Thursday 29 September 2016

चालू घडामोडी: २० सप्टेंबर

१. शक्तिशाली टाइफून मालकस कोणत्या देशावर आदळले आहे?
उत्तर - जापान, टाइफून मालकस हे शक्तिशाली वादळ जापानच्या दक्षिण भागावर आदळले असून १८० किमी प्रती तास वेगाचे हे वादळ आहे. जापान सरकारने तब्बल ५ लाख लोकांना स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला आहे.
२. भारतीय अंतरराष्ट्रीय सागरी पदार्थ २०१६ हे प्रदर्शन कोणत्या शहरामध्ये पार पडले?
उत्तर - विशाखापट्टनम, २० वे इंडियन इंटरनॅशनल सीफ़ूड शो २०१६ २३ सप्टेंबरला आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथे पार पडले. 'सुरक्षित आणि शाश्वत भारतीय मच्छीमारी' हे यंदाची थीम होती. ह्या प्रदर्शनामध्ये २००० हून अधिक भारतीयांनी तर २०० हून अधिक परदेशी व्यक्तीनी सहभाग घेतला होता. हे प्रदर्शन भारतातील मच्छी व्यवसायिकांना, फिशरीज, उत्पादकांना आयात आणि निर्यात समाजाविण्यासाठी फ्लैटफॉर्म होते.
३. जागतिक बँकेअंतर्गत भारताच्या संचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - जुनैद अहमद, बांग्लादेशच्या जुनैद अहमद यांची जागतिक बैंकेअंतर्गत भारताच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची ही निवड ओन्नो रुहल यांच्याजागी करण्यात आली आहे. याआधी ते जागतिक बँकेच्या अध्यक्ष जिम योंग किम यांच्याअंतर्गत चीफ ऑफ स्टाफ होते.
४. ऋषिराज बरोट कोणत्या खेळाशी निगडित आहे?
उत्तर - नेमबाजी, ऋषिराज बरोट याने नुकतेच अज़रबैजान मधील गबाला येथे पार पडलेल्या २०१६ च्या आईएसएसएफ जूनियर वर्ल्ड कपमध्ये २५ मीटर फायर पिस्टल प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे.
५. २०१६ ची ब्रिक्स देशांतील कृषी आणि कृषी विकास मंत्र्यांची परिषद कोणत्या भारतीय शहरामध्ये पार पडली?
उत्तर - नवी दिल्ली, सहावी ब्रिक्स कृषी आणि कृषी विकास मंत्री परिषद नवी दिल्लीमध्ये २२ सप्टेंबर रोजी पार पडली. दोनदिवसीय परिषदेमध्ये शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काही ठोस निर्णय घेण्याचा प्रयन्त करण्यात आला. त्याचप्रमाणे शेतीविषयक माहितीची देवाणघेवाण, अन्नमलिका आणि लोकसंख्येला लक्षात घेता काही योजनांवर विचार करण्यात आला.
६. २०१६ ची फॉर्मूला वन सिंगापूर ग्रैंड प्रिक्स कोणी जिंकली आहे?
उत्तर - नीको रोसबर्ग, २०१६ ची फॉर्मूला वन सिंगापूर ग्रैंड प्रिक्स मर्सिडीज़ बेंज़च्या नीको रोसबर्गने जिंकली आहे. ही त्याच्या कारकिर्दीतील २२ चैंपियनशिप होती तर सिंगापुरमधील पहिली चैंपियनशिप. 

