Monday 30 January 2017

चालू घडामोडी : १७ जानेवारी

१. "नागालँड हेल्थ प्रोजेक्ट"साठी जागतिक बँकेने किती कर्ज रक्कमेला मंजुरी दिली आहे?
उत्तर - ४८ दशलक्ष डॉलर्स, भारत सरकारने नुकतेच नागालैंड हेल्थ प्रोजेक्टसाठी जागतिक बँकेसोबत ४८ दशलक्ष डॉलर्सच्या करारावर स्वाक्षरी केली आहे? ह्या प्रकल्पा अंतर्गत नागालैंडमधील ६ लाख लोकांना फायदा होणार आहे. नागालैंडमधील लोकांचा स्वास्थ दर्जा उंचविणे हा ह्या प्रकल्पाच्या मुख्य हेतू आहे. हा प्रकल्प ३१ मार्च २०२३ रोजी पर्यंत चालू असेल.
२. इंटरनॅशनल मॉनेट्री फण्डच्या "वर्ल्ड इकॉनोमिक आउटलुक"अहवालानुसार भारताचा २०१७ मधील जीडीपी दर काय असेल?
उत्तर - ६.६%, आईएमफच्या वर्ल्ड इकॉनोमिक आउटलुक अहवालानुसार भारताचा २०१७ चा जीडीपी दर ६.६% असेल जो आधी ७.६% होता. मोदी सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे हा परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे ह्या अहवालानुसार २०१७-१८ मध्ये भारताचा जीडीपी ७.२% असेल तर २०१८-१९ मध्ये ७.७% असेल.
३. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारतातील कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात येणार आहे?
उत्तर - गुजरात, जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम गुजरामधील अहमदाबादमधील मोटेरामध्ये बांधण्यात येणार असून ह्या स्टेडियमची बैठक क्षमता १.१ लाख लोकांची असेल. पॉपुलॉस कंपनीने ह्या स्टेडियमचे डिजाइन बनविले असून लार्सेन एंड टूब्रो हे स्टेडियम ७०० कोटी ख़र्च करुण बांधणार आहे. जुने मोटेरा स्टेडियम पाडून त्या ठिकाणी ६३ एकर जागेमधे बांधले जाणार आहे.

४. २०१७ च्या ग्लोबल टैलेंट कॉम्पेटेटिवनेस इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
उत्तर - ९२ व्या, २०१७ च्या ग्लोबल टैलेंट कॉम्पिटेटिवनेस इंडेक्स मध्ये भारत ११८ देशांपैकी ९२ व्या स्थानी आहे. ह्या क्रमवारीमध्ये देशाची वाटचाल, आकर्षण शक्ति आणि टैलेंट जमा करण्याच्या क्षमतेचा विचार केला जातो. ह्या अहवालामध्ये स्विट्ज़रलैंड अव्वलस्थानी असून सिंगापुर, यूनाइटेड किंगडम, अमेरिका, स्वीडन आणि ऑस्ट्रेलिया त्या खालोखाल आहेत.
५. २०१७ ची भारतीय अंतरराष्ट्रीय गारमेंट महोत्सव कोणत्या शहरामध्ये पार पडला?
उत्त्तर - नवी दिल्ली, ५८ वी भारतीय अंतरराष्ट्रीय गारमेंट महोत्सव १८ ते २० जानेवारी दरम्यान नवी दिल्लीमध्ये पार पडला. हा कार्यक्रम अप्पेरल एक्सपोर्ट प्रमोशन कौंसिलने आयोजित केला होता. आईआईजीएफ ही आशियामधील सर्वात मोठा फ्लेटफॉर्म आहे जेथे परदेशी ग्राहक भारतीय कंपन्यांसोबत देवाण-घेवाणविषयी करार करतात. ह्या कार्यक्रमामध्ये १४ भारतीय राज्यांमधील ३१२ कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
६. स्वातंत्र्यसेवक मोहनसिंग जोसन यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्याचे होते?
उत्तर - राजस्थान, स्वातंत्र्यसेवक मोहनसिंग जोसन यांचे नुकतेच निधन झाले ते राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यातील होते. त्यांचा १९४२ मध्ये झालेल्या भारत छोडो (ऑगस्ट क्रांती) आंदोलनामध्ये सहभाग होता.
७. प्रसार भारतीच्या अंतरिम मुख्यकार्यकारी अधिकारी पदी कोणाची नेमणूक होणार आहे?
उत्तर - राजीव सिंग, प्रसार भारतीचे नवीन अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजीव सिंग यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्याचे एस सी पंडा फेब्रुवारी २०१७ मध्ये निवृत्त होणार असून नोवेम्बर २०१६ पासून प्रसार भारतीचे ते अंतरिम कार्यकारी अधिकारी आहेत. 

