Sunday 31 July 2016

चर्चेतील व्यक्ती

* न्यायाधीश दिलीप बाबासाहेब भोसले यांनी अलाहाबाद उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली.
मराठी न्यायाधीश दिलीप बाबासाहेब भोसले यांनी ३० जुलैला अलाहाबाद उच्चन्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. डी वाय चंद्रचूड़ हे याआधीचे मुख्य न्यायाधीश होते त्यांची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. दिलीप भोसले यांनी उत्तर प्रदेश राज्यपाल राम नाईक यांच्याकडून अलाहाबाद मध्ये घटनेच्या आर्टिकल २१९ नुसार शपथ घेतली.
दिलीप भोसलेबाबत अधिक माहिती:
त्यांचा जन्म मुंबईमध्ये १९५६ साली झाला. २००१ मध्ये प्रथम त्यांची मुंबई उच्चन्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. नंतर २०१२ मध्ये त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये बदली झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक होण्याआधी ते आंध्र प्रदेश आणि तेलंगाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

* सईद नईमुद्दीन यांना मोहन बागान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
कलकत्याच्या मोहन बागान एफसीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मोहन बागान रत्न पुरस्कार यावर्षी भारतीय फुटबॉलपटू सईद नईमुद्दीन यांना प्रदान करण्यात आला आहे. यासोबतच ते हा पुरस्कार मिळविणारे १६ वे व्यक्ती ठरले आहेत.
सईद नईमुद्दीनबाबत अधिक माहिती:
सईद नईमुद्दीन हे भारतीय फुटबॉल खेळाडू आणि भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आहेत. १९७० मध्ये झालेल्या एशियाई खेळांमध्ये त्यांनी भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. १९९७ मध्ये त्यांना भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नेमण्यात आले होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने दक्षिण एशियाई फुटबॉल फेडरेशन कप जिंकला आहे. अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार मिळविणारे ते एकटे खेळाडू आहेत.
मोहन बागान रत्न बाबत अधिक माहिती:
मोहन बागान पुरस्कार हा मोहन बागान एफसी तर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. फुटबॉल क्षेत्रामध्ये वैयक्तिक किंवा विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी २९ जुलैला प्रदान करण्यात येतो. 

चालू घडामोडी : २८ जुलै

१. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला औपचारिकरित्या गोवरमुक्त देश म्हणून घोषित केले आहे?
उत्तर - ब्राझिल, २०१५ मध्ये ब्राझिलमध्ये एकाही गोवरच्या रुग्णाची नोंद झालेली नाही यावरूनच जागतिक आरोग्य संघटनेने ब्राझिलला गोवर मुक्त देश घोषित केले आहे.
२. भारताने कोणत्या देशासोबत ४ पी-८आई लष्करी विमानांसाठी १ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे?
उत्तर - अमेरिका, भारताने अमेरिकन विमान निर्मिती करणाऱ्या बोइंगसोबत विमान खरेदीसाठी १ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. ह्या विमानामुळे भारतीय नौदलला भारतीय समुद्री सीमेवर पाळत ठेवणे सोपे जाणार आहे. हे विमान पानबुडी विरोधी श्रेणीतील असून शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे.
३. भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये विदेशी गुंतवणूक ५% हून कितीपर्यंत वाढविण्यात आली आहे?
उत्तर - १५%, केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडियन स्टॉक एक्सचेंज त्याचप्रमाणे बँकिंग कंपनी, इन्शुरन्स कंपनी मध्ये परदेशी गुंतवणुकीची मर्यादा ५% हून १५% पर्यंत वाढविण्यात आली आहे. ह्या निर्णयामुळे भारत लेटेस्ट टेक्नोलॉजीचा वापर करून आर्थिक दृष्टया प्रगती करेल त्याचप्रमाणे भारतीय स्टॉक एक्सचेंज आजच्या स्पर्धेच्या युगात शक्तिशाली बनेल.
४. यूरोपियन कमीशनने ब्रेक्सिटवर यूनाइटेड किंगडमसोबत बोलणी करण्यासाठी कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - मिचेल बर्नियर, यूरोपियन कमिशनचे माजी उपाध्यक्ष आणि फ़्रांसचे माजी मंत्री मिचेल बर्नियर यांची यूरोपियन कमिशनने ब्रेक्सिटवर यूनाइटेड किंगडमसोबत चर्चा करण्यासाठी नियुक्ती केली आहे. यासोबतच ते कमीशन टास्कफोर्सचे प्रमुख असणार आहेत, त्याचप्रमाणे यूरोपियन यूनियन करार अंतर्गत आर्टिकल ५० नुसार ते यूनाइटेड किंगडमसोबत ब्रेक्सिटवर बोलणी करणार आहेत.
५. नंदू पोळ यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या कार्यक्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - कलाकार, मराठी थिअटर कलाकार नंदू पोळ यांचे नुकतेच निधन झाले. थिअटर अकैडमीचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी अनेक लघुपट, माहितीपट, टीव्ही मालिका, शैक्षणिक पटांमध्ये काम केले आहे उदा. तीन पैशाचा तमाशा, महानिर्वाण, सामना, सिंहासन इ. त्यांनी त्यांच्या ५० वर्षाच्या कार्याची कथा 'मी नंदू पोळ' ह्या पुस्तकामध्ये लिहली आहे.
६. २०१६ ची सार्क गृह मंत्री परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - पाकिस्तान, पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये २०१६ ची सार्क होम मिनिस्टर्स कॉनफेरेन्स पार पडली. ह्या बैठकीचे मुख्य उद्देश्य होते सार्क देशांतील पोलिसांमध्ये नेटवर्किंग निर्माण करने आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनामध्ये माहिती शेयरिंग वाढविणे. भारताकडून गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ह्या परिषदेमध्ये भारताचे नेतृत्त्व केले.
७. वर्ल्ड हेपेटाइटिस डे कोणत्या दिवशी पळाला जातो?
उत्तर - २८ जुलै, वर्ल्ड हेपेटाइटिस डे दरवर्षी २८ जुलैला लोकांमध्ये हेपेटाइटिसबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पळाला जातो. ह्या रोगाचे हेपेटाइटिस ए, बी, सी, डी, ई असे प्रकार आहेत. यंदाची वर्ल्ड हेपेटाइटिस डेची थीम होती 'एलिमिनेशन'. 

चालू घडामोडी : २७ जुलै

१. 'दोस प्रयसी ठाकूर गर्ल्स' पुस्तकाचे लेखक/लेखिका कोण आहेत?
उत्तर - अनुजा चौहान, भारतीय लेखिका आणि जाहिरातकर अनुजा ठाकुर या 'दोस प्रयसी ठाकूर गर्ल्स' पुस्तकाच्या लेखिका आहेत. त्यांनी या पुस्तकामध्ये नवी दिल्ली शहराचे वर्णन केले आहे.
२. २०१६ च्या रामोन मैग्सेसे पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाणार आहे?
उत्तर - टी एम कृष्णा आणि बेजवाड़ा विल्सन, २०१६ च्या रामोन मैग्सेसे पुरस्कारासाठी सहा जणांची निवड करण्यात आली असून ह्यामध्ये दोन भारतीयांचाही समावेश आहे. कर्नाटकी संगीतकार थोदूर मडब्यूसी कृष्णा आणि मानवी हक्क कार्यकर्ते बेजवाड़ा विल्सन आहेत. दोन भारतीय सोडून फिलीपींसचे कुंचित कैप्रियो-मोरालेस, इंडोनेशियाच्या डोमपेट धुंएफ, जापानची ओवरसीज कॉर्पोरेशन वोलुंटेर्स आणि लाओसच्या वीएनटीण रेस्क्यू यांचा समावेश आहे. रामोन मैग्सेसे वार्षिक पुरस्कार असून आशिया खंडातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्थांना दिला जातो.
३. प्रवीण राणा कोणत्या खेळाशी निगडित आहे?
उत्तर - कुस्ती, भारतीय ओलिंपिक असोशिएनने भारतीय कुस्तीपटू नरसिंह यादवच्या जागी प्रवीण राणाची रिओ ओलिंपिक २०१६ साठी ७४ किलो वजनीगटामध्ये तात्पुरती (प्रोविशनल) नोंदणी केली आहे.
४. पेलेट गन्सला (नॉन-लेथेल वेपन) पर्यायी शस्त्र शोधण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली आहे?
उत्तर - टी व्ही एस एन प्रसाद समिती, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पेलेट गन्सला पर्यायी शस्त्र शोधण्यासाठी ७ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. टी व्ही एस एन प्रसाद हे ह्या समितीचे अध्यक्ष असून ही समिती २ महिन्यांमध्ये आपला अहवाल सादर करेल.
५. कोणत्या भारतीय कमोडिटी एक्सचेंजला २०१६ च्या बुलियन फेडरेशन ग्लोबल कन्वेंशनमध्ये बेस्ट कमोडिटी एक्सचेंजचा पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, उत्तर प्रदेश मधील आग्र्यामध्ये पार पडलेल्या बुलियन फेडरेशन ग्लोबल कन्वेंशन २०१६ मध्ये बेस्ट कमोडिटी एक्सचेंजचा पुरस्कार मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियाला मिळाला आहे.
६. २०१६ च्या आईसीसी क्रिकेट हॉल ऑफ़ फेम मध्ये कोणाच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे?
उत्तर - मुथ्थैया मुरलीधरन, श्री लंकेचा फिरकी गोलंदाज मुथ्थैया मुरलीधरनचे नाव २०१६ च्या आईसीसी क्रिकेट हॉल ऑफ़ फेम मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे क्रिकेटच्या हॉल ऑफ़ फेममध्ये नाव समाविष्ट होणारा पहिला श्री लंकन क्रिकेटर आहे. मुरलीधरन सोबतच इंग्लैंडचे जलदगती गोलंदाज जॉर्ज लोहमान, ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज ऑर्थर मॉरिस, ऑस्ट्रेलियाची महिला संघाची माजी कर्णधार कारेन रोल्तोन यांचाही समावेश आहे.
७. विद्यापीठ अनुदान आयोग (यूनिवर्सिटी ग्रांट कमिशन) आणि अखिल भारतीय तांत्रिक परिषद (आल इंडिया कौंसिल फॉर टेक्निकल एजुकेशन) ची पुनर्रचना करण्यासाठी कोणत्या कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली आहे?
उत्तर - अरविंद पंगरिया समिती, पंतप्रधान कार्यालयाने यूनिवर्सिटी ग्रांट कमीशन आणि ऑल इंडिया कौंसिल फॉर टेक्निकल एजुकेशनच्या पुनर्रचनेसाठी एक समिती स्थापन केली आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पंगरिया या समितीचे अध्यक्ष आहेत. ह्यासोबतच अरविंद पंगरिया समिती मेडिकल कौंसिल ऑफ़ इंडियाच्या पुनर्रचनेचेही काम करत आहे, त्यांनी मेडिकल कौंसिल ऑफ़ इंडिया नॅशनल मेडिकल कमीशनसोबत बदलण्याची शिफारस केली आहे.

Saturday 30 July 2016

चालू घडामोडी : २६ जुलै

१. भारतीय रेल्वेने प्रवाश्यांना किती विमा देऊ केला आहे?
उत्तर - १० लाख रुपये, भारतीय रेल्वे कैटरिंग टूरिज्म कॉर्पोरेशन सप्टेंबर २०१६ पासून प्रवाश्यांना १ रुपये प्रीमियमवर १० लक्ष रुपये विमा देऊ करणार आहे. ह्यासाठी प्रवाश्यांना आईआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन बुक करावी लागेल. जर ट्रेन अपघात झाला तर विम्याची ही रक्कम वैध टिकिटधारकाला दिली जाईल. टिकिट बुकिंग करताना हा विमा उतरविणे पर्यायी असेल.
२. कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त कुपोषित मुले आहेत, वॉटर ग्रिडचे सर्वेक्षण 'कॉट शॉर्ट - हाऊ लॅक ऑफ टॉयलेट्स एंड क्लीन वॉटर कंट्रीब्यूट टू मालनुट्रिशन?
उत्तर - भारत, वॉटर ग्रिडच्या सर्वेक्षणनुसार भारतामध्ये सर्वात जास्त कुपोषित मुलांची संख्या आहे. हा अहवाल वाटरएड ह्या अंतरराष्ट्रीय संस्थेने प्रकाशित केला आहे. ह्या अहवालानुसार भारतामध्ये तब्बल ४८ दशलक्ष लहान मुले कुपोषण किंवा अविकसित आहेत. भारताखालोखाल नाइजेरिया, पाकिस्तान, इंडोनेशिया, चीन, इथोपिया, बांग्लादेश, कांगो, फिलीपींस हे देश आहेत.
३. २०१६ च्या टिळक सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - शरद पवार, माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भारतीय हरितक्रांतीमध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना यंदाच्या टिळक सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार १ ऑगस्टला पुण्यात प्रदान केला जाईल. सन्मानचिन्ह आणि १ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप असेल.
४. कैरो येथे पार पडलेल्या अंतरराष्ट्रीय अरेबिक सुंदरहस्ताक्षर स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीयाला दूसरे बक्षीस मिळाले आहे?
उत्तर - मुख्तार अहमद, भारतीय सुलेखक मुख्तार अहमद यांना कैरो येथे पार पडलेल्या अंतरराष्ट्रीय अरेबिक हस्ताक्षर स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमकाचे क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. ह्या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये पूर्ण जगातून ११५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रथम पारितोषिक इजिप्तच्या खालिद मोहम्मद याला मिळाले. ह्या स्पर्धेचे उद्दिष्ट नव्याने कलाकार घडविणे आणि नवीन जेनेरेशनला सार्वजानिक शोज आणि कार्यशाळेमधून कलेची जिज्ञासा करून देणे.
५. राष्ट्रीय म्यूजियमच्या महासंचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - डॉ. बुधा रश्मी मणि, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या माजी अधिकारी डॉ. बुधा रश्मी मणि यांची राष्ट्रिय म्यूजियमच्या महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्या पुढील तीन वर्षे म्हणजेच वयाची ७० वर्षे पूर्ण होईपर्यंत ह्या पदाचा कार्यभार संभाळणार आहेत. राष्ट्रीय म्यूजियम भारतातील सर्वात मोठे म्यूजियम असून राष्ट्रीय म्यूजियममध्ये जवळपास दोन लाख भारतीय आणि विदेशी वस्तुंचा समावेश आहे. म्यूजियममध्ये ५००० वर्ष जुन्या वस्तू देखील आहेत.
६. 'हाऊ टू बी अ बॉस: अ गाइड टू सर्वाइविंग कांकेरिंग लाइफ' पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - लिली सिंग, हाउ टू बी अ बॉस: अ गाइड टू सर्वाइविंग कांकेरिंग लाइफ पुस्तकाची लेखक भारतीय वंशाची कैनेडियन यू ट्यूब स्टार लिली सिंग आहे. तिने आपल्या पुस्तकात तिच्या जीवनातील सत्य आणि विनोदी घटना लिहल्या आहेत. खरया आयुष्यामध्ये बॉस बनायचे असेल तर मेहनत करावी लागते आणि यश मिळविण्यासाठी कोणतेही शॉर्ट कट्स नसतात हे ह्या पुस्तकामध्ये तिने आवर्जून नमूद केले आहे.