चालू घडामोडी : १८, १९ सप्टेंबर

१. २०१७ च्या वाइब्रेंट गुजरात ग्लोबल समिटसाठी कोणता देश भागीदार असेल?
उत्तर - अमेरिका, ८ व्या २०१७ च्या वाइब्रेंट गुजरात ग्लोबल समिटसाठी अमेरिका भागीदार असून ही परिषद ८-९ जानेवारी २०१७ मध्ये गांधीनगरच्या महात्मा मंदिरमध्ये भरविण्यात येणार आहे. ही परिषद मुख्यतः शाश्वत विकास आणि आर्थिक विकासासाठी असेल. ह्या परिषदेमध्ये दोन्ही देश आणि राज्यांतील सरकारी मंत्री, नेते, व्यावसायिक, वरिष्ठ अर्थतज्ञ, अंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख यांचा सहभाग असेल.
२. २०१६ ची राष्ट्रीय कामगार परिषद कोणत्या शहरामध्ये पार पडणार आहे?
उत्तर - भुबनेश्वर, ओडिशा सरकार आणि अंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांच्या सहयोगाने २०१६ ची राष्ट्रीय कामगार परिषद ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये २० सप्टेंबरला पार पडली. २ दिवसीय परिषदेमध्ये भारतातील संघटित आणि असंघटित कामगार यांच्याविषयीच्या समस्यांवर विचारविनिमयासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
३. डेमोक्रेट्स एंड डिस्सेन्टर्स पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - रामचंद्र गुहा, रामचंद्र गुहा डेमोक्रेट्स एंड डिस्सेन्टर्स पुस्तकाचे लेखक रामचंद्र गुहा असून १६ निबंधनाच्या पुस्तकामध्ये त्यांनी भारताचे शेजारील राष्ट्रांसोबत असलेले नाते, देशाअंतर्गत व्यक्ती स्वातंत्र्य यांचा उल्लेख केला आहे.
४. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - अलका सिरोही, निवृत्त आईएएस अधिकारी अलका सिरोही यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी २१ सप्टेंबर पासून आपल्या कार्याची धुरा हाती घेतली आहे.
५. शुभंकर प्रामाणिक कोणत्या खेळाशी निगडित आहे?
उत्तर - नेमबाजी, अज़रबैजानच्या गाबालामध्ये झालेल्या २०१६ च्या आईएसएसएफ पिस्टल जूनियर वर्ल्ड कपमध्ये ५० मीटर राइफल प्रकारामध्ये शुभंकर प्रामाणिक याने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याचप्रमाणे २५ मीटर स्टैण्डर्ड पिस्तौल प्रकारामध्ये संभाजी पाटील याने सुवर्ण पदक जिंकले.
६. अंतरराष्ट्रीय रक्त संक्रमण सोसायटीच्या प्रमुखपदी कोणत्या भारतीय वंशीय व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - रवी रेड्डी, दक्षिण आफ्रिकेत स्थित भारतीय वंशाच्या रवी रेड्डी यांची इंटरनॅशनल सोसाइटी फॉर ब्लड ट्रान्सफ्यूशनच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे. यासोबतच ह्या संस्थेच्या प्रमुखपदी निवड होणारे अफ्रीका खंडातील ते पहिले व्यक्ती आहेत. सध्या रेड्डी हे साउथ अफ्रीकन नॅशनल ब्लड सर्विसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. रक्त संक्रमणाबद्दल जागरूकता आणि संशोधन हे आईएसबीटीचे मुख्य कार्य असून तिचे मुख्यालय एम्स्टर्डममध्ये आहे. 

