Tuesday 28 January 2014

चालू घडामोडी : भारत

केंद्रीय मंत्रीमंडळाने राष्ट्रीय युवा धोरण २०१४ मंजूर केले

केंद्रीय मंत्रीमंडळाने ९ जानेवारी २०१४ रोजी राष्ट्रीय युवा धोरण २०१४ ला मंजूरी दिली, मंत्री मंडळाची ही बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
राष्ट्रीय युवा धोरण २०१४ चे लक्ष्य: युवकांची पूर्ण क्षमता सध्या करुण त्यांना सशक्त बनवणे त्यामुळे देशाला इतर राष्ट्रांमध्ये मुख्य स्थान मिळविण्याचे सामर्थ प्राप्त होईल. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्राथमिकता असणारे ११ क्षेत्र निवडली असून प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळी रणनीति आखली गेली आहे. प्राथमिक क्षेत्रांमध्ये शिक्षा, कुशलता विकास आणि रोजगार, उद्योजकता, स्वास्थ आणि स्वस्थ जीवनशैली, खेळ, सामाजिक मूल्यांचे संवर्धन, समुदाय से जोडना, प्रशासनमध्ये सहभाग, युवकांना एकत्र ठेवणे, सामाजिक न्याय हे खेत्र आहेत. ही योजना १५ ते २९ वयोगटातील सर्व युवकांच्या गरजा पूर्ण करेल, २०११ च्या जनगणनेनुसार या गटातील व्यक्तींची एकूण लोकसंख्या २७.५% आहे. भारत हा जगातील सर्वाधिक युवक लोकसंख्या असणारा देश असून, त्याचा भविष्यामध्ये खुप फायदा होईल. हेच लक्ष्यामध्ये ठेवून २०१४ चे युवक धोरण आखण्यात आले आहे

केंद्रीय क्रीड़ा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीड़ा पुरस्करंसाठी नवीन नियमावली जाहिर केली

केंद्रीय क्रीड़ा मंत्रालयाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार तसेच ध्यानचंद पुरस्कार यांसाठी १० जानेवारी २०१४ रोजी नविन नियमावली जाहिर केली.
राष्ट्रीय खेल पुरस्करंसाठीचे जाहिर मार्गदशनाचे प्रमुख मुद्दे:
  • एखाद्या खेळाडू डोपिंगसाठी दोषी ठरविला गेला असेल किंवा त्याच्याविरुद्ध डोपिंगचा खटला चालू असेल तर तो खेल पुरस्कारासाठी योग्य नाही 
  • एखादा प्रशिक्षक खेळाडूला मादक द्रव्ये घेण्यास प्रोत्साहन करण्यासाठी दोषी ठरविला गेला असेल किंवा किंवा त्याच्याविरुद्ध खटला चालू असेल तर तर तो द्रोणाचार्य पुरस्करासाठी योग्य नाही 
  • खेल पुरस्कारांसाठी नामांकन अर्ज हे जानेवारी महिन्यामध्ये बोलविले जातील 
  • नामांकन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल असेल किंवा एप्रिल महिन्याच्या कामकाजाची अंतिम तारीख असेल 
  • नामांकन अर्ज पाठविण्यासाठी खेळ संस्थांच्या पदाधिकार्यांना नियुक्त केले आहे 
  • फ़क्त अधिकृत व्यक्तीच नामांकन अर्ज पाठवू शकतात 
  • नामांकन अर्जावरती स्वाक्षरी करण्याचा अधिकार हा फ़क्त ऑलम्पिक संघाचे अध्यक्ष किंवा महासचिव, राष्ट्रीय खेल महासंघाचे अध्यक्ष किंवा महासचिव यांनाच असेल 
  • क्रिकेटसाठीचे नामांकन अर्ज हे बीसीसीआय अध्यक्ष किंवा सचिवांनी पाठवायला हवा

Monday 27 January 2014

जगाचा भूगोल : भूमध्य सागरी हवामानी प्रदेश

यूरोप व अफ्रीका यांदरम्यान असलेल्या भूमध्य समुद्राभोवतालच्या प्रदेशात विशिष्ठ प्रकारचे हवामान आढळते त्याचप्रमाणे असे हवामान जगातील इतर काही प्रदेशामध्ये आढळते, त्या प्रदेशांना संयुक्तपणे भूमध्य सागरी हवामानाचे प्रदेश म्हणतात

अक्षवृत्तीय स्थान: विषुववृत्ताच्या दक्षिण व उत्तरेस ३० डिग्री ते ४० डिग्री अंशादरम्यान खंडाच्या पश्चिम भागात (उष्ण आणि समशितोष्ण कटिबंधांदरम्यान)

प्रमुख प्रदेश: भूमध्य समुद्राभोवताली असणारे पोर्तुगाल, स्पेन, दक्षिण फ़्रांस, इटली, लिबिया, मोरोक्को, अल्जेरिया याशिवाय उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील मध्य चिली आणि ऑस्ट्रेलियाचा आग्नेय व नैऋत्य भाग यांचा समावेश होतो

हवामान प्रकार: हिवाळी पाउस आणि कोरडा उबदार उन्हाळा हे भूमध्यसागरी हवामानाचे प्रमुख्य वैशिष्ठय आहे

वनस्पती जीवन: भूमध्य सागरी हवामानी प्रदेशातील वनस्पती खलीलप्रमाणे,
  • सदाहरित वृक्ष: पाईन, ऑक्स आणि सायप्रस 
  • पानझडी वृक्ष: सैकमोर्स, ऑक्स आणि बुकेएस 
  • फळ झाडे: ऑलिव्ह, अंजीर, द्राक्षे, अक्रोड, मोसंबी, अक्रोड 
  • झुडपे: बे लॉरेल, एरिक्स, चामिस, सागेस, सेगब्रश 
  • गवत: रशेज़, सेजेस, बंच ग्रास हे गवताचे प्रकार 
  • औषधी वनस्पती: रोसमेरी, थाइम, लैवेंडर 
प्राणीजीवन: गवताचा आभाव असल्याने या प्रदेशात मोजक्या पाळीव प्राण्यांव्यतिरिक्त विपुल प्राणीजीवन आढळत नाही 

