Saturday 23 November 2013

जागतिक लोकसंख्या

जागतिक लोकसंख्या म्हणजे एकूण मानवी लोकसंख्या होय. सन २००७ मध्ये जागतिक लोकसंख्या ६.६ अब्ज झाली होती तर सध्या लोकसंख्या ७.१२ अब्ज आहे

महत्त्वाचे मुद्दे:
  • अविकसित देशांमध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाण हे ९० दशलक्ष प्रति वर्ष इतके आहे
  • यूरेशिया या प्रांतमध्ये जगातील सर्वात जास्त लोकसंख्या एकटवलेल्या प्रांतापैकी १ आहे म्हणून हा प्रांत लहान असून खूप विकसित शहरी आहे 
  • लोकसंख्या जनगणना ही अविश्वसनीय आहे कारण जनगणनेसाठी लागणारा खर्च, मनुष्यबळ हे खूप खर्चिक आहे
  • लोकसंख्या घनता काढण्यासाठी विविध निष्कर्ष वापरले जातात
लोकसंख्या वाढीची कारणे:
१ - लोकसंख्या वाढ: 
  • आज लोकसंख्या ही गेल्या शंभर वर्षांच्या तुलनेत ४ पटीने वाढली आहे
  • विद्यान व मशीनी सहाय्याने मनवाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर कुरून आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण केल्या आहेत
२ - अन्न पुरवठा:
  • १९६० च्या दशकात लोकसंख्या वाढीचे प्रमाण हे धान्य पुरवठयाहुन अधिक होते, त्यामुळे उपासमार व कुपोषण वाढ ही जास्त होती
  • १९७० च्या दशकात झालेली हरित क्रांतीने सर्व चित्रच पालटून टाकले व उपसमारीचे प्रमाण खुपच कमी झाले
  • १९९१ च्या दशकात सतत होणारी लोकसंख्येत वाढ व बदलत्या खाण्याच्या सवायी यांमुळे लोकसंख्या ही आज जगाला भेडसावणारी मोठी समस्या बनाली आहे
३ - आरोग्य:
  • सतत वेगाने वाढणारी लोकसंख्या ही रोगराइस देखील आमंत्रण बनू शकते उदा. दूरस्थ विषुववृत्तावर असणारी रोगराइची समस्या
  • अविकसित देशांमध्ये खलावलेला रहनिमानाचा दर्जा असतो त्यामुळे रोगराई पसरते व मृत्यु दर वाढतो व जन्म दर घसरतो
४ - स्थलांतर:
  • लोकांचे सतत होणारे स्थलांतर हे एखाद्या प्रदेशच्या नैसर्गिक लोकसंख्येची आकडेवारी बदलू शकते
  • सरकारचे स्थलांतर नियंत्रणाचे सर्व उपाय जवळपास अयशस्वी होतात
  • सर्वाधिक स्थलांतर हे देशांतर्गत होते
५ - माहितीचा अपुरेपणा:
  • जनगणना ही उपलब्ध माहितीच्या आधारे काळजीपूर्वक केली जाते पण जनगणनेसाठी लागणारा खर्च, मनुष्यबळ हे खूप खर्चिक आहे
  • त्याचप्रमाणे माहिती अनेक संस्थाकडून गोळा केली जाते त्यामुळे आपण कोणतीच माहिती मूळ माहिती मानू शकत नाही

Thursday 21 November 2013

भारतरत्न : चिंतामणी नागेश रामचंद्र राव

चिंतामणी नागेश रामचंद्र राव हे सी. एन. आर. राव या नवाने ओळखले जातात, एक भारतीय रसायन वैद्यानिक आहेत आणि त्यानी पदार्थाची घन अवस्था व संचारात्मक रसायन शास्त्र या मुख्य क्षेत्रामध्ये काम केले आहे. सध्या ते प्रधानमंत्री कार्यालयात प्रधानमंत्र्यांचे प्रमुख वैद्यानिक तज्द्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ राव यांनी जगातील ६० विश्वविद्यालयातून डॉक्टरेट ही मानद पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी १५०० शोध लावले असून त्यानी ४५ वैद्यानिक पुस्तके लिहली आहेत.
२०१३ मध्ये त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. सी. वी. रमन व अब्दुल कलाम यां नंतरचे ते तीसरे वैद्यानिक आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.

आरंभिक जीवन: बेंगलोर मधील कन्नड परिवारमध्ये राव यांचा जन्म झाला असून नागम्मा नागेश राव ह्या त्यांच्या आई तर हनुमंत नागेश राव हे वडील आहेत. राव यांनी १९५१  मैसूर विश्वविद्यालयातून पदवीधर झाले तर काशी हिंदू विश्वविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९५८ मध्ये त्यांनी पर्ड्यू विश्वविद्यालयातून पी. एच. डी. पदवी प्राप्त केली. १९६१ ला त्याना मैसूर विश्वविद्यालयातून त्यांना डी. एस. सी. पदवी मिळाली. १९६३ मध्ये राव आयआयटी कानपुर मध्ये शिक्षण रुपाने कार्यरत झाले व तेथेच त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळाली.

