Wednesday 29 June 2016

इंडियन इंटरनॅशनल फिल्म अकॅडमी अवार्ड्स २०१६ विजेते

* सर्वोत्कृष्ठ चित्रपट - बजरंगी भाईजान
* सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक - संजय लीला भन्साली, बाजीराव मस्तानी
* सर्वोत्कृष्ठ अभिनेता (पुरुष) - रणवीर सिंग, बाजीराव मस्तानी
* सर्वोत्कृष्ठ अभिनेती (महिला) - दीपिका पादुकोण, पीकू
* सर्वोत्कृष्ठ अभिनेता (सपोर्टिंग) - अनिल कपूर, दिल धड़कने दो
* सर्वोत्कृष्ठ अभिनेती (सपोर्टिंग) - प्रियंका चोप्रा, बाजीराव मस्तानी
* सर्वोत्कृष्ठ अभिनेता (निगेटिव) - दर्शन कुमार, एनएच १०
* सर्वोत्कृष्ठ अभिनेता (कॉमिक) - दीपक डोबरियाल, तनु वेड्स मनु रिटर्न
* सर्वोत्कृष्ठ अभिनेता (पदार्पण) - विकी कौशल, मसान
* सर्वोत्कृष्ठ अभिनेती (पदार्पण) - भूमी पेडणेकर, दम लगा के हैशा
* सर्वोत्कृष्ठ जोड़ी (पदार्पण) - सूरज पंचोली आणि अथिया शेट्टी, हीरो
* सर्वोत्कृष्ठ स्टोरी - जूही चतुर्वेदी, पीकू
* सर्वोत्कृष्ठ पार्श्वगायिका (महिला) - मोनाली ठाकुर, मोह मोह के धागे
* सर्वोत्कृष्ठ पार्श्वगायक (पुरुष) - पापों, मोह मोह के धागे
* सर्वोत्कृष्ठ गीत - वरुण ग्रोवर, मोह मोह के धागे
* स्पेशल अवार्ड - वूमेन ऑफ़ दी ईयर - प्रियंका चोप्रा
* सर्वोत्कृष्ठ स्क्रीनप्ले - कबीर खान, परवेज़ शेख, वि. विजयेंद्र प्रसाद - बजरंगी भाईजान
* सर्वोत्कृष्ठ संवाद - जूही चतुर्वेदी, पीकू
* सर्वोत्कृष्ठ प्रोडक्शन डिजायन - सलोनी धत्रक, श्रीराम इएंगेर, सुजीत सावंत - बाजीराव मस्तानी
* सर्वोत्कृष्ठ कोरिऑग्रफी - रेमो डी'सूज़ा, पिंगा (बाजीराव मस्तानी)
* सर्वोत्कृष्ठ ऍक्शन - श्याम कौशल, बाजीराव मस्तानी
* सर्वोत्कृष्ठ साउंड डिजायन - बिश्वदीप चटर्जी, निहार रंजल समल - बाजीराव मस्तानी
* सर्वोत्कृष्ठ साउंड मिक्सिंग - अजय कुमार, बदलापुर
* सर्वोत्कृष्ठ पोशाख डिजायन - अंजू मोदी, मक्सिमा बासु - बाजीराव मस्तानी
* सर्वोत्कृष्ठ स्पेशल इफेक्ट्स - प्रसाद सुतरा, बाजीराव मस्तानी

Tuesday 28 June 2016

लिओनेल मेस्सीच्या १० मोठया कामगिरी


१. एका वर्षामध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावे असून त्याची गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद आहे. २०१२  ९१ गोल केले आहेत.
२. एका वर्षामध्ये सर्वाधिक अंतरराष्ट्रीय स्तरावर गोल - २५ गोल
३. सलग सर्वाधिक लीग मैचेस खेळण्याचा विक्रमही त्याच्याच नावे आहे - २१ मैचेस (३३ गोल)
४. मेस्सी हा पहिला फुटबॉलपटू आहे ज्याने प्रोफेशनल लीगमध्ये प्रत्येक टीम विरुद्ध गोल केला आहे.
५. मेस्सी हा पहिला फुटबॉलपटू ज्याने सलग चार चैम्पियंस लीगमध्ये सर्वाधिक गोल केले आहेत.
६.  स्पर्धेमध्ये सर्वाधिक हैट्रिक करण्याचाही विक्रम त्याच्याच नावे आहे.
७. मार्च २०१२ मध्ये चैम्पियंस लीगच्या एका मैचमध्ये पाच गोल करून वैयक्तिक पाच गोल करणारा तो पहिला खेळाडू बनला.
८. ला-लिगा स्पर्धेमध्ये एकाच कल्बकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही त्याच्याच नावे आहे - ३५४ गोल
९. ला-लिगा स्पर्धेमध्ये २०० गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू - २५ वर्षे
१०. १० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्याने बार्सिलोनाला सहा ला-लिगा, दोन कॉपस देल रेय, पाच सुपरकॉपस दे एस्पाना, तीन यूएफा सुपर कप्स, दोन कल्ब वर्ल्ड कप्स जिंकून दिल्या आहेत.

