Friday 20 September 2013

महाराष्ट्र रेल्वे वाहतूक

१६ एप्रिल १८५३ ला भारतातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात बोरबंदर ते ठाणे या मार्गावर धावली

राज्यातील प्रमुख लोहमार्ग:
  • मध्य रेल्वे - मुंबई ते दिल्ली, ठाणे-नाशिक-मनमाड-भुसावळ मार्गे मध्यप्रदेश-दिल्ली 
  • पश्चिम रेल्वे - मुंबई ते दिल्ली, डहाणु-सुरत-बडोदा-अहमदाबाद मार्गे राजस्थान-दिल्ली
  • मध्य रेल्वे - मुंबई ते कोलकाता, भुसावळ-अकोला-वर्धा-नागपुर-जबलपुर मार्गे दिल्ली
  • मध्य रेल्वे - मुंबई ते चेन्नई, मुंबई-दौंड-सोलापुर मार्गे चेन्नई
  • ग्रँट ट्रंक लोहमार्ग - दिल्ली ते चेन्नई, चंद्रपुर-वर्धा-नागपुर मार्गे आंध्रप्रदेश चेन्नई
  • मध्य रेल्वे - मुंबई ते सिंकदराबाद, पुणे-सोलापुर मार्गे
भारतीय रेल्वेबाबत:
  • ३ फेब्रुवारी १९२५ ला देशातील पहिली विद्युत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला या मार्गावर धावली
  • १९८६ ला दिल्ली येथे संगणकीकृत रेल्वे आरक्षण सुविधा सुरु
  • १९९१ ला जीवनरेखा हे धावते रेल्वे रुग्णालय मुंबईतून सुरु
  • १६ एप्रिल २००२ ला मुंबई ते मनमाड मार्गावर पहिली जन-शताब्दी एक्सप्रेस सुरु
  • स्काई बस या महत्वकांक्षी  प्रकल्पाची कोकण रेल्वेने २००३ मध्ये मनमाड येथे यशस्वी चाचणी घेतली
  • स्काई बस हा प्रकल्प जुलै २०१३ ला कोकण रेल्वेने बंद केला
  • देशातील १६ रेल्वे विभागांपैकी २ विभाग राज्यात आहेत
  • मध्य रेल्वे - छत्रपती शिवाजी टर्मिनस तर पश्चिम रेलवे - चर्चगेट, मुंबई
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या रेल्वे:
  • महाराष्ट्र एक्सप्रेस - कोल्हापुर ते गोंदिया
  • हरिप्रिया एक्सप्रेस - कोल्हापुर ते तिरुपती
  • सिद्धेश्वर एक्सप्रेस - सोलापुर ते मुंबई
  • सिंहगड एक्सप्रेस - पुणे ते मुंबई
  • महालक्ष्मी एक्सप्रेस - मुंबई ते कोल्हापुर
  • डेक्कन एक्सप्रेस - मुंबई ते पुणे
  • सह्याद्री एक्सप्रेस - मुंबई ते पुणे
कोकण रेल्वे:
  • कोकण रेल्वेचा शुभारंभ २६ जानेवारी १९९८
  • एकूण अंतर - ७६२ किमी, मुंबई ते मंगलूर - ८४३ किमी 
  • महाराष्ट्रातील अंतर - ३८२ किमी 
  • राज्यातील कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहाही जिल्ह्यातून कोकण रेल्वे प्रवास करते
  • भारतात कोकण रेल्वे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यातून प्रवास करते

