Sunday 28 July 2013

महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचे राजकीय स्वरुप:
  • १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्रात २६ जिल्हे, २३५ तालुके, २८९ शहरे व ३,५७७ खेडी होती. त्याचप्रमाणे मुंबई (कोकण), पुणे, औरंगाबाद, नागपुर हे चार प्रशासकीय विभाग होते
  • सध्या महाराष्ट्राचे सहा प्रशासकीय विभाग आहेत. सुलभ प्रशासनासाठी नाशिक व अमरावती हे दोन नविन प्रशासकीय विभाग निर्माण केले आहेत. तर कालांतराने कुलाबा जिल्ह्याचे नामांतर रायगड करण्यात आले
  • त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग, जालना, गडचिरोली, लातूर, मुंबई उपनगर असे पाच नवीन जिल्हे उदयास आले.
  • सर्वप्रथम रत्नागिरी जिल्हा विभाजून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केली तर चंद्रपुर जिल्हा विभाजुन गडचिरोली जिल्हा निर्माण केला, त्यानंतर औरंगाबाद विभाजुन जालना तर उस्मानाबाद विभाजुन लातूर असे ३० जिल्हे निर्माण केले गेले
  • मुंबई जिल्हा विभाजुन मुंबई उपनगर हा ३१ वा जिल्हा अस्तिवात आला
  • १ जुलै १९९८ रोजी धूले जिल्ह्याचे विभाजन होउन नंदुरबार तर अकोला विभाजुन वाशिम असे महाराष्ट्रात ३३ जिल्हे झाले
  • मे १९९९ मध्ये परभणी विभाजुन हिंगोली तर भंडारा विभाजुन गोंदिया हे जिल्हे निर्माण केले, 
  • सध्या महाराष्ट्रात ३५ जिल्हे आहेत, तर ३५८ तालुके आहेत
  • २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ४३,६६४ खेडी तर ५३५ शहरे आहेत, २३ महानगरपालिका तर २२६ नगरपालिका आहेत. त्याचप्रमाणे ७ केन्टोमेंट बोर्ड्स आहेत

Sunday 21 July 2013

भारतीय राज्यपद्धती

भारतीय राज्यघटनेतील कलमे व त्या अंतर्गत असलेल्या तरतुदी:

राष्ट्रपती संदर्भात कलमे:
कलम ५२  - देशाचे राष्ट्रपती पद
कलम ५४  - निवाडणुक पद्धत
कलम ५६  - कार्यकाल
कलम ५८  - पात्रता
कलम ५९  - कार्यकालाच्या अटी
कलम  ६०  - शपथ
कलम  ६१  - महाभियोग
कलम ७२  - दयेचा अधिकार
कलम ७८  - राष्ट्रपतीस माहीती / अहवाल पुरविणे पंतप्रधानाचे कर्त्तव्य
कलम ८७  - अभिभाषण
कलम १२३ - वटहुकुम काढणे
कलम १४३ - सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागणे

राज्यसभा:
कलम ८०  - राज्यसभा
कलम ८९  - राज्यसभेचे वरिष्ट सभापती व उपसभापती
कलम ९०  - उपसभापतिंची हकालपट्टी किंवा राजीनामा देणे
कलम ९२  - सभापती व उपसभापतिंची हकालपट्टीची चर्चा चालू असताना त्यामध्ये ते अध्यक्ष नसतात

लोकसभा:
कलम ८१  - लोकसभा
कलम ९३  - लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष
कलम ९४  - अध्यक्ष, उपाध्यक्ष नेमणूक, हकालपट्टी व राजीनामा
कलम ९६  - अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हकालपट्टीची चर्चा चालू असताना त्यामध्ये ते अध्यक्ष नसतात

राज्यपाल:
कलम १५२ - राज्याची व्याख्या
कलम १५३ - राज्याचे राज्यपाल
कलम १५४ - राज्याचे कार्याकारी अधिकारी
कलम १५५ - नेमणूक
कलम १५६ - कार्यकाल
कलम १५९  - शपथ

राज्य विधिमंडळ:
कलम १६८  - राज्यातील विधिमंडळ घडन
कलम १६९  - राज्यांमध्ये विधान परिषद् निर्माण किंवा रद्द करण्याबाबत
कलम १७० - विधानसभांची रचना
कलम १७१ - विधान परिषद रचना
कलम १७२ - कार्यकाल
कलम १७८ - अध्यक्ष व उपाध्यक्ष
कलम १७९ - हकालपट्टी व राजीनामा

सर्वोच्च न्यायालय:
कलम १२४ - सर्वोच्च न्यायालयाची स्थापना
कलम १४८ - वापरावयाची भाषा

उच्च न्यायालय:
कलम २१४ - राज्यासाठी उच्च न्यायालयाची स्थापना
कलम २३० - उच्च न्यायालयाचे केन्द्रशासित प्रदेशाकरीता अधिकारक्षेत्र वापरणे
कलम २३१ - राज्यासाठी संयुक्त उच्च न्यायालय

Tuesday 9 July 2013

भारतीय राज्यपद्धाती

जगातील इतर राज्य घटनांचा भारतीय राज्यघटनेवरील प्रभाव:

 १. इंग्लंड / युनायटेड किंगडम:
    १. राष्ट्राध्यक्ष / राष्ट्रपती
    २. मंत्रीमंडळ पद्धती
    ३. द्विगृही सभागृह
    ४. लोकसभा अध्यक्ष
    ५. कनिष्ट सभागृह अधिक शक्तिशाली

२. अमेरिका:
    १. लिखित संविधान
    २. राष्ट्राचा मुख्य कार्याकारी अधिकारी - राष्ट्रपती व तिन्ही दलांचा सुप्रीम कमांडर
    ३. उप राष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती
    ४. सुप्रीम कोर्ट
    ५. राज्य निर्मितीची तरतूद
    ६. प्रस्ताविना
    ७. मूलभूत अधिकार

३. रशिया:
     १. मूलभूत कर्तव्ये
     २. पंचवार्षिक योजना

४. ऑस्ट्रेलिया:
     १. समवर्ती सूची
     २. प्रस्ताविनेची भाषा
     ३. व्यापार, वाणिज्य व परस्परसंबंध याविषयी तरतूद

५. केनाडा:
     १. संघराज्याची संकल्पना
     २. केंद्र व राज्यांमध्ये शक्ती विभाजन आणि सर्वाधिक शक्ती केंद्राकडे

६. आयर्लंड:
     १. मार्गदर्शक तत्त्वांची संकल्पना
     २. राष्ट्रपती निवडणुक पद्धत
     ३. राज्यसभेमध्ये राष्ट्रपतीद्वारे सदस्य नियुक्ती

७. जर्मनी:
     १. आणिबाणीची तरतूद जर्मनीतील वायमर प्रजकसत्तेच्या घटनेवर आधारित

८. दक्षिण अफ्रीका:
     १. घटना दुरुस्तिची संकल्पना

९. भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्कांची संकल्पना अमेरिकन स्वातंत्रयुद्धाचा जाहीरनामा व फ्रांसच्या जनतेने मिळवलेली स्वंतत्रची सनद यावर आधारित