व्यवसाय: शेती व शेतीवर आधारित उद्योग हे येथील प्रमुख आर्थिक व्यवसाय आहेत. गहु, जव, मक ही येथील प्रमुख पिके आहेत.  भूमध्यसागरी हवामान फळ लागवडीसाठी पोषक असल्याने द्राक्षे, अंजीर, ऑलिव्ह, अक्रोड, डाळिंब या फळांची रेलचेल आहे. पर्यायाने ऑलिव्ह तेल काढणे, द्राक्षंपासून मद्य तयार करणे, फळे सुकवून निर्यात करणे हे देखील प्रमुख व्यवसायच आहेत. ऑलिव्ह तेलाचा उपयोग स्वयंपाकात केला जातो. दक्षिण यूरोपमध्ये द्राक्ष लागवड तर पुर्तगाल, फ़्रांसमध्ये द्राक्षंपासून मद्य बनविण्याचे उद्योग चालतात. सुवासिक फुलांच्या लागवडीमुळे अत्तरनिर्मिती, ऑलिव्ह तेलापासून साबण तयार करणे तसेच रेशीम उद्योग देखील केले जातात 

इतर वैशिष्ठये: स्वच्छ सूर्यप्रकाश व हवा यांमुळे उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे चित्रपट व्यवसायाचे केंद्रीकरण झालेले असून लॉस ऐंजल्सजवळील हॉलीवुड हे त्याचे प्रमुख केंद्र आहे. प्राचीन रोमन व ग्रीक संस्कृतीचा विकास या हवामान प्रदेशात झाला असून आजही या संस्कृतीचे अवशेष तेथे आढळतात. भूमध्य सागरी प्रदेशास 'जगातील फळांचा प्रदेश' म्हणून ओळखले जाते. 

खनिज संपत्ती: भूमध्य सागरी हवामानी प्रदेशातील खनिज संपत्ती खलीलप्रमाणे, कॅलिफोर्नियामध्ये खनिज तेल त्याचप्रमाणे चीलीमध्ये तांबे, नाइट्रेट. युगोस्लाव्हिया व फ्रांसमध्ये बॉक्साईट तर इटली व स्पेनमध्ये पारा हे खनिज आढळते 

इतर महत्त्वाचे: या हवामान प्रदेशात लोह व कोळसा यांचे साठे कमीप्रमाणात असल्यामुळे पायाभूत अवजड उद्योगांची वाढ ही मंद आहे. पर्यटन व्यवसायामुळे मात्र या प्रदेशाची भरभराट झालेली आहे 

Thursday 23 January 2014

भारतीय सशस्त्र सेना

इंद्र २०१३: १६ ते २८ ऑक्टोंबर २०१३ दरम्यान राजस्थानच्या थर वाळवंटातील महाजन फिल्ड फायरिंग येथे भारत आणि रशिया दरम्यान दहशवादविरोधी सैन्याभ्यास पार पडला. दोन्ही देशातील सुमारे २५० सैनिक यात सामिल झाले होते. याप्रकारचा सैन्याभ्यास २००५ पासून सुरु आहे

हॅंड इन हॅंड २०१३: भारत व चीन सेनेदरम्यान दहशदवादविरोधी संयुक्त सैन्याभ्यास चीनच्या सिचुआन प्रांतातील शेंगलू येथे ५ ते १४ नोव्हेंबर दरम्यान पार पडला. दोन्ही देशाचे प्रत्येकी १५० सैनिक यात सहभागी झाले होते. हा तीसरा सैन्याभ्यास होता. डिसेंबर २००७ मध्ये चीनच्या कुनमिंग येथे पहिली तर डिसेंबर २००८ मध्ये बेळगाव येथे दूसरा सैन्याभ्यास पार पडला होता

मिग २१ एफएल हवाईदलातून निवृत्त: रशियन बनावटीचे 'मिग २१ एफएल' ही लढाऊ विमाने १८ डिसेंबर रोजी हवाईदलातून निवृत्त झाली. पश्चिम बंगालमधील कलाईकुंडा येथील हवाईदलाच्या तळावरून १८ डिसेंबर रोजी ह्या विमानाने शेवटचे उड्डाण घेतले. १९६४ मध्ये 'मिग २१ एफएल' हवाईदलात दखल झाले. १९६५ व १९७१ च्या युद्धात या विमानाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. १९७१ च्या युद्धात ढाकयातील गव्हर्नर हाउसवर अचूक मारा करुन या युद्धातील परिस्थिती संपूर्ण बदलण्याचा मान मिग २१ याच विमानाकडे जातो. करगिलच्या युद्धातही हे विमान आघाडीवर होते. मिग २१ हे भारतीय हवाईदलातील पाहिले सुपरसॉनिक विमान होते, कारण याचा वेग २.०५ मॅक इतका आहे म्हणजेच हा वेग हवेच्या वेगाच्या २.०५ पट आहे. जमिनीपासून २१ किलोमीटर इतक्या उंचीवर जाण्याची क्षमता या विमानामध्ये आहे.

