Thursday 1 May 2014

जागतिक बँकेने भारताला जगातील तीसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था घोषित केली

कोणाला: भारताला
कोणी: जागतिक बँकेने
कधी: एप्रिलच्या चौथ्या आठवड्यामध्ये

जागतिक बँकेने एप्रिल २०१४ च्या चौथ्या आठवड्यामध्ये एक रिपोर्ट सादर केला त्यामध्ये भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था घोषित केले आहे
जागतिक बँकेच्या ह्या रिपोर्टनुसार भारताने जपानला पाठीमागे टाकत अमेरिका आणि चीन पाठोपाठ जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणाच्या स्थान पटकावले आहे. जागतिक बँकेने संबंधित देशातील नागरिकांची 'खरेदी क्षमता' ह्या आधारावर हा रिपोर्ट तयार केला आहे
ह्या रिपोर्टमध्ये वर्ष २००५ आणि वर्ष १०११ ही वर्षे केंद्र बिंदू मानून विविध देशातील नागरिकांची खरेदी क्षमतेचे तुलनात्मक अध्ययन केले आहे. ह्या रिपोर्टनुसार वर्ष २००५ मध्ये भारत १० व्या स्थानावर होता परंतु २०११ मध्ये तीसऱ्या स्थानावर आला. वर्ष २००४-०५ पेक्षा वर्ष २०१०-११ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था विकास दराची सरासरी ८% हून अधिक राहिली
जागतिक बँकेच्या रिपोर्टनुसार जगातील सरासरी जीडीपी मध्ये भारताचा वाटा हा ६.४% इतका होता. त्याचप्रमाणे अमेरिकेचा वाटा हा १७.१% तर चीनचा वाटा हा १४.९% होता आणि जपानचा वाटा ४.८% सोबत चौथ्या स्थानावर होता
ह्या रिपोर्टनुसार दरडोई उत्पनाबाबतीत भारत १२७ व्या स्थानावर आहे. ह्या रिपोर्टमध्ये असे गृहीत धरण्यात आले आहे की गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये महागाई दर वाढल्यामुळे भारत जगातील सर्वात स्वस्त १० देशांमध्ये सहभागी होऊ शकला नाही

जागतिक बँक - स्थापना १९४४ मध्ये झाली
उद्देश - सदस्य राष्ट्रांचे पुनर्निर्माण आणि विकास कार्यांसाठी अर्थसहाय्य करणे. 
मुख्यालय - वाशिंग्टन डीसी