Wednesday 1 June 2016

चालू घडामोडी : ३० मे

१. केरळच्या मुख्यमंत्रीपदी खालीलपैकी कोण विराजमान झाले आहे?
अ - पिनरई विजयन
ब - टी. पी. रामकृष्णन
क - वी एस अचथनंदन
ड - मर्कयकुट्टी अम्मा

२. वर्ल्ड ह्युमनीतरीन समिट (जागतिक मानवतावादी परिषद) कोणत्या देशामध्ये पार पडली?
अ - ईरान
ब - तुर्की
क - इस्राएल
ड - भारत

३. संयुक्त राष्ट्र संघाच्या औद्योगिक विकास अहवालामध्ये भारत कितव्या स्थानी विराजमान आहे?
अ - पहिल्या
ब - पाचव्या
क - सहाव्या
ड - दहाव्या

४. २०१६ चा मिलेनियम टेक्नोलॉजी पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे?
अ - बिल गेट्स
ब - टीम बर्नर्स-ली
क - स्टुअर्ट पार्किन
ड - फ्रांसिस अर्नाल्ड

५. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ़ बँक मॅनेजमेंट कोणत्या शहरामध्ये स्थित आहे?
अ - मुंबई
ब - नवी दिल्ली
क - पुणे
ड - कोलकाता

उत्तरे:
१. (अ) पिनरई विजयन, कम्मुनिस्ट पार्टी ऑफ़ इंडियाचे वरिष्ठ नेते पिनरई विजयन यांनी २५ मे रोजी केरळच्या मुख्य्मंत्रीपदाची शपथ घेतली. २०१६ विधानसभा निवडणुकीमध्ये ते धर्मदोम मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
२. (ब) तुर्की, पहिली वहिली जागतिक मानवतावादी परिषद तुर्कीची राजधानी इस्तांबुल येथे २३-२४ मे रोजी पार पडली.
३. (क) सहाव्या, यूनोच्या औद्योगिक विकास अहवालामध्ये भारत सहाव्या स्थानी आहे, ह्या अहवालामध्ये १० मोठया मैन्युफैक्चरिंग देशांचा समावेश होता. ह्या अहवालामध्ये चीन प्रथम स्थानी असून त्यापाठोपाठ अमेरिका, जापान. जर्मनी, कोरिया आहेत तर दहाव्या स्थानी इंडोनेशिया आहे.
४. (ड) फ्रांसिस अर्नाल्ड, अमेरिकन वैज्ञानिक आणि इंजीनियर प्रा. फ्रांसिस अर्नाल्ड ह्यांना २०१६ चा मिलेनियम टेक्नोलॉजी पुरस्कार मिळाला आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या 'डायरेक्टेड इवोल्यूशन' शोधासाठी मिळाला आहे. ह्याचसोबत १० लाख यूरो मिळविणार्य पहिल्या महिला ठरल्या आहेत. मिलेनियम टेक्नोलॉजी पुरस्कार टेक्नोलॉजी अकॅडमी फिनलॅंडतर्फे दर दोन वर्षांनंतर फिनलॅंडच्या राष्ट्र अध्यक्षांहस्ते दिला जातो.
५. (क) पुणे, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ़ बँक मैनेजमेंट पुण्यात स्थित असून १९६९ मध्ये स्थापना झाली आहे.

No comments:

Post a Comment