मिग २१ एफएल च्या जागी तेजस: मिग २१ हे विमान १८ डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी 'तेजस' हे भारतीय बनावटीचे हलक्या वजनाचे विमान हवाईदलात २० डिसेंबरला दाख़ल झाले. भारतीय हवाईदलाला मार्क १ प्रकारची ४० विमाने मिळाली असून, २०१४ पर्यन्त 'तेजस' युद्धासाठी सज्ज होईल. त्याचसोबत मार्क २ प्रकारातील तेजस विमानामध्ये आधुनिक रडार यंत्रणेसह काही आवश्यक बदल करुन ती विमाने हवाईदलात दाखल करण्यात येणार आहेत

अग्नी ३ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी: स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू अग्नी ३ ह्या क्षेपणास्त्राची २४ डिसेंबर रोजी बालासोर, उड़ीसा येथील व्हिलर बेटावर यशस्वी चाचणी करण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अग्नी ३ क्षेपणास्त्र २ टप्प्यांचे आहे.
१ - पल्ला ३ हजार किलोमीटर
२ - लांबी १७ मीटर आणि व्यास २ मीटर
३ - वजन ५० टन
४ - क्षेपणास्त्राची वाहक क्षमता १.५ टन स्फोटके

Friday 17 January 2014

धोक्यात आलेल्या प्रजाती

धोक्यात आलेल्या प्रजातींचे निसर्ग संवर्धन आंतरराष्ट्रीय यूनियनने संवर्धनाच्या दृष्टीने केलेले वर्गीकरण:
  • संकटग्रस्त प्रजाती: या प्रजातींची जीवसंख्या अत्यंत कमी झालेली असते. भविष्यात विशेष उपाययोजना न केल्यास नजिकच्या काळात या प्रजाती नष्ट होउ शकतात. उदा. हेल्ड वानर
  • दुर्मिळ प्रजाती: यांची संख्या खुपच कमी असते. ह्या स्थान प्रविष्ठ असल्याने जलदगतीने नामशेष होउ शकतात. उदा. रेड पांडा 
  • संवेशनशील प्रजाती: या प्रजितीची संख्या अत्यंत कमी असते व ती दिवसेंदिवस घटत जात असते. सातत्याने घटणारी संख्या हेच मुख्य चिंतेचे कारण असते
  • अनिश्चित प्रजाती: या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात. मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सक्तींमुळे त्यांच्याबाबत कोणतीही विशिष्ठ आणि ठोस माहिती उपलब्ध नसते
निसर्ग संवर्धन आंतरराष्ट्रीय यूनियनची रेड लिस्ट: निसर्ग संवर्धन आंतरराष्ट्रीय यूनियनने या निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या जागतिक संघटनेने १९६३ मध्ये ही यादी पहिल्यांदाच प्रसिद्ध केली. या यादीमध्ये गुलाबी पृष्ठे म्हणजे संकटग्रस्त प्रजाती आणि हरित पृष्ठे म्हणजे पूर्वी संकटग्रस्त असणार्या परंतु संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे या धोकयामधून बाहेर पडलेल्या प्रजाती

महाराष्ट्रातील वन्यजीवन: जागतिक हॉटस्पॉट ठरलेल्या पश्चिम घाटाचा बाराचसा भाग महाराष्ट्रात बसलेला आहे. एकूण १६०० किमी लांबीपैकी महाराष्ट्रातील लांबी ४४० किमी आहे. महाराष्ट्रात एकूण ४१ अभयारण्ये, ६ राष्ट्रीय उद्याने व ४ व्याघ्र राखीव क्षेत्रे आहेत

आंतरराष्ट्रिय पातळीवर केलेले काही करार:
  • रामसार करार (१९७१): इराणमधील रामसार या शहरात २ डिसेंबर १९७१ मध्ये एक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला. दलदली परिसंस्थांचे संवर्धन आणि धोरणी वापर ही दोन कराराची उदिष्ठे आहेत. १९७१ मध्ये करण्यात आलेला हा करार मात्र १९७५ साली अमलात आला. भारतामध्ये जगभरातील क्षेत्रांपैकी २६ क्षेत्रे आहेत यापैकी केरळ राज्यामध्ये ३ रामसार क्षेत्र आहेत
  • सीआयटीइएस करार (१९७५): या करारात प्राणी व वनस्पती प्रजातींच्या बाबतीत होनरया व्यापारामुळे जीवप्रजाती धोक्यात येणार नाहीत याची खात्री केली जाते 
  • जागतिक वारसा करार (१९७२): जगातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचा शोध आणि संवर्धन ही या कराराची मुख्य उद्दिष्टे आहेत 
  • नागोया करार : विविध जीवप्रजातींनी उपलब्ध केलेली जनुकीय संसाधने ही स्थानीक जनसमुदायाच्या मालकीची असतात, ती खासगी मालकीची नसतात हे हा करार मान्य करतो 