व्यवसायिक जीवन: राव सध्या जवाहरलाल नेहरु वैद्यानिक संशोधन केंद्राचे (बेंगलोर) अध्यक्ष आहेत, ज्याची स्थापना त्यानी स्वत: १९८९ मध्ये केली होती. येथे ते मुख्य संशोधन प्राध्यापक म्हणून कार्य करतात. त्याचप्रमाणे जानेवारी २००५ मध्ये त्यांची प्रधानमंत्र्यांचे प्रमुख वैद्यानिक सल्लागार म्हणुन निवड झाली. राव सध्या अंतरराष्ट्रीय पदार्थ विद्यान केंद्राचे संचालक आहेत.

पुरस्कार आणि सन्मान: १६ नोव्हेंबर २०१३ ला त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी त्यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मा विभूषण त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारने त्यांना कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. सन २००० मध्ये रॉयल सोसायटीने ह्यूज पदक देऊन त्यांचा गौरव केला. सन २००४ मध्ये घन अवस्थेमधील रसायन शास्त्र व पदार्थ विद्यान या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे भारत सरकारद्वारे संस्थापित भारतीय विद्यान अवार्ड भेटणारे पाहिले व्यक्ती बनले.

विवाद: राव यांच्यावरती साहित्याची चोरी केल्याचा व चोरी होउ देण्याचा आरोप आहे. त्यांनी २०११ मध्ये त्यांच्या अडवांस मटेरियल्स या मासिकामध्ये त्यांनी याबाबत माफ़ी मागितली. 

Sunday 17 November 2013

भारतीय सरनाम्याचा अर्थ

सरनाम्याचा अर्थ:
भारतीय सरनाम्यावरुण पुढील तीन गोष्टी स्पष्ट होतात,
१ - घटनेचे उगमस्थान 
२ - राज्यव्यवस्थेचे स्वरुप 
३ - राज्यव्यवस्थेचा उद्देश 

१ - घटनेचे उगमस्थान हे भारतीय जनता आहे
  •  याचा अर्थ घटनाकारांनी बनविलेली घटना ही लोकांना मान्य असून भारतीय जनतेनेच ती स्वत:साठी बनवलेली आहे असा होतो 
२ - राज्य व्यवस्थेचेस्वरुप
  • सार्वभौम - १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० या काळात स्वंतत्र भारताचे स्थान हे वसहातींचे स्वंतंत्र असे होते, कारण त्यावेळी घटना अमलात नव्हती. २६ जानेवारी १९५० रोजी घटनेच्या अम्बलबजानीमुळे भारत हे सार्वभौम राष्ट्र बनले, म्हणजेच अंतर्गत वा बहिगर्तरीत्या भारतावर आता कोणाचेही वर्चस्व राहिलेले नाही
  • समाजवादी - भारताला साम्यवादी अथवा भांडवलशाही अर्थव्यवस्था मान्य नाही. भांडवलदारांपासून श्रमिकांचे शोषण थांबविण्यासाठी उत्पादनाची साधने व वितरणावर सामाजिक मालकी वा नियंत्रण ठेवणारी समाजवादी अर्थव्यवस्था भारतने स्वीकारली
  • धर्मनिरपेक्ष - भारतात धर्म ही व्यक्तीची खाजगी वा ऐच्छिक बाब असून प्रत्येकाला कोणत्याही धर्माचा अवलंब करता येईल, मात्र सार्वजनिक बाबित धर्माची ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही 
  • प्रजासत्ताक - प्रजासत्ताक म्हणजे लोकानुवर्ती शासन, म्हणजेच सार्वभौम अशा भारतीय जनतेकडे देशाची अंतिम सत्ता
  • गणराज्य - गणराज्य म्हणजे राजा नसलेले राज्य. गणराज्यात सर्वोच्च शासन प्रमुख हा लोकनियुक्त असतो. भारतीय गणराज्यात सर्वोच्च शासक हा राष्ट्रपती असतो. त्याची निवड जनतेद्वारे केलि जाते
३ - राज्यव्यवस्थेचा उद्देश 
  • भारताच्या सर्व नागरिकांना - सामाजिक, आर्थिक, राजकीय  न्याय. विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म उपासना यांचे स्वतंत्र आहे. दर्जा आणि समान संधि आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मता व अखंडता मिळवून देणे हा भारतीय राज्यघटनेचा उद्देश आहे
  • १९७६ च्या ४२ व्या घटना दुरुस्तीने घटनेच्या सरनाम्यात समाजवादी व धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे

Wednesday 13 November 2013

भारतीय राज्यघटना

  • घटना समितीची स्थापना - जुलै १९४६
  • त्रिमंत्री योजनेतील तरतुदीनुसार जुलै १९४६ मध्ये घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आल्या, त्यानुसार २९९ सदस्यांनी घटना समिती अस्तित्वात आणली
  • घटना समितीचे प्रमुख सदस्य - डॉ. राजेन्द्रप्रसाद, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभपंत, मौलाना आज़ाद, बाबासाहेब आंबेडकर, जयकर, कन्हैयालाल मुन्शी इत्यादी
  • प्रमुख स्त्री सदस्या - राजकुमारी अमृत कौर, हंसाबेन मेहता, सरोजिनी नायडू सह सात महिला घटना समितीच्या सदस्य होत्या
  • जिनांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम लीगच्या ७३ सदस्यांची घटना समितीच्या कामकाजात अजिबात भाग घेतला नाही
  •  डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे प्रथम अधिवेशन दिल्लीत पार पडले, डॉ सच्चिदानंद सिन्हा हे या काळात हंगामी अध्यक्ष होते
  • ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ राजेन्द्रप्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली
  • घटना समितीचे सल्लागार - बी. एन. राव 
  • घटना समितीच्या एकूण उपसमित्या - ११ 
  • २९ ऑगस्ट १९४७ घटनेच्या मसूदा समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब आंबेडकर यांची निवड केली
  • घटना समितीचे कामकाज एकूण १०८२ दिवस चालले 
  • घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज १६५ दिवस चालले 
  • मसूदा संयतीचे सदस्य - बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अलादी कृष्णस्वामी अय्यर, मुन्शी, गोपाल अय्यंगर, मोहम्मद सादुल्ला, खेतान
  • २२ जानेवारी १९४७ - जवाहरलाल नेहरुनी मांडलेल्या घटना समितीच्या उदिष्ट याबाबत ठराव मंजूर केला
  • २६ नोवेम्बर १९४९ - घटना समितीने भारताचे संविधान स्वीकृत केले, अध्यक्ष राजेन्द्रप्रसाद यांची स्वाक्षरी होती 
  • २४ जानेवारी १९५० - संविधान समितीची अखेरची बैठक 
  • २६ जानेवारी १९५० - पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली
  • भारतीय राज्यघटना एकूण २४ भगत, १२ परिशिष्टात विभागली गेली आहे तिच्यामध्ये सुमारे ४४८ कलामे आहेत 
  • सुरुवातीला ८ परिशिष्टे व ३९५ कलामे होती
  • २००९ या वर्षी भारतीय राज्यघटनेच्या अम्बलबजावणीस ६० वर्षे पूर्ण झाली 
  • घटनेनुसार भारताने संसदीय पद्धतीची शासनव्यवस्था स्वीकारली असून राष्ट्रपती हा घटनात्मक प्रमुख आहे 
  • २२ जुलै १९४७ रोजी भारतीय राष्ट्रध्वजाची रचना घटना समितीने संमत केली 
  • भारतासाठी नवीन संविधान तयार करण्याचा आणि जुन्या संविधनात फेरबदल करण्याचा अधिकार फ़क्त घटना समीतीलाच आहे 
  • अलिकडेच घटनेच्या पुनरलोकनासाठी न्या वेंकटचलैय्या आयोग नेमन्यात आला होता

Tuesday 5 November 2013

मानव संसाधन विकास

परंपारिकदृष्टया विचार केला तर विकासाचा अर्थ भौतिक विकास मनाला जातो. लोकांकडे किती साधने आहेत व ते शिक्षण, आरोग्य, सकस आहार, स्वच्छ पाणी व स्वच्छता यावर किती खर्च करुन सुखी जीवन जगतात यावर भौतिक विकास अवलंबून असतो. आर्थिक वृध्दिमुळे लोकांच्या जीवनाचा गुणात्मक दर्जा सुधारला पाहिजे अशी अपेक्षा असते; पण तो आपोआप सुधारत नाही. लोकांनी त्यांच्याकडील संसाधनाचा योग्यरीत्या व योग्य कार्यासाठी वापर केला पाहिजे तरच गुणात्मक जीवन जगता येईल. जर लोक मद्यपान, सट्टेबाजी, वेश्यागमन व अन्य वाइट सवायीवर खर्च करत असतील तर त्यांना गुणात्मक व उच्च दर्जाचे जीवन जगाता येणार नाही. म्हणून मिळत असलेल्या आर्थिक वृद्धीचा उपयोग जर योग्य प्रकारे करूँ घ्यावयाचा असेल तर जीवनाचे अन्य पैलू विचारत घ्यावे लागतात. ते पैलू म्हणजे द्यान मिळवणे, आरोग्य व दीर्घ आयुष्य जगणे हे होत. अशा प्रकारच्या अनेक पौलुनमुले क्षमतेत वाढ होते. लोकांच्या क्षमतांमध्ये वाढ होणे म्हणजेच मानव विकास होय असे प्रतिपादन जगप्रसिद्ध अमर्त्य सेन यांनी केले आहे. मानव विकास संकल्पनेत आर्थिक समर्थन केले जात असले तरी लोकांना त्यांच्या आवादीनिवदीप्रमाणे सुखी जीवन जगण्यासाठी विविध संधीमध्ये वाढ करणे याचे प्रतिपादन महबुल-उल-हक़ यांनी केले आहे. आरोग्य, शिक्षण, कौशल्य व श्रमशक्ति ही उत्पन्न व क्षमता वाढवणारी साधने होत. अशा साधनाचा विकास म्हणजेच मानव विकास होय.

