Wednesday 30 March 2016

चालू घडामोडी : २१ मार्च

१. भारतीय रेल्वे केटरिंग एंड टुरिझम कॉर्पोरेशनने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील सर्वात स्वच्छ रेल्वे स्टेशन कोणते आहे?
उत्तर - सूरत रेल्वे स्टेशन, आईआरसीटीसीच्या सर्वेक्षणानुसार अ१ वर्गवारीमध्ये सूरत रेल्वे स्टेशन हे भारतातील स्वच्छ रेल्वे स्टेशन घोषित करण्यात आले आहे, सूरत खालोखाल राजकोट, बिलासपुर ही स्थानके आहेत. ह्या सर्वेक्षणामध्ये ४०७ रेल्वे स्टेशनस आणि १.३४ लाख प्रवाश्यांची मते ग्राह्य धरण्यात आले होते.

२. २०१६ ची फॉर्मूला वन रॉलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली आहे?
उत्तर - निको रोसबर्ग, जर्मनिचा रेसिंग ड्राइवर निको रोसबर्ग ह्याने २०१६ ची फॉर्मूला वन रॉलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स जिंकली असून तो मर्सडीज फॉर्मूला वन टीमचा चालक आहे.

३. २०१६ ची स्वीस ओपन प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन (पुरुष एकेरी) कोणी जिंकली आहे?
उत्तर - एचएस प्रणॉय, भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने २०१६ ची स्वीस ओपन प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन पुरुष एकेरी जिंकली. स्वित्झर्लैंडमधील बसेल येथे झालेल्या अंतिम सामान्यामध्ये त्याने जर्मनीच्या मार्क जविेबलेर चा २१-१८ २१-१५ असा पराभव केला.

४. २०१६ ची पुरुष एकेरी बीएनपी परिबास ओपन टूर्नामेंट कोणी जिंकली आहे?
उत्तर - नोवाक जोकोविक, मिलोस राओनिक ह्याचा पराभव करुण नोवाक जोकोविकने २०१६ ची पुरुष एकेरी बीएनपी टूर्नामेंट जिंकली. हा अंतिम सामना कलिफोर्नियाच्या इंडियाना वेल्स येथे पार पडला.

५. सीवी कुंहिरमन साहित्य पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - एम सुकुमारन, सीवी कुंहिरमन पुरस्कारासाठी मल्यालम लेखक एम सुकुमारन ह्यांना प्रदान करण्यात आला.

Monday 21 March 2016

चालू घडामोडी : १६, १७ मार्च

१. जगातील पूर्णपणे विजेवर चालणारी डबल-डेकर बस कोणत्या देशामध्ये सुरु करण्यात आली आहे?
उत्तर - यूनाइटेड किंगडम, संपूर्णपणे विजेवर चालणारी जगातील डबल-डेकर बस यूनाइटेड किंगडममधील लंडन येथे सुरु करण्यात आली आहे. ही बस चीनच्या बीवायडी कंपनीने तयार केली असून ही बस एकवेळ चार्ज केल्यावर तब्बल १८० मैल धावू शकते.

२. सिक्किम मध्ये असलेल्या कंचनजंगा शिखर सर्वात कमी वयात सर करण्याचा विक्रम नुकताच कोणी केला आहे?
उत्तर - सूर्यसंगिनीं चौधरी, सूर्यसंगिनीं चौधरी ह्या मुलीने १६३०० फूट उंच कंचनजंगा शिखर वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी सर केले आहे. ती उत्तर प्रदेशमधील बाघपत जिल्ह्यातील आहे.

३. २०१६ ची राष्ट्रिय सागरी परिषद कोणत्या शहरामध्ये पार पडली?
उत्तर - मुंबई, २०१६ ची राष्ट्रीय सागरी परिषद मुंबईच्या बॉम्बे कन्वेंशन एंड एक्सहिबिशन सेंटर, गोरेगाव येथे भरविण्यात येणार आहे. ही परिषद १४ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान पार पडेल. ही परिषद केंद्रीय शिपिंग मंत्रालयातर्फे भरविण्यात येणार आहे.

४. जगातील पहिली जागतिक सूफी परिषद भारतातील कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - नवी दिल्ली, जगातील पहिली जागतिक सूफी परिषद नवी दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये पार पडली. १७ मार्च रोजी ह्या परिषदेचे उद्धघाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले, चार दिवस चालणारी परिषद ऑल इंडिया उलमा एंड मशैख बोर्ड ह्यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली आहे. ऑल इंडिया उलमा एंड मशैख बोर्ड ही सूफी दर्ग्यावर लक्ष ठेवणारी शिखर संस्था आहे.

५. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आनंद निर्देशांक २०१६ च्या सर्वेक्षणामध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
उत्तर - ११८, दरवर्षीप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे प्रकाशित केल्या जाणाऱ्या जागतिक आनंद (हैप्पीनेस) निर्देशांकमध्ये (२०१६) भारत तब्बल ११८ व्या स्थानी आहे. ह्या सर्वेक्षणामध्ये १५६ देशांचा सहभाग होता. ह्या सर्वेक्षणामध्ये डेन्मार्क अव्वल स्थानी असून त्याखालोखाल आइसलैंड, नॉर्वे, फ़िनलैंड, कनाडा, नेदरलैंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया स्वीडन हे देश आहेत.