Wednesday 15 January 2014

महाराष्ट्राची वास्तुकला

जसजशी मानवी संस्कृती प्रगत होत जाते, तसतसे त्या-त्या समाजाचे राहणीमान बदलत जाते. या बदलत्या राहणी मानाचा दृश्य परिणाम म्हणजे वास्तुकलेचे बदलते स्वरुप होय. महाराष्ट्रात प्राचीन बौद्ध कालीन, हिंदू राजकालीन, मध्ययुगीन इस्लामिक, महादेव कोळी या जमातीची, १७-१८ व्य शतकातील मराठेकालीन, ब्रिटिशकालीन व आधुनिक भारतीय या सर्व शैलींची वास्तुशिल्पे आढळतात
  • लेणी: जगभरात असलेल्या सर्व लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळची लेणी सर्वात सुंदर मानली जातात. ही लेणी राष्ट्रकुटांच्या काळात निर्माण करण्यात आली. अजिंठा येथील लेण्यांमध्ये बैद्ध जीवनातील व जातक कथांतील चित्रांद्वारे कहाण्या सांगण्यात आल्या आहेत. वेरूळ येथील लेण्यात हिंदू, जैन, बैद्ध मंदिरे आहेत. 'पितळखोरा' येथील लेण्याला जागतिक वस्तुशास्त्रात अन्यनसधारण महत्त्व आहे. या लेण्यांमधील ज्या साधूंच्या खोल्या आहेत, त्या उतरत्या पायावर बांधल्या गेल्या आहेत आणि या सर्वच लेण्याच्या आकरत कोरण कोरण काढण्यात आल्या आहेत. यातील सर्व उल्लेखनीय मंदिर म्हणजे वेरूळ येथे राष्ट्कुटांच्या काळात निर्माण करण्यात आलेले कैलास लेणे होय 
  • इस्लामकालीन वास्तुकला: महाराष्ट्रातील इस्लामिक काळातील वास्तुकलेचे केंद्रीकरण औरंगाबाद व आसपासच्या प्रदेशात झाले आहे. बिवी का मकबरा, गोलघुमट, औरंगजेबाची कबर यासारख्या इस्लामिक वास्तुकलेची वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहता येतात 
  • गड़-किल्ले: महाराष्ट्रातील वास्तुकलेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे येथील गड़-किल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्याच्या संरक्षणासाठी या गड़-किल्ल्यांची उभारणी केली. ३४०-४०० वर्षांनंतर आजही हे किल्ले महाराष्ट्राच्या गौरवशाही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. हे किल्ले भुईकोट, जलदुर्ग त्याचप्रमाणे डोंगरी किल्ले आहेत. या किल्ल्यांचा मुख्य उद्देश संरक्षण हा असल्याचे त्यांच्या रचनेवरून स्पष्ट होते. हे किल्ले मोठ-मोठे दगड, चुना, गुळ इ.साहित्य वापरून बनविण्यात आले आहेत. हे किल्ले मुख्यत: सह्याद्रीच्या डोंगररांगावर वसले आहेत 
  • वाडा पद्धती: महाराष्ट्रात नागर समाजात कौटुंबिक वापरासाठी असलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजे वाडा होय. ही पद्धती पेशवे काळात उदयास आली. वाडा पद्धती ही मुघल, राजस्थानी आणि गुजराती शैलीचे मिश्रण आहे. हे वाडे किमान दुमजली आणि चौसोपी असतात. 
  • ब्रिटिशकालीन वास्तु: भारतातील ब्रिटिशांच्या प्रदीर्घ राजवटीचा प्रदीर्घ परिणाम महाराष्ट्रातील वास्तुशिल्पांवर झाला आहे.ब्रिटिशकालीन वास्तुशैलीचे केंद्रीकरण मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात झाले आहे.. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस, अफगाण मेमोरियल चर्च इ.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणाचा परिणाम येथील नृत्यकला त्याचप्रमाणे वास्तुकलेवर झाला आहे

Monday 13 January 2014

भारतातील कर रचना

भारतीय कर रचनेमध्ये करांचे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर अशा दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते.
केंद्राचे महत्त्वाचे कर - प्राप्तिकर, कस्टम डयुटी , केंद्रीय अबकारी कर. केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल हा अबकारी कर या अप्रत्यक्ष करापासून मिळतो

केंद्र शासनाचे प्रत्यक्ष कर:
  • प्राप्ती कर, कार्पोरेशन कर, संपत्ती कर, देणगी कर, इस्टेट डयुटी 
  • प्राप्तिकर व् कार्पोरेशन कर यांचा 'उत्पन्न करात' समावेश होतो 
  • देणगी कराचा संपत्ती करात समावेश होतो 
  • कार्पोरेशन करास 'महामंडळ कर' किंवा 'कंपनी कर' असे म्हटले जाते 
१ - प्राप्तिकर:
  • प्रत्य्क्ष कर 
  • लवचिक व प्रगतशील कर 
  • प्राप्तिकरतील कही उत्पन्न केंद्राकडून राज्यांना दिले जाते 
२ - कार्पोरेशन कर:
  • केंद्राचा महत्त्वाचा प्रत्यक्ष कर 
  • मोठया कंपन्यांना नफ्यावर आकारला जातो 
  • कार्पोरेशन करातील वाटा केंद्राकडून राज्यांना कधीच दिला जात नाही 
३ - संपत्ती कर व देणगी कर:
  • उत्पन्न व संपत्ति यावर केंद्र शासन कर बसविते 
केंद्र सरकारचे अप्रत्यक्ष कर: अबकारी कर, जकात कर 

१ - अबकारी कर:
  • यालाच केंद्रीय उत्पादन कर असेही म्हणतात 
  • देशात उत्पादन होनारया सर्व वस्तूंवर हा कर आकारला जातो
  • महत्त्वाचे - दारुसारखी अल्कोहोलयुक्त मादक पेये व अफू, गांजा यासारख्या गुंगी आणणार्या पदार्थांवर अबकारी कर आकरण्याचे अधिकार राज्यांना आहेत
  • दारु, अफू, गांजा ही मादक पेये वगळता इतर सर्व देशाअंतर्गत वस्तूंच्या उत्पादनावर अबकारी कर आकारण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत 
२ - जकात कर:
  • केंद्राचा महत्त्वाचा अप्रत्यक्ष कर 
  • आयात-निर्यात मालावरील करांचा जकात करात समावेश होतो 
  • यातील उत्पन्न राज्यांना दिले जात नाही

Sunday 12 January 2014

भारताचे हवामान

भारताचे हवामान 'मान्सून' प्रकारात मोड़ते. देशाच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्तवार जवळजवळ वर्षभर सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्यामुळे तेथे वर्षभर तापमान अधिक असते. सरासरी वार्षिक तापमान कक्षा दक्षिणेकडे वाढत जाते. उन्हाळ्यात राजस्थानातील गंगानगर भागात (५० डिग्री हून अधिक) देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद होते. हिवाळ्यात जम्मू काश्मीर, हिमालयीन पर्वत क्षेत्र या भागातील तापमान उणे ४० डिग्री इतके खली उतरते.

