Sunday, 15 September 2013

महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण

राज्यात रस्ते, हवाई, रेल्वे व जलमार्ग या प्रमुख मार्गानी वाहतूक केली जाते

रस्ते वाहतूक - राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग व ग्रामीण सडका
  • रस्ते विकास योजना - डॉ जयकर आयोग (१९२७) व नागपुर योजना (१९४३)
  • नागपुर योजनेनुसार - १९६१ ते १९८१ व १९८१ ते २००१ अशा २० वर्षाच्या कालावधीच्या 'सुधारित रस्ते विकास योजना' कार्यान्वित करण्यात आल्या
महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग:
  • राष्ट्रीय महामार्ग ३ - मुंबई ते आग्रा, ठाणे-भिवंडी-नाशिक-धूले मार्गे (३९१ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ४ - मुंबई ते चेन्नई, पुणे-सातारा-बेलगाव मार्गे (३७५ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ४ ब - न्हावाशेवा ते पलस्पे, कलंबोली मार्गे (२७ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ६ - धुले ते कोलकाता, धुले-अकोला-बडनेरा-नागपुर मार्गे (६८६ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ७ - वाराणसी ते कन्याकुमारी, बोरी-नागपुर-रामटेक (२३२ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ८ - मुंबई ते दिल्ली, भायंदर-मनोर मार्गे (१२८ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ९ - पुणे ते मचलिपत्तानाम, इंदापूर-सोलापुर मार्गे (३३६ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग १३ - सोलापुर ते मंगलूर विजापुर मार्गे (४३ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग १६ - निज़ामाबाद ते जगदलपुर, विदर्भ मार्गे (४० किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग १७ - पनवेल ते एडापल्ली, रायगड-सावंतवाडी-पणजी मार्गे (४८२ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ५० - पुणे ते नाशिक, पुणे-नाशिक (१९२ किमी)
  • राष्ट्रीय महामार्ग ६९ - नागपुर ते अब्दुल्लागंज (५५ किमी)
  • राष्टीय महामार्ग २०४ - रत्नागिरी ते नागपुर, पाली-कोल्हापुर-सांगली-सोलापुर-लातूर-वर्धा (९७४ किमी)
रस्ते वाहतूक वैशिष्ट्ये:
  • न्हावाशेवा-कलंबोली-पलस्पे रा. म. ४ ब हा राज्यातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग असून त्याचा वापर न्हावाशेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या बंदरावर जाण्यासाठी केला जातो
  • मार्च २०११ अखेर राज्यातील सर्व प्रकारच्या रस्यांची लांबी - २.४० लाख
  • दर १०० चौकिमी मागे राज्यामध्ये रस्त्यांची लांबी ९३ किमी आहे
  • राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची एकुण लांबी ४,३७६ किमी आहे 
  • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ १९४८ ला स्थापन करण्यात आले
  • २०११ अखेर रा. म. २११ (सोलापुर ते धुले) व रा. म. २१४ (कल्याण ते भोकर) हे घोषित करण्यात आले
कोकण व पठारावारिल प्रमुख घाट:
  • थळ (कसरा) घाट - मुंबई - नाशिक
  • बोर घाट - मुंबई - पुणे 
  • कुंभर्ली घाट - कराड - चिपलुण 
  • आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
  • फोंडा घाट - कोल्हापुर - पणजी
  • अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
  • खंबाटकी घाट - सातारा - पुणे

No comments:

Post a Comment