Sunday 29 January 2017

चालू घडामोडी : १५-१६ जानेवारी

१. कैशलेस व्यावहारांना चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने "डिजिटल डाकिया" योजना सुरु केली आहे?
उत्तर - मध्य प्रदेश, कैशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने इंदौर जिल्यामध्ये "डिजीटल डाकिया" योजनेचे अनावरण केले आहे. ह्या योजने अंतर्गत डिजीटल पोस्टमैन राज्यांतर्गत विविध ठिकांणाना भेटी देऊन कैशलेस व्यवहारांबाबत माहिती देतील. त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना ओळखपत्र दिले जाईल.
२. २०१६-१७ रणजी करंडक कोणत्या संघाने जिंकला आहे?
उत्तर - गुजरात, गुजरात संघाने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतला पहिलाच रणजी करंडक यावर्षी जिंकला आहे. इंदौरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये गुजरातने महाराष्ट्राचा ५ गडी राखून पराभव केला. २०१६-१७ रणजी मालिका ८३ वी रणजी मालिका होती.
३. इजराइल आणि पैलेस्टाइन दरम्यान होणाऱ्या अंतरराष्ट्रीय शांतता परिषद कोणत्या शहरामध्ये पार पडेल?
उत्तर - पेरिस, इजराइल आणि पैलेस्टाइन देशादरम्यान होणारी अंतरराष्ट्रीय शांतता परिषद फ्रांसच्या पेरिस शहरामध्ये पार पडणार असून ह्या परिषदेला तब्बल ७० देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हे सर्व देश निष्कर्ष ऐकण्यासाठी येणार आहेत.

४. खेलो इंडिया ह्या राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आले?
उत्तर - नवी दिल्ली, केंद्रीय खेलमंत्री विजय गोयल यानी १४ आणि १७ वर्ष वयोगटाखालील खेळाडूंसाठी नवी दिल्लीच्या डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी स्विमिंग पूल कॉम्प्लेक्समध्ये खेल इंडिया स्पर्धेचे उद्घाटन केले. राष्ट्रिय स्तरावर खेळाडूंमध्ये स्पर्धा निर्माण करण्यासाठी ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेमध्ये २५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील १००० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा जानेवारी, फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडणार आहे. दिल्लीमध्ये ही स्पर्धा स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ़ इंडियाने आयोजित केली असून पोहणे, सायकलिंग, कुस्ती हे खेळ असून नेल्लोरमध्ये कबड्डी, खो-खो तर गुवाहाटीमध्ये वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, टेबल टेनीस गांधीनगरमध्ये हैंडबॉल, हॉकी तर  चेन्नईमध्ये कराटे, फुटबॉल, वॉलीबॉल तर हैद्राबादमध्ये बैडमिंटन, बास्केटबॉल होणार आहेत.
५. आईआईटीमध्ये मूलींसाठी राखीव जागा असावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली आहे?
उत्तर - टिमोथी गोनसाल्वेस समिती, महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींच्या संख्येमध्ये सतत होणाऱ्या घटीमुळे प्रो. टिमोथी गोनसाल्वेस यांच्या समितीने आईआईटीमध्ये मुलींसाठी राखीव जागा असाव्यात अशी शिफारस केली आहे.
६. सुरजीत सिंह बरनाला यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते?
उत्तर - पंजाब, पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुरजीत सिंग बरनाला यांचे नुकतेच चंडीगड़ येथे निधन झाले ते ९१ वर्षाचे होते. २००० साली निर्मित झालेल्या उत्तराखंड राज्याचे ते पहिले राज्यपाल होते त्याचप्रमाणे आंध्र प्रदेश, ओडिशा, तमिळनाडु राज्यांचे राज्यपालपद ही त्यांनी भूषवले आहे.
७. २०१७ ची वोडाफोन प्रीमियर  बॅडमिंटन लीग कोणत्या संघाने जिंकली आहे?
उत्तर - चेन्नई स्मैशर्स, नवी दिल्लीच्या सीरी फोर्ट कॉम्प्लेक्समध्ये पार  पडलेल्या वोडाफोन बॅडमिंटन प्रीमियर लीग चेन्नई स्मैशर्स संघाने जिंकली, अंतिम लढतीमध्ये चेन्नईने मुंबई रॉकेटसचा ४-३ असा पराभव केला. 