Thursday 22 September 2016

चालू घडामोडी : १७ सप्टेंबर

१. २०१६ च्या अर्जुन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - अजिंक्य रहाणे, अजिंक्य रहाणेला २०१६ च्या अर्जुन पुरस्काराने तर रोहीत शर्माला २०१५ च्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना हा पुरस्कार दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये देण्यात येईल.
२. यूनाइटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स एंड क्राइमच्या सदिच्छा दुतपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - नादिया मुराद, इस्लामिक स्टेट ह्या दहशवादी संघटनेच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घेतलेल्या नादिया मुराद बासी ताहाची यूनाइटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स एंड क्राइमच्या गुडविल अम्बेसेडरपदी नेमणूक करण्यात आली आहे. नादिया ही यज़ीदी लोकांची प्रतिनिधी असून २०१६ च्या नोबेल परितोषकासाठी नामांकित आहे.
३. २०१७ ची अफ्रीकन डेवलपमेंट बैंक ग्रुप मीटिंग कोणत्या देशामध्ये भरविण्यात येणार आहे?
उत्तर - भारत, भारताने नुकतेच अफ्रीकन विकास बँकेसोबत भारतातील अहमदाबादमधील महात्मा गांधी कन्वेंशन सेंटरमध्ये वार्षिक बैठक भारविण्यासाठी सामंजस्य करार केला असून ही बैठक २२ ते २६ मे २०१६ दरम्यान पार पडणार आहे. ही परिषद २०१७ मधील एक मोठी अंतरराष्ट्रीय बैठक असेल त्याचप्रमाणे ८० देशातील गवर्नर, पॉलिसी मेकर्स, अर्थविषतज्ञ असे ५००० प्रतिनिधी उपस्थित असतील.
४. २०१६ चा मारकोनी सोसाइटी पॉल बरन यंग स्कॉलर अवार्ड कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्तीला मिळाला आहे?
उत्तर - दिनेश भराड़िया, भारतीय वंशाचे वैज्ञानिक दिनेश भराड़िया यांना प्रतिशिष्ठ मार्कोनी सोसायटी पॉल बरन पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. त्यांना हा पुरस्कार, रेडियो वेव्सचे एकाच चॅनेलमधून देवाणघेवाण करण्यासाठी मिळाला आहे. हा पुरस्कार नोबेल परितोषिका इतकाच प्रतिशिष्ठ असून ४००० डॉलर देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
५. कोणत्या देशाने तिआनगोंग-२ ह्या अवकाश प्रयोगशाळेचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे?
उत्तर - चीन, अवकाश तंत्रज्ञानाचा आणि मेडिकल त्याचप्रमाणे अवकाशामध्ये प्रयोग करण्यासाठी चीनने तिआनगोंग-२ चे प्रक्षेपण केले आहे. गोबीच्या वाळवंटामध्ये असलेल्या जिउकुआन उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून लॉन्ग मार्च २-फ टी२ रॉकेटद्वारे त्याचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
६. शक्तिशाली टाइफून मेरांतीने कोणत्या देशाचे जनजीवन विस्कळीत केले आहे?
उत्तर - चीन, चीनच्या फुजियान राज्यामध्ये १७३किमीप्रतीतास वाहणाऱ्या टाइफून मेरांतीने धडक दिली असून २०१६ मधील आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली वादळ होते. ह्या वादळाला फिलिफिंसमध्ये टाइफून फड़िए असेही संबोधिले जाते. फुजियान राज्यामध्ये प्रवेश करण्याआधी हे वादळ दक्षिण तैवान आणि चिनच्या इतरही भागात धडकले होते. 

Tuesday 20 September 2016

चालू घडामोडी : १६ सप्टेंबर

१. २०१५ च्या राष्ट्रीय मानवी पुरस्कारा (नॅशनल हयूमैनिटिज़ मैडल) साठी कोणत्या भारतीय-अमेरिकन लेखकाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - अब्राहम वेर्घीज़, अब्राहम वेर्घीज़ यांची २०१५ च्या नॅशनल हयूमैनिटिज़ मैडलसाठी निवड करण्यात आली आहे. २१ सप्टेंबर रोजी त्यांना हा पुरस्कार अमेरिकेतील वॉशिंगटनमध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार व्यक्ती किंवा समूहाला प्रदान करण्यात येतो.
२. इंदिरा गांधी कृषी विश्वविदयालय कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे?
उत्तर - छत्तीसगढ़, एग्रीकल्चर म्यूजियमने छत्तीसगढ़मधील रायपुरमध्ये  इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालयाचे उद्धघाटन केले आहे. त्याचप्रमाणे ह्यप्रकारचे हे भारतातील पहिले कृषी विद्यापीठ आहे. ग्रामीण भागातील लोकांना शेती पद्धती, शेतीविषक समस्या आणि त्यांचे उपाय देणे यामागचे मुख्य उदिष्ट आहे. त्याचप्रमाणे छत्तीसगढ़मधील शेती आणि आदिवासी संस्कृतीचे प्रदशन करणे हेही असेल.
३. 'शांति की तलाश मैं जिंदगी' पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?
उत्तर - राधिका नागरथ, हरिद्वारच्या लेखिका आणि पत्रकार राधिका नागरथ यांनी शांति की तलाश मैं जिंदगी पुस्तकाचे लेखन केले आहे. त्याने ही पुस्तक साध्या तात्विक भाषेमध्ये लिहले असून त्यांना जोड म्हणून दररोजच्या जीवनातील किस्सयांची जोड दिली आहे. ह्या पुस्तकाचे प्रकाशन उत्त्तराखंडच्या राज्यपाल के के पॉल यांच्या हस्ते करण्यात आले.
४. रामकुमार रामनाथन कोणत्या खेळाशी निगडित आहे?
उत्तर - टेनिस, रामकुमार रामनाथन हा भारतीय टेनिस खेळाडू असून डेविस कपच्या एकेरी प्ले ऑफमध्ये त्याची लढत १४ वेळा ग्रैंड स्लैम विजेत्या राफेल नदलसोबत होणार आहे.
५. ओज़ोन थराच्या रक्षणासाठी अंतरराष्ट्रिय दिन साजरा केला जातो त्यासाठीची यंदाची थीम काय आहे?
उत्तर - ओज़ोन एंड क्लाइमेट: रेस्टोर बाय ए वर्ल्ड यूनाइटेड, ओजोन थराच्या रक्षणासाठी १९८७ पासून मोंटेरल प्रोटोकॉलनुसार दरवर्षी १६ सप्टेंबरला अंतरराष्ट्रीय प्रिजर्वेशन दिन साजरा केला जातो.
६. डाळींच्या पुरवठ्यामध्ये आलेल्या तूटीला हाताळण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली आहे?
उत्तर - अरविंद सुब्रमनियन समिती, डाळींच्या पुरवठ्यामध्ये आलेल्या तूटीला हाताळण्यासाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून तिचे प्रमुख मुख्य आर्थिक सल्लागार अरविन्द सुब्रमनियन आहेत. ही समिती आपला अहवाल अर्थमंत्री अरुण जेठली यांना देणार आहे. ही समिती डाळींसाठी मिनिमम सपोर्ट प्राइस, डाळ उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बोनस हे विषय देखील हाताळणार आहे. 