Sunday 15 September 2013

महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण

राज्यात रस्ते, हवाई, रेल्वे व जलमार्ग या प्रमुख मार्गानी वाहतूक केली जाते

रस्ते वाहतूक - राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग व ग्रामीण सडका
  • रस्ते विकास योजना - डॉ जयकर आयोग (१९२७) व नागपुर योजना (१९४३)
  • नागपुर योजनेनुसार - १९६१ ते १९८१ व १९८१ ते २००१ अशा २० वर्षाच्या कालावधीच्या 'सुधारित रस्ते विकास योजना' कार्यान्वित करण्यात आल्या
महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग:
  • राष्ट्रीय महामार्ग ३ - मुंबई ते आग्रा, ठाणे-भिवंडी-नाशिक-धूले मार्गे (३९१ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ४ - मुंबई ते चेन्नई, पुणे-सातारा-बेलगाव मार्गे (३७५ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ४ ब - न्हावाशेवा ते पलस्पे, कलंबोली मार्गे (२७ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ६ - धुले ते कोलकाता, धुले-अकोला-बडनेरा-नागपुर मार्गे (६८६ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ७ - वाराणसी ते कन्याकुमारी, बोरी-नागपुर-रामटेक (२३२ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ८ - मुंबई ते दिल्ली, भायंदर-मनोर मार्गे (१२८ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ९ - पुणे ते मचलिपत्तानाम, इंदापूर-सोलापुर मार्गे (३३६ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग १३ - सोलापुर ते मंगलूर विजापुर मार्गे (४३ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग १६ - निज़ामाबाद ते जगदलपुर, विदर्भ मार्गे (४० किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग १७ - पनवेल ते एडापल्ली, रायगड-सावंतवाडी-पणजी मार्गे (४८२ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ५० - पुणे ते नाशिक, पुणे-नाशिक (१९२ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ६९ - नागपुर ते अब्दुल्लागंज (५५ किमी)
  • राष्टीय महामार्ग २०४ - रत्नागिरी ते नागपुर, पाली-कोल्हापुर-सांगली-सोलापुर-लातूर-वर्धा (९७४ किमी)
रस्ते वाहतूक वैशिष्ट्ये:
  • न्हावाशेवा-कलंबोली-पलस्पे रा. म. ४ ब हा राज्यातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग असून त्याचा वापर न्हावाशेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या बंदरावर जाण्यासाठी केला जातो
  • मार्च २०११ अखेर राज्यातील सर्व प्रकारच्या रस्यांची लांबी - २.४० लाख
  • दर १०० चौकिमी मागे राज्यामध्ये रस्त्यांची लांबी ९३ किमी आहे
  • राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची एकुण लांबी ४,३७६ किमी आहे 
  • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ १९४८ ला स्थापन करण्यात आले
  • २०११ अखेर रा. म. २११ (सोलापुर ते धुले) व रा. म. २१४ (कल्याण ते भोकर) हे घोषित करण्यात आले
कोकण व पठारावारिल प्रमुख घाट:
  • थळ (कसरा) घाट - मुंबई - नाशिक
  • बोर घाट - मुंबई - पुणे 
  • कुंभर्ली घाट - कराड - चिपलुण 
  • आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
  • फोंडा घाट - कोल्हापुर - पणजी
  • अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
  • खंबाटकी घाट - सातारा - पुणे