चालू घडामोडी : २० जून

१. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने 'स्वयम' तत्त्वावर ऑनलाइन कोर्स सुरु केला असून त्यासाठी तंत्रज्ञान भागीदार (टेक्नोलॉजी पार्टनर) म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - माइक्रोसॉफ्ट, केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने स्वयम तत्त्वावर ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठया माइक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केली असून ह्याअंतर्गत तीन करोड विद्यार्थांसाठी तब्बल २००० कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. ह्याकार्यक्रमासाठी यूनिवर्सिटी ग्रांट कमीशननेही नवीन नियम निर्माण केले आहेत. माइक्रोसॉफ्ट आणि आल इंडिया कौंसिल ऑफ़ टेक्निकल एजुकेशन दोघांमध्ये ३८ कोटी रुपयांचा करार झाला आहे. स्वयमचा अर्थ स्टडी वेब ऑफ ऐक्टिव लर्निंग फॉर यंग एस्प्रिंग माइंडस.
२. शांघाई अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल २०१६ मध्ये एशिया खंडातील नवीन प्रतिभा अंतर्गत कोणत्या भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ चित्रपट आणि सर्वोत्कृष्ठ पठकथा लेखक पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - तिथी, कन्नड़ भाषेतील चित्रपट तिथीला १९ व्या शांघाई चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ठ चित्रपट आणि सर्वोत्कृष्ठ पठकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला आहे. ह्या फ्लिम फेस्टिवलमध्ये निवडला आणि प्रदर्शित झालेला एकमेव चित्रपट होता. हा चित्रपट राम रेड्डी यांनी दिग्दर्शित केला असून राष्ट्रीय पुरस्कार २०१६ मध्ये कन्नड़ भाषेतील बेस्ट फीचर पुरस्कार मिळाला आहे.
३. 'ऊर्जा' मोबईल ऍप कोणी सुरु केले आहे?
उत्तर - पॉवर फाइनेंस कॉर्पोरेशन, अर्बन ज्योती अभियान मोबईल ऍप पॉवर फाइनेंस कॉर्पोरेशनने सुरु केले आहे.
४. २०१६ च्या टॉप ५०० लिस्ट ऑफ सुपरकम्प्यूटर्स नुसार सध्याचा जगातील सर्वात वेगवान सुपरकंप्यूटर कोणता आहे?
उत्तर - तैहु लाइट, चीनी सुपरकंप्यूटर 'सनवे तैहुलाइट' हा जगातील सर्वात वेगवान सुपरकंप्यूटर असून २०१६ च्या टॉप ५०० लिस्ट ऑफ सुपरकम्प्यूटर्स च्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. सनवे तैहुलाइट हा एक सेकंडमध्ये ९३००० ट्रिलियन गणिते करू शकतो. त्याचप्रमाणे ह्या सुपरकंप्यूटरचा वापर संशोधन, इंजीनियरिंग कामे, हवामान फरक, निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. तैहुलाइट खलोखाल तिंहे-२, आईबीएम चा ब्लूजेन/क्यू सिस्टिम, फुजिस्तुचा के कंप्यूटर असून हे ४७ वे एडिशन आहे.
५. अंतरराष्ट्रीय योग परिषद कोणत्या भारतीय शहरामध्ये पार पडली?
उत्तर - नवी दिल्ली, भारताचे उप-राष्ट्रपती मो. हमीद अन्सारी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे दोन दिवसीय अंतरराष्ट्रीय योग परिषद ' योगा फॉर बॉडी अण्ड बियॉन्ड'. ह्या परिषदेमध्ये अनेक देशांचे ७० प्रतिनिधी सहभागी झाले होते. ह्या परिषदेमध्ये प्रामुख्याने इराक, अफ़ग़ानिस्तान, अल्जीरिया, मलेशिया, स्पेन, रशिया, ऑस्ट्रेलिया, चीन, इजिप्त, कुवैत, कोरिया देशाचे प्रतिनिधी अधिक होते.
६. २०१६ शांघाई सहकार्य संघटना (शांघाई कोऑपरेशन आर्गेनाईजेशन) ची बैठक कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - उज़्बेकिस्तान, २०१६ शांघाई सहकार्य संघटनेची बैठक उज़्बेकिस्तानच्या ताशकंत मध्ये पार पडली. शांघाई सहकार्य संघटनेची स्थापना २००१ मध्ये चीन, कझगिस्तान, किर्गिस्तान, रशिया, तजाकिस्तान आणि उज़्बेकिस्तानच्या नेत्यांनी मिळून केली. यूरेशिया मधील राजकीय, आर्थिक आणि राजकीय समंस्यांचे निर्मूलन करण्यासाठी ही संघटना निर्माण करण्यात आली आहे. २४ जून २०१६ रोजी भारत आणि पाकिस्तानला औपचारिक रित्या ह्या संघटनेचे सदस्य बनविण्यात आले आहे.

Monday 27 June 2016

भारतीय शहरांची टोपणनावे

१. गोल्डन (सुवर्ण) सिटी - अमृतसर
२. भारताचे मैनचेस्टर - अहमदाबाद
३. सात बेटांचे शहर - मुंबई
४. स्पेस सिटी - बँगलोर
५. भारताचे बगीचा (गार्डन) शहर - बँगलोर
६. भारताची सिलिकॉन वैली - बँगलोर
७. भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर - बँगलोर
८. अरबी समुद्राची राणी - कोचीन
९. गुलाबी शहर - जयपुर
१०. भारताचे प्रवेशद्वार - मुंबई
११. ट्विन सिटी - हैद्राबाद, सिकंदराबाद
१२. सणांचे शहर - मदुरई
१३. दख्खनची राणी - पुणे
१४. इमारतींचे शहर - कोलकाता
१५. दक्षिण गंगा - गोदावरी
१६. दक्षिणेकडील मैनचेस्टर - कोयम्बटूर
१७. सोयाबीनचा प्रदेश - मध्य प्रदेश
१८. नवाबांचे शहर - लखनऊ
१९. पूर्वेकडील वेनिस - कोचीन
२०. बंगालचे अश्रू - दामोदर नदी
२१. बिहारचे अश्रू - कोसी नदी
२२. निळा पर्वत - नीलगिरी
२३. पर्वतांची राणी - मसूरी (उत्तराखंड)
२४. पवित्र नदी - गंगा
२५. भारताचे हॉलीवुड - मुंबई
२६. किल्ल्यांचे शहर - कोलकाता
२७. पाच नद्यांचे राज्य - पंजाब
२८. तलावांचे शहर - श्रीनगर
२९. भारताचे पोलादी शहर - जमशेदपुर (टाटानगर)
३०. मंदिरांचे शहर - वाराणसी
३१. उत्तरेकडील मैनचेस्टर - कानपूर
३२. भारताचे स्वर्ग - जम्मू आणि काश्मीर
३३. मसाल्यांचे राज्य - केरळ
३४. भारताचे स्विट्ज़रलैंड - काश्मीर
३५. भारताचे बॉस्टन - अहमदाबाद

Sunday 26 June 2016

जागतिक दिन : भाग १

जानेवारी
* १ जानेवारी - जागतिक वर्षारंभ दिन
* १२ जानेवारी - राष्ट्रीय युवक दिन
* १५ जानेवारी - राष्ट्रीय सैन्य दिन
* २६ जानेवारी - भारतीय प्रजासत्ताक दिन
* ३० जानेवारी - भारतीय हुतात्मा दिन (महात्मा गांधी स्मृती दिन)

फेब्रुवारी
* ४ फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिन
* १४ फेब्रुवारी - जागतिक व्हॅलेंटाइन दिन
* २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिन
* २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* २४ फेब्रुवारी - केंद्रीय उत्पादनशुक्ल दिन
* २७ फेब्रुवारी - जागतिक नाट्यदिन
* २८ फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन

मार्च
* ७ मार्च - जागतिक गणित दिवस
* ८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* २० मार्च - जागतिक चिमणी दिन
* २१ मार्च - जागतिक जंगल दिन
* २२ मार्च - जागतिक पाणी दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* २३ मार्च - जागतिक हवामान दिन
* २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन
* ३० मार्च - जागतिक डॉक्टर दिन