भारतीय ऋतु: भारतात ऋतुची विभागणी खालीलप्रमाणे:
  • उष्ण हवेचा उन्हाळा - मार्च ते मे 
  • दमट व उष्ण पावसाळी ऋतु - जून ते सप्टेंबर 
  • माघारी मान्सूनचा काळ - ऑक्टोंबर ते नोव्हेंबर 
  • ठंड व कोरडा हिवाळा - डिसेंबर ते फेब्रुवारी 
१ - उन्हाळा: मार्च ते मे 
  • २१ मार्च रोजी सूर्यकिरणे विषुवृत्तावर लंबरूप पडतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरु होते 
  • भारतात या काळात सूर्यकिरणे लंबरूप पडून तापमान वाढते व उन्हाळा सुरु होतो, परिणाम - लू वारे, धुळीची वादळे, नॉर्वेस्टर, कालबैसाखी 
  • लू वारे - उन्हाळ्यात उत्तर भागात वाहणारे अति उष्ण वारे म्हणजे लू वारे 
  • नॉर्वेस्टर - पश्चिम बंगाल, ओरिसा या भागात बंगालच्या उपसागरावरून येणारे उबदार बाष्पयुक्त वारे व वायव्येकडून येणारे उष्ण कोरडे वारे यांच्या मिलनातून गडगडाटी वादळांची निर्मिती होते, त्यास नॉर्वेस्टर म्हणतात 
  • कालबैसाखी - पश्चिम बंगालमध्ये अशा वादळांना (नॉर्वेस्टर) कालबैसाखी म्हणतात 
  • आंबेसरी - उन्हाळ्यात निर्माण होनारया कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तमिलनाडु या राज्यांत पडणारा पाउस म्हणजे आंबेसरी
  • वसंत वर्षा - पश्चिम बंगाल, आसाममध्ये या पावसास आंबेसरी म्हणतात
२ - पावसाळा: जून ते सप्टेंबर 
  • हिंदी महासागरावरून वाहणार्या बाष्पयुक्त नैऋत्य मौसमी वरयांमुळे भारतात पाउस पडतो 
  • भारतात प्रवेश करताना नैऋत्य मौसमी वारयांचे अरबी समुद्रावरून वाहणारे आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणारे असे दोन प्रकार पडतात 
  • हे वारे भारतात ८० टक्के हून अधिक पाउस देतात 
३ - माघारी मान्सून काळ: ऑक्टोंबर ते नोव्हेंबर 
  • २३ सप्टेंबरपासून सूर्याचे दक्षिणायन सुरु होते आणि उत्तर गोलर्धात् तापमान कमी होऊन वायुदाब वाढतो, परिणामी उत्तर भारतात नैऋत्य मौसमी वरयांचा प्रभाव कमी होऊन ते आग्नेय व दक्षिणेकडे सर्कु लागतात. यालाच मान्सूनची माघार असे म्हणतात
४ - हिवाळा: डिसेंबर ते फेब्रुवारी 
  • २२ डिसेंबरला सूर्य मकरवृत्तावर असतो, त्यावेळी भारतात तापमान कक्षा खाली येऊन कोरडा व थंड हिवाळा सुरु होतो
  • या काळात 'ईशान्य मौसमी वारे' बंगालच्या उपसागरावरून वाहताना बाष्पयुक्त बनतात 
  • ईशान्य मौसमी वारयांमुळे पूर्व किनर्यावर आंध्रप्रदेश, तमिलनाडु येथे हिवाळ्यात पाउस पडतो

Saturday 11 January 2014

सामान्य विज्ञान

पेशींचा अभ्यास:
पेशी हा सर्व सजीव प्राणीमात्रांचा प्रमुख घटक आहे, एकपेशीय सजीव उदा. अमीबा, बहुपेशीय सजीव उदा. माणूस, उंदीर, मका 

पेशींचा शोध: १६६५ मध्ये रॉबर्ट हूक यानी पेशींचा शोध लावला. श्लायाडेन व थिओडोर (१८३८) या संशोधकांनी सर्व प्राणी व वनस्पती हे पेशींनी बनलेले असतात हे सिद्ध केले. सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रकाच्या अस्तित्त्वानुसार पेशींचे वर्गीकरण दोन गटांत केले जाते.

आदिकेंद्राकी पेशी:
  • या पेशींमध्ये सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक नसते, उदा. जीवाणु या एकपेशीय सूक्ष्मजीवामध्ये आदिकेंद्रकी पेशी असते. या पेशींची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे,
  • पेशीभित्तिका - ही सेल्यूलोजची बनलेली नसते (सेल्युलोजविरहित)
  • प्रदव्यपटल - मेद व प्रथिनापासून बनलेले पेशीभित्तिकेच्या आतील दूसरे आवरण 
  • पेशीद्रव्य - प्रद्रव्यपटलाच्या आतील कर्बानी-अकर्बानी जैवरेणुनी बनलेली आधारपीठिका म्हणजे पेशीद्रव्य 
  • यामध्ये डीएनए व आरएनए ही केंद्रकीय आम्ले तसेच रयबोझोम्स असतात 
  • पेशीद्रव्यचे कार्य - पेशीद्रव्य पेशीतील चयापचय क्रियेसाठी योग्य स्थान उपलब्ध करुन देते 
  • डीएनए - आदिकेंद्रकी पेशीतील डीएनए हे जननिक द्रव्य विभाजनावली स्वत:ची प्रतिकृती निर्माण करते 
  • आरएनए - हे केंद्रकाम्ल रयबोझोम्स प्रथिन संश्लेषणात मदत करते 
दृश्यकेंद्रकी पेशी:
  • या पेशींमध्ये सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक असते, उदा. प्रोटोझुआ, शैवाल, कवक, वनस्पती व प्राणी सजीवांमध्ये दृश्यकेंद्रकी पेशी असतात. या पेशींची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे,
  • पेशीभित्तिका - प्राणी पेशींमध्ये पेशीभित्तिका नसते 
  • शैवाल, कवक व वनस्पती यांच्यामध्ये सेल्युलोजची पेशीभित्तिका असते 
  • पेशीभित्तिकेचे कार्य - पेशीचा आकार, स्वरुप ठरवणे, पेशी संरक्षण 
  • दोन पेशींच्या पेशीभित्तिकांमधील 'पेक्टिन' हे सिमेंटसदृश्य द्रव्य पेशींना एकत्र बांधून ठेवते 
प्रद्रव्य पटल: प्राणी पेशींमध्ये पेशीभित्तिका नसल्याने प्रद्रव्यपटल हेच बाह्य आवरण असते 
पेशीद्रव्य: विविध पेशी अंगके व कर्बोदके, मेद, प्रथिने व अकर्बानी आयानांपासून पेशीद्रव्य बनते 