Monday 9 September 2013

महाराष्ट्राचा भूगोल भाग - २

महाराष्ट्र भौगोलिक दृष्टया:
  • महाराष्ट्राची निर्मिती - १ मे १९६० (१ मे हा महाराष्ट्र दिन म्हणुन साजरा केला जातो)
  • १ मे २०१० रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेचा सुवर्णमहोस्तव उस्ताहात संपन्न झाला
  • महाराष्ट्र हे निर्मितीवेळी देशातील १४ वे राज्य ठरले 
  • क्षेत्रफळ - ३,०७,७१३ किमी
  • दक्षिणोत्तर लांबी - ७२० किमी 
  • पूर्व - पश्चिम लांबी - ८०० किमी 
  • समुद्र किनारा लांबी - ७२० किमी 
  • स्थान - भारताच्या पश्चिम भागास अरबी समुद्र लागुन 
  • शेजारील राज्ये - वाव्यवेस गुजरात राज्य तर दीव दमण, दादरा नगरहवेली हे केंद्रशासित प्रदेश
  • उत्तरेस - मध्य प्रदेश, पूर्व व इशान्येस - छत्तीसगढ़
  • आगन्येस - आंध्र प्रदेश, दक्षिणेस - कर्नाटक व गोवा
  • लोकसंख्या - ९,६८,७८,६२७ (२००१)
  • २०११ चा अंतरिम निष्कर्ष - ११,२३,७२,९७२ 
  • भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण - ९.४२% (२००१) आणि ९.२९% (२०११)
  • राजधानी - मुंबई तर उपराजधानी - नागपुर 
  • राज्यातील जिल्हे - ३५ 
  • जिल्हा परिषदा - ३३ (मुंबई व मुंबई उपनगरामध्ये जिल्हा परिषदा नाहीत)
  • तालुके - ३५५, ग्रामपंचायती - २७,९९३, पचायत समित्या - ३५५
  • महानगरपालिका - २३, नगरपालिका - २२२, नगरपंचायती - ०४ 
  • दशलक्षी शहरे - ०७, १ लाखाहून जास्त लोकसंख्येची शहरे - ४० 
  • प्रशासकीय विभाग - ६ (कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपुर)

Friday 6 September 2013

महाराष्ट्राचा भूगोल भाग - १

महाराष्ट्र राज्याची प्रमुख वैशिष्ठ्ये:
  • महाराष्ट्राची भूमी बेसाल्ट या प्रमुख खडकापासून बनलेली आहे 
  • कोकणात जाम्भा चीरा अढाळतो
  • राज्यातील कळसूबाई हे सर्वोच्च शिखर उंची - १,६४६ मी
  • दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते; तिला रेगुर म्हणतात
  • माथेरान, महाबलेश्वर यासारखी थंड हवेची ठिकाणे
  • अंबोली, सिंधुदुर्ग येथे राज्यातील सर्वाधिक पाउस
  • बुलढाना जिल्ह्यातील 'लोणार' हे उल्कपातामुले निर्माण झालेले खारट पाण्याचे सरोवर
  • तापी, गोदावरी, वैनगंगा, वर्धा, भीमा, कृष्णा या प्रमुख नद्यांनी राज्याला सुफलाम सुजलाम केले आहे
  • पूर्व विदर्भ साग, बांबू यांच्या वनासठी तसेच कोळसा, लोह व मंगनीज या खानिजानी समृद्ध आहे
  • शेती हा राज्यातील प्रमुख व्यवसाय 
  • ज्वारी, बाजारी, तांदुळ, गहू ही प्रमुख पीके
  • ऊस, कापूस, तंबाखू, गलीत धान्ये ही नगदी पीके
  • कापड गिरण्या व साखर कारखान्याची रेलचेल
  • फळ लगावडित महाराष्ट्र देशात अग्रेसर
  • नागपुरची संत्री, जळगावची केळी, नाशिक - संगलीची द्राक्षे, रत्नागिरिचा हापूस प्रसिद्ध आहे
  • मुंबई हे देशातील प्रमुख औद्योगिक व व्यापारी शहर आहे
  • मुंबई - महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी व देशाची आर्थिक राजधानी
  • नागपुर - ही महाराष्ट्राची उपराजधानी, आंबेडकर यांनी बौद्ध धर्म याच नागभुमितच स्वीकारला
  • कोयना विजकेंद्र, जायकवाडी धरण, तारापुर अणुवीज केंद्र, अरबी समुद्रातील बॉम्बे हाय तेलक्षेत्र
  • इतर अनेक उद्योगानी राज्याच्या वैभवात भर टाकली आहे 
  • एतिहासिक साक्ष देणारे मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी, रायगड किल्ले 
  • समर्थ रामदासांच्या वास्तव्याने पुनीत झालेला सज्जनगड आदि प्रेक्षणीय किल्ले 
  • शिरवाडकर, खांडेकर, पु ल देशपांडे यानि मराठी राजभाषा समृद्ध केलेली आहे 
  • शाहू, फुले, आंबेडकर यानि समाजसुधारनेची बीजे मराठी मातीत रुजविली 