एप्रिल
* १ एप्रिल - जागतिक मुर्खांचा दिन
* ५ एप्रिल - जागतिक सागरी दिन
* ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
* ११ एप्रिल - जागतिक पार्किंसन्स दिन
* १७ एप्रिल - जागतिक हीमोफीलिया दिन
* २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
* २३ एप्रिल - जागतिक प्रताधिकार दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिन

मे
* १ मे - महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन, जागतिक अस्थमा/दमा दिन
* ३ मे - जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* ४ मे - आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन
* ८ मे - जागतिक रेडक्रॉस दिन
* ९ मे - जागतिक थैलसीमिया दिन
* ११ मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
* १२ मे - आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन
* १५ मे - आंतरराष्ट्रीय कुठुंबपरिवार दिन
* १७ मे - जागतिक दूरसंचार दिन
* १९ मे - जागतिक कावीळ दिन
* २२ मे - आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* २३ मे - आंतरराष्ट्रीय कूर्मदिन
*  ३१ मे - जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन
* मे महिन्यातील पहीला रविवार जागतिक हास्यदिन तर दूसरा रविवार आंतरराष्ट्रीय मातृदिन

जून
* १ जून - आंतरराष्ट्रीय बालदिन
* ५ जून - जागतिक पर्यावरण दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
* १४ जून - जागतिक रक्तदान दिन
* जूनमधला तीसरा रविवार - पितृदिन (अमेरिका, इंग्लंड, कनाडा)

Tuesday 21 June 2016

भारतीय रिझर्व्ह बँक


भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती आर्थिक संस्था आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व्ह बँक देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व्ह बँक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण (मॉनेटरी पॉलिसी) आणि पतधोरण (क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.
संपूर्ण भारतामध्ये रिझर्व्ह बँकेची २२ क्षेत्रीय कार्यालये आहेत  कार्यालये त्यात्या राज्यांच्या राजधानी ठिकाणी आहेत.
प्रमुख उद्देश:
* भारतीय चलनी नोटांची छपाई नियमित करणे.
* वित्तीय प्रणालीचे विनियमन आणि पर्यवेक्षण करणे.
* भारताची गंगजळी राखणे
* भारताची आर्थिक स्थिती राखणे.
* भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.
इतिहास: भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना हिल्टन यंग समितीच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँक कायदा १९३४ अन्वये १ एप्रिल १९३५ ला करण्यात आली. बँकेचे मुख्यालय पहिल्यापासूनच मुंबई येथे असून येथूनच बँकेचे प्रमुख कार्य चलते. या बँकेने ब्रम्हदेशाची मध्यवर्ती बँक म्हणून एप्रिल १९४७ तर पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून जून १९४८ पर्यंत काम पाहिले. सुरुवातीस बँकेची मालकी खाजगी हातांमध्ये होती. परंतु १९४९ पासून बँक पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची झाली.
गव्हर्नर: भारतीय नोटा चलन म्हणून योग्य असल्याचे प्रमाण आणि सरकारतर्फे खात्री म्हणून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नोटांवर एक वचन नामा आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी करतात. सर ऑस्बर्न स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी कार्यभार स्वीकारला ते ३० जून १९३७ पर्यंत गव्हर्नर पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटेवर त्यांची स्वाक्षरी नव्हती.
त्यानंतर सर जेम्स ब्रेड टेलर १ जुलै १९३७ ते १७ फेब्रुवारी १९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते, ते ११ ऑगस्ट १९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणूनही काम पाहिले.
सध्या रघुराम राजन हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असून त्यांचा पदभार सप्टेंबर २०१६ मध्ये पूर्ण होणार आहे.

हॉकी चॅम्पियन ट्रॉफी २०१६ ऑस्ट्रेलियाने जिंकली

यूनाइटेड किंगडम मधील लंडन येथे झालेल्या अंतिम सामान्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला ३-१ असे नमवून चैम्पियन्स ट्रॉफी हॉकी २०१६ वर आपले नाव कोरले. यासोबतच आजवर ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा १४ वेळा जिंकून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. लंडनमध्ये झालेल्या अंतिम सामान्यामध्ये दोन्ही संघ दोन्ही हाफमध्ये एकही गोल करु शकले नाहीत. पेनाल्टी शूटआउट मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर ३-१ अशी मात केली.
ऑस्ट्रेलियासाठी पेनाल्टी शूटआउट मध्ये एरान जलेव्स्की, डेनियल बैले आणि साइमन ऑर्चर्ड ह्यांनी प्रत्येकी एक-एक गोल केले तर हरमनप्रीत सिंह ह्याने भारताकडून एक गोल केला. ह्या पराभवासोबतच भारताला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.
चैम्पियन्स ट्रॉफी हॉकीबाबत थोडक्यात माहिती:
* चैम्पियन्स ट्रॉफी ही अंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन मार्फ़त भरविण्यात येते.
* प्रथम ही स्पर्धा १९७८ साली पाकिस्तानचे एयर मार्शल नूर खान आणि पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या सहयोगाने भरविण्यात आली होती.
* सुरुवातीला ही स्पर्धा दरवर्षी भरविण्यात येत होती परंतु हॉकी वर्ल्ड लीगमुळे २०१४ पासून ही स्पर्धा दोन वर्षांनंतर भरविण्यात येत आहे.
* ह्या स्पर्धेमध्ये क्रमवारीत अग्रेसर असलेल्या देशांचेच हॉकी संघ सहभागी होऊ शकतात.
* पुरुषांच्या विभागामध्ये ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा १४ वेळा जिंकला असून, जर्मनी १० तर नेदरलॅंड ८ वेळा जिंकला आहे.
* भारत ही स्पर्धा एकदाही जिंकला नाही तर भारत प्रथमच २०१६ मध्ये अंतिम सामान्यामध्ये खेळला आहे.

