Thursday 28 July 2016

चर्चेतील व्यक्ती

* नीलमराजू गंगा प्रसाद राव संकरित ज्वारीचे जनक यांचे निधन झाले.
प्रतिष्ठित कृषी शास्त्रज्ञ डॉ.नीलमराजू गंगा प्रसाद राव यांचे तेलंगणाची राजधानी हैद्राबाद  येथे दीर्घ आजारामुळे निधन झाले ते ८९ वर्षाचे होते. संकरित ज्वारीचे जनक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे कोरडवाहू पिकांवरील क्रॉस ब्रीडिंग, पिकांवरील मुलभुत आणि उपयोजित संशोधन यासाठी प्रसिध्द आहेत.
त्यांच्याविषयी थोडी अधिक माहिती: राव यांचा जन्म कोरिसापडू, आंध्र प्रदेशमध्ये झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण बापतला कृषी विद्यालयातून पूर्ण केले. भारतातील संकरित ज्वारीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्याचप्रमाणे देशी कापुस, एरंडेल, तुर ह्या कोरडवाहू पिकांवरील संशोधनासाठी ही त्यांना ओळखले जाते. ते भारतीय जेनेटिक्स एंड प्लांट ब्रीडिंग सोसायटीचे उपाध्यक्ष तर बाजारी सुधारणा सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांना एसएस भटनागर पुरस्कार, आत्मा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

* २०१६ चे रमोन मैग्सेसे पुरस्कार जाहीर. 
यंदाच्या रामोन मैग्सेसे पुरस्कार दोन भारतीयांसह सहा जणांना जाहीर झाला आहे. रामोन मैग्सेसे पुरस्कार हा आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. सहा विजेते खालीलप्रमाणे:
थोडुर मडब्यूसी कृष्णा (भारत) कर्नाटकी संगीतकार असून समाजामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी ते ओळखले जातात. बेजवाड़ा विल्सन (भारत) हे सफाई कर्मचारी आंदोलनचे राष्ट्रीय निमंत्रक आहेत. हाताने मल साफ करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी केलेले काम हे उल्लेखनीय आहे. कुंचित कैरपिओ मोरालेस (फिलीपींस), डोमपेट धुंएफ (इंडोनेशिया), जापान ओवरसीज कॉर्पोरेशन वालंटियर्स (जापान), वीएनटीने रेस्क्यू (लाओस) यांना ३१ ऑगस्ट रोजी फिलीपींसच्या पसाय सिटी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. ३१ ऑगस्ट १९०७ रोजी रामोन मैग्सेसे यांचा जन्म झाला होता.
रामोन मैग्सेसे पुरस्काराविषयी अधिक माहिती: रामोन मैग्सेसे पुरस्कार हा आशिया खंडातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो त्याचप्रमाणे आशियातील नोबेल म्हणून ही ओळखला जातो. फिलीपींसचे तीसरे राष्ट्रप्रमुख रामोन मैग्सेसे यांच्या स्मरणार्थ दिला जातो.  हे पुरस्कार १९५७ पासून अस्तित्वात आले, १७ मार्च १९५७ ला मैग्सेसे यांचे हवाई अपघातामध्ये निधन झाले. हा पुरस्कार न्यू यॉर्क मधील रॉकफेलर ब्रॉदर्स आणि फिलीपीन सरकारकडून दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी आशिया खंडातील लोक किंवा संस्थाना दिला जातो.

* व्हायोलीवादक ए कन्याकुमारी यांना संगीत कलानिधी जाहीर झाला. 
दक्षिण भारतातील ज्येष्ठ व्हायोलिनवादक अवसरला कन्याकुमारी यांची २०१६ च्या संगीत कलानिधी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यासोबतच संगीत कलानिधी पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला व्हायोलिनवादक आहेत. त्यांना हा पुरस्कार १ जानेवारी २०१७ रोजी प्रदान करण्यात येईल. याआधी ८ व्हायोलिनवादकांना (पुरुष) हा पुरस्कार मिळाला आहे.
अवसरला कन्याकुमारी दक्षिण भारतातील व्हायोलिनवादक असून कर्नाटकी संगीताच्या त्या विशेषज्ञ आहेत. त्या मुळच्या आंध्र प्रदेशातील असून शिक्षक, संगीतकार असा ५० वर्षांचा अनुभव आहे. याआधी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२००३), पद्मश्री पुरस्कार (२०१५) मिळाले आहेत.
संगीत कलानिधी पुरस्कारविषयी अधिक माहिती: संगीत कलानिधी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार असून मद्रास संगीत अकादमीतर्फे दिला जातो. 

No comments:

Post a Comment