चालू घडामोडी : २५ जुलै

१. स्टार्टअप इंडिया स्टेट्स कॉन्फ्रेंस कोणत्या शहरामध्ये पार पडली?
उत्तर - नवी दिल्ली, औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागने नवी दिल्लीमध्ये स्टार्टअप इंडिया स्टेट्स कॉन्फ्रेंस २३ जुलै रोजी भरविली होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारमण ह्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या. ह्या बैठकीनुसार स्टार्टअप इंडिया ऍक्शन प्लैननुसार व्यवसायिकांना तीन वर्षांसाठी कर मुक्तता आणि ईतर फायदे भारत सरकारकडून देण्यात येणार आहेत.
२. कोणत्या सरकारने इ-कंप्लेंट सिस्टमसाठी पथदर्शी प्रकल्प सुरु केला आहे?
उत्तर - महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य सरकारने इ-कंप्लेंटसाठी पुण्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर पायलट प्रॉजेक्ट सुरु केला आहे. ह्या प्रकल्पाअंतर्गत सर्वसामान्य जनता कोणत्याही ठिकाणाहून कोणत्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रार ऑनलाइन नोंदवू शकते. तक्रार नोंदविण्यासाठी जनतेला 'महाराष्ट्र पोलिस' पोर्टलवर नवीन यूजरनेम आणि पासवर्ड तयार करावा लागेल. पोलीसांनुसार जनता आपली तक्रार १२००० अक्षरामध्ये लिहून ऑनलाइन पाठवू शकते. त्यानंतर सदर तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात तपासल्यानंतर तक्रारदारा एफआईआर नोंदणीसाठी पोलिस ठाण्यात बोलविले जाईल.
३. भारतमधील पहिला ग्रीन रोड कॉरिडोर कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आली आहे?
उत्तर - तामिळनाडू, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तामिळनाडू मध्ये भारतातील पहिला रेल्वे ग्रीन कॉरिडोर सुरु केला असून तो भारतमधील पहिला स्त्रावमुक्त रेल्वे ट्रैक असेल. ११४ किमी लांबीचा हा मार्ग तमिळनाडूतील रामेश्वरम ते मनामदुराई दरम्यान असून ह्याअंतर्गत रेल्वे ट्रैकवर जीरो शौचालय स्त्राव सोडले जाणार आहे.
४. मानवादित्य राठौर कोणत्या खेळाशी निगडित आहेत?
उत्तर - नेमबाजी, भारतीय नेमबाज मानवादित्य राठौरने इटलीच्या पोरपेटतोमध्ये झालेल्या जुनियर वर्ल्ड कपमध्ये 'चैंपियन ऑफ चैंपियंस' सामन्यामध्ये कांस्य पदक जिंकले आहे. तो २००४ च्या एथेंस ओलंपिक्समध्ये रौप्य पदक जिंकलेल्या कर्नल राज्यवर्धन राठौर यांचा मुलगा आहे.
५. भारतमधील पहिला वॉटर मेट्रो प्रॉजेक्ट कोणत्या शहरामध्ये सुरु करण्यात आला आहे?
उत्तर - कोची, केरळमधील कोचीमध्ये भारतातील पहिला वॉटर मेट्रो प्रॉजेक्ट 'कोची वॉटर मेट्रो प्रॉजेक्ट' मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या सुरु हस्ते करण्यात आला आहे. ह्या प्रकल्पाचे मुख्य उदिष्ट म्हणजे कोची शहर आणि आजूबाजूच्या संचयित प्रदेशातील जनतेचा जल प्रवास सुखकर करने. ह्या प्रकल्पाअंतर्गत नवीन बोटी विकत घेतल्या जाणाऱ्या असून मेट्रोसारखा प्रवास जनतेला अनुभवाला येणार आहे म्हणून त्यांना वॉटर मेट्रोज म्हटले जाईल.
६. एथेलेटिक्समध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित करणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय एथेलेटिक्स असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर -  भालाफेक, हरियाणाचा नीरज चोप्रा (थालीफेक) एथेलेटिक्समध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित करणारा पहिला एथेलेटिक्स आहे. पोलंडमध्ये पार पडलेल्या अंडर २० वर्ल्ड चैंपियनशिपमध्ये त्याने थालीफेक मध्ये ८६.४८ मीटर लांब थाली फेकून विक्रम करून सुवर्ण पदक जिंकले आहे. ह्या विक्रमानंतर देखील तो समर ओलंपिक्ससाठी पात्र ठरला नाही.
७. २०१६ ची फॉर्मूला वन हंगेरियन ग्रैंड प्रिक्स कोणी जिंकली आहे?
उत्तर - लेविस हैमिल्टन, ब्रटिश फॉर्मूला वन ड्राइवर लेविस हैमिल्टनने २०१६ ची हंगेरियन ग्रैंड प्रिक्स जिंकली आहे. त्याचे २०१६ मधील हे पाचवे चषक आहे. ह्यआधी त्याने मोनाको ग्रैंड प्रिक्स, कैनेडियन ग्रैंड प्रिक्स, ऑस्ट्रियन ग्रैंड प्रिक्स, ब्रिटिश ग्रैंड प्रिक्स जिंकली आहे.

Friday 29 July 2016

चालू घडामोडी : २४ जुलै

१. भूमिसंपादन विधेयकासाठी संसदेच्या संयुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - गणेश सिंग, भारतीयजनता पार्टीचे लोकसभा सदस्य गणेश सिंग यांची भूमिसंपादन विधेयकासाठी संसदेच्या संयुक्त समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. सुरेंद्रसिंग अहुवालिया याअधिचे अध्यक्ष होते त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
२. गंगा नदीवर मसूदा योजना तयार करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली आहे?
उत्तर - गिरधर मालवीय समिती, केंद्रीय नदी विकास, जलसंपदा, गंगा पुनर्विकास मंत्रालयाने गंगा पुनर्विकासासाठी मसूद योजना तयार करण्यासाठी गिरधर मालवीय समितीची स्थापना केली आहे. निवृत्त न्यायाधीश गिरधर मालवीय हे ह्या समितीचे प्रमुख असून त्यांच्यावर गंगा नदीच्या सफाई त्याचप्रमाणे गंगेच्या अखंड प्रवाहासाठी मसूद योजना तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते आपला अहवाल तीन महिन्याच्या आतमध्ये सादर करतील.
३. कोणत्या राज्य सरकारने पतंग उडविण्यासाठी लागणाऱ्या चायनीज मांझा आणि नॉन-बायोडिग्रेडेबल धाग्यांवर बिनशर्त बंदी घातली आहे?
उत्तर - कर्नाटक, कर्नाटक सरकारने नुकतेच पतंग उडविण्यासाठी लागणाऱ्या चायनीज मांझा आणि नॉन-बिओडिग्रेडेबल धाग्यांच्या विक्री आणि साठवणूकीवर बिनशर्त बंदी घातली आहे. हे धाग्यांवर बारीक ठेचलेल्या काच, इतर हानिकारक पदार्थांचे आवरण असते त्यामुळे जखम होते आणि पक्षांना आपला जीव गमवावा लागतो.
४. भारताने यूनाइटेड नेशंसच्या लौंगिक शोषण आणि अत्याचाराला बळी पडलेल्यासाठीच्या निधीमध्ये किती रक्कमेचे योगदान दिले आहे?
उत्तर - १ लाख डॉलर्स, भारत सरकारने यूनाटेड नेशंसच्या लौंगिक शोषण आणि अत्याचाराला बळी पडलेल्यासाठीच्या निधीमध्ये १ लाख डॉलर्सचे योगदान केले आहे. यासोबतच लौंगिक शोषण अणि अत्याचाराला बळी पडलेल्यासाठीच्या निधीमध्ये योगदान करणारा भारत पहिला देश आहे. सध्या भारत युनाइटेड नेशंसने योगदान देणाऱ्या देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
५. सईद हैदर रझा यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या कार्यक्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - चित्रकला, महान चित्रकार सईद हैदर रझा यांचे नवी दिल्ली येथे नुकतेच निधन झाले ते ९४ वर्षाचे होते. ते जागतिक स्तरावर नावाजलेले चित्रकार होते त्याचप्रमाणे ते त्यांच्या आधुनिक चित्रकारिता आणि इकॉनोग्राफीसाठी प्रसिद्ध होते. रझा अंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकार होते त्यांचे काम तेल किंवा असीरीलिक, सोबत जास्तीत जास्त रंग यांचा वापर करत.
६. रेल टिकटिंगला प्रोस्ताहन देण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर - भारतीय स्टेट बँक, रेल टिकटिंगला प्रोस्ताहन देण्यासाठी इंडियन रेल्वे कैटरिंग एंड टूरिज्म कॉर्पोरेशनने भारतीय स्टेट बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे. ह्याअंतर्गत इंटरनेट टिकटिंग आणि अनारक्षित टिकटिंग सिस्टमचा समावेश आहे.
७. 'वन लास्ट ड्रिंक एट गौपा' पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - सलीम हद्दाद, सलीम हद्दाद हे वन लास्ट ड्रिंक एट गौपा पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकामध्ये रस आणि एका तरुण समलिंगी युवकाची गोष्ठ आहे जो एका अरब देशामध्ये राहत असतो. 

Thursday 28 July 2016

चर्चेतील व्यक्ती

* नीलमराजू गंगा प्रसाद राव संकरित ज्वारीचे जनक यांचे निधन झाले.
प्रतिष्ठित कृषी शास्त्रज्ञ डॉ.नीलमराजू गंगा प्रसाद राव यांचे तेलंगणाची राजधानी हैद्राबाद  येथे दीर्घ आजारामुळे निधन झाले ते ८९ वर्षाचे होते. संकरित ज्वारीचे जनक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे कोरडवाहू पिकांवरील क्रॉस ब्रीडिंग, पिकांवरील मुलभुत आणि उपयोजित संशोधन यासाठी प्रसिध्द आहेत.
त्यांच्याविषयी थोडी अधिक माहिती: राव यांचा जन्म कोरिसापडू, आंध्र प्रदेशमध्ये झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण बापतला कृषी विद्यालयातून पूर्ण केले. भारतातील संकरित ज्वारीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्याचप्रमाणे देशी कापुस, एरंडेल, तुर ह्या कोरडवाहू पिकांवरील संशोधनासाठी ही त्यांना ओळखले जाते. ते भारतीय जेनेटिक्स एंड प्लांट ब्रीडिंग सोसायटीचे उपाध्यक्ष तर बाजारी सुधारणा सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांना एसएस भटनागर पुरस्कार, आत्मा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

* २०१६ चे रमोन मैग्सेसे पुरस्कार जाहीर. 
यंदाच्या रामोन मैग्सेसे पुरस्कार दोन भारतीयांसह सहा जणांना जाहीर झाला आहे. रामोन मैग्सेसे पुरस्कार हा आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. सहा विजेते खालीलप्रमाणे:
थोडुर मडब्यूसी कृष्णा (भारत) कर्नाटकी संगीतकार असून समाजामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी ते ओळखले जातात. बेजवाड़ा विल्सन (भारत) हे सफाई कर्मचारी आंदोलनचे राष्ट्रीय निमंत्रक आहेत. हाताने मल साफ करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी केलेले काम हे उल्लेखनीय आहे. कुंचित कैरपिओ मोरालेस (फिलीपींस), डोमपेट धुंएफ (इंडोनेशिया), जापान ओवरसीज कॉर्पोरेशन वालंटियर्स (जापान), वीएनटीने रेस्क्यू (लाओस) यांना ३१ ऑगस्ट रोजी फिलीपींसच्या पसाय सिटी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. ३१ ऑगस्ट १९०७ रोजी रामोन मैग्सेसे यांचा जन्म झाला होता.
रामोन मैग्सेसे पुरस्काराविषयी अधिक माहिती: रामोन मैग्सेसे पुरस्कार हा आशिया खंडातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो त्याचप्रमाणे आशियातील नोबेल म्हणून ही ओळखला जातो. फिलीपींसचे तीसरे राष्ट्रप्रमुख रामोन मैग्सेसे यांच्या स्मरणार्थ दिला जातो.  हे पुरस्कार १९५७ पासून अस्तित्वात आले, १७ मार्च १९५७ ला मैग्सेसे यांचे हवाई अपघातामध्ये निधन झाले. हा पुरस्कार न्यू यॉर्क मधील रॉकफेलर ब्रॉदर्स आणि फिलीपीन सरकारकडून दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी आशिया खंडातील लोक किंवा संस्थाना दिला जातो.

* व्हायोलीवादक ए कन्याकुमारी यांना संगीत कलानिधी जाहीर झाला. 
दक्षिण भारतातील ज्येष्ठ व्हायोलिनवादक अवसरला कन्याकुमारी यांची २०१६ च्या संगीत कलानिधी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यासोबतच संगीत कलानिधी पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला व्हायोलिनवादक आहेत. त्यांना हा पुरस्कार १ जानेवारी २०१७ रोजी प्रदान करण्यात येईल. याआधी ८ व्हायोलिनवादकांना (पुरुष) हा पुरस्कार मिळाला आहे.
अवसरला कन्याकुमारी दक्षिण भारतातील व्हायोलिनवादक असून कर्नाटकी संगीताच्या त्या विशेषज्ञ आहेत. त्या मुळच्या आंध्र प्रदेशातील असून शिक्षक, संगीतकार असा ५० वर्षांचा अनुभव आहे. याआधी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००३), पद्मश्री पुरस्कार (२०१५) मिळाले आहेत.
संगीत कलानिधी पुरस्कारविषयी अधिक माहिती: संगीत कलानिधी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार असून मद्रास संगीत अकादमीतर्फे दिला जातो. 

Wednesday 27 July 2016

प्रतापगड

प्रतापगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असून जिल्ह्यातील मोठा किल्ला आहे. प्रतापगड किल्ला प्रतापगडावरील लढाईसाठी ओळखला जातो त्याचप्रमाणे सध्या प्रतापगड महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे प्रेक्षणीय ठिकाण आहे. हा किल्ला १६५६-१८१८ पर्यंत मराठ्यांच्या अधिपत्त्याखाली होता टार १८१८-१९४७ ब्रिटिश राज, आणि आता भारताकडे आहे.
भौतिक माहिती: प्रतापगड पोलादपुरपासून अवघ्या १५ किमी अंतरावर आहे तर महाबळेश्वरच्या पश्चिमेला २३ किमी अंतरावर आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून ३५४० फुट (१०८० मीटर) उंचीवर आहे.
इतिहास: छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरु झाले. नीरा नदी आणि कोयना नदी यांचे संरक्षण हा या मागचा मुख्य उद्देश होता. १६५६ मध्ये प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. १० नोव्हेम्बर १६५९ ला शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात प्रतापगडाचे युद्ध झाले. अफझलखानाच्या वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खरया अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. १६५९ ते १८१८ या प्रदीर्घ कलावधीमध्ये १६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रुला कधीच मिळाला नाही.
बांधकाम: किल्ल्याची वरचा किल्ला आणि खालच्या किल्ला अशा दोन भागांमध्ये विभागणी केली जाऊ शकते.
वरचा किल्ला हा डोंगराच्या माथ्यावर बंधाला गेला असून तो प्रामुख्याने चौकानाकार आहे आणि त्याची प्रत्येक बाजू १८० मीटरची आहे. किल्ल्यावर काही कायमस्वरूपी इमारती आहेत उदा. शंभू महादेवाचे मंदिर. हे मंदिर किल्ल्याच्या वायव्येला असून पूर्णपणे कड्याने वेढले आहे.
खालचा किल्ला, किल्ल्याची ही बाजू ३२० मीटर लांब तर ११० मीटर रुंद आहे. ही बाजू किल्ल्याच्या अग्नेयाला असून १० ते १२ मीटर ऊंच बुरुज ह्याच्या संरक्षणासाठी उभारले गेले आहेत.
प्रतापगडाच्या लढाईनंतर अफझल बुरुज उभारला असून बुरुजाखाली अफझलखानाचे मुंडके पुरून ठेवले आहे असे बोलले जाते.
शिवरायांना तुळजा भवानीच्या भेटीला जाणे शक्य नव्हते म्हणून महाराजांनी १६६१ मध्ये गडावरच भवानीचे मंदिर बांधले. हे मंदिर खालच्या किल्याच्या पूर्वेला आहे. भवानीच्या मंदिराकडून बालेकिल्ल्याच्या पायऱ्या चढतांना उजव्या हातास श्री समर्थांनी स्थापन केलेला हनुमान आहे. किल्ल्यावर शिवरायांचा अश्वारूढ़ पुतळा व छोटी बाग आहे. गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाला दुपदरी बांधणीचा यशवंत व रेडका बुरुज आहेत. या दोन बुरुजांमध्ये नासके तळे व गोडे तळे आहे. ह्या खेरीज गडावर वेताळाचे मंदिर, स्वयंभू केदारेश्वराचे मंदिर, घोरपडीचे चित्र, कडेलोट, सूर्य बुरुज इ. ठिकाणे आहेत.
गडापासून अगन्येला काही अंतरावर अफझल खानाचा दर्गा आहे.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम

डॉ. एपीजे अब्दुल कलाम किंवा अबुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आपल्या आगळया कार्यपद्धतीमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपती' म्हणून लोकप्रिय होते.