Monday 20 June 2016

चालू घडामोडी : १७ जून

१. जागतिक रक्तदान दिननिम्मित कोणती थीम ठेवण्यात आली होती?
उत्तर - ब्लड कनेक्टस अस आल, जागतिक रक्तदान दिन हा दरवर्षी १४ जून रोजी साजरा केला जातो. अधिकाधिक लोकांनी रक्तदान करावे त्याचप्रमाणे रक्ताची क्वॉलिटी, प्रमाण हयाबाबत जागरूकता लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी हा दिवस जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २००४ पासून पाळला जातो. जग भरातून जास्तीतजास्त लोकांनी रक्तदान करावे ह्यासाठी २०१६ ची थीम होती 'ब्लड कनेक्टस अस आल'.
२. सेंट पिटरस्बर्ग येथे पार पडलेल्या अंतरराष्ट्रीय आर्थिक मंचच्या बैठकीमध्ये भारताकडून कोणी प्रतिनिधित्त्व केले?
उत्तर - धर्मेंद्र प्रधान, रशियाच्या सेंट पिटरस्बर्ग पार पडलेल्या बैठकीमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले. ही बैठक १६-१७ जूनला पार पडली. सेंट पिटरगबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम ही दरवर्षी होणारी अंतरराष्ट्रीय परिषद असून आर्थिक आणि बिज़नेस समस्यांवर तोडगा काढण्यासाठी भरविण्यात येते.
३. भारतीय रिजर्व बँकेच्या गवर्नरपदाच्या उमेदवार नेमनुकीसाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली आहे?
उत्तर - पी के सिन्हा समिती, भारतीय रिज़र्व बँकेचे सध्याचे गवर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१६ संपणार असून त्याच्या ठिकाणी योग्य उमेदवार नेमन्यासाठी केंद्र सरकारने कैबिनेट सचिव पी के सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
४. संयुक्त राष्ट्रांच्या ७१ व्या महसभेसाठी कोणाची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे?
उत्तर - पीटर थॉमसन, फिजीचे संयुक्त राष्ट्राचे दूत पीटर थॉमसन यांची संयुक्त राष्ट्राच्या ७१ व्या महासभेसाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते सध्याचे महासभेचे अध्यक्ष मोगेंस लयकेटोफ्ट यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतील. पीटर यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१६ पासून सुरु होणार आहे.
५. 'डेल्टा ४ हेवी' हे जगातील सर्वात ताकदवान रॉकेट कोणत्या देशाने बनविले आहे?
उत्तर - अमेरिका, नुकतेच अमेरिकेने गुप्तहेरसाठी 'एनआरओएल-३७' उपग्रह डेल्टा हेवी रोकेटच्या मदतीने अवकाशामध्ये प्रक्षेपित केला. डेल्टा ४ हेवी रॉकेट जगातील सर्वात पावरफुल रॉकेट असून एनआरओने हे रॉकेट डिजाइन, तयार आणि ऑपरेट देखील करते.
६. २०१६ ची फार्मूला वन कैनेडियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली आहे?
उत्तर - लेविस हैमिलटन, ब्रिटिश फार्मूला वन रेसिंग चालक लेविस हैमिलटनने मोंटेरल येथे झालेली २०१६ ची फॉर्मूला वन कैनेडियन ग्रँड प्रिक्स जिंकली आहे. तो मर्सेडीज़ एएमजी पेट्रोन्स टीमचा सदस्य आहे.

महाराष्ट्र : नागपूर विभाग


नागपूर विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागंपैकी एक असून नागपूर विभाग हा पूर्व विदर्भ ह्या नावाने देखील ओळखला जातो. त्याचप्रमाणे अमरावती आणि नागपूर विभाग मिळून विदर्भ हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग तयार होतो. नागपूर ही महाराष्ट्राची पूर्वेकडील एक बाजू असून प्रशासकीय मुख्यालय हे नागपूर शहरामध्ये आहे.
चतुः सीमा: नागपूर विभागाच्या पश्चिमेस अमरावती विभाग, पूर्वेस मध्य प्रदेश, उत्तरेस मध्य प्रदेश तर दक्षिणेस आंध्र
इतिहास: नागपूर हा प्रशासकीय विभाग हा ब्रिटिशांनी १८६१ साली निर्माण केला होता. ब्रिटिशकालीन नागपूर विभागामध्ये बालाघाट जिल्हा त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राज्यातील काही इतर भाग/जिल्हे देखील होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मध्य प्रांताचे रूपांतर मध्य प्रदेश राज्यामध्ये करण्यात तर १ नोवंबर १९५६ ला अमरावती आणि नागपूरला मुंबई प्रांतमध्ये स्थलांतरित करण्यात आले. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली.
विभगा अंतर्गत येणारे जिल्हे: भंडारा, गडचिरोली, चंद्रपुर, गोंदिया, नागपूर, वर्धा
क्षेत्र: ५१,३३६ वर्ग किमी
साक्षरता: ७५.९०%

Sunday 19 June 2016

चालू घडामोडी : महत्त्वाचे मुद्दे

१. सुप्रिया साहू यांची दूरदर्शनच्या महासंचालक पदी नेमणुक करण्यात आली असून ह्याआधीच्या अपर्णा वैश महासंचालक होत्या.
२. ज्येष्ठ लीगल सर्विसेस ऑफिसर सुरेशचंद्र यांची केंद्रीय कायदे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. भारती इंटरप्राइजेजचे चेयरमैन आणि संस्थापक सुनील भारती मित्तल यांची पॅरिसमध्ये स्थित अंतरराष्ट्रीय कॉमर्स चैंबरचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. इंटरनॅशनल कॉमर्स चैंबरची स्थापना १९१९ मध्ये पॅरिस मध्ये झाली आहे.
४. २१ जून रोजी होणार्या अंतरराष्ट्रीय योग दीनानिम्मित भारत सरकारने एक योग गीत प्रकाशित केले आहे. हे गाणे हिंदीमध्ये असून त्याचा कालावधी ३ मिनिटे आणि १५ सेकंद आहे. इंटरनॅशनल योग दिन हा २१ जून रोजी साजरा केला जातो. येणारा योग दिन हा दूसरा जागतिक योग दिन असेल.
५. पियूष गोयल यांनी ग्राहक कनेक्टिविटी वाढविण्यासाठी गोव्यामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये विद्युत प्रवाह आणि ऊर्जा अर्बन ज्योती अभियान ही दोन मोबाइल ऍप सुरु केली.
६. ज्येष्ठ ओडिया अभिनेत्री मणिमाला देवी यांचे नुकतेच निधन झाले.
७. रिओ आयोजन समितीने दक्षिण अमेरिकेत होणार्या ऑलिम्पिक आणि पैरालम्पिक गेम्ससाठी अधिकृत घोषवाक्य 'अ न्यू वर्ल्ड' प्रसिद्ध करण्यात आले आहे.
८. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी भारतातील पहिली वेळापत्रकावर आधारित मालवाहतूक रेल्वे 'कार्गो एक्सप्रेस' ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन नवी दिल्लीहून बँगलोर जाणार आहे.
९. कनैडियन कवी, कादंबरीकार आणि पर्यावरण कार्यकर्ते मार्गरेट एटवुड यांना २०१६ चा पेन पिंटर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१०. पुण्याचे मधुमेह स्पेशालिस्ट सशांक शाह यांना विवियन फोंसेका स्कॉलर अवार्ड २०१६ ने सन्मानित करण्यात आले आहे.