Tuesday 24 January 2017

चालू घडामोडी : १३ - १४ जानेवारी

१. टाटा सन्सच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - नटराजन चंद्रशेखरन, टाटा कंसलटेंसी सर्विसेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. ते टाटा समूहाचे पहिले गैर -पारशी अध्यक्ष असणार असून २१ फेब्रुवारी २०१७ पासून ते आपल्या कामाचा कार्यभार स्विकारणार आहेत. ह्याआधी सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे अध्यक्ष होते. चंद्रशेखरन हे नोवरोजी सक्लटवाला, सायरस मिस्त्री यांच्यानंतर तीसरे गैर-टाटा अध्यक्ष आहेत.
२. "आदित्या" भारतातील पहिली सौर-ऊर्जेवर चालणारी बोटचे कोणत्या राज्यामध्ये अनावरण करण्यात आले आहे?
उत्तर - केरळ, भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणाऱ्या बोटीचे अनावरण नुकतेच केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी वेम्बनाड लेक, कोची येथे केले. ही बोट ७५ सिट्सची असून बोटीच्या छतावर ७८ सोलर पॅनेल आहेत. ही बोट वैकोम ते थवनक्कादवु दरम्यान प्रतिदिन २२ फेऱ्या मारेल. सदर अंतर २. किमीचे असून बोट ७.५ नॉट्सच्या वेगाने धावेल. ही बोट कोचीच्या नावल्टी कंपनीने बनविली आहे.
३. जगातील पहिले लिंग साहित्य संमेलन कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे?
उत्तर - भारत, जगातील पहिले लिंग साहित्य संमेलन बिहारमधील पाटन्यामध्ये एप्रिल २०१७ च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पार पडणार आहे. बिहारचे महिला विकास महामंडळ ह्या संमेलनाचे आयोजन करणार आहे. बिहारमध्ये महिला सशक्तीकरण त्याचप्रमाणे लिंग समानता यांना वाव देण्यासाठी मदत करणार आहे.

४. छाबरा औष्णिक वीज निर्मिती केंद्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?
उत्तर - राजस्थान, छाबरा औष्णिक वीज निर्मिती केंद्र राजस्थानमधील बारन जिल्ह्यातील चौकी मोतीपुरा गावामध्ये वसले आहे. २६५० मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प असून १२ व्या पंचवार्षिक योजनेच्या समाप्तीपर्यंत पूर्ण होईल.
५. अटलांटिक ओशियन ह्या विचार गटाचे मुख्यालय कोणत्या शहरामधे आहे?
उत्तर - वाशिगटन, अटलांटिक ओशियन ह्या विचार गटाचे मुख्यालय अमेरिकेतील वाशिंगटन डी सी येथे असून विधायक नेतृत्वाला प्रोत्साहन देणे हे ह्या संस्थेचे काम आहे. कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांची अटलांटिक ओशियनच्या वरिष्ठ सहकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.
६. "ऐन अनसूटेबल बॉय" हे आत्मचरित्र्य कोणत्या भारतीय व्यक्तीचे आहे?
उत्तर - करण जोहर, "ऍन अनसूटेबल बॉय" हे आत्मचरित्र्य चित्रपट निर्माता करण जोहरचे असून प्रामाणिक, व्ययक्तिक, मनमिळावू आणि चित्रपट निर्माता करण जोहरवर आधारित आहे.