Friday 10 January 2014

जागतिक व्यापार संघटनेची बाली परिषद

जागतिक व्यापार संघटना:
  • १९९४ च्या माराकेश कररानुसार जेनराल अग्रीमेंट ऑन टेरिफ एंड ट्रेड रद्द होऊन १ जानेवारी १९९५ पासून जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली 
  • एकूण १५९ सदस्य देश 
  • भारत हा १९९५ ला संस्थापक देश होता 
जागतिक व्यापार संघटनेच्या मंत्रिपरिषदा: सर्व सदस्य देशांच्या वाणिज्य आणि व्यापार मंत्र्यांच्या दर दोन वर्षानी अशी मंत्रिपरिषद भरते. या वेळची परिषद ही इंडोनेशियातील बाली या ठिकाणी ३ डिसेंबर २०१३ ते ६ डिसेंबर २०१३ दरम्यान झाली. २००१ साली झालेल्या दोहा परिषदेनंतर ही अतिशय महत्त्वाची व चर्चेची अशी परिषद ठरली
दोहा परिषद - जागतिक व्यापार संघटनेची २००१ सालची मंत्रिपरिषद ही दोहा येथे झाली होती व अतिशय गाजलेली ही परिषद दोहा राउंड या नवाने ओळखली जाते. शेतीक्षेत्रावर दिल्या जाणार्या अनुदानावरून विकसित व विकसनशील राष्ट्रांच्या दरम्यान वादाची किनार या परिषदेमुळेच निर्माण झाली 

बाली परिषद २०१३:
  • विकसित राष्ट्र व विकसनशील राष्ट्रांच्या वादाचा मुद्दा - शेतीमालावरील अनुदान हे मर्यादित असावे अशी विकसित राष्ट्रांची मागणी होती. परंतु विकसनशील राष्ट्रांचा यास विरोध होता. विकसित राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार विकसनशील देशांत शेतीक्षेत्रवार दिल्या जाणार्या अनुदानापायी जागतिक पातळीवर किमतीवर परिणाम होतो व अनुदानाचा फायदादेखील शेतकर्यांना मिळत नाही. 
  • भारत आणि अन्य विकसनशील राष्ट्रांच्या भूमिका - भारताच्या म्हणण्याप्रमाणे जागतिक व्यापार संघटनेमध्ये होणार्या करारात अनुदानावार कसलेच बंधन असू नये, भारताने अन्नसुरक्षेविषयक कायद्यावर घेतलेल्या निर्णयांमुळे बाली परिषद जर फ़िस्कटली असती तर भारतास पूर्णपणे जबाबदार धरले गेले असते. भारतात शेतकर्यांना किमान आधारभूत किंमत दिली जाते व त्यायोगे शेतकर्यांना आर्थिक आधार मिळतो
बाली परिषदेची पार्श्वभूमि व महत्त्व: बाली मंत्रिपरिषदेतील उद्देश म्हणजे शेती, व्यापार सुविधा आणि मागास देश यांच्या प्रगतीवरील उपाय हे होते, थोडक्यात शेतकर्यांची आर्थिक उन्नती करणे हा मुख्य उद्देश बाली परिषदेच्या चर्चेत पार्श्वभूमी होता

बाली कराराची फलश्रुती:
  • बाली परिषदेत क्युबाचा आणि अन्य तीन लैटिन अमेरिकन देशांचा विरोध डावलून बाली पॅकेज मंजूर करण्यात आले 
  • या करारामुळे जागतिक व्यापारात १००० अब्ज डॉलरची वाढ होईल 
  • उत्पादनाच्या किंमतीवर असलेल्या १०% सबसिडीची मर्यादा उठवण्यात आली 
  • या करारान्वये भारताने नव्या व्यापार सुलभीकरण करारास मान्यता देऊन आपल्या अन्नसुरक्षा योजनेचा मार्ग मोकळा केला 
  • नवा व्यापार सुलभीकरण करारानुसार बंदरे व विमानतळ यावरील सरकारचे नियंत्रण रद्द करण्यात येईल 
  • याचा फायदा दक्षिण अफ्रीका, अर्जेंटीना, केनिया व नायजेरिया यांसारख्या विकसनशील देशांनाही होणार आहे 
  • भारताच्या अन्नसुरक्षा योजनेचा मार्ग सध्या जरी सुकर झाला असला तरी चार वर्षांनंतर परत यावर चर्चा होणार आहे 
जागतिक व्यापार संघटनेचा फायदा: क्षेत्रीय व्यापार करारापेक्षा जागतिक व्यापार क़रार कधीही फायदेशीर ठरतो. यामुळेच जागतिक व्यापार संघटना जपणे आणि अधिक सक्षम करणे याला सर्वानीच महत्त्व दिले पाहिजे. परंतु हे करताना विकसनशील राष्ट्रांच्या मुख्य उदिष्ठांना धक्का लागणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे 

Tuesday 7 January 2014

समाजसेवक

महर्षी धोंडो केशव कर्वे 
जन्म - १८ एप्रिल १८५८ (शेरवाली, रत्नागिरी)
मृत्यु - ९ नोव्हेंबर १९६२ (पुणे)

जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्ठी:
  • १८८४ - एल्फिस्टन कॉलेज (मुंबई) येथून गणित विषयात बी. ए. पदवी प्राप्त 
  • १८९१ - पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती 
  • १८९३ - उक्तीप्रमाणे कृती या न्यायाने गोदुबाई या विधवेशी पुनर्विवाह त्याचप्रमाणे पुणे येथे विधवा विवाहोत्तोजक मंडळाची स्थापना 
  • १८९९ - विधवा स्त्रियांसाठी 'अनाथ बलिकाश्रमाची' स्थापना केली 
  • १९०७ - हिंगणे येथे महिला विद्यापीठाची स्थापना 
  • १९१० - निष्काम कर्ममठाची स्थापना, उद्देश - लोकसेवेसाठी नि:ष्काम तन, मन, धन अर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण करणे
  • ब्रीदवाक्य - 'समाजसेवा हा आमचा देव व सेवेच्या उपयुक्ततेविषयी खात्री ही आमची श्र्द्धा'
  • १९१६ - महिला विद्यापीठाची स्थापना 
  • १९१९ - महिला विद्यापीठाचे रूपांतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये झाले 
  • १९२० - सर विट्ठलदास ठाकरसी या दानशूर व्यक्तीने आपल्या मातोश्री श्रीमती नाथीबाई यांच्या स्मरणार्थ महिला विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली 
  • १९४९ - पासून हे विद्यापीठ 'श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' या नवाने ओळखले जाऊ लागले
  • १९३६ - महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली 
  • १९४४ - समता संघाची स्थापना केली, उद्देश - जातिभेद व अस्पृश्येतेचे निर्मूलन करुन समता प्रस्थापित करणे हे समता संघाचे उद्दिष्ट होते 
  • १९५८ - त्यांच्या जन्मशतब्दी निम्मित भारतरत्न सन्मान बहाल करण्यात आला 
  • व्यापारोत्तेजक सहकारी मंडळाची स्थापना त्याचप्रमाणे विधवा आश्रम स्थापना 
पदव्या:
  • १९४२ - महर्षी कर्वे यांना बनारस विद्यापीठाने सर्वप्रथम डि. लिट. ही पदवी दिली
  • त्यानंतर पुणे विद्यापीठ व एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ यांनी त्याना डी. लिट. पदवी दिली
  • मुम्बई विद्यापीठाने त्यांना एल.एल.डी. ही सर्वोच्च पदवी दिली 
  • १९५५  - पद्मविभूषण आणि १९५८ ला  भारतरत्न 

Saturday 4 January 2014

महाराष्ट्राची नृत्यकला

महाराष्ट्राला समृद्ध आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. ही संस्कृती व परंपरांची भूमी आहे त्याचप्रमाणे सामाजिक करमणुकीसाठी महाराष्ट्रात सणांना फार महत्त्व आहे. असे धार्मिक सण वा अन्य ठिकाणी सादर केल्या जाणार्या लोकनृत्यातून महाराष्ट्राची सांस्कृतिक श्रीमंती प्रतीत आहे.
नृत्यकला - मानवी भावभावना प्रकट करण्याचे नृत्य हे एक प्रभावी माध्यम आहे. लोकनृत्यातून त्या-त्या समाजाची संस्कृती, राहणीमान, विचारसरणी प्रकट होते. महाराष्ट्रातील नृत्यांचे विविध प्रकार पुढील प्रमाणे:
  • लावणी नृत्य: पारंपारिक नृत्य व गायनाचा लवाणिनृत्य हा संगम आहे. लावणी नृत्य 'ढोलकी' या वद्याच्या ठोकयांच्या सहायाने सादर केले जाते. लावणी नृत्य मुख्यत: स्त्रिया सादर करतात. हे नृत्य सादर करताना पारंपारिक प्रकारचे कपडे वापरले जातात. 'लावणी' हा शब्द 'लावण्य' या शब्दापासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ सौंदर्य असा आहे. सुरुवातीस लावणीतून सामाजिक, धार्मिक, राजकीय विषय मांडले जात. १८ व्या आणि १९ व्या शतकामध्ये मराठ्यांच्या युद्धवेळी लावणी, सैनिकांसाठी मनोरंजनाचे साधन म्हणून वापरली गेली
  • पोवाडा: महाराष्ट्रातील इतिहासाची जाणीव सर्वांना करुण देण्याचे प्रभावी साधन म्हणजे पोवाडा होय. पोवाडा हा मुख्यत: गायनाचा प्रकार आहे. पोवाडयातून डफाच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुरपणाचे किस्से सांगितले जातात
  • कोळी नृत्य: कोळी नृत्य हा महाराष्ट्राचा वैशिष्ठ्यपूर्ण असा लोकनृत्याचा प्रकार आहे. 'कोळी' म्हणजे मासेमारी करणार्या समाजाचे नृत्य म्हणून या पप्रकारास कोळी नृत्य असे म्हटले जाते. हा समाज त्यांची वेगळी-आगळी ओळख व रंगतदार नृत्यांसाठी प्रसिद्ध आहे. या नृत्यांमध्ये प्रामुख्याने मासेमारांच्या दैनंदिन जीवनातील प्रसंगांचा समावेश असतो. कोळी नृत्य स्त्रिया व पुरुष दोघा-दोघांच्या समूहाने करतात. हे नृत्य करताना रंगीत पोशाख वापरले जातात
  • धनगरी गाजा: सोलापुर जिल्ह्यातील धनगर समाजातील लोक हा नृत्यप्रकार सादर करतात. धनगर मेंढया बकरे पाळून आपला चरितार्थ चलावतात. त्यांची गाणी ही आजूबाजूच्या झाडांपासून प्रेऱणा घेऊन तयार होतात. ही गाणी 'ओवी' च्या स्वरुपात असतात.त्यांतून धनगरांचे दैवत 'बिरबा'च्या जन्माच्या कथा सांगितल्या जातात. बिरुबाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गाजा सादर केला जातो. यावेळी धोतर, अंगरखा, फेटा आणि एक रंगीत रुमाल असा पेहराव करतात. ढोल वाजवणार्यांच्या भोवती तालावर पावले टाकत हे नृत्य केले जाते
  • तमाशा: महाराष्ट्रातील सर्वत लोकप्रिय लोकनृत्याचा प्रकार म्हणजे तमाशा होय. 'तमाशा' हा पारशी शब्द असून त्याचा अर्थ आनंद किंवा करमणुकीचे मिश्रण आहे. तमाशाचा उदय १६ व्या शतकात झाला असे मानन्यात  येते. लावणी ही तमाशाच्या केंद्रस्थानी असते. ढोलकी, तूणतुणे, मंजीरा, डफ, लेझिम, संवादिनी आणि घुंगरू ही वाद्ये तमाशात वापरली जातात
  • वाघ्या मुरळी: खंडोबा या देवाच्या आदरापित्यार्थ वाघ्या-मुरळीचे नृत्य सादर केले जाते. वाघ्या म्हणजे पुरुष तर मुरळी ही स्त्री असते. खंडोबाच्या कुत्र्यांचे प्रतीक म्हणून ही पात्रे वापरली जातात. कोणत्याही धार्मिक उत्सवात वाघ्या मुरळीचे नृत्य सादर करण्यात येते 
  • दिंडी: दिंडी हा महाराष्ट्रातील धार्मिक लोकनृत्याचा प्रकार आहे. अषाढ़ी व कार्तिकी एकादशीला दिंडी काढली जाते. यात तालवादकांच्या सभोवती तालावर पावले टाकून मार्गक्रमणा केली जाते 
  • काला: श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंग काल्याचा माध्यमातून सादर केले जातात। यामध्ये मातीचे मडके वापरले जाते. हे मडके म्हणजे सर्जनशक्तीचे प्रतीक आहे. ठोके व तालावर हा नृत्यप्रकार सादर केला जातो 

