Saturday 23 July 2016

चालू घडामोडी : १६ जुलै

१. ट्रांसफॉर्मिंग इंडिया हे वेब पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरु केले आहे?
उत्तर - कायदा अणि न्याय मंत्रालय, केंद्रीय कायदा आणि न्याय अणि संवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमामध्ये विविध सरकारी योजनांचा सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया अभ्यासण्यसाठी ट्रांसफॉर्मिंग इंडिया हे वेब पोर्टल सुरु केले आहे. ही वेबसाइट वापरण्यामध्ये पूर्णपणे सोपी असून जनता एखाद्या सरकारी योजनेबद्दल असणारे आपले मत फोटो, व्हिडीओ, अभिप्राय स्वरूपामध्ये मांडू शकते. ही वेबसाइट जनता आणि सरकारमधील दुवा म्हणून काम करेल आणि दोन्ही दिशांनी माहितीची देवाणघेवाण करेल.
२. यूनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट (जागतिक वारसा) म्हणून भारतातील कोणत्या प्राचीन ठिकाणाची निवड केली आहे?
उत्तर - नालंदा महाविहारा (विश्वविद्यालय), तुर्कीच्या इस्तांबुल येथे पार पडलेल्या ४० व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीमध्ये बिहारमधील नालंदा महाविहारा अर्थातच नालंदा विश्वविद्यालय ह्या प्राचीन वास्तूला यूनेस्कोने वर्ल्ड कल्चरल हेरिटेजचा दर्जा दिला आहे. नालंदा विद्यापीठाप्रमाणे जगातील ज़ुओजिण हॉशन रॉक आर्ट (चीन), पर्शियन कनाट (इराण), फिलिपी पुरातत्व साईट (ग्रीस), अँटकेर डोलमेन्स साईट (स्पेन) या ठिकांणाना ही वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला आहे.
३. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिटी कंपोस्ट मोहीमेसाठी सर्व सामान्य जनतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या भारतीय व्यक्तीला नेमण्यात आले आहे?
उत्तर - अमिताभ बच्चन, बॉलीवुडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिटी कंपोस्ट मोहीमेसाठी नेमणूक करण्यात आली असून जनतेला प्रोस्ताहन देण्याचे काम करणार आहेत. ह्या मोहीम अंतर्गत बच्चन सर्वसामान्य जनतेला, नर्सरी मालक त्याचप्रमाणे फलोत्पादन करणार्या संस्थांना आपल्या गार्डन, फार्म हाउस, आणि सार्वजानिक बगीच्यांमध्ये फक्त सिटी कंपोस्ट वापरण्याचे आवाहन करणार आहेत. जनता, हॉटेल्स आणि शैक्षणिक संस्थांना ह्यांनी आपला जैवीक कचरा वेगळा करुन त्याचे कंपोस्ट करावे ह्याचे आवाहन देखील बच्चन करणार आहेत.
४. सुरेश केतकर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - राजकरण, राष्ट्रीय समाजसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचे लातूर येथे नुकतेच निधन झाले ते ८४ वर्षाचे होते.
५. जगातील पहिले ट्रेनवरील धावते हॉस्पिटल कोणते आहे?
उत्तर - लाइफलाइन एक्सप्रेस, १६ जुलै २०१६ ला मुंबईमध्ये जगातील पहिल्या ट्रेनवरील धावत्या हॉस्पिटलने 'लाइफलाइन एक्सप्रेस' (जीवन रेखा एक्सप्रेस) ने भारतातील गरीब आणि वंचित जनतेला सेवा पुरविण्याची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. भारताची जादूई ट्रेन म्हणूनही तिची ओळख आहे. आजपर्यंत ह्या ट्रैनने १० लाख गरीब आणि वैद्यकीय सेवेपासून वंचित लोकांची मुक्त मदत केली आहे. ह्या ट्रेनने आजपर्यंत १८ राज्यांमध्ये १७८ प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले असून तब्बल २ लाख किमीचा प्रवास केला आहे.
६. "करेज एंड कमिटमेंट : एन ऑटोबायोग्राफी" हे पुस्तक कोणी लिहले आहे?
उत्तर - मार्गरेट अल्वा, राजस्थानच्या माजी राज्यपाल आणि कांग्रेसच्या नेत्या मार्गरेट अल्वा यांनी "करेज एंड कमिटमेंट : एन ऑटोबायोग्राफी" पुस्तकाचे लेखन केले आहे. लेखिकेने ह्या पुस्तकामध्ये लहान मुलगी ते एक राजकारणातली प्रसिध्द महिला असा आपल्या आयुष्याचा प्रवास मांडला आहे. लेखिकीने आपल्या ४४ वर्षाच्या राजकीय करकिर्दीमध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी वी नरसिम्हा राव, मनमोहन सिंग ह्या चार पंतप्रधानांसोबत काम केले  असून त्यांचसोबतचा प्रवास ही नमूद केला आहे.

No comments:

Post a Comment