जन्म: १५ ओक्टोबर १९३१
मृत्यु: २७ जुलै २०१५ (वय ८३)
शिक्षण: त्यांचे वडील रामेश्वराला येणाऱ्या यात्रेकरुंना होडीतून धनुषकोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे क्षत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमावित व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना त्यांना गणिताची विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी. एससी झाल्यानंतर त्यांनी मद्रास इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते, बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून ऐरोडायनामिक्स डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महीने एरोस्पेसचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर डॉ. कलाम यांचा १९५८ ते १९६३ या दरम्यान संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी संबंध आला.
कार्य: १९६३ मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र विकासातील सैटेलाइट लॉन्चिंग वेहिकलच्या संशोधनात भाग घेतला. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र एकात्मिक विकासाचा कार्यक्रम हाती घेतला. यासाठी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओ मध्ये आले.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. इस्रोमध्ये असताना सैटलाइट लॉन्चिंग वेहिकल ३ या प्रकल्पाचे ते प्रमुख होते. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी असे व्यक्तव्य केले होते, पुढे ते विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे प्रमुख होते.
वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकाऱ्यांवरील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करुन घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यमधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम. बी. टी. रणगाडा व लाइट कॉम्बैट एयरक्राफ्ट यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पडली आहे.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदशील आणि साधे होते. भारत सरकारने १९८१मध्ये  'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' आणि १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला आहे. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपणी अथक परीश्रमात व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉ. कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे. 

चालू घडामोडी : २३ जुलै

१. भारतातील पहिली सार्क पर्यटन बैठक महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये पार पडणार आहे?
उत्तर - औरंगाबाद, भारतातील पहिली सार्क पर्यटन बैठक महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये ऑक्टोबर २०१६ ला पार पडेल. २ दिवसीय परिषदेचा उद्देश्य म्हणजे मेक इन इंडिया, मेक इन महाराट्र अंतर्गत थेट परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हा असेल. परराष्ट्र मंत्रालयाने ह्या परिषदेसाठी औरंगाबाद निवडले आहे कारण २०१७ हे वर्ष 'विजिट महाराष्ट्र ईयर' म्हणून साजरे केले जाणार आहे तर २०१८ मध्ये अजंटा गुहांच्या उत्खननाला २०० वर्षे पूर्ण होणार आहेत.
२. इंडियन गोल्डन क्वाड्रीलेटरल (भारतीय सुवर्ण चतुष्कोण) पायी चालून पूर्ण करणारी मिशेल काकडे ही पहिली व्यक्ती आहे, ती कोणत्या शहराची रहिवाशी आहे?
उत्तर - पुणे, भारतीय सुवर्ण चतुष्कोण पायी सर करणारी मिशेल काकडे ही पुण्याची असून तिने १९३ दिवस १ तास आणि ९ मिनटांमध्ये ५९६८.४ किमीचा प्रवास करून चार भारतीय मेट्रो शहरांना जोडणारा भारतीय सुवर्ण चतुष्कोण प्रवास पूर्ण केला आहे. यासोबत तिच्या ह्या विक्रमाची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये 'भारतीय सुवर्ण चतुष्कोण पायी चालून सर्वात जलद पूर्ण करणारी महिला' अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
३. शाश्वत विकास ध्येय निर्देशांक (सस्टेनेबल डेवलपमेंट गोल इंडेक्स) मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
उत्तर - ११० व्या, शाश्वत विकास ध्येय निर्देशांकच्या १४९ देशांच्या यादीमध्ये भारत ११० व्या स्थानी आहे. हा निर्देशांक सस्टेनेबल डेवलपमेंट सोलूशन्स नेटवर्क आणि दी बेरटलमैंन यांनी प्रकाशित केला असून हा निर्देशांक देशातील विकास आणि ध्येयधोरण ह्यांवर आधारित आहे. ह्या निर्देशांकामध्ये स्वीडन अव्वल स्थानी असून डेनमार्क, नॉर्वे त्याखालोखाल आहेत.
४. २०१६ च्या फार्च्यून ५०० जगातील मोठ्या कॉर्पोरेशन्स (महसूल दृष्ठिने) कंपनीच्या यादीमध्ये किती भारतीय कंपण्याचा समावेश आहे?
उत्तर - सात, २०१६ च्या फार्च्यून ५०० जगातील मोठ्या कॉर्पोरेशन कंपन्यांच्या यादीमध्ये ७ भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (१६१ वी), रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (२१५ वी), टाटा मोटर्स लिमिटेड (२२६ वी), स्टेट बँक ऑफ़ इंडिया (२३२ वी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (३५८ वी), हिन्दुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (३६७ वी) आणि राजेश एक्सपोर्ट्स (४२३ वी). ह्या यादीमध्ये सर्वप्रथम आहे वालमार्ट आणि त्याखालोखाल स्टेट ग्रिड, चाइना नॅशनल पेट्रॉलियम आहेत.
५. घाटमपुर औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश, कोळश्यावर आधारित घाटमपुर औष्णिक वीज प्रकल्प उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपुर मध्ये सुरु होणार आहे. हा प्रकल्पामध्ये १९८० मेगावॉट बसविण्याची परवानगी केंद्राच्या आर्थिक विषयावरील कैबिनेट समितीने दिली आहे. ह्या प्रकल्पामध्ये नेयवेली उत्तर प्रदेश पॉवर लिमिटेड आणि उत्तर प्रदेश राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडची संयुक्य भागीदारी आहे.
६. भारतीय आधारच्या (यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - अजय भूषण पांडे, १९८४ बैचचे आईएएस ऑफिसर अजय भूषण पांडे यांची यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. 

Tuesday 26 July 2016

चालू घडामोडी : २२ जुलै

१. भारताने कोणत्या शेजारी देशासोबत व्यापार वाढविण्यासाठी पेट्रापोल एकात्मिक चेक पोस्ट सुरु केला आहे?
उत्तर - बांग्लादेश, पश्चिम बंगालमधील पेट्रापोल येथे झालेल्या व्हिडीओ कॉनफेरेन्समध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पेट्रापोल इंटीग्रेटेड चेक पोस्ट सुरु आहे. ह्या चेकपोस्टमुळे लोक, माल आणि दळवळणाची साधने सीमापार जाऊ शकतात त्याचप्रमाणे सुरक्षा आणि कस्टम्सचा ही प्रश्न सहजरित्या सोडवला जाईल. पेट्रापोल चेकपोस्ट हा भारतातील दूसरा इंटीग्रेटेड चेकपोस्ट आहे. याआधी भारत आणि बांग्लादेश सीमेवर आगरतला आणि अखुरा येथे आगरतला इंटीग्रेटेड चेकपोस्ट आहे.
२. 'इन दी नेम ऑफ डेमॉक्रेसी: जेपी मूवमेंट एंड दी इमरजेंसी' पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - बीपन चंद्रा, भारतीय इतिहासकार बीपन चंद्रा यांनी 'इन दी नेम ऑफ डेमोक्रेसी: जेपी मूवमेंट एंड दी इमरजेंसी' हे पुस्तक लिहले आहे. ह्या पुस्तकामध्ये १९७५-७७ मध्ये झालेली राष्ट्रीय आणिबाणी आणि जयप्रकाश मूवमेंट म्हणजेच जेपी मूवमेंट यांचे वर्णन केले आहे. ह्या पुस्तकात त्यांनी त्याकाळच्या सर्व घटना क्रमाने मांडल्या असून पंतप्रधान इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांनी लोकशाहीसाठी दिलेले योगदान कथित केले आहे.
३. ब्रिक्सच्या न्यू डेवलपमेंट बँकेच्या बोर्ड ऑफ गवर्नर्सची पहिली वार्षिक सभा कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - चीन, चीनच्या शांघाई मध्ये ब्रिक्स न्यू डेवलपमेंट बँकेच्या गवर्नर्सची वार्षिक सभा पार पडली. २०१६ ची बैठक, बँकेच्या नजीकच्या भविष्यासाठीचे व्हिजन तयार करने त्याचप्रमाणे संस्थापक सदस्य देश आणि विकसनशील सदस्य देशांमध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी भर देणे यासाठी ओळखली जाईल. पुढच्या वर्षीची म्हणजेच २०१७ न्यू डेवलपमेंट बँकेच्या बोर्ड ऑफ गवर्नर्सची बैठक भारतामध्ये होणार आहे.
४. सामाजिक सुरक्षा करार म्हणजेच दी सोशल सिक्यूरिटी अग्रीमेंट भारताने कोणत्या देशासोबत केला आहे?
उत्तर - जापान, सामाजिक सुरक्षा करारवर भारत आणि जापान यांनी स्वाक्षरी केली असून १ ओक्टोबर २०१६ पासून अमलात येईल.
५. जगामध्ये पहिल्यांदाच कोणता देश माणसावर जीका विषाणू लस चाचणी करणार आहे?
उत्तर - कनाडा, जीका विषाणूच्या प्रसारवर रोक आणण्यासाठी कनाडा जगामध्ये पहिल्यांदाच मानवावर जीका विषाणू लसीची चाचणी घेणार आहे. कॅनडाच्या कयूबेक सिटीमध्ये असलेल्या लैवल यूनिवर्सिटीचे संशोधक ही चाचणी करणार आहेत. आजपर्यंत हया लसीची चाचणी उंदरावर केली जात होती. जीका विषाणू प्रामुख्याने मच्छराकडून प्रसारित होतो आणि हया रोगावर कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही.
६. २०१९ च्या आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कपसाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - स्टीव एल्वरथी, दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज स्टीव एल्वरथी यांची २०१९ मध्ये इंग्लैंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कपसाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्टीव २०१७ मध्ये होणाऱ्या आईसीसी चैम्पियंस ट्रॉफी आणि आईसीसी महिला वर्ल्ड कपचे पर्यवेक्षणही करणार आहेत.
७. बैसीपल्ली अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे?
उत्तर - ओडिशा, बैसीपल्ली ओडिशामधील नयागढ़ मध्ये स्थित असून १६८.३५ वर्गकिमी परिसरामध्ये पसरले आहे. ह्या अभयारण्यामध्ये अस्वल, हत्ती, चित्ता, सांबर, हरिण हे प्राणी आढळतात.

Monday 25 July 2016

पुणे विभाग

पुणे विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक असून पुणे विभाग हा पश्चिमेला कोकण विभाग, उत्तरेला नाशिक विभाग, पूर्वेला औरंगाबाद विभाग तर दक्षिणेला कर्नाटक राज्य असा चहुबाजूंनी बांधला गेला आहे.
  • क्षेत्रफळ - ५८,२६८ वर्गकिमी 
  • जिल्हे - पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
  • साक्षरता - ७६.९५%
  • मुख्य पीके - ज्वारी, गहू, बाजारी, ऊस, तांदूळ, सोयाबीन, कांदा, भुईमूग, भाज्या, द्राक्ष, डाळिंब
  • सर्वात मोठे शहर - पुणे 
  • सर्वाधिक विकसित शहर - पुणे 
  • सर्वाधिक साक्षरता असलेले शहर - पुणे

पुणे विभगातील प्रशासकीय जिल्ह्यांचा इतिहास: १९४७ मध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आणि महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर पुणे विभगातील काही जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली तर काही नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली या निर्मिती दरम्यान सांगली जिल्यामध्ये मिरज, औंध, सांगली, तासगाव, कुरुंदवाड़ ही संस्थाने विलीन करण्यात आली होती. 
  • दूसरे महत्त्वाचे म्हणजे पूना जिल्ह्याचे पुणे जिल्ह्यात नामांतरण करण्यात आले. 
  • सोलापूर जिल्ह्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव असून पंढरपूर हा नवीन जिल्हा वनविला जाईल त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातीलच पंढरपूर, संगोला, कर्माळा, मंगलवेढा, माळशिरस, माढा आणि सांगली जिल्ह्यातील जथ, आटपाडी तालुक्यांचा समावेश करण्यात येईल. 
  • पुणे जिल्ह्याचेही विभाजन प्रस्ताव असून पुणे जिल्ह्यातून बारामती जिल्हा तयार करण्यात येणार आहे. बारामती जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यातीलच शिरूर, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा समावेश करण्यात येईल. 
  • सातारा जिल्ह्याचेही विभाजनाचा प्रस्ताव असून सातारा जिल्ह्यातून कराड हा जिल्हा बनविण्यात येईल. कराड जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यातीलच कराड, पाटन आणि सांगली जिल्ह्यातील वलवा, कडेगाव, शिराळा तालुक्यांचा समावेश करण्यात येईल. 

चालू घडामोडी : २१ जुलै

१. भारत विमानतळ प्राधिकरण (एयरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - गुरुप्रसाद मोहपात्रा, १९८६ च्या बैचचे आईएएस ऑफिसर गुरुप्रसाद मोहपात्रा मोहपात्रा यांची भारत विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. सध्या ते अर्थ मंत्रालयाचे संयुक्त सचिव आहेत. मोहपात्रा हे सूरतचे आयुक्त ही राहिले आहेत यांनी गुजरात अल्काइनेस एंड केमिकल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकपद ही भूषविले आहे. एयरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भारतातील १२५ विमानतळांचे व्यवस्थापन करते त्यापैकी ११ विमानतळे अंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत.
२. जागतिक बँकेच्या मुख्य आर्थिक सल्लागार आणि उपाध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - पॉल रोमर, अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ पॉल रोमर हे जागतिक बँकेचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार आणि उपाध्यक्ष असतील. कौशिक बासु हे सध्याचे जागतिक बँकेचे आर्थिक सल्लागार असून त्यांच्या कार्यकाळ सप्टेंबर २०१६ ला संपणार आहे. यापूर्वी रोमर हे न्यू यॉर्क यूनिवर्सिटी मध्ये प्राध्यापक होते त्याचप्रमाणे न्यू यॉर्क यूनिवर्सिटीच्या मार्रोन इंस्टिट्यूट ऑफ अर्बन मैनेजमेंटचे संचालक म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे.
३. २०१६ चा मिस्टर वर्ल्ड किताब कोणत्या भारतीयाने जिंकला असून तो हा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती आहे?
उत्तर - रोहित खंडेलवाल, इंग्लैंडच्या साउथपोर्ट येथे पार पडलेल्या भव्य समरंभामध्ये रोहित खंडेलवाल मिस्टर वर्ल्ड २०१६ आणि ५०००० डॉलर्स कॅश असा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह्यासोबतच मिस्टर वर्ल्ड किताब मिळविणारा पहिला भारतीय ठरला आहे. रोहित खंडेलवाल हा हैद्राबादचा लोकप्रिय अभेनेता, मॉडल आहे. २०१५ मध्ये त्याने मिस्टर इंडिया स्पर्धा जिंकली होती.
४. मोहमद शहीद यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या खेळाचे महान खेळाडू आहेत?
उत्तर - हॉकी, हरियाणातील गुड़गांव येथे मोहमद शाहिद यांचे निधन झाले ते ५६ वर्षांचे होते. ते एक नवाजलेले महान हॉकी खेळाडू होते. ते त्यांचा ड्रिब्लिंग स्किल्ससाठी प्रसिध्द होते. १९८० साली मास्को येथे झालेल्या ऑलिम्पिक मध्ये व्ही बासकरण यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने सुवर्ण पदक जिंकले होते त्या संघाचे मोहमद शाहिद हे सदस्य होते. त्याचप्रमाणे १९८२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या एशियाई खेळामध्ये भारताने रौप्य तर १९८६ मध्ये सीओलमधील एशियाई खेळामध्ये कांस्य पदक जिंकले होते त्यावेळी ही ते त्या संघाचे सदस्य खेळाडू होते.
५. भारतामध्ये अटल टिंकरिंग लैब्स सुरु करण्यासाठी नीती आयोगाने कोणत्या अंतरराष्ट्रीय कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे?
उत्तर - इंटेल इंडिया, युवाकांमध्ये कुतूहल, कल्पकता, सर्जनशीलतेला प्रोत्हासन देण्यासाठी नीती आयोगाने इंटेल इंडिया या अंतरराष्ट्रीय कंपनीसोबत हतमिळवणी करून १० अटल टिंकरिंग लैब्स उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अटल टिंकरिंग लैब्स हे सरकारच्या अटल इनोवेशन मिशनचा एक भाग असेल.
६. ब्रिक्स धोरणविषयक नियोजन बैठक कोठे पार पडणार आहे?
उत्तर - पटना, २६ जुलै रोजी बिहारमधील पटना मध्ये ब्रिक्सची धोरणविषयक नियोजन बैठक पार पडणार आहे. ही बैठक देशांमधील अंतरराष्ट्रीय समस्या त्याचप्रमाणे देशांअंतर्गत समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ही मदत करेल.
७. भारतीय निवडणूक आयोगाचे २०१६ सालासाठी कोणते बोधवाक्य असेल?
उत्तर - नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड

Sunday 24 July 2016

चालू घडामोडी : २० जुलै

१. अंतरराष्ट्रीय फौजदारी न्याय दिन (इंटरनॅशनल क्रिमीनल जस्टिस डे) कोणत्या दिवशी पाळला जातो?
उत्तर - १७ जुलै, इंटरनॅशनल क्रिमीनल जस्टिस डे दरवर्षी १७ जुलैला पळाला जातो.
२. २०१६ ची सीनियर महिला राष्ट्रीय स्क्वाश चैंपियनशिप कोणी जिंकली आहे?
उत्तर - दीपिका पल्लीकल, मुंबईमध्ये पार पडलेल्या ७३ व्या सीनियर महिला राष्ट्रीय स्क्वाश चैंपियनशिप जोशना चिनप्पाचा पराभव करून दीपिका पल्लीकलने जिंकली. त्याचप्रमाणे हरिंदरपाल सिंग संधूचा पराभव करत सौरव घोषालने पुरुष राष्ट्रीय स्क्वाश चैंपियनशिप ११ व्यांदा जिंकून नवीन विक्रम केला आहे.
३. २०१६ ची ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी बोर्ड कबड्डी टूर्नामेंट कोणत्या राज्य वीज मंडळाने जिंकली आहे?
उत्तर - हिमाचल प्रदेश, ४१ वी ऑल इंडिया इलेक्ट्रिसिटी बोर्ड कबड्डी टूर्नामेंट २०१६ पंजाब वीज मंडळाचा पराभव करून हिमाचल प्रदेश वीज मंडळाने जिंकली आहे. तमिळनाडुच्या तिरुचिरापल्ली येथे झालेल्या अंतिम सामान्यामध्ये हिमाचल प्रदेशने पंजाबचा ३६-३२ असा पराभव केला.
४. नेल्सन मंडेला अंतरराष्ट्रीय दिन २०१६ ची थीम काय होती?
उत्तर - टेक एक्शन, इन्सपायर चेंज, अंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन दरवर्षी १८ जुलैला पाळला जातो. नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनी वर्णद्वेषाबद्दल केल्याल कार्याला उजाळा देण्यासाठी हा दिवस अंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. ह्यामागचा उद्देश्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये ऊर्जा आहे की तो आपल्या विचारांचा वापर करून पूर्ण जगाला प्रभावी करू शकतो.
५. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह म्हणजेच लोकसभेमध्ये पेपर आणि पेपर वर्क कमी करण्यासाठी कोणते पोर्टल सुरु करण्यात आले आहे?
उत्तर - ई-पोर्टल, लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी लोकसभेमध्ये पेपरवर्क कमी करण्यासाठी ई-पोर्टल सुरु केले आहे. ह्याअंतर्गत लोकसभेचे सदस्य सर्व सचिवालयंसोबत ई-मेल आणि मेसेजद्वारे संपर्क करू शकतात. ह्याअंतर्गत प्रत्येक लोकसभा सदस्याला वेगळे लॉगिन आईडी आणि पासवर्ड असेल. ह्यासोबतच लोकसभा सदस्य ई-फाइल सवाल अणि नोटिस देऊ शकतात. ही पोर्टल इंग्लिश आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे ह्या पोर्टलवर संसदीय बिल्स, कमिटी मीटिंग वेळापत्रक, विषयपत्रिका, अहवाल आणि ईतर संसदीय माहिती उपलब्ध असेल.
६. कुदसी रगुणेर यांची यूनेस्कोने आपल्या यूनेस्को आर्टिस्ट फॉर पीससाठी नामांकित केले आहे ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत?
उत्तर - तुर्की, तुर्किश संगीतकार कुदसी रगुणेर यांची यूनेस्कोच्या आर्टिस्ट फॉर पीससाठी नेमण्यात आले आहे. यूनेस्कोचे महासंचालक इरिना बोकोवा यांनी तुर्कीच्या इस्तांबुलमध्ये पार पडलेल्या ४० व्या वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीटिंगमध्ये ही घोषणा केली.
७. मुबारक बेगम यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या कार्यक्षेत्राशी निगडित आहेत?
उत्तर - गायन, ज्येष्ठ पार्श्वगायिका मुबारक बेगम यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले त्या ८० वर्षांच्या होत्या.  त्या त्यांनी १९५० ते १९७० च्या दशकात गायलेल्या गण्यांसाठी प्रसिध्द असून त्यांची गाणी अजूनही यादगार आहेत. त्यांनी १९६१ मध्ये हमारी याद आयेगी चित्रपटामध्ये गायलेले 'कभी तन्हायियोन में हमारी याद आयेगी' हे सदाबहार गाणे आहे.

चालू घडामोडी : १८, १९ जुलै

१. 'दी ग्रेट इंडिया रन' भारतमधील पहिली मल्टी-सिटी मैराथॉन कोणत्या भारतीय शहरातून सुरु झाली?
उत्तर - नवी दिल्ली, भारतातली पहिली मल्टी-सिटी मैराथॉन 'दी ग्रेट इंडिया रन' नवी दिल्लीमधून १७ जुलै रोजी सुरु झाली. ही मैराथॉन भारतातील उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, दादरा आणि नगर हवेली राज्यांतून जाणार असून तिचा शेवट ६ ऑगस्टला मुंबई येथे होणार आहे.
२. खंगचेंदजोंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे?
उत्तर - सिक्कीम, खंगचेंदजोंगा राष्ट्रीय उद्यान सिक्किम राज्यामध्ये असून हरिण, बर्फीय चित्ता, हिमालयन तहर आढळून येतात. कॅपिटल कॉम्प्लेक्स ऑफ चंडीगढ़, खंगचेंदजोंगा राष्ट्रीय उद्यान, नालंदा महाविहारा यांना यूनेस्कोने तुर्कीच्या इस्तांबुलमध्ये झालेल्या ४० व्या वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीटिंगमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला आहे. एक जागतिक वारसा ठिकाण म्हणजे इमारत, शहर, वाळवंट, जंगल, बेट, तलाव, पर्वत यांचा समावेश असतो आणि यांची निवड यूनेस्को केलेली असते.
३. २०१६ ची डब्लूबीओ एशिया पैसिफिक सुपर मिडिलवेट चषक कोणी जिंकले आहे?
उत्तर - विजेंदर सिंग, भारतीय मुष्टीयोद्धा विजेंदर सिंगने २०१६ ची डब्लूबीओ एशिया पैसिफिक सुपर मिडिलवेट चषक जिंकली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या अंतिम सामान्यामध्ये विजेंदर सिंगने डब्लूबीसी यूरोपियन चैंपियनशिप गतविजेत्या  केरी हॉपचा पराभव केला आहे.
४. कोणत्या भारतीय राज्यांमध्ये भारतातील पहिली एकात्मिक फौजदारी न्याय व्यवस्था (इंटीग्रेटेड क्रिमीनल जस्टिस सिस्टम) सुरु करण्यात आली आहे?
उत्तर - तेलंगाना आणि आंध्र प्रदेश, भारतातील पहिली एकात्मिक फौजदारी न्याय व्यवस्था तेलंगाना आणि आंध्र प्रदेश राज्यांमध्ये सुरु करण्यात आली आहे. ह्या व्यवस्थे अंतर्गत कोर्ट, पोलिस स्टेशन्स, फिर्यादी, प्रयोगशाळा, तुरुंग यांना एकत्रित आणेल.
५. ट्रेन अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणती सुरक्षा प्रणाली सुरु केली आहे?
उत्तर - त्रि-नेत्र, ट्रेन अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने त्रि-नेत्र ही सुरक्षा प्रणाली सुरु केली आहे. हे यंत्र इंफ्रारेड किरणे आणि रडार टेक्नोलॉजीचा वापर करून २-३ किमी अंतरापर्यंतची माहिती जमा करुन इंजिनमध्ये लावलेल्या डिस्प्ले स्क्रीनवर दाखवेल. ह्या प्रणालीमुळे मोटरमैनला ब्रेक लावण्यासाठी पुष्कळ वेळ मिळेल. त्याचप्रमाणे त्रि-नेत्र मोटरमैनला रेल्वे ट्रैकवर येणाऱ्या कोणत्याही भौतिक अडथळ्याबाबतही दक्ष करेल. ही सुरक्षा प्रणाली धुक्यामध्ये, मुसळधार पाऊस आणि रात्रीच्या मोटरमैनला सतत इंजिनच्या बाहेर बघून बाहेरील परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो अशावेळी उपयोगी येणार आहे.
६. 'टॉक टू ऐके' हा लाइव इंटरैक्टिव प्रोग्राम कोणत्या राज्य/केंद्र शासित प्रदेशाने सुरु केला आहे?
उत्तर - दिल्ली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टॉक टू ऐके ह्या लाइव इंटरैक्टिव प्रोग्रामची सुरुवात केली आहे. ह्या योजनेअंतर्गत दिल्लीची सर्वसामान्य जनता थेट अरविंद केजरीवाल यांना सवाल-जवाब करेल. ह्या योजनेचा पहिला कार्यक्रम जवळपास तासभर चालला ह्यामध्ये दिल्लीच्या जनतेने शिक्षण, युवक अणि प्रशासन यांबाबत वेबसाइट आणि फ़ोनवरुन केजरीवाल यांना प्रश्न विचारले. 

Saturday 23 July 2016

जगातील शेअर बाजार अणि त्यांचे मुख्यालय

जगातील काही महत्त्वाच्या आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या स्टॉक एक्सचेंज यादी खालीलप्रमाणे आहे. ह्यापैकी काही स्टॉक एक्सचेंजचेमार्केट कैपिटल तब्बल १ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सहून जास्त आहे. अशा स्टॉक एक्सचेंजेसला "१ ट्रिलियन डॉलर्स क्लब" संबोधले जाते. २०१५ मध्ये ह्या १६ स्टॉक एक्सचेंजचे ग्लोबल मार्केट कॅपिटल ८७% होते.
१. न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय न्यू यॉर्क सिटी, अमेरिका
२. नैस्डेक ओमक्स - मुख्यालय न्यू यॉर्क सिटी, अमेरिका
३. जापान एक्सचेंज ग्रुप, टोकोयो - मुख्यालय टोकयो, जापान
४. लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप - मुख्यालय लंडन, यूनाइटेड किंगडम आणि इटली
५. शांघाई स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय शांघाई, चीन
६. हॉन्ग कोंग स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय हॉन्ग काँग, हॉन्ग कॉन्ग
७. यूरोनेक्स्ट - मुख्यालय एमस्टर्डम, ब्रुसेल्स, लिस्बन, पॅरिस, यूरोपियन यूनियन
८. टीएमक्स ग्रुप - मुख्यालय टोरंटो, कनाडा
९. शेंजहेन स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय शेंजहेन, चीन
१०. ड्यूट्सचे बोरसे - मुख्यालय, फ़्रैंकफ़र्ट, जर्मनी
११. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय मुंबई, भारत
१२. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ़ इंडिया - मुख्यालय मुंबई, भारत
१३. सिक्स स्वीस एक्सचेंज - मुख्यालय जुरीच, स्विट्ज़रलैंड
१४. ऑस्ट्रिलियान सिक्योरिटीज एक्सचेंज - मुख्यालय सिडनी, ऑस्ट्रेलिया
१५. कोरिया एक्सचेंज - मुख्यालय सीओल, दक्षिण कोरिया
१६. ओमक्स नॉर्डिक एक्सचेंज - मुख्यालय स्टॉकहोल्म, अर्मेनिआ आणि उत्तर यूरोप
१७. जेएसई लिमिटेड - मुख्यालय जोहान्सबर्ग, दक्षिण अफ्रीका
१८. बीएमई स्पेनिश एक्सचेंजेस - मुख्यालय मॅड्रिड, स्पेन
१९. ताइवान स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय ताइपेई, ताइवान
२०. बीएम एंड एफ बोवेस्पा - मुख्यालय साओ पॉलो, ब्राझिल
२१. मोंटेरेल एक्सचेंज - मुख्यालय मोंटेरल, कनाडा
२२. रॉयल सेक्युरिटीज एक्सचेंज ऑफ़ भूटान - मुख्यालय थिम्पू, भूटान
२३. कोलोंबो स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय कोलोंबो, श्रीलंका
२४. मालदीव स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय माले, मालदीव
२५. अफ़ग़ानिस्तान स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय काबुल, अफ़ग़ानिस्तान

शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला ३५०० फूट उंचीचा असून हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. भारत सरकारने या किल्ल्याला २६ मे १९०९ मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला आहे. किल्ल्याच्या चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर (शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले होते) व जीजाबाई आणि बाल शिवाजी यांची प्रतिमा आहे. शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नरमध्ये शिरताच शिवनेरीचे दर्शन होते. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुठुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
शिवनेरी किल्ल्याचा आकार पिंडिसारखा आहे. हा किल्ला १६३७ पर्यंत मराठ्यांचा अधिपत्त्याखाली होता तर १६३७ ते १७१६ पर्यंत मुघलांकडे होता. १७१६ ते १८२० पुन्हा मराठे तर १८२० ते १९४७ ब्रिटिश राज आता हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आहे.

इतिहास: जुन्नर हे शहर ईसवी सन काळापासून प्रसिद्ध असून जीर्णनगर, जुन्नेर अशा नावाने ओळखले जात होते. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर शहर परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नानेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग असून या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे, यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरुन फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गांवरील दुर्गाची निर्मिती करण्यात आली. सातवाहनाची सत्ता स्थिरावल्यावर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतल्या. सातवहनानंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवानी आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरुप प्राप्त झाले. नंतर १४४३ मध्ये मलिक-उल-माजूर याने यादवांचा पराभव करून किल्ला सर करून किल्ला बहमनी राजवटीखाली आणला. १४७० मध्ये मलिक-उल-माजुर याचा प्रतिनिधी मलिक महमंद याने किल्ल्याची नाकेबंदी करून किल्ला सर केला. १४९३ मध्ये त्याने राजधानी शिवनेरीहून अहमदनगरला हलवली. १५६५ मध्ये सुलतान मुर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला शिवनेरीमध्ये कैद करुन ठेवले. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वर त्यांच्यासोाबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन आले. शिवरायांचा जन्म ह्याच गडावर झाला. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरुद्ध जुन्नरमधील कोळ्यांनी बंड केले परंतु मोगलांनी बंड मोडून काढले. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात आले. ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहू महाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला आणि नंतर पेशव्यांकडे हस्तांतरित केला.

