Sunday 31 January 2016

इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू

पाच वर्षांतून एकदा देशाचे सर्वोच्च सेनाधिपती म्हणून राष्ट्रपतींकडून भारताच्या नौदल ताफ्याच्या संचालनाचे अवलोकन केले जाते. त्यास प्रेसिडेंशियल फ्लीट रिव्ह्यू म्हणतात. आपले नौदल सामर्थ्य जगाला दाखवून देण्यासाठी भारताने २००१ मध्ये त्यास अंतरराष्ट्रीय रूप दिले, जानेवारी २००१ मध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये २९ देशांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर आता ०४ - ०८ फेब्रुवारी  दरम्यान विशापट्टनम येथे भारताचा दूसरा इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू होत आहे. ह्या आधीचा फ्लीट रिव्ह्यू हा  जानेवारी २०११ मध्ये मुंबई येथे पार पडला होता.
जगभरातील ५२ देशांच्या नौदलांच्या वरिष्ठ दर्यावर्दिंनी भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे कूच केली आहे. यामध्ये भारताच्या युद्धनौकांसह अमेरिका, चीन, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया आदी बलाढ्य नौदलांच्या एकूण ९० युद्धनौका आणि २० हजार नौसैनिक बंगालच्या उपसागरातील आरमार नियोजनाच्या कसोटीत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

डिजीटल स्वरुप: यंदा इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूसाठी जगभरातील सर्व नोंदणी वेबसाइटच्या माध्यमातून करण्यात आल्या असून, या वेबसाइटवर व्हिडिओ, फोटो देण्यात येणार आहेत.

Saturday 30 January 2016

चालू घडामोडी - २६ जानेवारी

१. पोर्तुगालचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - मार्सेलो रेबेलो डिसूज़ा, पोर्तुगालच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक, पत्रकार, राजकारणतज्ञ, पंडित असलेले मार्सेलो रेबेलो डिसूज़ा यांनी बाजी मारली आहे. याआधी ते खासदार त्याचप्रमाणे मंत्री होते.

२. यंदाचा राष्ट्रिय यश चोप्रा पुरस्कार कोणाला जाहिर झाला आहे?
उत्तर - रेखा, ज्येष्ठ बॉलीवुड अभिनेत्री रेखा यांना तिसऱ्या राष्ट्रिय यश चोप्रा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना फ़िल्मी क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल देण्यात आला आहे. हा पुरस्कार टी इस आर फाउंडेशन तर्फे यश चोप्रा यांच्या स्मरणार्थ २०१२ पासून दिला जातो. सुवर्ण पदक आणि रोख १० लाख रुपये असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे.

३. शंकर घोष यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर - तबलावादक, प्रसिद्द तबला उस्ताद पंडित शंकर घोष यांचे कोलकाता येथे निधन झाले ते ८० वर्षाचे होते. ते फरुखाबाद घराण्याचे होते आणि देशातील नामांकित तबलावादकांपैकी एक होते.

४. राष्ट्रिय मतदार दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
उत्तर - २५ जानेवारी, सहावा राष्ट्रिय मतदार दिन संपूर्ण भारतामध्ये भारतीय निवडणूक आयोगातर्फे २५ जानेवारीला साजरा करण्यात आला. २५ जानेवारी १८५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

५. जिका विषाणूंच्या प्रसारासाठी कोण कारणीभूत आहेत?
उत्तर - मच्छर, नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने जिका विषाणुबद्दल सर्व सदस्य राष्ट्रांना धोक्याचा इशारा दिला आहे. मच्छर हे जिका विषाणूचे प्रसारक असून ह्याचा परिणाम म्हणजे मानवी जन्मदोष. हा विषाणू कॅनडा व चिली वगळता संपूर्ण अमेरिकेमध्ये पसरला असल्याची शक्यता आहे. हा विषाणू १९४७ मध्ये प्रथम सापडला होता.

६. कोणत्या देशाच्या सैनिकांनी भारतीय प्रजासत्ताकदिनी परेडमध्ये सहभागी झाले होते?
उत्तर - फ़्रांस, भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या इतिहासामध्ये प्रथमच फ्रान्सच्या ७६ सैनिकांनी सहभाग घेतला होता. 

