Monday 3 October 2016

चालू घडामोडी : २३ सप्टेंबर

१. २०१६ च्या क्लार्क आर बाविन वन्यजीवन कायदा अंमलबजावणी पुरस्कारासाठी कोणत्या दोन भारतीयांची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - संजय दत्ता आणि रितेश सारोठिया, संजय दत्ता आणि रितेश सारोठिया यांची २०१६ च्या क्लार्क आर बाविन वन्यजीवन कायदा अंमलबजावणी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. वन्यजीवन वाचवण्यासाठी वन्यजीवन कायदे अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तिंना ह्या पुरस्काराने सन्मानित केले जाते. सारोठिया हे मध्य प्रदेश राज्य वन विभागामध्ये सहाय्यक संरक्षक आहेत तर दत्ता बेलाकोबा, पश्चिम बंगालमध्ये रेंज ऑफिसर आहेत.
२. रेवती सरन शर्मा यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी निगडित होत्या?
उत्तर - लेखक, रेवती सरन शर्मा यांचे नुकतेच नवी दिल्ली येथे निधन झाले त्या प्रसिद्ध हिंदी आणि उर्दू लेखिका होत्या. ऑल इंडिया रेडियोमध्ये कार्यक्रम समीक्षणामध्ये त्या अग्रेसर होत्या. त्याचप्रमाणे २००७ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
३. 'सिटिज़न एंड सोसायटी' पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - मोहम्मद हामिद अंसारी, भारताचे उपराष्ट्रपती मोहम्मद हामिद अंसारी हे सिटीजन आणि सोसायटी पुसकचे लेखक आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनमध्ये ह्या पुस्तकाचे प्रकाशन केले. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःच्या जीवनाचे आत्मचरित्र आहे.
४. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मोनेट्री पॉलिसी कमिटीमध्ये कोणाची नेमणूक केली आहे?
उत्तर - रविन्द्र ढोलकिया, पामी दुआ, चेतन घाटे, केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या मोनेट्री पॉलिसी कमिटीमध्ये व्याजदर ठरविण्यासाठी तीन बाहेरील ताज्ञानची नेमणूक केली आहे. चेतन घाटे हे इंडियन स्टैटिकल इंस्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत, पामी दुआ ह्या दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या संचालक आहेत तर रविन्द्र ढोलकिया आईआईएम अहदाबादचे आहेत. हे तज्ञ चार वर्ष कार्यभार संभळातील आणि त्यांची पुनर्निवड़ होउ शकत नाही.
५. २०१६ चा क्लिंटन ग्लोबल सिटीजन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - आदि गोदरेज, मुंबईस्थित व्यावसायिक आणि गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज यांची १० व्या क्लिंटन ग्लोबल सिटीजन अवार्ड २०१६ ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार क्लिंटन फाउंडेशनतर्फे दिला जातो. आदि गोदरेज यांच्या नेतृत्त्वला पुरस्कार देण्यात आला आहे. शाश्वत बिज़नेस स्ट्रेटेजीज आणि लीडरशिपच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय समूह जगभरात प्रसिध्द केला यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
६. 'इंद्रा २०१६' हे संयुक्त लष्करी शिबीर भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडले?
उत्तर - रशिया, ८ वी भारत-रशिया संयुक्त लष्करी शिबीर इंद्रा २०१६ रशियातील व्लादिवोस्टोक जिल्ह्यात पार पडले. ह्या संयुक्त शिबीराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पर्वतीय, जंगली भागामध्ये अतिरेक्यांच्या सामना करणे. 

चालू घडामोडी : २२ सप्टेंबर

१. जगातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प कोणत्या भारतीय राज्यामध्ये उभारण्यात आला आहे?
उत्तर - तामिळनाडू, जगातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प तामिळनाडूतील रमनथपुरम जिल्ह्यामध्ये उभारण्यात आला असून ६४८ मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प अडानी समूहद्वारे ५००० एकरामध्ये उभारण्यात आला असून त्यासाठी ४५५० कोटी खर्च झाला आहे.
२. २०१६ ची इंटरनेशनल एसोसिएशन ऑफ साइन्स पार्क्स एंड एरियाज ऑफ इनोवेशन कॉन्फ्रेंस कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - रशिया, ३३ वी इंटरनॅशनल एसोसिएशन ऑफ साइन्स पार्क्स एंड एरियाज ऑफ इनोवेशन कॉन्फ्रेंस १९-२२ सप्टेंबर दरम्यान रशियातील मॉस्को येथे पार पडली. ही परिषद जगातील ह्या क्षेत्रातील सर्वात मोठी बैठक असून तिला संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिंक आणि सामाजिक परिषदेचे विशेष सल्लागार दर्जा दिला आहे. २०१७ ची बैठक तुर्कीमधील इंस्तांबुलमध्ये होणार आहे.
३. २०१७ च्या ऑस्कर पुरस्कारामधील फॉरेन लैंग्वेज चित्रपटाअन्तर्गत कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - विसरनै, तमिळ चित्रपट विसरनैची २०१७ ऑस्कर पुरस्कारामधील फॉरेन लैंग्वेज चित्रपटाअंतर्गत निवड करण्यात आली आहे. हा चित्रपट वेत्रीमारन यांनी दिग्दर्शित केला असून, एम. चंद्रकुमार यांच्या 'लॉक अप' कादंबरीवर आधारित आहे.
४. पहिला जेसे ओवेन्स ओलिंपिक स्पिरीट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
उत्तर - मुहम्मद अली, पहिल्यांदाच प्रदान करण्यात येणारा जेसे ओवेन्स ओलिंपिक स्पिरिट पुरस्कार २०१६ मुहम्मद अली यांना मरोणोत्तर देण्यात येणार आहे. ३ जून २०१६ ला त्यांचे निधन झाले. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी लोणी अली यांना देण्यात येणार आहे. हा वार्षिक पुरस्कार असून समाजाला चांगल्या कामासाठी प्रोस्ताहित करणाऱ्या, समाजाला एकत्रित बांधून ठेवणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणार आहे.
५. अमेरिकेमधील भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - नवतेज सरना, १९८० बैचच्या भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी नवतेज सरना यांची अमेरिकेतील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्या लंदनमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव म्हणून काम पाहत होत्या. त्यांची ही नेमणूक अरुण सिंह यांच्या जागी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने तरणजीत सिंह यांची श्रीलंकेमध्ये भारतीय हाई कमिश्नर पदी नेमणूक केली आहे.
६. पहिली वस्तू आणि सेवा कर परिषद कोणत्या शहरामध्ये पार पडली?
उत्तर - नवी दिल्ली, पहिली वस्तु आणि सेवा कर परिषद नवी दिल्ली येथे पार पडली, अरुण जेटली ह्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. 