चालू घडामोडी : १६ जुलै

१. ट्रांसफॉर्मिंग इंडिया हे वेब पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरु केले आहे?
उत्तर - कायदा अणि न्याय मंत्रालय, केंद्रीय कायदा आणि न्याय अणि संवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमामध्ये विविध सरकारी योजनांचा सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया अभ्यासण्यसाठी ट्रांसफॉर्मिंग इंडिया हे वेब पोर्टल सुरु केले आहे. ही वेबसाइट वापरण्यामध्ये पूर्णपणे सोपी असून जनता एखाद्या सरकारी योजनेबद्दल असणारे आपले मत फोटो, व्हिडीओ, अभिप्राय स्वरूपामध्ये मांडू शकते. ही वेबसाइट जनता आणि सरकारमधील दुवा म्हणून काम करेल आणि दोन्ही दिशांनी माहितीची देवाणघेवाण करेल.
२. यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट (जागतिक वारसा) म्हणून भारतातील कोणत्या प्राचीन ठिकाणाची निवड केली आहे?
उत्तर - नालंदा महाविहारा (विश्वविद्यालय), तुर्कीच्या इस्तांबुल येथे पार पडलेल्या ४० व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीमध्ये बिहारमधील नालंदा महाविहारा अर्थातच नालंदा विश्वविद्यालय ह्या प्राचीन वास्तूला यूनेस्कोने वर्ल्ड कल्चरल हेरिटेजचा दर्जा दिला आहे. नालंदा विद्यापीठाप्रमाणे जगातील ज़ुओजिण हॉशन रॉक आर्ट (चीन), पर्शियन कनाट (इराण), फिलिपी पुरातत्व साईट (ग्रीस), अँटकेर डोलमेन्स साईट (स्पेन) या ठिकांणाना ही वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला आहे.
३. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिटी कंपोस्ट मोहीमेसाठी सर्व सामान्य जनतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या भारतीय व्यक्तीला नेमण्यात आले आहे?
उत्तर - अमिताभ बच्चन, बॉलीवुडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिटी कंपोस्ट मोहीमेसाठी नेमणूक करण्यात आली असून जनतेला प्रोस्ताहन देण्याचे काम करणार आहेत. ह्या मोहीम अंतर्गत बच्चन सर्वसामान्य जनतेला, नर्सरी मालक त्याचप्रमाणे फलोत्पादन करणार्या संस्थांना आपल्या गार्डन, फार्म हाउस, आणि सार्वजानिक बगीच्यांमध्ये फक्त सिटी कंपोस्ट वापरण्याचे आवाहन करणार आहेत. जनता, हॉटेल्स आणि शैक्षणिक संस्थांना ह्यांनी आपला जैवीक कचरा वेगळा करुन त्याचे कंपोस्ट करावे ह्याचे आवाहन देखील बच्चन करणार आहेत.
४. सुरेश केतकर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - राजकरण, राष्ट्रीय समाजसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचे लातूर येथे नुकतेच निधन झाले ते ८४ वर्षाचे होते.
५. जगातील पहिले ट्रेनवरील धावते हॉस्पिटल कोणते आहे?
उत्तर - लाइफलाइन एक्सप्रेस, १६ जुलै २०१६ ला मुंबईमध्ये जगातील पहिल्या ट्रेनवरील धावत्या हॉस्पिटलने 'लाइफलाइन एक्सप्रेस' (जीवन रेखा एक्सप्रेस) ने भारतातील गरीब आणि वंचित जनतेला सेवा पुरविण्याची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. भारताची जादूई ट्रेन म्हणूनही तिची ओळख आहे. आजपर्यंत ह्या ट्रैनने १० लाख गरीब आणि वैद्यकीय सेवेपासून वंचित लोकांची मुक्त मदत केली आहे. ह्या ट्रेनने आजपर्यंत १८ राज्यांमध्ये १७८ प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले असून तब्बल २ लाख किमीचा प्रवास केला आहे.
६. "करेज एंड कमिटमेंट : एन ऑटोबायोग्राफी" हे पुस्तक कोणी लिहले आहे?
उत्तर - मार्गरेट अल्वा, राजस्थानच्या माजी राज्यपाल आणि कांग्रेसच्या नेत्या मार्गरेट अल्वा यांनी "करेज एंड कमिटमेंट : एन ऑटोबायोग्राफी" पुस्तकाचे लेखन केले आहे. लेखिकेने ह्या पुस्तकामध्ये लहान मुलगी ते एक राजकारणातली प्रसिध्द महिला असा आपल्या आयुष्याचा प्रवास मांडला आहे. लेखिकीने आपल्या ४४ वर्षाच्या राजकीय करकिर्दीमध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी वी नरसिम्हा राव, मनमोहन सिंग ह्या चार पंतप्रधानांसोबत काम केले  असून त्यांचसोबतचा प्रवास ही नमूद केला आहे.

Tuesday 19 July 2016

चालू घडामोडी : १४, १५ जुलै

१. नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड अर्थातच नैटग्रिड च्या मुख्य कार्यकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - अशोक पटनायक, १९८३ बैचचे आईपीएस अधिकारी अशोक पटनायक यांची नॅशनल इंटेलिजेंस ग्रिडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक पटनायक हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे जावई असून सध्या ते इंटेलिजेंस ब्यूरोचे अतिरिक्त संचालक आहेत.
२. जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - के वी आर मूर्ती, के वी आर मूर्ती यांची पुढील पाच वर्षांसाठी जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ह्याआधी ते पूर्वीय रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक होते. जूट कॉर्पोरेशन जूट उत्पादन करणार्या राज्यांमध्ये जूट लागवडीसाठी मदत करते त्याचप्रमाणे आलेल्या पिकाला कमीत कमी बाजारभाव मूल्य ठरविण्याचे ही काम करते. जूट कॉर्पोरेशनचे मुख्यालय पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे आहे.
३. यूनाइटेड किंगडमचे नवीन पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर - थेरेसा मे, कंजरवेटिव पार्टीच्या नेत्या थेरेसा मे यांची यूनाइटेड किंगडमच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. डेविड कैमेरॉन हे पूर्व पंतप्रधान होते, यूनाइटेड किंगडमने यूरोपियन यूनियनमधून बाहेर पडल्यामुळे कैमेरॉन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. थेरेसा मे या यूनाइटेड किंगडमच्या दुसर्या महिला पंतप्रधान आहेत, ह्याआधी मार्गरेट थैचर ह्या यूनाइटेड किंगडमच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या कालावधी १९७९-१९९०.
४. 'रिंगसाइड विथ विजेंदर' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - रुद्रनेिल सेनगुप्ता, लौंग मासिकाचे उपसंपादक रुद्रनिल सेनगुप्ता हे रिंगसाइड विथ विजेंदर ह्या पुस्तकाचे लेखक आहेत. हे पुस्तक बॉक्सर विजेंदरसिंग वर आधारित असून त्याचा २००८ ऑलम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकलेला विजेंदर ते २०१६ रिओ ऑलिम्पिक मध्ये खेळणारा विजेंदर प्रोफेशनल बॉक्सर ह्या प्रवासावर प्रकाश टाकला आहे. त्याचप्रमाणे त्याला त्याच्या ह्या प्रवासामध्ये आलेले अडथळे, ट्रेंनिंग, त्याचे वैयक्तिक जीवन आणि बदलेल्या बॉक्सिंग पद्धती यांचे वर्णन केले आहे.
५. जिका हेल्थ इमरजेंसी कोणत्या दक्षिण अमेरिकन देशामध्ये जाहीर करण्यात आली आहे?
उत्तर - पेरू, पेरू रिपब्लिक दक्षिण अमेरिकन देशामधील उत्तरेकडील भागामध्ये जिका विषाणुचे १०२ रुग्ण आढळून आल्यामुळे पेरूमध्ये जिका हेल्थ इमरजेंसी लागू करण्यात आली आहे. ही आणीबाणी ९० दिवसांची असून रोगावर आळा घालण्यासाठी लागू करण्यात आली आहे. १०२ रुग्णांपैकी ३० गर्भवती महिला आहेत. संसर्गजन्य गर्भवती महिलेची प्रसूती झाल्यास जन्मणार्य बाळाला माइक्रोफली होतो आणि वयस्क लोकांमध्ये टेम्पररी पैरालिसिस होतो.
६. दमपा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?
उत्तर - मिझोरम, दमपा व्याघ्र प्रकल्प हा मिझोरम मधील सर्वात मोठा प्राणी अभयारण्य प्रकल्प असून ५५० वर्ग किमी परिसरामध्ये पसरला आहे. हा प्रकल्प मिझोरमच्या पश्चिम भागात असून बांग्लादेशाच्या अंतरराष्ट्रीय सीमेला लागून आहे. ह्या अभयारण्यमध्ये चित्ता, भारतीय रानगवे, विविध पक्षी, हरिण हे प्राणी आहेत. 

Monday 18 July 2016

चालू घडामोडी : १३ जुलै

१. २०१६ ची आशिया-यूरोप परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - मंगोलिया, ११ वी आशिया-यूरोप मीटिंग समिट २०१६ मंगोलियातील उलानबातर शहरामध्ये १४ ते १६ जुलै दरम्यान पार पडली. ही बैठक दोन खंडातील देशांना आणि विचार विनिमय यांना जोडण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. ही बैठक प्रामुख्याने राजकीय संवाद, आर्थिक सहयोग आणि सामाजिक-सांस्कृतिक विचार या तीन मुख्य स्तंभावर आधारित आहे. थाईलैंड मधील बैंकाक येथे १९९६ साली पहिली बैठक पार पडली होती. भारताचे उपराष्ट्रपती मो. हमीद अंसारी यांनी भारताचे प्रतिनिधित्त्व केले होते.
२. विशाखापट्टनम येथे कोणते मारकोससाठी नवीन नाविक तळ उभारण्यात आले आहे?
उत्तर - आयएनएस कर्ण, विशाखापट्टनम येथील भीमुनीपट्टनम येथील नाविक तळामध्ये मारकोस म्हणजेच मरीन कमांडोसाठी आयएनएस कर्ण हे नाविक तळ उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन सुनील लंबा यांच्या हस्ते करण्यात आले. मारकोसची स्थापना फेब्रुवारी १९८७ मध्ये मुंबईमध्ये आयएनएस अभिमन्युमध्ये इंडियन मरीन स्पेशल फ़ोर्स म्हणून करण्यात आली होती. मारकोस हे गुप्त सैनिक असून जमीन, सागरी आणि हवेमध्ये आपले काम करण्यास सक्षम आहेत.
३. समन्वय २०१६ म्हणजेच इंडियन लैंग्वेज फेस्टिवल याचा यंदाचा विषय/थीम काय आहे?
उत्तर - लैंग्वेज ऎस पब्लिक ऍक्शन, ६ वा इंडियन लैंग्वेज फेस्टिवल अर्थातच समन्वय २०१६ नवी दिल्ली येथे नोवंबर २०१६ पासून सुरु होणार असून लैंग्वेज ऎस पब्लिक ऎक्शन ही यंदाची थीम आहे.
४. जगातील पहिले स्नूपी म्यूजियम कोणत्या देशामध्ये खुले करण्यात आले आहे?
उत्तर - जापान, जगातील पहिले स्नूपी जपनमधील टोकोयो शहरामध्ये रोप्पोंगी येथे सुरु करण्यात आले आहे. हे म्यूजियम चार्ल्स एम स्कूल्ज म्यूजियम आणि रिसर्च सेंटर मार्फत चालविले जाईल आणि कार्टून पत्रांना समर्पित आहेत.
५. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - मुख़्तार अब्बास नक़वी, माजी अल्पसंख्यांक मंत्री डॉ. नजमा हेपतुल्लाह यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला  असून मुख़्तार अब्बास नक़वी यांची नवीन अल्पसंख्यांक मंत्री म्हणून नियूक्त करण्यात आले आहे.
६. पहिली विंबल्डन पुरुष एकेरी व्हीलचेयर टेनिस स्पर्धा कोणी जिंकली आहे?
उत्तर - गॉर्डोन रेड, ब्रिटिश पैराऑलिम्पिक खेळाडू गॉर्डोन रेड याने स्वीडनच्या स्टेफन ओलसनचा ६-१, ६-४, असा पराभव करून पहिली विंबल्डन पुरुष एकेरी व्हीलचेयर टेनिस स्पर्धा जिंकली आहे. त्याचप्रमाणे व्हीलचेयर दुहेरी स्पर्धा गॉर्डोन रेडने त्याचा जोडीदार अल्फीे हवेत्त ह्याच्यामदतीने स्टेफन हौदत आणि पिफर यांचा पराभव ४-६, ६-१, ७-६ असा पराभव करून जिंकली. 

Sunday 17 July 2016

चालू घडामोडी : १२ जुलै

१. कोणत्या राज्य सरकारने आपल्या आईपीएस अधिकार्यांच्या कामाचा मुल्यमापन अहवाल 'स्पैरो'मार्फ़त ऑनलाइन दाखल करणार आहे?
उत्तर - हरियाणा, हरियाणा सरकारने आपल्या आईपीएस अधिकार्यांच्या कामाचा मूल्यमापन अहवाल स्पैरो म्हणजेच स्मार्ट परफॉरमेंस अप्रैज़ल रिपोर्ट रिकॉर्डिंग ऑनलाइन विंडो मार्फत ऑनलाइन दाखल केला जाऊ शकतो. अधिकारी आपला अहवालअसेस्मेंट ईयर २०१५-१६ पासून दाखल करू शकतात.
२. भारतामध्ये दरवर्षी होणार्या डाळीची तूट अभ्यासण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना केली आहे?
उत्तर - अरविंद सुब्रमनियन समिती, केंद्र सरकारने भारतामध्ये दरवर्षी होणार्या डाळीच्या तूटीचा अभ्यास करण्यासाठी एक उच्च स्तरीय समितीची नेमणूक केली आहे. ही समिती आपला अहवाल २ आठवड्यामध्ये सादर करणार असून केंद्र सरकारने डाळीचा बफर स्टॉक ८ लाख हून २० लाख टन करण्याचा निर्णय घेतला आहे.
३. नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण झाल्या आहेत?
उत्तर - सुशीला कार्की, नेपाळच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून सुशीला कार्की यांनी नेपाळच्या राष्ट्रपती भवनामध्ये (शीतल निवास) राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी शपथ दिली. त्या ६ जून २०१७ पर्यंत न्यायपालिकेच्या प्रमुख असतील. सुशीला कार्कीसोबतच अयोधी प्रसाद यादव यांनी मुख्य निवडणूक आयुक्त पदाची शपथ घेतली.
४. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - डी राजकुमार, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटिड अर्थातच बीपिसीएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी डी राजकुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे. एस वी वरदराजन हे सध्याचे प्रमुख असून त्यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबरला संपणार असून १ ऑक्टोबर पासून राजकुमार आपला पदभार स्वीकरतील. राजकुमार यांच्यासोबत उत्पल बोरा यांची ऑइल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
५. २०१५ चा ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - रघुवीर चौधरी, ५१ वा २०१५ चा ज्ञानपीठ पुरस्कार डॉ. रघुवीर चौधरी यांना संसद संग्रहालय इमारत, नवी दिल्ली येथे बहाल करण्यात आला आहे. ११ लाख रोख आणि ब्रॉन्ज़ची सरस्वती देवीची मूर्ती असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
६. अमल दत्ता यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
उत्तर - फुटबॉल, माजी भारतीय फूटबॉलपटू आणि भारताचे पाहिले पूर्णवेळ प्रशिक्षक अमल दत्ता यांचे नुकतेच बागुईआटी कोलकाता येथे निधन झाले ते ८६ वर्षांचे होते. १९५४ मध्ये मनिला येथे झालेल्या एशियन खेळांमध्ये त्यांनी भारताकडून प्रतिनिधित्व केले होते त्यांनी डायमंड सिस्टम नावाची खेळ पद्धत निर्माण केली म्हणून त्यांना डायमंड कोच म्हणूनही ओळखले जाते. 