Monday 5 September 2016

चालू घडामोडी : १५ सप्टेंबर

१. २०१६ ची दुलीप क्रिकेट टूर्नामेंट कोणी जिंकली आहे?
उत्तर - इंडिया ब्लू, ५५ वी २०१६ ची दुलीप क्रिकेट टूर्नामेंट इंडिया ब्लू संघाने जिंकली आहे. नोएडामध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये इंडिया ब्लूने इंडिया रेडचा ३५५ धावांनी पराभव केला. ही पहिला क्रिकेट मालिका होती जी डे/नाईट आणि गुलाबी बॉलने खेळली गेली.
२. २०१६ ची नॉन अलायंग मूवमेंट परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - वेनेज़ुएला, १७ वी २०१६ ची नॉन अलायंग मूवमेंट परिषद वेनेज़ुएलाच्या मार्गरिटा आइलैंड मध्ये १७-१८ सप्टेंबर रोजी पार पडली. ही परिषद जगातील दूसरी सर्वात मोठी परिषद असून भारत ह्या परिषदेचा संस्थापक सदस्य आहे. ह्या परिषदेची स्थापना ५५ वर्षांपूर्वी २५ विकसशील देशातील नेत्यांनी केली होती, ह्या नेत्यांमध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू देखील होते. पहिली परिषद १९६१ मध्ये झाली होती.
३. अरुणाचल प्रदेशचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
उत्तर - व्ही शंमुगनाथन, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून व्ही शंमुगनाथन यांनी शपथ ते सध्या मेघालय राज्याचे राज्यपाल असून त्यांना अरुणाचलचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.
४. स्वच्छ भारत अभियानाच्या मैस्कॉट म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - कुंवर बाई, १०५ वर्षाच्या कुंवर बाई यांची स्वच्छ भारत अभियानाच्या मैस्कॉट म्हणून निवड करण्यात आली आहे. स्वतःच्या शेळ्या विकून त्यांनी गावामध्ये शौचालये बांधून दिली आहेत. १७ सप्टेंबर २०१६ रोजी मोदींनी स्वच्छता दिवस साजरा केला आणि त्यांची निवड ही केली.
५. कोणत्या भारतीय व्यक्तीला ज्यूइश मानाधिकार संघटनने मानवतावादी पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे?
उत्तर - श्री श्री रवी शंकर, आध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांना ज्यूइश मानवाधिकार संघटनने मानतावादी पुरस्कार देऊन करणार आहे. ते आर्ट ऑफ़ लिविंगचे संस्थापक असून  त्यांनी त्यामार्फत लोकांमध्ये सहिष्णुता, मानवतावाद, एकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. २१ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांना साइमन वीएसएंथल सेंटरच्या 'दी साइमन वीएसएंथल ह्यूमैनिटेरिअन लॉरेट' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
६. निसर्गाचे सहकारी (फेलोस ऑफ नेचर) दक्षिण आशयाई लघुकथा पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर - मेघना पंत, मेघना पंत यांना फेलोस ऑफ नेचर दक्षिण आशयाई लघुकथा पुरस्काराने ऑक्टोबर २०१६ मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या 'पीपल ऑफ़ दी सन' या लघुकथेसाठी मिळणार आहे. हा पुरस्कार फ्रेंच इंस्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या सहयोगाने दिला जातो. निसर्गाचे होणारे नुकसान साहित्याच्या माध्यमातून लोकांच्या नजरेत यावे यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. 

