Thursday 14 July 2016

चालू घडामोडी : ८ जुलै

१. नवीन आर्थिक वर्षाची व्यवहार्यता तपासण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली आहे?
उत्तर - शंकर आचार्य समिती, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नवीन आर्थिक वर्षाची व्यवहार्यता आणि इष्ठता तपासण्यासाठी डॉ. शंकर आचार्य समितीची स्थापना केली आहे. ह्याअंतर्गत भारताचे आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च ऐवजी जानेवारी ते डिसेंबर किंवा १२ महिन्यांचा इतर कालावधी नवीन आर्थिक वर्ष म्हणून बदलला जाऊ शकतो. ह्या प्रस्तावाअंतर्गत ४ सदस्यीय समिती प्रत्येक १२ महिन्यांच्या कालखंड अभ्यासून त्याचे फायदे आणि तोटे शोधून काढेल. ही समिती आपला अहवाल ३१ डिसेंबर २०१६ पूर्वी सादर करणार आहे.
२. २०१६ च्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे?
उत्तर - ९१ व्या, २०१६ च्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स मध्ये १३९ देशांपैकी भारत ९१ व्या स्थानी आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स ही वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या ग्लोबल इनफार्मेशन टेक्नोलॉजी रिपोर्ट २०१६ चा महत्त्वाचा कणा आहे. ह्या अहवालामध्ये सिंगापूर प्रथमस्थानी असून त्याखालोखाल फ़िनलैंड, स्वीडन, नॉर्वे आणि अमेरिका आहेत. ह्या अहवालानुसार कोणता देश आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचप्रमाणे समाजकारणामध्ये किती तंत्रज्ञानाचा वापर करतो हे दर्शवतो.
३. नमामी गंगे कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या भारतीय शहरापासून सुरु करण्यात आली आहे?
उत्तर - हरीद्वार, केंद्रीय जलसंपदा , नदी विकास आणि गंगा पुनर्जीवन मंत्री उमा भारती यांनी गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी नमामी गंगे कार्यक्रमाची सुरुवात उत्तराखंडमधील हरिद्वार येथून केली. ह्याच कार्यक्रमाला समांतर म्हणजेच गंगेच्या उपनद्या आणि गंगा साफ करण्याचा कार्यक्रम गंगोत्री ते हावडा दरम्यान राबविला जाणार आहे. हा कार्यक्रम उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांमधील २३१ ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
४. जागतिक जूनोसेस (पशूजन्य रोग) दिन कोणत्या दिवशी पाळला जातो?
उत्तर - ६ जुलै, जागतिक जूनोसेस दिन  हा दरवर्षी ६ जुलैला सर्वसामान्य जनतेमध्ये पशूजन्य रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो. पशूवैद्यच्या अनूसार १५० पशूजन्य रोग आहेत त्यापैकी ट्यूबरक्लोसिस (क्षयरोग), हुकवर्म्स, राउंडवर्म्स, स्केबीज आणि रेबीज हे काही महत्त्वाचे रोग आहेत.
५. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - वेंकैय्या नायडू, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलामध्ये वैंकेया नायडू यांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
६. कोणत्या भारतीय जिम्नास्टला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जिमनास्टिक्सने वर्ल्ड क्लास जिम्नास्ट म्हणून गौरविले आहे?
उत्तर - दीपा करमकर, त्रिपुराच्या दीपा करमकरला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ़ जिमनास्टिक्सने वर्ल्ड क्लास जिम्नास्ट म्हणून गौरविले आहे. हा बहुमान मिळविणारी ती पहिली भारतीय जिम्नास्ट आहे.

No comments:

Post a Comment