Thursday 2 January 2014

भारतातील विमान वाहू नौकांचा इतिहास

भारतातील विमान वाहू नौकांचा इतिहास:
  • सर्वात पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत (१९६१) तिचा वापर आपण १९९० पर्यन्त केला. ही युद्धनौका आपण ब्रिटिश नेव्हीकडून घेतली होती 
  • त्यानंतर १९८७ साली आयएनएस विराट (आर २२) ही देखील आपण ब्रिटिश नेव्हीकडूनच घेतली
  • १६ डिसेंबर २०१३ रोजी भारतीय संरक्षण मंत्री अंटोनी यांच्या उपस्थितीत विक्रमादित्य हे जहाज भारतीय नैसेनेत समाविष्ट करण्यात आले
  • आयएनएस विक्रांत (१९६१) ला आपण ३१ जानेवारी १९९७ रोजी निवृत्त केल आणि त्याची जगा घ्यायला मात्र आता भारतीय बनावटीचे विक्रांत येत आहे
  • भारतीय नौदलाच्या पद्धतीप्रमाणे स्त्री ही नविन जहाजान्ना पहिला झेंडा दाखविते, यावेळी ए.के. अंटोनी यांच्या पत्नी एलिझाबेथ अंटोनी यांनी विक्रांतला हिरवा झेंडा दाखविला
  • संपूर्णत: तयार होवून विक्रांत २०१८ पर्यन्त सेवेत रुजू होईल
  • भारताने स्वता:च्या क्षमतेवर स्वतंत्र्यानंतर बनवलेल्या पहिल्या विमानवाहू नौकेची चाचणी २०१३ ला घेतली. त्याचे नाव आयएनएस विक्रांत ते साधारणत: २०१८ च्या जवळपास नौसेनेत दाखल होईल

Wednesday 1 January 2014

समाजसुधारक आणि त्यांचे साहित्य

महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांनी लिहिलेले साहित्य:
१ - महात्मा जोतिबा फुले:
  • शेतकर्यांचा आसुड
  • गुलामगिरी, इशारा 
  • अस्पृश्यांची कैफियत 
  • तृतीय रत्न, ब्रम्हणाचे कसब 
  • सस्तार, सार्वजनिक सत्यधर्म 
  • दीनबंधु (नियतकालिक)
२ - सावित्रीबाई फुले:
  • सुबोध रत्नाकर (काव्यसंग्रह)
३ - गोपाळ गणेश आगरकर:
  • डोंगरीच्या तुरुंगातील आमचे १०१ दिवस 
  • गुलमगिरीचे शस्त्र 
  • विकार विलसित, वाकयमीमांसा 
  • सुधाकर (नियतकालिक)
४ - बाळशास्त्री जांभेकर:
  • नीतिकथा, बालव्याकरण 
  • इंग्लंड देशाची बखर 
  • ज्ञानेश्वरीचे साक्षेपी संपादन 
५ - गोपाळ हरी देशमुख:
  • हिंदुस्थानचा इतिहास, पानीपतची लढाई 
  • भाऊ महाजन यांच्या 'प्रभाकर' मध्ये शतपत्रे लिहिली 
  • लोकहितवादी (मासिक)
६ - गोविंद विठ्ठल कुंठे:
  • धूमकेतु हे साप्ताहिक तर प्रभाकर हे मासिक 
७ - दादोबा पांडुरंग तर्खडकर:
  • यशोदा पांडुरंग (मोरोपंतांच्या 'केकावली' वर टिका)
  • पारमहांसिक ब्राम्हधर्म, मराठी व्याकरण 
८ - बाबा पदमनजी: 
  • यमुना पर्यटन (मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी)
  • अरुणोदय (आत्मचरित्र)
९ - महर्षी वि. रा. शिंदे:
  • माझ्या आठवणी आणि अनुभव
  • अनटचेबल इंडिया, बहिष्कृत भारत 
  • भारतीय अस्पृशतेचा प्रश्न 
  • हिस्ट्री ऑफ़ परिहाज 
१० - लोकमान्य टिळक:
  • अरोयान, दी आर्टिक्ट होम इन द् वेदाज 
  • गीतारहस्य 
  • केसरी मराठी मध्ये तर मराठा इंग्रजीमध्ये