Saturday 16 July 2016

चालू घडामोडी : ११ जुलै

१. २०१६ चा कंप्यूटर हिस्ट्री म्यूजियम बूक प्राइज कोणी जिंकला?
उत्तर - दिनेश शर्मा, भारतीय स्तंभलेखक आणि लेखक दिनेश शर्मा यांना त्यांच्या 'दि आउटसौरसर: दि स्टोरी ऑफ इंडियाज़ आईटी रेवोलुशन' ह्या पुस्तकासाठी त्यांना २०१६ चा कंप्यूटर हिस्ट्री म्यूजियम बूक प्राइज मिळाला आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी गेल्या ५० वर्षांमध्ये भारतामध्ये कंप्यूटर क्षेत्रामध्ये झालेल्या बदलाचे वर्णन केले आहे. १००० डॉलर रोख असे पुरस्काराचे स्वरुप असून हा पुरस्कार ग्रुप फॉर कंप्यूटर, इनफार्मेशन एंड सोसायटी तर्फे दिला जातो.
२. डीआरडीओ ने कोणत्या आईआईटीसोबत सेंटर फॉर प्रोपल्शन टेक्नोलॉजीसाठी करार केला आहे?
उत्तर - आईआईटी मुंबई आणि आईआईटी मद्रास, डिफेंस रिसर्च एंड डेवलपमेंट आर्गेनाईजेशनने नुकतेच सेंटर फॉर प्रोपल्शन टेक्नोलॉजीसाठी आईआईटी मुंबई आणि आईआईटी मद्रास सोबत करार केला आहे.ह्या कराराचे उद्देश म्हणजे डीआरडीओ आणि आईआईटी यांच्या समन्वयाने नवीन उत्पादने तयार करणे आणि अवकाश तंत्रज्ञानामध्ये प्रगती करने.
३. २०१६ ची पुरुषांची विंबलडन स्पर्धा कोणी जिंकली?
उत्तर - एंडी मर्रे, लंडनमधील सेंटर कोर्टमध्ये झालेल्या अंतिम सामान्यामध्ये मिलोस राओनिक याचा पराभव ग्रेट ब्रिटेनच्या अंडी मर्रेने २०१६ ची पुरुषांची विंबलडन स्पर्धा जिंकली. हयसोबतच त्याने विंबलडन स्पर्धा दुसर्यांदा जिंकली असून आपल्या करियरमधील तीसरे ग्रँड स्लॅम जिंकले.
४. गंगाजल डिलीवरी योजना कोणत्या भारतीय शहरामध्ये सुरु करण्यात आली आहे?
उत्तर - पटना, गंगाजल डिलीवरी योजना बिहारची राजधानी पटनामधील जनरल पोस्ट मास्टर ऑफिसमध्ये सुरु करण्यात आली आहे. ह्या योजनेअंतर्गत घरपोच गंगाजलची भारतीय टपालमार्फ़त डिलीवरी केली जाईल. ही योजना केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री रवी शंकर प्रसाद आणि दळणवळण राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सुरु केली आहे. ह्या योजनेअंतर्गत पवित्र गंगाजल गंगोत्री किंवा हृषिकेश मधून घेतले जाईल आणि ग्राहकांच्या घरी नाममात्र किमतीमध्ये पोहचवले जाईल.
५. २०१६ फॉर्मूला वन ब्रिटिश ग्रँड प्रिक्स चैंपियनशिप कोणी जिंकली आहे?
उत्तर - लेविस हैमिल्टन, यूनाइटेड किंगडमच्या सिल्वरस्टोन येथे झालेली२०१६ ची फॉर्मूला वन ब्रिटिश ग्रँड प्रिक्स चैंपियनशिप मर्सिडीज़चा ब्रिटिश ड्राइवर लेविस हैमिलटन याने जिंकली. त्याचे २०१६ मधील हे ४ थे जेतेपद आहे, त्याने ह्याआधी मोनाको ग्रँड प्रिक्स, कैनेडियन ग्रँड प्रिक्स, ऑस्ट्रीअन ग्रँड प्रिक्स जिंकली आहे.
६. 'वन पार्ट वीमेन' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - पेरुमल मुरुगन, तमिळ लेखिका पेरुमल मुरुगन ह्या वन पार्ट वीमेन पुस्तकाच्या लेखिका आहेत. 

चालू घडामोडी : महत्त्वाचे मुद्दे

१. राजेश कुमार चतुर्वेदी यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
२. जागतिक युवा कौशल्य दिन (यूथ स्किल डे) १५ जुलै रोजी साजरा करण्यात आला, विकास कौशल्याच्या मदतीने युवकांसाठीरोजगार निर्मिती करणे ही यंदाची थीम होती.
३. काळ्या पैश्याबाबत नेमण्यात आलेले (विशेष तपास पथक) निवृत्त न्यायमूर्ती एम बी शहा यांच्या समितीने काळ्या पैश्यावर रोख आणण्यासाठी एका दिवशी ३ लाख वरील रोख व्यवहारावर बंदी करण्याची शिफारस केली आहे.
४. याज मुक्त देश म्हणून भारत हा जगातील पहिला देश बनला आहे, याज हा उष्णकटिबंधीय देशांमध्ये आढळणारा संसर्गजन्य रोग असून हा त्रिपोनमा पाट्रेन्यू या जंतुमुळे होतो. हा रोग त्वचा, हाडे आणि सांधे यांवर प्रभाव करतो.
५. बिहारच्या नालंदा महाविहाराने यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये प्रवेश केला आहे. नालंदा महाविहाराची स्थापना गुप्त राजवंशाच्या राजा कुमारगुप्त पहिला ह्याने पाचव्या शतकात स्थापना केली आहे.
६. मध्य प्रदेश हे पहिले भारतीय संघराज्य आहे ज्याचे स्वतंत्र्य 'हैप्पीनेस डिपार्टमेंट' आहे, जे भूटानच्या हैप्पीनेस विषयावर (हैप्पीनेस विषयाचे स्त्रौत केंद्र) काम करेल.
७. महिला उद्योजकांसाठी देशातील पहिले औद्योगिक पार्क उत्तरखंड मधील फेडरेशन हाउस येथे सुरु करण्यात आले असून त्याचे अनावरण उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
८. जगातील पहिले ट्रेनवरील हॉस्पिटल अर्थातच भारताची लाइफलाइन एक्सप्रेसने ग्रामीण भारतातील गरीब आणि सरकारी योजना, मेडिकल सुविधांपासून वंचित असलेल्या जनतेला सुविधा देत आपल्या कार्याची २५ वर्षे पूर्ण केली आहेत.
९. फीफाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या फीफा रॅंकिंग मध्ये भारत १५२ व्या स्थानी आहे.
१०. भारताची ग्रँड मास्टर हरिका द्रोणवल्ली हिने चीनच्या छेदू येथे पार पडलेल्या फ़ीड विमेंस ग्रँड प्रिक्स ट्रॉफी जिंकली आहे.

Friday 15 July 2016

चालू घडामोडी : ९, १० जुलै

१. कृषी केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कोणते वेब पोर्टल सुरु केले आहे?
उत्तर - कृषी विज्ञान केंद्र, भारताचे कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये कृषी केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र ही वेब पोर्टल सुरु केली. ही पोर्टल ६४५ कृषी केंद्रांवर लक्ष ठेवून असेल. कृषी विज्ञान केंद्र शेतकर्यांना शेतीबाबत नवीन योजना, हवामान बदल, बाजार विकास, शेतकर्यांना विविध विषयांवर सल्ला पुरवेल.
२. अब्दुल सत्तार ईधी यांचे नुकतेच निधन झाले ते नावाजलेले समाजसेवक असून ते कोणत्या देशाचे होते?
उत्तर - पाकिस्तान, अब्दुल सत्तार ईधी पाकिस्तानातील प्रसिध्द मानवतावादी आणि समाजसेवक होते त्यांचे नुकतेच कराची मध्ये निधन झाले ते ९२ वर्षांचे होते. ते पाकिस्तानातील ईधी फाउंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख होते. ईधी फाउंडेशन पाकिस्तानामध्ये मोफत समाजसेवेचे काम करते उदा. एम्बुलैंस, अनाथालये, वृद्ध आणि अपंगाना मोफत सेवा सुविधा देते.
३. अमली पदार्थांची तस्करी, खेळ आणि कडधान्य ट्रेडिंगसाठी भारताने कोणत्या अफ्रीकन देशासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - मोजांबिक, भारताने मोजांबिकसोबत तीन सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे त्यामध्ये अमली पदार्थांची तस्करी, खेळ आणि कडधान्य ट्रेडिंग असे तीन करार आहेत. ह्या करारानुसार मोजांबिक तूर डाळ उत्पादनावर भर देणार असून हा संपूर्ण तूर भारतामध्ये आयात केला जाईल. त्याचप्रमाणे अमली पदार्थांच्या तस्करीवर बंधण घालणे आणि खेळांना प्राधान्य देणे.
४. वर्ल्ड बँक एनर्जी इफिशिएंसी इनिशिएटिवसाठी कोणत्या भारतीय बँकेने सिडबीसोबत करार केला
आहे?
उत्तर - येस बँक, स्मॉल इंडस्ट्रीज डेवलपमेंट ऑफ इंडिया अर्थातच सिडबीने येस बँकेसोबत लहान उद्योगांना अर्थ सहाय्य करण्यासाठी  करार केला आहे.
५. "ऐस अगेंस्ट ऑड्स' हे कोणत्या भारतीय टेनिस खेळाडूचे आत्मचरित्र आहे?
उत्तर - सानिया मिर्झा, ऐस अगेंस्ट ऑड्स हे सानिया मिर्झाचे आत्मचरित्र असून तिने तिचे वडील इम्रान मिर्झा यांच्यासोबत शब्दांकित केले आहे. तिने आपल्या आत्मचरित्रमध्ये आयुष्यामध्ये आलेले सर्व उतार चढाव त्याचप्रमाणे आनंदी आणि दुःखी क्षण यांचे वर्णन केले आहे. खेळाच्या मैदानामध्ये आणि मैदानाबाहेर खेळाडुंसोबत असलेले संबंध त्याचप्रमाणे एक साधारण खेळाडू ते उत्कृष्ट खेळाडू बनण्याचा प्रवास हयात नमूद केला आहे.
६. राष्ट्रीय ई-विधान अकॅडमी कोणत्या भारतीय राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे?
उत्तर - हिमाचल प्रदेश, राष्ट्रिय ई-विधान अकॅडमी भारतातील हिमाचल प्रदेश मधील तपोवनमध्ये उभारण्यात येणार असून ह्याच ठिकाणी म्हणजेच धर्मशाळामध्ये हिमाचल प्रदेशची विधानसभा आहे. ही अकॅडमी भारतातील विविध राज्यांतून येणार्या आमदार आणि खासदारांना प्रशिक्षित करेल.

Thursday 14 July 2016

चालू घडामोडी : ८ जुलै

१. नवीन आर्थिक वर्षाची व्यवहार्यता तपासण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली आहे?
उत्तर - शंकर आचार्य समिती, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नवीन आर्थिक वर्षाची व्यवहार्यता आणि इष्ठता तपासण्यासाठी डॉ. शंकर आचार्य समितीची स्थापना केली आहे. ह्याअंतर्गत भारताचे आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च ऐवजी जानेवारी ते डिसेंबर किंवा १२ महिन्यांचा इतर कालावधी नवीन आर्थिक वर्ष म्हणून बदलला जाऊ शकतो. ह्या प्रस्तावाअंतर्गत ४ सदस्यीय समिती प्रत्येक १२ महिन्यांच्या कालखंड अभ्यासून त्याचे फायदे आणि तोटे शोधून काढेल. ही समिती आपला अहवाल ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी सादर करणार आहे.
२. २०१६ च्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे?
उत्तर - ९१ व्या, २०१६ च्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये १३९ देशांपैकी भारत ९१ व्या स्थानी आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स ही वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या ग्लोबल इनफार्मेशन टेक्नोलॉजी रिपोर्ट २०१६ चा महत्त्वाचा कणा आहे. ह्या अहवालामध्ये सिंगापूर प्रथमस्थानी असून त्याखालोखाल फ़िनलैंड, स्वीडन, नॉर्वे आणि अमेरिका आहेत. ह्या अहवालानुसार कोणता देश आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचप्रमाणे समाजकारणामध्ये किती तंत्रज्ञानाचा वापर करतो हे दर्शवतो.
३. नमामी गंगे कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या भारतीय शहरापासून सुरु करण्यात आली आहे?
उत्तर - हरीद्वार, केंद्रीय जलसंपदा , नदी विकास आणि गंगा पुनर्जीवन मंत्री उमा भारती यांनी गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी नमामी गंगे कार्यक्रमाची सुरुवात उत्तराखंडमधील हरिद्वार येथून केली. ह्याच कार्यक्रमाला समांतर म्हणजेच गंगेच्या उपनद्या आणि गंगा साफ करण्याचा कार्यक्रम गंगोत्री ते हावडा दरम्यान राबविला जाणार आहे. हा कार्यक्रम उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांमधील २३१ ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
४. जागतिक जूनोसेस (पशूजन्य रोग) दिन कोणत्या दिवशी पाळला जातो?
उत्तर - ६ जुलै, जागतिक जूनोसेस दिन  हा दरवर्षी ६ जुलैला सर्वसामान्य जनतेमध्ये पशूजन्य रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो. पशूवैद्यच्या अनूसार १५० पशूजन्य रोग आहेत त्यापैकी ट्यूबरक्लोसिस (क्षयरोग), हुकवर्म्स, राउंडवर्म्स, स्केबीज आणि रेबीज हे काही महत्त्वाचे रोग आहेत.
५. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - वेंकैय्या नायडू, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये वैंकेया नायडू यांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
६. कोणत्या भारतीय जिम्नास्टला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जिमनास्टिक्सने वर्ल्ड क्लास जिम्नास्ट म्हणून गौरविले आहे?
उत्तर - दीपा करमकर, त्रिपुराच्या दीपा करमकरला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ़ जिमनास्टिक्सने वर्ल्ड क्लास जिम्नास्ट म्हणून गौरविले आहे. हा बहुमान मिळविणारी ती पहिली भारतीय जिम्नास्ट आहे.

Sunday 10 July 2016

चंद्रशेखर आझाद

जन्म: २३ जुलै १९०६
मृत्यु: २७ फेब्रुवारी १९३१
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतीकारक होते. रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्युनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशन या क्रांतीकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशिएशन या नवीन नावाखाली पुनर्बाधणी केली. त्याचप्रमाणे त्यांना भगतसिंग यांचे गुरु मानले जाते.
जन्म आणि बालपण: चंद्रशेखर यांचा जन्म २३ जुलै १९०६ ला सध्याच्या अलीराजपुर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी आणि आईचे नाव जगरानी देवी होते. त्यांचे पूर्वज कानपूर जवळच्या बदरखा गावात राहत होते. जगरानी देवी ह्या सीताराम यांच्या तिसर्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरीत झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसीमधील संस्कृत शाळेत गेले. डिसेंबर १९२१ मध्ये महात्मा गांधीनी सुरु केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चन्द्रशेखरने सहभाग घेतला. त्यासाठी त्याला अटक सुद्धा झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव आझाद असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते आझाद आडनावाने ओळखले जाऊ लागले.
मृत्यु: २७ फेब्रुवारी १९३१ ला अलाहाबादमधील अल्फ्रेड पार्क येथे सुखदेव राज या क्रांतीकारकाला भेटायला गेले असताना एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला आणि चंद्रशेखर व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे ठेवण्यात आले.

चालू घडामोडी : ५ जुलै

१. कोणत्या भारतीय पैरा-स्वीमरने २०१६ च्या २३ वयोगटाखालील इंटरनॅशनल व्हीलचेयर एंड ऐम्प्युटी स्पोर्ट्स मध्ये ८ पदके जिंकली आहेत?
उत्तर - निरंजन मुकुंदन, चेक रिपब्लिकची राजधानी परगुे येथे पार पडलेल्या २३ वर्ष वयोगटा खालील इंटरनॅशनल व्हीलचेयर एंड ऐम्प्युटी स्पोर्ट्स मध्ये बंगलोरच्या निरंजन मुकुंदन याने ८ मेडल्स जिंकली आहेत. त्याने २०० मी फ्रीस्टाइल, ५० मी बटरफ्लाई, ५० मी ब्रेस्टस्ट्रोक मध्ये सुवर्ण तर १०० मी फ्लाई, ५० मी फ्रीस्टाइल मध्ये रौप्य आणि १०० मी फ्रीस्टाइल, १०० मी ब्रेस्टस्ट्रोक, १०० मी बैकस्ट्रोक मध्ये कांस्य पदक पटकावले.
२. कोणत्या भारतीय जोडीने २०१६ कनाडा ओपन ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन टूर्नामेंट मध्ये पुरुष दुहेरी जिंकली आहे?
उत्तर - मनु अत्तरी आणि सुमीथ रेड्डी, कनाडाच्या कैलगरी मध्ये झालेल्या कनाडा ओपन ग्रँड प्रिक्सच्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय जोड़ी मनु अत्तरी आणि सुमीथ रेड्डी ह्यांनी एड्रिन लिउ आणि टोबी नग ह्या जोडीचा २१-८, २१-१४ असा पराभव केला. मनु अत्तरी आणि सुमीथ रेड्डी ही पहिली भारतीय पुरुष जोडी आहे जिने रिओ ऑलिम्पिक २०१६ साठी पात्र झाली आहे.
३. स्टेट्स ऑफ़ दी वर्ल्डस चिल्डेरन हा वार्षिक अहवाल कोणती अंतरराष्ट्रीय संघटना प्रकाशित करते?
उत्तर - यूनिसेफ, नुकताच यूनाइटेड नेशनसच्या चिल्डरंस इमर्जेसी फंडने २०१६ चा स्टेटस ऑफ दी वर्ल्ड्स चिल्ड्रन हा वार्षिक अहवाल प्रकाशित केला. ह्या अहवालानुसार सध्याचा ५ वर्षाखालील बालकांचा मृत्युदर ५ हून कमी आहे.
४. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले कार्यकारी संचालक कोण आहेत?
उत्तर - सुदर्शन सेन, भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून सुदर्शन सेन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एन एस विश्वनाथन हे सध्याचे कार्यकारी संचालक असून त्यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गर्व्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली आहे. सेन हे बँकिंग रेगुलेशन विभाग, नॉन-बँकिंग रेगुलेशन विभाग त्याचप्रमाणे को-ऑपरेटिव बँक रेगुलेशन विभागावर लक्ष ठेवतील. सुदर्शन सेन हे रिझर्व्ह बँकेच्या अहमदाबाद ऑफिसचे विभागीय संचालक ही होते.
५. रेणुका अभयारण्य कोणत्या भारतीय संघराज्यामध्ये आहे?
उत्तर - हिमाचल प्रदेश, रेणुका अभयारण्य हिमाचल प्रदेश मधील सिरमौर जिल्ह्यामध्ये आहे. हे अभयारण्य चित्ता, सांबर, हरण, चितळ, कोल्हा, डोंगरी कावळा, बुलबुल, कबूतर यांचे घर आहे.
६. 'लॉजिस्टिक्स डेटाबँक - टैगिंग सिस्टम्स ऑफ़ कंटेनर्स' अमलात आणणारे भारतातील पहिले पोर्ट कोणते आहे?
उत्तर - जवाहरलाल नेहरु पोर्ट, मुंबईच्या दक्षिणेला असलेले  पोर्ट ट्रस्ट हे भारतातील पहिले बंदर आहे ज्याने ग्राहकांच्या सुलभतेसाठी लॉजिस्टिक्स डेटाबँक - टैगिंग ऑफ कंटेनर्स सिस्टम सुरु केली आहे. ह्या सुविधेमुळे इम्पोर्टर्स/एक्सपोर्टर्स त्यांचा माल/कंटेनर लॉजिस्टिक्स डेटाबँकद्वारे ट्रॅक करू शकतात.