Sunday 1 September 2013

भारतातील सर्वप्रथम भाग - ४

महिला:
  • पहिले महिला न्यायालय - मडला, पश्चिम बंगाल (२४ जानेवारी २०१३)
  • पदवी धारक - कादम्बिनी गांगुली व चंद्रमुखी बासु (१८८३)
  • पहिली पोलिस महासंचालक - कांचन चौधरी भट्टाचार्य
  • नोबेल मिळविनारी - मदर टेरेसा
  • महिला रेल्वे मंत्री - ममता बनर्जी 
  • पहिली महिला वकील - कोर्नेलिया सोराबजी (१८९२, बॉम्बे यूनिवर्सिटी)
  • ऑक्सफ़ोर्डमध्ये शिकविनारी जगातील पहिली महिला - कोर्नेलिया सोराबजी
  • सुप्रीम कोर्टाच्या जज - कुमारी फातिमा बीवी
  • वैमानिक - दुर्बा बनर्जी 
  • इंग्लिश चैनल पार करणारी - आरती शाह 
  • पंतप्रधान - इंदिरा गांधी 
  • भारतीय पोलिस सेवा - किरण बेदी 
  • राष्ट्रपती - प्रतिभाताई पाटील 
  • केंदीय मंत्री - राजकुमारी अमृत कौर 
  • राष्ट्रिय कांग्रेस अध्यक्ष - एनी बेझेंट
ठिकाणे:
  • १००% साक्षरतेचा मान मिळविनिरा जिल्हा - एर्नाकुलम, केरळ (१९९०)
  • १००% साक्षरतेचा मान मिळविनिरे शहर - कोट्टायम, केरल (१९८९)
  • १००% साक्षरतेसह कमी जन्मदर असणारे पहिला जिल्हा - पतनमथित्ता, केरळ 
  • पोलिओ मुक्त पहिला जिल्हा - पतनमथित्ता, केरळ
  • तंबाखू मुक्त पहिला जिल्हा - कोट्टायम, केरळ  (२७ सप्टेम्बर २००८)
  • १००% वीज असलेला जिल्हा - पलक्कड़, केरळ (२०११)
  • इ-कोर्ट असणारे शहर - अहमदाबाद (२००९)
वाहतुक:
  • पहिली मेट्रो - कोलकाता मेट्रो 
  • पहिली ट्रेन - १६ एप्रिल १८५३ (मुंबई ते ठाणे)
  • पहिली उपनगरीय लाइन - मुंबई १८५७ 
  • पहिली मोटरकार - फोरस्टर (१८९७)
  • दररोज वापरासाठी मोटरकार - फ्रांसिस स्प्रिंग, चेन्नई (१९०१)
  • पहिले कार घेणारे भारतीय - जमशेदजी टाटा (१९०१)
  • पहिली महिला चालक - सुजेन टाटा (१९०५)
  • मोटर टैक्सी - १९११, मुंबई 
  • परदेशातून माल आणून भारतात कारखाना असलेली कंपनी - जनरल मोटर्स 
  • भारतीय कार बनाविनरी कंपनी - हिंदुस्तान मोटर्स (१९४२)
  • संपूर्ण भारतीय बनावटीची कार - टाटा इंडिका (१९९८)
  • पहिला एक्सप्रेसवे - मुंबई-पुणे मेगा हाईवे (२००२)
  • पहिले  विमान - पतियालाचे महाराज (१९१०)
  • भारतीय एयरलाइन्स - इम्पेरिअल एयरवेज (१९२७)
  • पहिले वैमानिक - जमशेदजी टाटा (१९२७)