Saturday 18 June 2016

फादर ऑफ दी सब्जेक्ट्स

भारतीय घटनेचे जनक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अमेरिकन घटनेचे जनक - जेम्स मैडिसन
हरित क्रांतीचे जनक - नॉर्मन बोरलॉग
भारतीय हरित क्रांतीचे जनक - एम एस स्वामीनाथन
अयुर्वेदचे जनक - लॉर्ड धनवंतरी
जीवशास्त्रचे जनक - एरिस्टोटल
भौतिकशास्त्राचे जनक - अल्बर्ट आइंस्टीन
सांख्यिकीचे जनक - रोनाल्ड फिशर
प्राणीशास्त्राचे जनक - एरिस्टोटल
इतिहासाचे जनक - हेरोडोतुस
सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक - लुइस पैस्टर
वनस्पतीशास्त्राचे जनक - थेफ्रस्तुस
गणितचे जनक - दिोफन्टूस
रक्तगटांचे जनक - लैंडस्टीनेर
विद्युतप्रवाहचे जनक - बेंजामिन फ्रैंकलिन
त्रिकोणमितीचे जनक - हिप्पर्चुस
भूमितीचे जनक - यूक्लिड
आधुनिक रसायनशास्त्राचे जनक - एंटोनी लावोइसीयर
रोबोटिक्सचे जनक - निकोला टेस्ला
इलेट्रॉनिक्सचे जनक - रे टॉमलिंसन
इंटरनेटचे जनक - विंटन सर्फ
अर्थशास्त्राचे जनक - ऐडम स्मिथ
विडियो गेम्सचे जनक - थॉमस गोल्डस्मिथ
आर्किटेक्चरचे जनक - इमहोतेप
जेनेटिक्स जनक - ग्रेगोर जोहन मेंडेल
वर्ल्ड वाइड वेबचे जनक - टीम बर्नर्स-ली
सर्च इंजिनचे जनक - ऐलान एमटग
आवर्तसारणीचे जनक - दमित्री मेंडेलीव

Thursday 16 June 2016

महाराष्ट्रातील पर्वतशिखरे

महराष्ट्राला समुद्रकिनारपट्टीला समांतर तब्बल ८४० किमी लांबीची डोंगररांग लाभली आहे. भौगोलिक दृष्ठ्या ही रांग म्हणजेच सह्याद्री घाट किंवा पश्चिम घाट, जो दख्खनच्या पठाराला कोकण किनारपट्टीपासून वेगळा करतो. येथे आपण महाराष्ट्रातील काही उंच पर्वत शिखरे अभ्यासणार आहोत.
 नाव
महाराष्ट्रातील क्रमांक
ऊंची (मीटरमध्ये)
पर्वतरांग
जिल्हा
महत्त्व
कळसुबाई

पहिला

 १,६४६ मीटर
 कळसुबाई रांगा
अहमदनगर/नाशिक
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर
 साल्हेर

दूसरा

१,५६७ मीटर 
सेलबरी रांगा
नाशिक
सह्याद्री रांगांमधील उंच किल्ला
धोडप
तीसरा
१,४७२ मीटर
सातमाळा पर्वतरांगा
नाशिक
नाशिकमधील दूसरे उंच शिखर
 तारामती

चौथा 

१,४३१ मीटर
माळशेज पर्वतरांगा
अहमदनगर
हरीशचंद्रगड मधील एक शिखर
तोरणा
  पाचवा 
१,४०३ मीटरसह्याद्री पर्वतरांगपुणेशिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला गड 
पुरंदर

सहावा 

१,३८७ मीटर
सह्याद्री पर्वतरांग
पुणे
संभाजी राज्यांचे जन्मस्थान
मांगी-तुंगी

सातवा 

१,३३१ मीटर
सेलबरी पर्वतरांग
नाशिक
जुळी शिखरे
राजगड 


आठवा 
१,३१८ मीटर
सह्याद्री पर्वतरांग
पुणे
मुरुमदेव म्हणून आधी ओळखले जायचे आणि मराठ्यांची राजधानी पहिली (२६ वर्षे)
 सिंहगड

नऊवा

  १,३१२ मीटर
सह्याद्री पर्वतरांग
पुणे
सिंहगडची लढाई
रतनगढ 


दहावा 
१,२९७ मीटर
माळशेज पर्वतरांग
अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातील दूसरे उंच शिखर 
ब्रम्हगिरी

अकरावा 

१,२९५ मीटर
त्रयंबकेश्वर पर्वतरांग  
नाशिक
गोदवरीचे उगमस्थान त्र्यंबकच्या शेजारी असणारे शिखर
अंजनेरी 


बारवा
१,२८० मीटर 
त्र्यंबकेश्वर पर्वतरांग 
नाशिक 
प्रभु हनुमंताचे जन्मस्थान, म्हणून ह्या शिखराला त्यांच्या आईचे नाव देण्यात आले
सप्तश्रृंगी

तेरावा 

१,२६४ मीटर 
सातमाळा पर्वतरांग 
नाशिक 
हिंदू देवस्थान 
प्रतापगड 

चौदावा 
१,०८० मीटर 
सह्याद्री पर्वतरांग
सातारा 
प्रतापगडची लढाई आणि प्रसिध्द प्रेक्षणीय स्थळ
रायगड 

पंधरवा 
८२० मीटर 
सह्याद्री पर्वतरांग  
रायगड 
मराठा साम्राज्याची राजधानी शिवराज्याभिषेक  

चालू घडामोडी : १४ जून

१. खालीलपैकी कोणता देश जंगलतोड बंदी करणारा जगातील पहिला देश आहे?
अ - पैराग्वे
ब - नॉर्वे
क - बोलीविया
ड - अर्जेंटीना

२. नुक्लेअर फ्यूल कॉम्प्लेक्सचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
अ - एम राधाकृष्णन
ब - जी कल्याणकृष्णन
क - एन साईबाबा
ड - अनुपमा परमेस्वरन

३. इंटरनॅशनल पैरालम्पिक कमिटीचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे?
अ - जिनेवा
ब - न्यू यॉर्क
क - पॅरिस
ड - बोन

४. लिटील मिस प्रिंसेस ऑफ एशिया २०१६ ची मानकरी कोण ठरली आहे?
अ - पेहर कुमारी
ब - मृदुला सिन्हा
क - महिमा सेन
ड - बैतूल अजमल

