Friday 11 November 2016

चालू घडामोडी : ४ नोव्हेंबर

१. सातवी तंबाखू नियंत्रण परिषद (कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज ऑन टोबॅको कंट्रोल) कोणत्या देशामध्ये पार पाडणार आहे?
उत्तर - भारत, सातवी तंबाखू नियंत्रण परिषद ७ ते १२ नोव्हेंबर दरम्यान उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे पार पडणार आहे. भारताने तंबाखू आणि तंबाखू सेवनावर केलेले उपाय, निर्बंध इ. ह्या परिषदेमध्ये इतर सहभागी देशांसोबत शेयर केले जाईल. त्याचप्रमाणे ह्या परिषदेमध्ये १८० देशांचे १५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेचे सचिव सहभागी होणार आहेत. भारतामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज मीटिंग भरावली गेली आहे.
२. 'प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान' योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयद्वारे सुरु करण्यात आली आहे?
उत्तर - केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, जगत प्रकाश नड्डा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री यांनी नुकतेच नवी दिल्ली येथे गर्भवती महिलांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी 'प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान' सुरु केले आहे. ह्या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना नवव्या महिन्यामध्ये लागणाऱ्या सर्व उपचार आणि चेक-अप्स मुफ्त दिल्या जाणार आहे. ही योजना सर्व सरकारी हॉस्पीटलमध्ये उपलब्ध असेल.
३. २०१६ च्या दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या बॉलीवुड अभिनेत्रीला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
उत्तर - रेखा, बॉलीवुड अभिनेत्री रेखाला १३ व्या दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
४. आशिया खंडातील सर्वात मोठी मानवनिर्मित 'जंगल सफारी' कोणत्या राज्यात सुरु करण्यात आला आहे?
उत्तर - छत्तीसगढ़, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच छत्तीसगढ़मध्ये नया रायपुर येथे आशिया खंडातील सर्वात मोठे मानवनिर्मित 'जंगल सफारी' सुरु केले आहे. ८०० ऐकर क्षेत्रामध्ये हे जंगल पसरले असून ८ विभागांमध्ये विभागले आहे. ह्या जंगलामध्ये जंगली प्राणी असून संपूर्ण मुक्त पटांगणामध्ये फिरू शकतात. इको-फ्रेंडली गाड्यांमधून पर्यटकांना फिरण्याची सोय आहे. ह्या जंगलामध्ये दररोज १०००० पर्यटक फिरू शकतात. ह्या सफ़ारीमध्ये वाघ,सिंह, अस्वल आणि इतर जंगली प्राणी असतील त्याचप्रमाणे मांसाहारी आणि शाकाहारी असे विभागही असतील.
५. लिंकेडीनने कोणत्या भारतीय केंद्रीय मंत्रालयासोबत नौकरी अप्डेट्ससाठी कोणत्या मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर - मानव संसाधन विकास मंत्रालय, लिंकेडीनने भारतीय विद्यार्थ्यांसाठी नौकरी अप्डेट्स देण्यासाठी केंद्रीय मानव विकास संसाधन मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे. ह्या कराराअंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना भारतामध्ये आणि भारताबाहेरही ३५ देशांमध्ये नौकरी शोधणे सोपे होणार आहे.
६. भीतरकनिका राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?
उत्तर - ओडिशा, भीतरकणिका राष्ट्रिय अभयारण्य ओडीषामधील केंद्रपारा जिल्यामध्ये आहे. हे अभयारण्य अद्वितीय पर्यावरणामध्ये स्थित आहे. नदीचा त्रिभुज प्रदेश, मैनग्रोव जंगल, समुद्र किनारा, नदीचे मुख, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, विविध प्रजातीच्या वनस्पती ह्या अभयारण्याचे वैशिष्ट आहे. यूनेस्कोने नुकतेच दोन सदस्यीय समिती ह्या अभयारण्याच्या पाहणीसाठी येणार आहेत.