व्यक्तीचा व एकूणच समाजाचा जीवनस्तर व दर्जा किटी सुधारला आहे यावरुन लोकांच्या क्षमतेचे मोजमाप केले जाते. उदहारण सांगायचे झाल्यास किरकोळ आरोग्य असणार्या  व्यक्तीपेक्षा सुदृढ़, आरोग्यसंपन्न व शिकलेली व्यक्ती अधिक सक्षम असते, म्हणूनच मानव विकास मोजन्यासाठी ३ प्रमुख निर्देशांक ठरविण्यात आले आहेत :
१ - लोकांच्या शौक्षणिक स्थितींचे मोजमाप करण्यासाठी प्रौढ साक्षरता
२ - लोकांच्या आरोग्याची स्थिती मौजन्यसाठी आयुर्मन
३ - लोकांचे रहनिमाण मोजमपानासाठी सकल घरगुती उत्पादन

Monday 4 November 2013

भारतातील अवजड उद्योग भाग २

ख़त उद्योग:
  • नायट्रोजन, फॉस्फरस, पोटेशियम हे रासायनिक खतातील तीन प्रमुख घटक आहेत 
  • भारतात नेत्रयुक्त खते, मिश्र खते, युरिया व उप-उत्पादक म्हणून अमोनियम सल्फेट या खतांचे उत्पादन होते 
  • भारतात सार्वजनिक क्षेत्रातील पहिला खत कारखाना झारखण्डमधील सिंद्री येथे १९५१ मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेत उभारण्यात आला 
  • भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील खत प्रकल्पांसाठी ९ सार्वजनिक निगम कार्यरत आहेत 
९ निगम पुढीलप्रमाणे:
  • फर्टिलायझर कारपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड - १९६१ ला स्थापन, सिंद्री (झारखण्ड), गोरखपुर (उ. प्रदेश), तालचेर (ओडिसा), रामागुंडम (आंध्र प्रदेश) या ४ प्रकल्पावरती देखरेख 
  • हिंदुस्तान फर्टिलायझर कारपोरेशन लिमिटेड - १९७८ ला स्थापन, दुर्गापुर, हल्दिया (प. बंगाल), नामरूप (आसाम), बरौनी (बिहार) या ४ प्रकल्पावरती देखरेख 
  • पाइराइट्स एंड फॉस्फेट केमिकल्स लिमिटेड - १९६० ला स्थापन, अंजोर (बिहार), सालदीपुर (राजस्थान), देहरादून (उत्तरांचल) या ३ प्रकल्पावरती देखरेख 
  • राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स - १९७८ ला स्थापन, मुंबई व थल प्रकल्पावरती देखरेख 
  • नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड - १९७८ ला स्थापन, भटिंडा व पानीपत (पंजाब) प्रकल्पावरती देखरेख
  • प्रोजेक्ट्स एंड डेवलपमेंट इंडिया लिमिटेड - १९७८ ला स्थापन, डिजाइनिंग, इंजेनेरिंग, तपासणी, देखरेख ही कामे ही संस्था करते 
  • फर्टिलायझर्स एंड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड - १९७८ ला स्थापन, कोचीनमध्ये २ प्रकल्पावरती देखरेख
  • मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड - १९६६ ला स्थापन, चेन्नईमध्ये प्रकल्प असून तो इतर प्रकल्पांना अमोनिया पुरवितो 
  • अरावली जिप्सम एंड मिनरल्स इंडिया लिमिटेड, जोधपुर - इतर प्रकल्पांसाठी जिप्सम पुरविण्यासाठी
कागद उद्योग:
  • भारतातील पहिली कागद गिरणी - सेहरापुर (प. बंगाल) १८३२ 
  • विस्तार - मध्यप्रदेश, महाराष्ट्र, झारखण्ड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश
  • महाराष्ट्रातील चंद्रपुर व नागपूर कागद गिरण्यांसाठी प्रसिद्ध