Saturday 3 September 2016

चालू घडामोडी : २५ ऑगस्ट

१. केंद्र सरकारने दिव्यांग जनतेसाठी केंद्र सरकारने कोणती ई-लायब्रेरी सुरु केली आहे?
उत्तर - सुगम्य पुस्तकालय, प्रधानमंत्री सुगम्य भारत आभियानाअंतर्गत केंद्र सरकारने सुगम्य पुस्तकालय ही ई-लायब्रेरी सुरु केली आहे. ही ऑनलाइन लाइब्रेरी असून दिव्यांग व्यक्ती कोणत्याही प्रकाशकाचे कोणत्याही भाषेतील पुस्तक वाचू शकते आणि ही पुस्तके वेगवेगळ्या फॉर्मेट्समध्ये उपलब्ध आहेत. ह्या पुस्तकालयामध्ये विविध भाषेतील मिळून २ लाखाहून अधिक पुस्तके आहेत. ही ऑनलाइन लाइब्रेरी बुकशेयर आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ विसुअली हैंडीकैप्ड, मेंबर आर्गेनाईजेशन ऑफ डेज़ी फोरम ऑफ इंडियाच्या सहकार्यातून सुरु करण्यात आली आहे.
२. के के श्रीधरन नायर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - पत्रकारिता, के के श्रीधरन यांचे नुकतेच केरळमधील कोची येथे निधन झाले ते ८६ वर्षाचे होते ते मातृभूमी मासिकाचे संपादक होते.
३. डॉ. ए आर किडवाई यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या कार्यक्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - राजकारण, डॉ. अख़लाक़ उर रहमान किडवाई यांचे नुकतेच निधन झाले ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते, खासदार आणि प्रशासक होते. त्याचप्रमाणे ते बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थान राज्यांचे माजी  होते त्याचप्रमाणे त्यांना २०११ मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.
४. दक्षिण भारतातील पहिले अल्पवयीन मुलांसाठी असलेले चिल्ड्रन कोर्ट कोणत्या शहरामध्ये सुरु करण्यात आले आहे?
उत्तर - हैद्राबाद, अल्पवयीन मुलांसाठी असलेले दक्षिण भारतातील चिल्ड्रन कोर्ट हैद्राबादमधील नामपल्ली क्रिमीनल कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये सुरु करण्यात आली आहे. अशा प्रकारचे भारतातील हे सहावे कोर्ट असून मुलांसाठी वेगळी वेटिंग रूम, आरोपीसाठी वेगळी व्हिडीओ ट्रायल रम यांची सोय आहे.
५. भारताने कोणत्या शेजारील देशातील श्रोत्यांसाठी आकाशवाणी मैत्री हा नवीन चैनल सुरु केला आहे?
उत्तर - बांग्लादेश, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कलकत्ता राजभवनामध्ये बंगाली श्रोत्यांसाठी आकाशवाणी मैत्री चैनल सुरु केला आहे. हा चैनल ऑल इंडिया रेडियोच्या माध्यमातुन सुरु करण्यात आला असून भारत आणि बांग्लादेश मधील सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि नैतिक दूरी कमी होण्यासाठी सुरु करण्यात आला आहे.
६. रिओ २०१६ मध्ये भारतीय नेमबाजांचा झालेल्या बोजवाऱ्यावर नॅशनल राइफल एसोसिएशन ऑफ इंडिया कमिटी स्थापन करण्यात आली आहे तिच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - अभिनव बिंद्रा, रिओ २०१६ मध्ये भारतीय नेमबाजांचा बोजवारा झाला त्यासाठी ५ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून अभिनव बिंद्रा हा ह्या समितीचा अध्यक्ष आहे. अभिनव बिंद्रा हा भारतीय संघाचा सदस्य होता, तो प्रत्येक नेमबजाला प्रश्न विचारुन त्यांची मुलाखत घेणार आहे. त्यानंतर ही समिती भविष्यातील ओलंपिक्ससाठी आपले बदल आणि अहवाल सादर करेल.
७. २०१६ च्या भारतीय अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणता देश फोकस्ड देश असेल?
उत्तर - दक्षिण कोरिया, ४७ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया २०१६ मध्ये दक्षिण कोरिया हा देश फोकस्ड देश असेल. यादरम्यान दक्षिण कोरियाचे चित्रपट आणि चित्रपट व्यक्तिमत्व उपस्थित राहतील. हा महोत्सव नोव्हेम्बर मध्ये गोव्यात पार पडणार आहे. 