५. कोणत्या भारतीय लघु चित्रपटाला सेउल अंतरराष्ट्रीय महिला फिल्म फेस्टिवल २०१६ मध्ये प्रेक्षक निवड पुरस्कार मिळाला आहे?
अ - अहिल्या
ब - नामकरण
क - चाय
ड - लीचेस

उत्तरे :
१. (ब) नॉर्वे, जंगलतोड बंदी करणारा नॉर्वे हा जगातील पहिला देश ठरला आहे. जंगलतोड बंदी ही नॉर्वेजियन सरकारची पॉलिसी असून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
२. (ब) जी कल्याणकृष्णन, नुक्लेअर फ्यूल कॉम्प्लेक्स चे नवीन मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून जी कल्याणकृष्णन यांची नेमणुक करण्यात आली आहे. एन साईबाबा ह्या आधीचे मुख्यकार्यकारी अधिकारी होते. नुक्लेअर फ्यूल कॉम्प्लेक्सचे मुख्यालय हैद्राबादला असून ऊर्जा निर्मितीसाठी लगनरया आण्विक इंधनाचा पुरवठा ही संस्था करते.
३. (ड) बोन, इंटरनॅशनल पैरालम्पिक कमिटीचे मुख्यालय बोनला असून तिने नुकतेच पैरालम्पिक कमिटी ऑफ इंडियाला पुन्हा मान्यता दिली असून सध्या राओ इंदरजीत सिंह हे अध्यक्ष आहेत. आयपीसी अंतरराष्ट्रीय पातळीवर पैरालम्पिक ९ खेळ भरविते. आयपीसीचे मुख्यालय बोन मध्ये असून पैरालम्पिक गेम्स ऑलिम्पिक गेम्सला समांतर भरविले जातात.
४. (ड) बैतूल अजमल, केरळच्या बैतूल अजमलला लिटिल मिस प्रिंसेस ऑफ एशिया २०१६ किताब मिळाला असून ही स्पर्धा जॉर्जिया येथे पार पडली. हयसोबतच बैतूलला 'यंग टॅलेंट', 'यंग मिस यूनिवर्स ग्रँड प्रिक्स' ने सन्मानित करण्यात आले आहे. ही स्पर्धा जॉर्जिया मध्ये ५ जून २०१६ रोजी पार पडली. ह्या स्पर्धेमध्ये २७ देशांमधील १०-१३ वयोगटातील २९ स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा किंगडम ऑफ यूनिवर्सल प्रोडक्शनने भरवली होती.
५. (ड) लीचेस

Tuesday 14 June 2016

चालू घडामोडी : १२ जून

१. कोणत्या राज्य सरकारने शेती उत्पन्नावरील कर रद्द केला आहे?
अ - कर्नाटक
ब - राजस्थान 
क - बिहार
ड - पंजाब

२. जननी सेवा ही नवीन योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरु केली आहे?
अ - रेल्वे मंत्रालय
ब - महिला आणि बाल विकास मंत्रालय
क - गृह मंत्रालय
ड - कामगार आणि रोजगार मंत्रालय

३. २०१६ ची महिला एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरिस ही बॅडमिंटन स्पर्धा कोणी जिंकली आहे?
अ - पी व्ही सिंधू 
ब - यिहान वांग 
क - साइना नेहवाल
ड - सुन यु

४. २०१६ चा अंतरराष्ट्रीय डबलिन साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
अ - अखिल शर्मा 
ब - शंतनु गुहा 
क - निर्मल जैन 
ड - प्रीती कपूर

५. फ़ोर्ब्सने जाहीर केलेल्या १०० सर्वाधिक पेड़ खेळाडूंच्या यादीमध्ये अव्वल स्थानी कोण आहे?
अ - रॉजर फेडरर 
ब - नोवाक जोकोविच
क - क्रिस्टिआनो रोनाल्डो
ड - लिओनेल मेस्सी

उत्तरे:
१. (अ) कर्नाटक, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरमैाह ह्यांनी नुकतीच शेत मालावरील उत्पन्नावरील कर रद्द केला आहे, २०१६-१७ च्या बजेटमध्ये तो आकारण्यात आला होता.
२. (अ) रेल्वे मंत्रालय, जननी सेवा योजना रेल्वे मंत्रालयाने सुरु केली असून त्या योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनवरती गरम दूध, गरम पाणी, लहान बाळाला अन्न उपलब्ध असेल.
३. (क) साइना नेहवाल, भारतीय बॅडमिंटनपटू साइना नेहवालने २०१६ ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरिज जिंकली आहे. सिडनी येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये तिने सुन युचा ११-२१, २१-१४, २१-१९ असा पराभव केला.
४. (अ) अखिल शर्मा, भारतीय वंशाचे अमेरिकन लेखक अखिल शर्मा यांना प्रतिशिष्ठ २०१६ अंतरराष्ट्रीय डबलिन साहित्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांना हा पुरस्कार 'फॅमिली लाइफ' आत्मचरित्राला मिळाला आहे. १००,०००/- यूरोज असे पुरस्काराचे स्वरुप असून जर पुस्तक इंग्लिश मध्ये भाषांतरित केले असेल तर ७५,०००/- यूरोज लेखकाला आणि २५,०००/- यूरोज भाषांतरित करणार्या व्यक्तीला.
५. (क) क्रिस्टिआनो रोनाल्डो, फोर्ब्स २०१६ च्या टॉप पेड़ १०० खेळाडूंच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे पोर्तुगलचा क्रिस्टिआनो रोनाल्डो (८८ दशलक्ष डॉलर्स) त्याखालोखाल आहेत लिओनेल मेस्सी, लेबोर्न जेम्स, रॉजर फेडरर, केविन दुरन्त. ह्या यादीमध्ये २३ देश आणि १० खेळांतील खेळाडूंचा समावेश होता.