Sunday 2 October 2016

चालू घडामोडी : २१ सप्टेंबर

१. २१६ ची नॉर्थ ईस्ट कनेक्टिविटी समिट कोणत्या भारतीय शहरामध्ये पार पडली?
उत्तर - अगरतला, २०१६ ची नॉर्थ ईस्ट कनेक्टिविटी समिट त्रिपुरातील अगरतला येथे २३ सप्टेंबर रोजी पार पडली. दोनदिवसीय परिषदेमध्ये ईशान्य आशियाला आर्थिक, दळणवळण, ऊर्जा या साधनांसोबत आग्नेय आशियासोबत जोडणे हा ह्या चर्चेचा मुख्य हेतू होता. या परिषदेमध्ये सिंगापूर, बांग्लादेश, म्यानमार हे देश सहभागी झाले होते.
२. केंद्र सरकारने कोणत्या आईआईटी कॉलेजमध्ये 'परम-ईशान' सुपरकंप्यूटिंग सुविधा सुरु केली आहे?
उत्तर - आईआईटी गुवाहाटी, केंद्रीय मानवसंसाधन मंत्री प्रकाश जावड़ेकर यांनी नुकतेच आईआईटी गुवाहाटीमध्ये 'परम-ईशान' ह्या सुपरकंप्यूटिंग सुविधेचे उद्धघाटन केले. परम-ईशानचे २५० टेराफ्लॉपस स्पीड असून ३०० टीबी साठवणूक क्षमता आहे. त्याचा उपयोग संगणकीय रसायनशास्त्र, नाना ब्लॉक सेल्फ अस्सेम्बल, ऑप्टीमाइजेशनसाठी करण्यात येणार आहे.
३. भारतातील पहिला कोस्टल कॉरिडोर निर्मितीसाठी आशियाई विकास बँकेने किती कर्ज मंजूर केले आहे?
उत्तर - ६३१ दशलक्ष डॉलर्स, विशाखापट्नम ते चेन्नई दरम्यान भारतातील कोस्टल कॉरिडोर बनविण्यासाठी आशियाई विकास बँकेने ६३१ दशलश डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे. भारताची पश्चिम किनारपट्टी २५०० किमिची असून त्यापैकी ८०० किमीचा कॉरिडोर ह्या राक्केमेतून बनविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ह्या विकसित बंदरांतून दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांसोबत व्यापर केला जाईल.
४. कोणत्या भारतीय स्टॉक एक्सचेंजने लाइव स्टॉक अपडेट दाखविण्यासाठी ट्वीटरसोबत करार केला आहे?
उत्तर - बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने आपले लाइव स्टॉक अप्डेट्स दाखविण्यासाठी ट्वीटर ह्या सोशल मीडियासोबत करार केला आहे. ह्या कराराअंतर्गत ट्वीटर सेंसेक्स लेवल्स, स्टॉक प्राइजेस, सर्व कंपन्यांचे बाजार खुलत्यावेळचे आणि बंद होत्या वेळचे भाव दाखविले जातील. हा आशिया खंडातील करार आहे ज्यात एखाद्या स्टॉक एक्सचेंजने, सोशल मीडिया पार्टनरसोबत करार केला आहे.
५. सार्क देशांच्या सर्वोच्च सुरक्षाताज्ञानची बैठक कोणत्या देशात पार पडली?
उत्तर - भारत, सार्क देशांच्या सर्वोच्च सुरक्षाताज्ञानची बैठक भारतामध्ये नवी दिल्ली येथे २२-२३ सप्टेंबर दरम्यान पार पडली. ही परिषद भारतीय गुप्तचर विभागाचे प्रमुख दिनेश्वर शर्मा आणि सार्क देशांच्या गुप्तचर प्रमुखांनी बोलाविली होती. नेपाळ, भूटान, बांग्लादेश, श्रीलंका, अफगानिस्थान, मालदीव हे देश सहभागी झाले होते. दहशदवादाविरुद्ध सार्क देशांना मजबूत करणे हे ह्यमागचे मुख्य उद्दिष्ट होते.
६. 'डू नॉट से वी हॅव नथिंग'पुस्तकाचे लेखक/लेखिका कोण आहेत?
उत्तर - मैडेलीन थे, कैनेडियन लघुकथालेखक मेडेलिन थे हे 'डू नॉट से वी हॅव नथिंग' पुस्तकाचे लेखक असून ह्या पुस्तकाची निवड २०१६ च्या मॅन बुकर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी चीनमधील शास्त्रीय संगीताच्या जडनघडणीचे वर्णन केले आहे.