चालू घडामोडी : २४ ऑगस्ट

१. बिश्वेश्वर नंदी यांची २०१६ च्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, ते कोणत्या खेळाशी निगडित आहेत?
उत्तर - जिमनास्टिक्स, २०१६ चा द्रोणाचार्य पुरस्कार ६ प्रशिक्षकांना प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये दीपा करमकरचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी, विराट कोहलीचे गुरु राजकुमार शर्मा, नागपुरी रमेश (एथेलेटिक्स), सागर माल धायल (बॉक्सिंग), एस प्रदीप कुमार (पोहणे), महाबीर सिंग (कुस्ती) यांचा समावेश आहे. यासोबतच ह्या पुरस्कारांसोबत १५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार तर ३ ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
२. ओ पी जैशा कोणत्या खेळाशी निगडित आहे?
उत्तर - अथेलेट, केरळची असणारी भारतीय धावपटू ओ पी जैशा हीने भारतीय ओलिंपिक अधिकाऱ्यांवर आरोप केल्यामुळे नुकतीच चर्चेमध्ये होती. रिओमध्ये रेस दरम्यान तिला कोणत्याही प्रकारचे पाणी, एनर्जी ड्रिंक उपलब्ध नसल्यामुळे ती ट्रैकवार पडली. ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी खेळ मंत्रालयाने ओंकार केडिया, विनायक नारायण ही दोन-सदस्यीय समिती नेमली आहे. ती समिती ७ दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करेल.
३. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयासोबत १० नॉन-फंक्शनल रिजनल विमानतळांसाठी कोणत्या राज्याने करार केला आहे?
उत्तर - महाराष्ट्र, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयासोबत १० नॉन-फंक्शनल रीजनल विमानतळांसाठी करार महाराष्ट्र राज्य सरकारने केला असून असे करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. सामान्य जनतेला विमान प्रवास परवडणारा आणि सोयीस्कर व्हावा यासाठी मंत्रिमंडळाने जून २०१६ मध्ये नॅशनल सिविल एविएशन पॉलिसी केली होती ह्याअंतर्गतच विमानतळांची निर्मिती करण्यात येणार आहे. ह्या विमानतळांमध्ये कोल्हापूर, शिर्डी, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड़, सोलापुर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग यांचा समावेश आहे. ह्या प्रकल्पामध्ये राज्य सरकार २०% गुंतविणार असून बाकी केंद्र सरकार मदत करेल.
४. व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे?
उत्तर - जर्मनी, व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भारताने जर्मनीसोबत करार केला आहे. ह्या कराराअंतर्गत जर्मन टेक्नलॉजीचा वापर करून भारतीय आणि जर्मन कंपन्यांदरम्यान भागीदारी करून स्थानिक प्रशिक्षण संस्था, उद्योगांमध्ये लिंकेज वाढवून भारतीय उद्योगांना चालना देने.
५. जगातील सर्वात मोठी इंडोर थीम पार्क कोणत्या शहरामध्ये सुरु करण्यात आली आहे?
उत्तर - दुबई, जगातील सर्वात मोठे इंडोर थीम पार्क यूनाइटेड अरब इमिरतीमधील दुबई शहरामध्ये सुरु करण्यात आली आहे. आईएमजी वर्ल्ड ऑफ़ एडवेंचर ही सर्वात मोठी इंडोर थीम पार्क दुबईमध्ये येणाऱ्या प्रवाश्यांना आकर्षक करण्यासाठी उभारण्यात आली आहे.
६. पहिला ब्रिक्स फिल्म फेस्टिवल कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे?
उत्तर - भारत, पहिली ब्रिक्स फिल्म फेस्टिवल भारतामध्ये नवी दिल्लीतील सिरीफोर्ट ऑडिटोरियम कॉम्प्लेक्समध्ये २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. ब्रिक्स देशांमधील सदस्य देशांमधील कलाकार, चित्रपट, संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून सर्वोत्कृष्ट चित्रपटांना, कलाकारांना, निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.