Saturday 9 July 2016

चालू घडामोडी : ४ जून

१. २०१६ ची फार्मूला वन ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली आहे?
उत्तर - लेविस हैमिलटन, ब्रिटिश फॉर्मूला वन रेसिंग ड्राइवर लेविस हैमिलटन याने २०१६ ची ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स जिंकली आहे. त्याने २०१६ मध्ये तीन ग्रँड प्रिक्स जिंकल्या आहेत ह्याआधी त्याने मोनाको ग्रँड प्रिक्स आणि कैनेडियन ग्रँड प्रिक्स जिंकली आहे.
२. २०१६ ची कनाडा ओपन ग्रँड प्रिक्स बॅडमिंटनची पुरुष एकेरी टूर्नामेंट कोणी जिंकली?
उत्तर - साई प्रनीथ, कनाडाच्या कैलगरी येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण कोरियाच्या ली ह्यूनचा पराभव करत भारताच्या साई प्रणीथने २०१६ ची कनाडा ओपन ग्रँड प्रिक्स पुरुष एकेरी २१-१२, २१- १० ने जिंकली.
३. कोणत्या भारतीयाला २०१६ चा भारत गौरव पुरस्कार देऊन  गौरविण्यात आले आहे?
उत्तर - नीरजा भनोट, पैन ऍम विमानावर सीनियर फ्लाइट पर्सर असणार्या नीरजा भनोटला लंडन येथे पार पडलेल्या कार्यक्रममध्ये भारत गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार त्यांना देश सेवेसाठी केलेल्या कार्याबद्दल देण्यात आला आहे. ५ सप्टेंबर १९८६ ला कराची अंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशदवाद्यांनी पैन ऍम विमान अपहरण केले होते, त्यावेळी त्यांनी आपल्या जिवाची पर्वा नकरता प्रवाश्यांना वाचविले होते. हा पुरस्कार संस्कृती युवा संस्था, जयपुर तर्फे दिला जातो. हा पुरस्कार तिचे बंधू अखिल आणि अनेश ह्यांनी स्वीकारला.
४. २०१६ ची ब्रिक्स अर्बन फोरम मीटींग कोणत्या देशामध्ये भरविण्यात येणार आहे?
उत्तर - भारत, तीसरी ब्रिक्स अर्बन फोरम मीटिंग २०१६, १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान भारतामध्ये विशाखापट्टनम येथे पार पडणार आहे. ब्रिक्स मध्ये ब्राज़ील, रशिया, इंडिया, चीन आणि साउथ अफ्रीका यांचा समावेश होतो.
५. कोणत्या राष्ट्रीय बँकेने 'मिंगल' हे फेसबुक आणि ट्वीटर यूसर्ससाठी सोशल मिडिया बॅंकिंग ऍप सुरु केले आहे?
उत्तर - भारतीय स्टेट बँक, फेसबुक आणि ट्विटर यूसर्ससाठी भारतीय स्टेट बँकेने मिंगल सोशल मिडिया बॅंकिंग ऍप सुरु केले आहे. ह्या अंतर्गत ग्राहक विविध बॅंकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकणार आहेत. ह्या ऍपमध्ये रजिस्टर करण्यासाठी ग्राहकांना त्यांचा बँक अकाउंट नंबर किंवा डेबिट कार्ड नंबरका वापर करू शकतात. सध्या फेसबुक यूसर्स ह्या ऍपअंतर्गत बॅलन्स इन्क्वारी, मिनी स्टेटमेंट, विथीन बँक फंड ट्रांसफर करू शकतात तर ट्वीटर यूसर्स हैशटैग्स द्वारे अकाउंट बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंट पाहू शकतात.
६. जगातली पहिली मिक्स्ड मर्शिअल आर्ट्स 'सुपर फाइट लीग' कोणत्या देशामध्ये भरविंयत येणार आहे?
उत्तर - भारत, जगातील पहिली मिक्स्ड मर्शिअल आर्ट्स 'सुपर फाइट लीग' भारतामध्ये २६ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे. ही स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन गटांमध्ये होणार असून ९६ खेळाडू सहभागी होणार आहेत. ह्या स्पर्धेमध्ये ८ संघ आहेत मुंबई, पुणे, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, बैंगलोर, पंजाब आणि गोवा त्याचप्रमाणे प्रत्येक संघामध्ये १२ खेळाडू असून ९ भारतीय तर ३ विदेशी खेळाडू असतील.

Friday 8 July 2016

चालू घडामोडी : ३ जुलै

१. एक्सरसाइज रिम ऑफ दी पैसिफिक २०१६ ही बहुदेशीय नौदल अभ्यासमलिका कोणत्या देशामध्ये सुरु आहे?
उत्तर - अमेरिका, २५ वी एक्सरसाइज रिम ऑफ दी पैसिफिक २०१६ पैसिफिक महासागरामधील हवाई येथे सुरु झाली असून ती ३० जून २०१६ ते ४ ऑगस्ट २०१६ दरम्यान पार पडणार आहे. ह्या अभ्यास शिबिरामध्ये २७ देशांनी सहभाग घेतला आहे. ह्या देशांमध्ये भारत, फिलीपींस, ऑस्ट्रेलिया, फ़्रांस, जापान, मलेशिया, नेदरलैंड, न्यूज़ीलैंड, टोंगा, यूनाइटेड किंगडम आहेत. रिमपक ही जगातील सर्वात मोठी अंतरराष्ट्रीय दर्जाची समुद्री युद्धाची अभ्यास शिबिर आहे.
२. भारतातील तंत्रज्ञान शिक्षण आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी जागतिक बँकेने किती रक्कम भारताला देण्याचे मान्य केले आहे?
उत्तर - २०१.५० दशलक्ष डॉलर्स, भारतातील तंत्रज्ञान शिक्षण आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी जागतिक बँकेने २०१.५० दशलक्ष डॉलर्स भारताला मान्य केले असून ह्या प्रोजेक्टचे मुख्य उद्देश म्हणजे अभियांत्रिकी शिक्षण देणार्या संस्थांचा शिक्षण दर्जा, गुणवत्ता वाढवून त्यांची कार्यक्षमता वाढविणे आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी २५ वर्षे मुदत असेल आणि २५ वर्षांमध्ये पूर्ण न झाल्यास अधिक ५ वर्षांची मुदतवाढ असेल.
३. जागतिक बँकेने प्रकाशित केलेल्या २०१६ च्या लॉजिस्टिक्स परफॉरमेंस इंडेक्समध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
उत्तर - ३५ व्या, जागतिक बँकेने प्रकाशित केलेल्या लॉजिस्टिक्स परफॉरमेंस इंडेक्समध्ये भारत ३५ व्या स्थानी आहे. ह्या क्रमवारीमध्ये १६० देशांना विचारात घेतले गेले होते. भारत २०१४ मध्ये ५४ व्या स्थानी होता, २०१६ मध्ये भारत १९ क्रमांक वर आला आहे. ह्या २ वर्षांमध्ये फ़क्त फ़क्त भारताचा व्यापरच वाढला नसून मेक इन इंडिया म्हणजेच निर्यातही वाढली आहे. ह्या क्रमवारीमध्ये जर्मनी, अव्वल स्थानी असून लक्सेम्बॉर्ग, स्वीडन त्या खलोखाल आहेत.
४. कवल व्याघ्र प्रकल्प कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे?
उत्तर - तेलांगना, केवल व्याघ्र तेलांगना राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील जनरम मंडल मध्ये असून ८९२.३३ वर्ग किमी भागात पसरला आहे त्याचप्रमाणे १,१२३.२१ वर्ग किमी इतका बफर एरिया आहे. वाघ, चित्ता, गौर, चितळ, सांबर, नीलगाय ह्यांच्यासाठी माहेर घर आहे.
५. राष्ट्रीय डॉक्टर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - १ जुलै, भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिन दर वर्षी १ जुलै रोजी साजरा केला जातो. बंगालचे दूसरे मुख्यमंत्री आणि महान वैद्य डॉ बिधान चंद्र रॉय यांना स्मरण म्हणून भारतामध्ये डॉक्टर दिन १ जुलैला साजरा केला जातो.
६. कोणत्या राज्यामध्ये ई-सिगारेटवर बंदी घालण्यात आली आहे?
उत्तर - केरळ, केरळ राज्य सरकारने राज्याअंतर्गत ई-सिगारेट उत्पादन, विक्री, विपणन आणि जाहिरात यांवर बंदी घातली आहे. ई-सिगारेटमुळे ह्रदय विकार आणि कर्क रोग होण्याचा धोका असतो म्हणून बंदी घालण्यात आली आहे. ई-सिगारेट हे एक हैंडी डिवाइस असून निकोटिन उत्सर्जित करते. निकोटिन हे प्राणघातक, व्यासनी आणि लहान मुलांनी गिळल्यास ते लहान मुलांना अतिशय हानिकारक आहे.

Tuesday 5 July 2016

चालू घडामोडी : ३० जून

१. एडवरटाइजिंग स्टैंडर्ड्स कौंसिल ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - मुंबई, फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि एडवरटाइजिंग स्टैंडर्ड्स कौंसिल ऑफ़ इंडिया ह्यांनी अन्न आणि पेयावरील दिशाभूल करणार्या जहिरातींवर अंकुश ठेवण्यासाठी करार केला आहे. त्याचप्रमाणे एफएसएसआईने दिशाभूल करणार्या जाहिराती आणि फूड कंपन्यांच्या विरोधी येणार्या आलेल्या तक्रारी 'सुओ मोटो' फ़ास्ट ट्रॅक पद्धतीने चालविण्याची मुभा दिली आहे. प्रकाशित होणार्या सर्व जहीरितींवर एएससीआई लक्ष ठेऊन असणार आहे.
२. रिओ ऑलिम्पिक २०१६ साठी भारतीय एथलेटिक्सना कोणत्या भारतीय कंपनीने प्रायोजक (स्पोंसरशिप) दिली आहे?
उत्तर - अमूल, भारतातील सर्वात मोठी दुग्धजन्य पदार्थ बनवणारी कंपनी अमूलने भारतीय एथलेटिक्स खेळाडूंना अधिकृतरित्या रिओ ऑलिम्पिकसाठी स्पॉंसर केले आहे. अमूलने ही स्पोंसरशिप तरुणाईला केंद्रित ठेऊन केली आहे. तरुणाई मध्ये खेळ आणि दुधापासून शरीराला मिळणारी ऊर्जा ह्याचा संबंध पटवून देणे हा ह्यामागचा मुख्य उद्देश आहे. ह्या अंतर्गत कंपनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची जाहिरात करणार आहे.
३. कोणत्या भारतीय-अमेरिकन नागरिकांना २०१६ चा ग्रेट इमिग्रेंट्स: दी प्राइड ऑफ अमेरिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
उत्तर - हरी श्रीनिवासन, विक्रम मल्होत्रा, भारती मुखर्जी, सुंदर पिचाई, चार भारतीय-अमेरिकन नागरिकांना २०१६ च्या ग्रेट इमिग्रेंट्स: दी प्राइड ऑफ अमेरिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हरी श्रीनिवासन (पीबीएस न्यूज़ऑवरचे एंकर), विक्रम मल्होत्रा (मैककिन्से  एंड कंपनीचे अध्यक्ष), भारती मुखर्जी, सुंदर पिचाई (गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी).
४. मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेसाठी कोणती शिक्षक एजुकेशन पोर्टल सुरु केली आहे?
उत्तर - प्रशिक्षक, केंद्रीय मानव संसाधन आणि विकास मंत्री स्मृती ईरानी यांनी नवी दिल्ली येथे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थे अंतर्गत शिक्षकांसाठी 'प्रशिक्षक' एजुकेशन पोर्टल सुरु केली आहे. ही पोर्टल मानव संसाधन मंत्रालय आणि सेंट्रल स्क्वैर फाउंडेशन ह्यांच्या सहयोगने विकसित करण्यात आला आहे.
५. अरुणाचल प्रदेश चे नवनिर्वाचित गवर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - तथागत रॉय, त्रिपुराचे गवर्नर तथागत रॉय यांना अरुणाचल प्रदेशचे सध्याचे गवर्नर ज्योती प्रसाद राजखोवा यांच्या अनुपस्थितीमध्ये अरुणाचल प्रदेशचे गवर्नर म्हणून त्यांच्यावर अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांची ही नेमणूक भारताच्या राष्ट्रपती म्हणजेच प्रणव मुखर्जी यांनी केली आहे.
६. जिनसन जॉनसन हा भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर - एथलेटिक्स, ८०० मीटर धावणे.

Sunday 3 July 2016

चालू घडामोडी मुख्य मुद्दे

१. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) ने विश्वनाथन आनंद यांना 'होनोरिस कैसा' डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
२. रोड्रिगो डटर्टे यांनी फिलिफिन्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.
३. राष्ट्रीय सांख्यिकी दिन दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षीही २९ जूनला पाळण्यात आला असून 'कृषी आणि शतकर्यांचे कल्याण' ही यंदाची थीम होती.
४. आसाम सरकारने नुकतेच ब्रम्हपुत्रा नदीवरील माजुली बेटाला नदी बेट जिल्हा म्हणून घोषित केले, माजुली हा भारतातील पहिला नदी बेट जिल्हा झाला आहे.
५. बराक-८ ह्या अंतरखण्डीय क्षेपणास्त्रची ओडिशामधील बालासोर जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली.
६. प्रसिद्ध मराठी साहित्यकार डॉ रामचंद्र चिंतामण ढेरे यांचे निधन झाले ते ८६ वर्षांचे होते.
७. रेल्वे मंत्रालय देशातील विविध रेल्वे स्टेशन्सवर एक हजार सीसीटीवी कॅमेरे बसवणार आहे.
८. भारताने बांग्लादेशला ६० आधुनिक प्रवासी डब्बे निर्यात केले.
९. राष्ट्रीय अंतरराज्यीय स्पर्धेमध्ये समीर मोन हा सर्वात जलद धावपटू ठरला आहे, त्याने १०० मीटर अंतर अवख्या १०.६० सेकण्डमध्ये पूर्ण केले.
१०. हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड निर्मित तेजसची भारतीय सैन्यामध्ये दाखल, स्वदेशी बनावटीचे पहिले विमान भारतीय सैन्यामध्ये दाखल झाले आहे.