Sunday 12 June 2016

चालू घडामोडी : १० जून

१. २०१६ महिला जूनियर वर्ल्ड चैंपियनशिप कोणत्या देशामध्ये भरविल्या जाणार आहेत?
अ - भारत
ब - चिली
क - बेल्जियम
ड - इंग्लंड

२. जागतिक शांतता निर्देशांक (वर्ल्ड पीस इंडेक्स) २०१६ च्या आकडेवारी मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
अ - १५५ व्या
बी - १४१ व्या
क - १६२ व्या
ड - ११९ व्या

३. नुकतीच पार पडलेली अंतरराष्ट्रीय कामगार परिषद (इंटरनॅशनल लेबर कॉन्फरेंस) कोणत्या शहरामध्ये भरविण्यात आली होती?
अ - नवी दिल्ली
ब - बर्लिन
क - जिनेवा
ड - न्यू यॉर्क

४. 'सहयोग-हएोबलोद-२०१६' हे संयुक्त सैनिकी अभ्यास शिबिर भारत आणि कोणत्या देशा दरम्यान पार पडले?
अ - सिंगापूर
ब - दक्षिण कोरिया
क - वियतनाम
ड - मलेशिया

५. कोणत्या भारतीयाला अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे?
अ - मिल्खा सिंह
ब - पी टी उषा
क - एन रामचंद्रन
ड - अरुणिमा सिन्हा

६. नुकत्याच प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणानुसार जगामध्ये सर्वात जास्त तेल वापरणारा (ऑइल) देश कोणता आहे?
अ - चीन
ब - भारत
क - अमेरिका
ड - रशिया

उत्तरे:
१. (ब) चिली, २०१६ ची महिला जूनियर वर्ल्ड चैंपियनशिप चिलीच्या सैंटीगो शहरामध्ये २४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान पार पडणार असून भारत ह्या स्पर्धेमध्ये सभासद नाही.
२. (ब) १४१ व्या, जागतिक शांतता निर्देशांक २०१६ नुसार भारत १६३ पैकी १४१ व्या स्थानी आहे. हा अहवाल इंस्टीटूट फॉर इकोनॉमिक्स एंड पीस ह्या अंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत प्रकाशित केला जातो. ह्या अहवालामध्ये प्रथम स्थानी आहे आइसलैंड तर द्वितीय स्थानी आहे डेन्मार्क. ह्या अहवालामध्ये १६३ देशांचा समावेश होता आणि त्यांच्या देशाअंतर्गत शांततेनुसार क्रम दिला आहे.
३. (क) जिनेवा, १०५ वी अंतरराष्ट्रीय कामगार परिषद जिनेवामध्ये पार पडली. ही परिषद ३० मे रोजी सुरु झाली आणि  जूनला समारोप झाला. भारतातर्फे ह्या परिषदेमध्ये केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय गेले होते.
४. (ब) दक्षिण कोरिया, २०१६ ची सहयोग-हएोबलोद (सहकार्य) संयुक्त सैनिकी अभ्यास शिबीर भारत-दक्षिण कोरिया दरम्यान ९ जून ते ११ जून दरम्यान पार पडले. हे शिबीर बंगालच्या उपसागरामध्ये चेन्नई येथे पार पडले. हे शिबीर दोन वर्षांमधुन एकदा पार पडते आणि हे ह्या शिबिराचे ५ वे वर्ष होते.
५. (क) एन रामचंद्रन, भारतीय ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष एन रामचंद्रन यांना अंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने प्रतिष्ठित ऑलम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी ऑलम्पिक चळवळीसाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना हा बहुमान मिळाला आहे.
६. (क) अमेरिका, जगामध्ये सर्वाधिक तेल वापरणारा अमेरिका असून त्याखालोखाल चीन, भारत, जापान आहेत. भारत दररोज ४.१ दशलक्ष बर्रेल्स वापरतो तर अमेरिका १९.३९ दशलक्ष बर्रेल्स, चीन ११.९६ बर्रेल्स तेल दररोज वापरतात. हा अहवाल दरवर्षी ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीतर्फे प्रकाशित केला जातो.

राजश्री छत्रपती शाहू महाराज


राजश्री छत्रपती शाहू महाराज उर्फ चौथे शाहू हे कोल्हापूर संस्थानचे १८८४ ते १९२२ दरम्यान छत्रपती होते.
जन्म: २६ जून १८७४
मृत्यु: ६ मे १९२२
जीवन: शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ ला कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव आप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्युनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंत यांना दत्तक घेतले आणि शाहू नाव ठेवले. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंत म्हणजेच २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते. मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.
कार्य: शाहू महाराजांनी बहुजन शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ठ करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांना वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातीभेद बंद करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात अंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ साली निपाणी येथे 'डेक्कन रयत असोशिएशन' ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरुन झालेला वेदोक्त प्रकरण शाहू महरजांच्याच काळात झाला.
'शाहू छत्रपती स्पिनिंग एंड वीव्हिंग मिल' शाहपुरी व्यापरपेठ, शतकर्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी 'किंग एडवर्ड एग्रीकल्चरल इंस्टीट्यूट' इ. संस्था कोल्हापूरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्यांना कर्जे उपलब्ध करुण देणे अशा उपक्रमातून त्यांनी कृषी विकासाकडे लक्ष पुरवले.
त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.
शाहू महाराजांना 'राजश्री' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रीय समाजाने दिली.

Saturday 11 June 2016

चालू घडामोडी : ९ जून

१. जागतिक समुद्र दिन (ओशियन डे) हा दरवर्षी ८ जूनला पाळला जातो, यंदाची समुद्र दिनाची थीम काय होती?
अ - ऑउर ओशन, ऑउर रिस्पॉन्सिबिलिटी
ब - युथ: दी नेक्स्ट वेव ऑफ चेंज
क - हेल्थी ओशन, हेल्थी प्लॅनेट
ड - कैन वी प्रोटेक्ट ऑउर ओशन्स

२. रिज़र्व बँकेने नुकतेच दुमासीक मॉनेटरी स्टेटमेंट २०१६-१७ जाहिर केले, सध्याचा रेपो रेट काय आहे?
अ - ६.०%
ब - ६.५%
क - ७.०%
ड - ७.५%

३. तृतीय पंतियांना पेंशन आणि अन्नलाभ देण्याचा निर्णय घेतला असून असे करणारे भारतातील ते प्रथम राज्य आहे?
अ - राजस्थान
ब - पंजाब
क - ओडिशा
ड - कर्नाटक

४. खालीलपैकी कोणत्या शहर स्वता:चा शहर प्राणी (सिटी एनिमल) असणारे भारतातील पहिले शहर आहे?
अ - शिलॉन्ग
ब - गुवाहाटी
क - चंडीगढ़
ड - मुंबई

५. 'अखिल भारतीय महिला पत्रकार कार्यशाळा' कोणत्या शहरामध्ये पार पडली?
अ - जयपुर
ब - कानपूर
क - नवी दिल्ली
ड - भोपाळ

६. ओडिशामध्ये सिंचनला मदत मिळावी यासाठी भारताने नुकतेच आशियाई विकास बँक (एशियन डेवलपमेंट बँक) सोबत किती रक्कमेच्या लोन-करारावर स्वाक्षरी केली आहे?
अ - १०० दशलक्ष डॉलर्स
ब - १२० दशलक्ष डॉलर्स
क - १५० दशलक्ष डॉलर्स
ड - २१० दशलक्ष डॉलर्स