६. जागतिक चिमणी दिनाला अनुसरुन चिमणी संरक्षणासाठी व जनतेमध्ये जागरूकता निर्माण व्हावी ह्यासाठी कोणत्या राज्याने मोहीम सुरु केली आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश

Sunday 20 March 2016

चालू घडामोडी : १५ मार्च

१. आर्ट ऑफ़ लिविंग जागतिक संस्कृती महोस्तव कोणत्या शहरामध्ये पार पडला?
उत्तर - नवी दिल्ली, श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग संस्थेचा जागतिक संस्कृती महोस्तव यमुना काठी नवी दिल्लीमध्ये पार पडला. हा कार्यक्रम ११ ते १३ मार्च दरम्यान पार पडला. ह्या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश म्हणजे जगातील विविध संस्कृतींचे सर्वांना ज्ञान देऊन एक मानवी कुटुंब व ऐक्य ह्यांचे महत्व सांगणे.

२. २०१६ चे संतोष चषक कोणी जिंकले आहे?
उत्तर - सेवा दल, २०१६ ची संतोष चषक अर्थातच राष्ट्रिय फूटबॉल मलिका सेवा दलाने जिंकली आहे, नागपूरच्या रेल्वे स्टेडियमवर झालेल्या अंतिम समन्यामध्ये सेवा दलाने महाराष्ट्राचा पराभव केला. हे चषक सेवदलाने चौथ्यांदा जिंकली आहे.

३. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची नव्याने निवड झाली आहे?
उत्तर - हटीं क्याव, हटीं क्याव ह्यांची नुकतीच म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत, ते नेशनल लीग फॉर डेमॉक्रेसी पार्टीसोबत सल्लंग असून औंग सू क्यी ह्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत.

४. दी फल्ब्राइट - कलाम हवामान शिष्यवृत्ती भारताने कोणत्या देशाच्या मदतीने सुरु केलि आहे?
उत्तर - अमेरिका, दी फल्ब्राइट कलाम हवामान शिष्यवृत्ती भारत आणि अमेरिका दोन्ही देशांनी मिळून सुरु केली आहे. ह्या शिष्यवृत्तीचे मुख्य उद्देश म्हणजे भारतीय हवामानशास्त्रज्ञ अमेरिकेच्या हवामान प्रयोगशाळेत हवामान बदलाविषयी अभ्यास करणार आहेत. ह्या अंतर्गत ६ भारतीय पीएचडीधारक विद्यार्थी व इतर काही कर्मचारी असा संघ अमेरिकेतील विविध संस्थांसोबत एक वर्ष काम करेल. ह्या शिष्यवृत्तीला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम ह्यांचे नाव देण्यात आले आहे. ह्या शिष्यवृत्ती अंतर्गत येणारा सर्व खर्च दोन्ही राष्ट्रांची सरकारे करणार आहेत.

५. जागतिक ग्राहक अधिकार दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
उत्तर - १५ मार्च, जागतिक ग्राहक अधिकार दिन दरवर्षीप्रमाणे १५ मार्चला साजरा केला गेला. ग्राहकांमध्ये आपल्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे.

६. कोणत्या देशाने स्वत:चे अंतरराष्ट्रीय सागरी न्यायलय केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - चीन, चीन आपले सागरी अधिकार त्याचप्रमाणे, प्रादेशिक मतभेद हाताळण्यासाठी आणि सार्वभौमत्व हितसंबंध राखण्यासाठी स्वत:चे अंतरराष्ट्रीय सागरी न्यायालयीन केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे.

Wednesday 2 March 2016

८८ वा ऑस्कर वितरण सोहळा

अमेरिकेच्या लॉस अँजेलोस शहरात पार पडलेल्या ८८ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'दी रिव्हनंट', 'स्पॉटलाइट' आणि 'मॅड मॅक्स: फ्यूरी रोड' या चित्रपटांनी बाजी मारली. स्पॉटलाइट चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकाविला तर याच चित्रपटातील जॉश सिंगर आणि टॉम मेकॉर्थी यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचा सन्मान मिळाला. सहावेळा ऑस्करने हुलकावणी दिल्यानंतर अखेर लिओनार्डो दि केप्रिओला दि रिव्हनंट मधील मुख्य भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. अभिनेत्री ब्री लर्सनला 'रूम' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दि रिव्हनंट या चित्रपटाला सर्वाधिक १२ नामांकनेेे देण्यात आली होती.
ऑस्कर पुरस्काराचे मानकरी:
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट - स्पॉटलाइट
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - लिओनार्डो दि केप्रिओ (दि रिव्हनंट)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - ब्री लार्सन (रूम)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अलेजांड्रो (दि रिव्हनंट)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - मार्क रायलन्स (ब्रिज ऑफ स्पायसेस)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अलिशिया विकंदर (डेनिश गर्ल)
  • सर्वोत्कृष्ट मूळ गीत - रायटिंग्ज ऑन दि वॉल
  • सर्वोत्कृष्टवेशभूषा  वेशभूषा - जेनी बिव्हन (मैड मैक्स: फ्युरी रोड)
  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - एमन्यूएल लुबेस्की (दि रिव्हनंट)
  • सर्वोत्कृष्ट ऐनिमेटेड चित्रपट - इनसाइट आउट
  • सर्वोत्कृष्ट महितीपट - आसिफ कपाडिया, जेम्स गे-रीस (ऎमी)
  • सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऐक्शन लघुकथा - स्टूटेरर
  • सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट - हंगेरीचा 'सन ऑफ सोल'