चालू घडामोडी : २९ जून

१. कोणत्या देशांना संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीने २०१७-१८ साठी युएनएससी नॉन-परमानेंट मेंबरशिप दिली आहे?
उत्तर - इथोपिया, स्वीडन, बोलीविया, कजाखस्तान, संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीने इथोपिया, स्वीडन, बोलीविया, कजाखस्तान, इटली किंवा नेदरलैंड या देशांना यूनाइटेड नेशन्स सिक्युरिटी कौंसिलचे २०१७-१८ साठी नॉन-परमेनेंट सदस्यत्व देण्यात आले आहे. करारानुसार इटली सिक्युरिटी कौंसिलमध्ये २०१७ पद भूषवेल तर २०१८ साठी नेदरलैंड पद भूषवेल. हे सदस्यत्व दोन वर्षांसाठी असून १ जानेवारी २०१७ पासून त्यांचा कार्यकाळ सुरु होणार असून ते अंगोला, मलेशिया, न्यूज़ीलैंड, स्पेन आणि वेनेज़ुएला यांना रेप्लस करतील. सिक्युरिटी कौंसिल मध्ये १५ देश असतात, त्यापैकी पाच कायमस्वरूपी सदस्य असून त्यांना वेटो पॉवर आहे अमेरिका, चीन, रशिया, फ़्रांस, यूनाइटेड किंगडम हे परमानेंट सदस्य आहेत. उरलेले १० सदस्य नॉन-परमानेंट स्वरुपाचे असतात.
२. कोणत्या भारतीय संघराज्याने वर्ल्डफिश ह्या अंतरराष्ट्रीय संस्थेसोबत मत्स्यउत्पादन वाढविण्यासाठी करार केला आहे?
उत्तर - ओडिशा, ओडिशा सरकारने वर्ल्डफिश या अंतरराष्ट्रीय रिसर्च संस्थेसोबत मस्त्यउत्पादन वाढविण्यासाठी करार केला आहे. वर्ल्डफिशचे मुख्यालय मलेशियातील पेनांग येथे असून ही संस्था संवर्धन पद्धती, क्वॉलिटी सीड टेक्नोलॉजी आणि फार्मिंग सिस्टम्सबद्दल मार्गदर्शन करते. सदर करार ५ वर्षांचा असून जुलै २०१६ पासून सुरु झाला आहे.
३. २०१६ ची ब्रिक्स यूथ समिट कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे?
उत्तर - भारत, २०१६ ची ब्रिक्स यूथ समिट १ ते ३ जुलै दरम्यान आसाममधील गुवाहाटी पार पडणार आहे. ह्या परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे - स्किल डेवलपमेंट, इंटरप्रेनरशिप, सामाजिक कार्यामध्ये त्याचप्रमाणे शासन प्रकियेमध्ये युवकांचा समावेश.
४. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गवर्नर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - एन एस विश्वनाथन, एन एस विश्वनाथन ह्यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गवर्नर पदी नेमणूक करण्यात आली आहे. सध्याचे डेप्युटी गवर्नर एच आर खान ३ जुलै २०१६ रोजी निवृत्त होणार आहेत. विश्वनाथन हे सध्या सेंट्रल बँकेचे कार्यकारी संचालक आहेत.
५. अवजड मलवाहु वाहनांसाठी जगातील पहिला इलेक्ट्रिक रोड कोणत्या देशाने सुरु केला आहे?
उत्तर - स्वीडन, स्वीडनने जगातील पहिला इलेक्ट्रिक रोडची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. ही चाचणी हाइब्रिड हेवी ट्रांसपोर्ट रोड आणि ट्रकवर सण्डविकमध्ये केली गेली. ही चाचणी स्वीडनच्या ई१६ रोडवर करण्यात आली असून ती २०१८ पर्यंत केली जाणार आहे.
६. भारतातील कोणत्या बेटाला देशातील पहिला नदीवरील बेट जिल्हा (रिवर आइलैंड डिस्ट्रिक्ट) म्हणून मान्यता देण्यात आली आहे?
उत्तर - माजुली, आसाम सरकारने ब्रम्हपुत्रा नदीवरील माजुली बेटाला जिल्ह्याचा दर्जा दिला आहे. त्याचप्रमाणे माजुली हा भारतातील पहिला नदीवरील बेट जिल्हा झाला आहे.

राज्यसभा

राज्यसभा हे भारतीय संसदेतील जेष्ठ सभागृह आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यापैकी १२ सभसदांची नेमणूक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील मान्यवरांमधुन करतात उदा. कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात. राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असून एक तिमाही सभासदांची निवड दर दोन वर्षांनी होते. राज्यसभेचे सत्र कायमस्वरूपी असून ते लोकसभेप्रमाणे विलीन होत नाही. राज्यसभा आणि लोकसभा यांना सम अधिकार आहेत शिवाय धन विधेयक लोकसभेस अध्यारोही अधिकार आहे. जर परस्पर विरोधी ठरल्यास एक संयुक्त बैठक घेतली जाते. परंतु लोकसभेची सभासद संख्या दुप्पट असल्यामुळे बहुतांश त्यांना बहुमत मिळते.
भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. राज्यसभेच्या उपध्यक्षांची नेमणूक निवड पद्धतीने होते, ह्या निवड प्रक्रियेमध्ये राजयसभा सदस्य मतदान करतात. अध्यक्षांच्या गैरहजेरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज करतात. राज्यसभेचे पहिले सत्र १३ मे १९५२ रोजी भरले होते.
अध्यक्ष: मोहम्मद हमीद अंसारी (११ ऑगस्ट २००७ पासून)
उपाध्यक्ष: पि. जे. कुरियन (२१ ऑगस्ट २०१२ पासून)
पक्षनेते: अरुण जेटली (जुलै २०१४ पासून)
विरोधी पक्षनेते: गुलाम नबी आझाद (जुलै २०१४ पासून)
* सदस्य पात्रता: राज्यसभेचा सभासद होण्यास ती/तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा. ही व्यक्ती मानसिक रित्या स्वस्थ असून कर्जबाजारी ही नसावी. ह्या व्यक्तीने शपथपत्रात द्यावे जात कोणत्याही अपराधी करवाई करण्यात आली नाही. आरक्षित जा=जागांसाठी ही व्यक्ती अनुसूचित जाती/जमातीतील असली पाहिजे.
* नियुक्ती: राज्यसभा सदस्यांची निवड प्रत्येक राज्यातील विधानसभेमार्फ़त होते. प्रत्येक राज्यासाठी जागा निर्धारित आहेत व समान नसून लोकसंख्येनुसार ठरविण्यात आल्या आहेत.

Saturday 2 July 2016

चालू घडामोडी : २८ जून

१. इराकमधील कोणते शहर औपचारिकरित्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अंड सीरिया ह्या दहशदवादी संघटनेच्या ताब्यातून पूर्णपणे मुक्त झाले आहे?
उत्तर - फल्लुजाह, इराकी सैन्याच्या करवाईनंतर इराकमधील फल्लुजाह शहर पूर्णपणे आईसीस ह्या दहशतवादी संघटनेच्या ताब्यातून पूर्णपणे मुक्त झाले आहे. फल्लुजाह हे शहर इराक़ची राजधानी असलेल्या बगदादपासून ४० मैल म्हणजेच ६४ किमी पश्चिमेला आहे. जानेवारी २००४ मध्ये आईसीसने काबीज केलेले पाहिले इराकी शहर म्हणजे बगदाद.
२. २०१६ ची महिला हॉकी चॅम्पियन ट्रॉफी कोणत्या देशाने जिंकली आहे?
उत्तर - अर्जेंटीना, अर्जेंटीनाच्या महिला संघाने २०१६ ची महिला हॉकी चॅम्पियन ट्रॉफी सतव्यांदा जिंकून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. १८ ते २६ जून दरम्यान ही स्पर्धा लंडनमध्ये पार पडली असून ली वैली हॉकी एंड टेनिस सेंटर येथे पार पडलेल्या अंतिम सामन्यामध्ये अर्जेंटीनाने नेदरलंडचा २-१ असा पराभव केला.
३. नॅशनल इन्वेस्टमेंट एंड इंफ्रास्ट्रक्चर फण्ड लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - सुजॉय बोस, सुजॉय बोस यांची नॅशनल इंवेस्टमेंट्स एंड इंफ्रास्ट्रक्चर फण्डच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंतरराष्ट्रीय त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरुन उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी एनआईआईएफ ची कम्पनीज ऍक्ट २०१३ अंतर्गत स्थापना करण्यात आली आहे.
४. २०१६ ची राष्ट्रीय अंतरराज्यीय एथलेटिक्स चैंपियनशिप कोणत्या भारतीय शहरामध्ये पार पडली?
उत्तर - हैद्राबाद, ५६ वी राष्ट्रीय राष्ट्रीय अंतरराज्यीय एथलेटिक्स चैंपियनशिप हैद्राबादमध्ये पार पडली. ही स्पर्धा रिओ ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी भरविण्यात आली आहे. पाच दिवसीय स्पर्धेमध्ये ७४४ खेळाडूंनी भाग घेतला होता, त्यापैकी २६ राज्यांतून २६४ महिला खेळाडू सहभागी झाल्या होत्या. कालपर्यंत २१ खेळाडू रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र झाले आहेत.
५. आइसलैंडच्या २०१६ राष्ट्रपती पदाची निवडणूक कोणी जिंकली आहे?
उत्तर - गुडंई जोहानसन, यूनिवर्सिटी ऑफ़ आइसलैंडचे प्राध्यापक आणि इतिहासकार गुडंई जोहानसन यांनी २०१६ राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली आहे. १ ऑगस्ट २०१६ पासून ते आपला कार्यभार स्वीकरतील, ओलफुर रगनर ग्रिमसन हे सध्याचे राष्ट्रपती असून ते तब्बल २० वर्षे आइसलैंडचे प्रमुख होते.
६. कोणत्या राज्य सरकारने राज्यवार येणार्या सर्व नैसर्गिक आपत्ती राज्य आपत्ती (स्टेट डिजास्टर) असतील असे घोषित केले आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश सरकारने सर्व नैसर्गिक आपत्ती उदा. जोरदार पाऊस, वादळ, लू, वीज पड़ने राज्य आपत्ती असतील असे घोषित केले आहे. अश्या आपत्तीग्रस्थांना केंद्र सरकारने राज्य सरकरांना स्टेट डिजास्टर रिलीफ फंड अंतर्गत दिलेल्या निधीतून मदत केली जाईल.

Friday 1 July 2016

एचएएल तेजस


तब्बल तीन दशकांच्या प्रतिक्षेनंतर अखेर भारतीय बनवटीचं पहिल लढाऊ विमान 'तेजस' काल वायुदलात दाखल झाले. बंगळुरुमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात काल हे विमान दाखल झाले. तेजसला भारतीय वायुदलात दाखल करुन घेण्यात अनेक अडचणी आल्यात मात्र सरकारी हिंदुस्तान एयरोनॉटिकल लिमिटेडने तेजस तयार केले. तजसने सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्या असून आत्तापर्यत ३ हजारपेक्षा जास्त वेळ तजसने उड्डाण केले आहे. सुरुवातीला या ताफ्यात २ विमाने असतील नंतर ही संख्या वाढवली जाणार अाहे. जगातल्या अत्यंत आधुनिक लढाऊ विमानांमध्ये तेजसचा समावेश होत आहे.
तेजसची वैशिष्ठ्ये:
* १९८३ साली निवृत्तीकडे झकलेल्या मिग-२१ एस विमनांच्या जागी 'तेजस' या देशी बनावटीच्या विमनांचा प्रस्ताव.
* १९८६ साली या प्रकल्पासाठी ५७५ कोटींची तरतूद.
* जानेवारी २००१ मध्ये तेजसची पहिल्यांदा हवेत झेप
* तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यंनि 'तेजस' नाव ठेवले
* हवेतून हवेत मारा करणारे मिसाईल
* अँटी शिप मिसाईल, बॉम्ब आणि रॉकेट्स वाहून नेण्याची क्षमता
* ४२ टक्के कार्बन फायबर, ४३ टक्के एल्युमीनियम धातू मिश्रण आणि उर्वरित टाइटेनियम धातूंच्या मिश्रणातून वीमानाची बांधणी करण्यात आली आहे
* याआधी तेजस हे विमान बेहरीन येथील अंतरराष्ट्रीय हवाई कार्यक्रमात (२०१६) मध्ये प्रात्यक्षिक करण्यासाठी दाखल होते
* या कार्यक्रमात तेजसची तुलना पाकिस्तानच्या जेएफ़-१७ थंडर या लढाऊ विमानाशी केली गेली
* तेजस लढाऊ विमनांच्या दोन प्रकारात उपलब्ध
* पहिल्या प्रकारात केवळ वैमानिकासाठी जागा तर दुसर्या प्रकारातील विमान हे वैमानिक आणि सहकारी अशा २ सीट्स मध्ये उपलब्ध
* भारतीय हवाई दलातील सर्वात हलके विमान म्हणून तेजसची ओळख
* तेजसच्या एफ़ओसी प्रकारातील कमाल वेग २२०५ किमी प्रती तास आहे
* आयओसी प्रकारातील विमानाचा कमाल वेग २००० किमी प्रती तास आहे

चालू घडामोडी : २५ जून

१. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - अनिल कुंबले, माजी भारतीय कर्णधार आणि फिरकी गोलंदाज अनिल कुंबले याची एक वर्षासाठी भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तो येणार्या वेस्ट इंडीज मालिकेपासून म्हणजेच ९ जुलै २०१६ पासून प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळेल. ह्यासोबतच १९९९-२००० पासून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी स्वार होणारा तो पहिला भारतीय बनला आहे. ह्याआधी १९९९-२००० साली कपिल देव हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.
२. अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कोणत्या दिवशी पाळला जातो?
उत्तर - २३ जून, अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन दरवर्षी २३ जूनला पाळला जातो, ह्याचे मुख्य कारण म्हणजेच ऑलिम्पिक सामान्यामध्ये खेळाडुंचा सहभाग वाढविणे हे हयमागचे मुख्य उदिष्ठ आहे.
३. एस के रॉय ह्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला, ते कोणत्या सरकारी संघटनेचे (महामंडळ) अध्यक्ष होते?
उत्तर - लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एलआईसी छे अध्यक्ष एस के रॉय यांनी आपला कार्यकाळ सम्पण्याच्या दोन वर्ष आधीच राजीनामा दिला आहे. त्यांची नेमणुक २९ जून २०१५ रोजी युपीए सरकारने नियुक्ती केली होती. सरकारअंतर्गत असणार्या ह्या इन्शुरन्स कंपनीचे भारतीय स्टॉक्स मार्केटमध्ये सर्वात मोठा गुंतवणूकदार असून १८ ट्रिलियन मालमत्ता आहे.
४. वैज्ञानिक संशोधनासाठी दिला जाणारा जी डी बिर्ला पुरस्कार २०१६ कोणाला बहाल करण्यात आला आहे?
उत्तर - संजय मित्तल, वैज्ञानिक संशोधनासाठी दिला जाणारा २५ वा जी डी बिर्ला पुरस्कार प्रा. संजय मित्तल यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांनी यांत्रिकी क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानासाठी देण्यात आला आहे. संजय मित्तल हे आईआईटी कानपूरच्या एयरोस्पेस इंजीनियरिंग विभागाचे प्राध्यापक आहेत.
५. कोणत्या भारतीयाला चीनच्या नानजिंग ऑडिट यूनिवर्सिटीने आपली प्रोफेसरशिप देऊन सन्मानित केले आहे?
उत्तर - शशी कांत शर्मा, भारतीय कॅग (कम्पट्रोलर एंड ऑडिटर ऑफ इंडिया) शशी कांत शर्मा ह्यांची चीनच्या नानजिंग यूनिवर्सिटीने आपली प्रोफेसरशिप देऊन सन्मानित केले आहे. इंस्टीटूट ऑफ़ इंटर्नल ऑडिटर्सने मान्यता दिलेले जगातील हे एकमेव विद्यापीठ आहे.
६. कोणता देश क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्था (मिसाइल टेक्नोलॉजी कंट्रोल रिजीम) चा नवीन सदस्य बनला?
उत्तर - भारत, जून २०१६ मध्ये भारत मिसाइल टेक्नोलॉजी कंट्रोल रिजीमचा ३५ वा सदस्य देश बनला आहे. ह्यासोबतच भारत आता उच्च स्तरावरील क्षेपणास्त्र बनविण्यासाठी लागणारी टेक्नोलॉजी, माहिती विकत घेऊ शकतो त्याचप्रमाणे क्षेपणास्त्र विकासासाठी रशियासोबत हातमिळवणी करू शकतो.