उत्तरे -
१. (क) हेल्थी ओशन्स, हेल्थी प्लॅनेट, जागतिक समुद्र दिन हा दरवर्षी ८ जूनला साजरा केला जातो. यंदा लोकांमध्ये समुद्र संवर्धन आणि त्याला प्रदूषित न करण्यासाठी हेल्थी ओशन्स, हेल्थी प्लॅनेट ही थीम ठेवण्यात आली होती.
२. (बी) ६.५%, रिज़र्व बँकेने ६.५% केला असून रिवर्स रेपो रेटमध्ये काहीही बदल न करता ६% ठेवला आहे तर शेडुल्ड बॅकांचा कॅश रिज़र्व रेशो न बदलता ४.०% ठेवला आहे .
३. (क) ओडिशा, तृतीय पंतियांना पेंशन त्याचप्रमाणे धान्यलाभ देणारे ओडिशा हे भारतातील प्रथम राज्य असून त्यांना दारिद्र्यरेषेखालील रेशनिंग कार्ड दिले जाणार आहे त्यामुळे ह्या योजनेचा लाभ घेणे त्यांना सोयीस्कर जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना स्वत: चा व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय कर्जही मिळणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांना दरमहीना ५ किलो धान्य मिळणार आहे.
४. (ब) गुवाहाटी, आसामची राजधानी असलेले गुवाहाटी भारतातील पहिले शहर आहे ज्याचा स्वत: चा शहरी प्राणी आहे. गंगा नदीतील डॉल्फिन हा सिटी एनिमल आहे.
५. (क) नवी दिल्ली, महिला आणि बाल विकास मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि प्रेस इनफार्मेशन ब्यूरो ह्यांच्या सहयोगाने आयोजित पहिली अखिल भारतीय महिला पत्रकार कार्यशाळा नवी दिल्लीच्या विज्ञान भवनमध्ये पार पडली. ह्या कार्यशाळेमध्ये ३० भारतीय संघराज्यातून जवळपास २५० महिला पत्रकार आल्या होत्या.
६. (ब) १२० दशलक्ष डॉलर्स, भारत सरकार आणि आशियाई विकास बँकमध्ये १२० दशलक्ष डॉलर्सचा कर्जकरार झाला असून ह्या कर्जाचा वापर ओडीशामधील सिंचन आणि वॉटर मैनेजमेंट इंफ्रास्ट्रक्टर बनविण्यासाठी होणार आहे. ह्या प्रकल्पाअंतर्गत बैतरणी, ब्राह्मणी, बुधबलंगा, सुबर्णरेखा, आणि महानदीचे खोरे समाविष्ठ आहेत.

Thursday 9 June 2016

चालू घडामोडी : ४ जून

१. २०१८ मध्ये दक्षिण कोरियाच्या पयोंगचांग मध्ये भरवण्यात येणार्या पैरालिम्पिक विंटर गेम्ससाठी मैस्कॉट म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
अ - मुकमुक
ब - बंदबी
क - ल्यो एंड मर्ली
ड - टॉम

२. आर्थिक क्षेत्रामध्ये संशोधन आणि भरती प्रक्रियेसाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली आहे?
अ - एन के मित्तल समिती
ब - आर एस लोढ़ा समिती
क - एम एन मिश्रा
ड - पी के सिंहा समिती

३. दक्षिण कोरियात भरविण्यात येणार्या २०१८ विंटर ओलंपिक्स साठी मैस्कॉट म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
अ - बेली मिश्का
ब - सूहोरंग
क - विल्ली
ड - विनिकस

४. आशिया खंडातील पहिला 'जिपस वल्चर रिइंट्रोडक्शन प्रोग्राम' कोणत्या भारतीय राज्यामध्ये सुरु करण्यात आला?
अ - गोवा
ब - महाराष्ट्र
क - हरियाणा
ड - गुजरात

५. राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्था म्हणजेच नाडाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नेमणुक करण्यात आली आहे?
अ - सुधीर मित्तल
ब - नवीन अग्रवाल
क - निहाल सिंघवी
ड - दीपक नारायण

६. सियट क्रिकेट रेटिंग तर्फे दिला जाणारा २०१६ चा जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
अ - कपिल देव
ब - दिलीप वेंगसरकर
क - सुनील गावसकर
ड - अजित वाडकर

उत्तरे:
१. (अ) बंदबी, बंदबी  हे आशियाई काळे अस्वल असून त्याला दक्षिण कोरियामध्ये होणार्या २०१८ च्या परालंपिक विंटर गेम्सचे मैस्कॉट घोषित करण्यात आले आहे. काळे अस्वल हे गंगवोंन प्रांताचे प्रतिक आहे.
२. (ब) पी के सिंहा समिती, केंद्र सरकारने आर्थिक क्षेत्रामध्ये संशोधन आणि भरती प्रक्रियेसाठी समिती स्थापन केली असून सदर समिती कॅबिनेटचे सचिव पी के सिंहा ह्यांचा अध्यक्षतेखाली काम करेल.
३. (ब ) सुहोरंग, सुहोरंग सफेद वाघाचे असून दक्षिण कोरियामध्ये होणार्या २०१६ ऑलिम्पिक विंटर गेम्ससाठी मैस्कॉट म्हणुन घोषित करण्यात आले आहे. पौराणिक दृष्ठ्या पाहिले तर कोरियन द्विपकल्पाचा आकार हा वाघाच्या आकराशी मिळता जुळता आहे. मैस्कॉटचा सफेद रंग विंटर गेम्समधील बर्फासोबत साम्य खाउन जातो.
४. (क) हरियाणा, जिप्स वल्चर रिइंट्रोडक्शन प्रोग्राम हरियाणाच्या जटायु संवर्धन आणि पैदास केंद्र, पिंजौरमध्ये सुरु करण्यात आला असून आशिया खंडातील हा पहिला प्रयोग आहे, ह्याचे उद्धघाटन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावड़ेकर आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खटटर ह्यांनी केले.
५. (ब) नवीन अग्रवाल, १९८६ च्या बैचचे आईपीएस अधिकारी नवीन अग्रवाल यांची नॅशनल एंटी-डोपिंग एजेंसीच्या कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाडा ही राष्ट्रीय संस्था असून  डोपिंग विरोधी कारवाई, त्याचप्रमाणे जाहीरात आणि त्यांवर लक्ष ठेवण्याचे कार्य करते.
६. (ब) दिलीप वेंगसरकर, दिलीप बलवंत वेंगसरकर ह्यांना यंदाचा सियट क्रिकेट रेटिंग जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.