भारतीय कर रचनेमध्ये करांचे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर अशा दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते.
केंद्राचे महत्त्वाचे कर - प्राप्तिकर, कस्टम डयुटी , केंद्रीय अबकारी कर. केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल हा अबकारी कर या अप्रत्यक्ष करापासून मिळतो
केंद्र शासनाचे प्रत्यक्ष कर:
केंद्राचे महत्त्वाचे कर - प्राप्तिकर, कस्टम डयुटी , केंद्रीय अबकारी कर. केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल हा अबकारी कर या अप्रत्यक्ष करापासून मिळतो
केंद्र शासनाचे प्रत्यक्ष कर:
- प्राप्ती कर, कार्पोरेशन कर, संपत्ती कर, देणगी कर, इस्टेट डयुटी
- प्राप्तिकर व् कार्पोरेशन कर यांचा 'उत्पन्न करात' समावेश होतो
- देणगी कराचा संपत्ती करात समावेश होतो
- कार्पोरेशन करास 'महामंडळ कर' किंवा 'कंपनी कर' असे म्हटले जाते
१ - प्राप्तिकर:
- प्रत्य्क्ष कर
- लवचिक व प्रगतशील कर
- प्राप्तिकरतील कही उत्पन्न केंद्राकडून राज्यांना दिले जाते
२ - कार्पोरेशन कर:
- केंद्राचा महत्त्वाचा प्रत्यक्ष कर
- मोठया कंपन्यांना नफ्यावर आकारला जातो
- कार्पोरेशन करातील वाटा केंद्राकडून राज्यांना कधीच दिला जात नाही
३ - संपत्ती कर व देणगी कर:
- उत्पन्न व संपत्ति यावर केंद्र शासन कर बसविते
केंद्र सरकारचे अप्रत्यक्ष कर: अबकारी कर, जकात कर
१ - अबकारी कर:
- यालाच केंद्रीय उत्पादन कर असेही म्हणतात
- देशात उत्पादन होनारया सर्व वस्तूंवर हा कर आकारला जातो
- महत्त्वाचे - दारुसारखी अल्कोहोलयुक्त मादक पेये व अफू, गांजा यासारख्या गुंगी आणणार्या पदार्थांवर अबकारी कर आकरण्याचे अधिकार राज्यांना आहेत
- दारु, अफू, गांजा ही मादक पेये वगळता इतर सर्व देशाअंतर्गत वस्तूंच्या उत्पादनावर अबकारी कर आकारण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत
२ - जकात कर:
- केंद्राचा महत्त्वाचा अप्रत्यक्ष कर
- आयात-निर्यात मालावरील करांचा जकात करात समावेश होतो
- यातील उत्पन्न राज्यांना दिले जात नाही
No comments:
Post a Comment