चालू घडामोडी - २४ जानेवारी

१. सर्वात जास्त एकेरी ग्रैंड स्लैम सामने जिंकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
उत्तर - मार्टिना नवरातिलोवा, नुकतेच रॉजर फेडररने ३०० एकेरी ग्रैंड स्लैम सामने जिंकत सर्वात जास्त एकेरी ग्रैंड स्लैम जिंकण्याचा विक्रम केला आहे, असे करणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे . त्याचप्रमाणे सर्वात जास्त एकेरी ग्रैंड स्लैम सामने जिंकण्याचा विक्रम मार्टिना नवरतिलोवाच्या नावावर आहे (पुरुष आणि महिला).

२. जागतिक आर्थिक स्थिती आणि संभावना (२०१६) हा अहवाल कोणत्या अंतरराष्ट्रिय संस्थेने प्रकाशित केला आहे?
उत्तर - संयुक्त राष्ट्रे, संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आर्थिक स्थिती आणि संभावना २०१६ अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात जलद वाढणारी अर्थव्यवस्था आहे. अहवालानुसार भारताचा २०१५ चा विकासदर 7.२% होता तर २०१६ चा संभावित विकासदर ७.३% असेल तर २०१७ मधील विकासदर जवळपास ७.५% असेल.

३. पहिला अंध आशियाई टी२० चषक कोणत्या देशाने जिंकले आहे?
उत्तर - भारत, जवाहरलाल अंतरराष्ट्रिय स्टेडियम, कोच्ची येथे भारताने पहिल्या अंध आशियाई टी२० चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे.

४. २०१६ ची मलेशियन ग्रैंड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकली?
उत्तर - पी वी सिंधु, भारतीय बॅडमिंटनपटू पी वी सिंधु हीने २०१६ ची मलेशियन ग्रैंड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. पेनांग येथे झालेल्या अंतिम समन्यामध्ये तिने स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरचा पराभव केला. ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली असून २०१३ मध्ये मलेशियन ग्रैंड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन जिंकली होती. तिचे हे पाचवे ग्रैंड प्रिक्स जेतेपद असून २०१६ चे पाहिले जेतेपद आहे.

५. फ्री हाय स्पीड वाय-फाय इंटरनेट सुविधा देणारे कोणते रेल्वे स्टेशन पाहिले भारतीय रेल्वे स्टेशन आहे?
उत्तर - मुंबई सेंट्रल स्टेशन, गूगल भारत (गूगल इंडिया) आणि भारतीय रेल्वेच्या रैलटेलने रेल्वे प्रवाशांसाठी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर फ्री रेल वायर पब्लिक वाय-फाय सुविधा सुरु केली आहे.

६. फेनी हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध पेय आहे?
उत्त्तर - गोवा, २०१० मध्ये फेनी ह्या पेयाला भौगोलिक मान्यता मिळाली. त्याचप्रमाणे हे राज्याबाहेर विकण्याची तयारी गोवा सरकारने दर्शविली आहे.

Sunday 24 January 2016

१८५७ च्या उठावाची कारणे

* सामाजिक कारणे: केवळ स्वत:ची संस्कृती श्रेष्ठ मानताना इंग्रजांनी संस्कृतीला रानटी संस्कृती व भारतीय लोकांना रानटी असे संबोधले त्याचप्रमाणे सतिबंदी कायदा, बालविवाहप्रतिबंधक कायदा, विधवा-पुनर्विवाह कायदा यासारखे काही अन्यायकारक कायदे ब्रिटिशांनी भारतात राबविले. परंपरागत भारतीय समाजाला हे आपल्या संस्कृतीवर संकट वाटले.

* धार्मिक कारणे: १८१३ च्या कायद्याने इंगलंडमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसारासाठी भारतात जाण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. पर्यायाने इंग्रजी आक्रमणाने प्रथम सत्ता गेली, नंतर व्यापार-उदीम बुडाला आणि आता  धर्मावर संकट आल्याची भावना वाढीस आली. १८०६ मध्ये लष्कराच्या मद्रास छावनीतील शिपयांना गंध लावण्यास व दाढ़ी वाढवण्यास बंदी घालण्यात आली. १८४२ साली ब्रम्हदेशच्या युद्धात हिंदू शिपयांना सक्तीने पाठविण्यास आले. परदेशगमन, समुद्र पर्यटन या गोष्टी त्याज्य मानणाऱ्या हिंदी शिपयांत यामुळे असंतोष वाढू लागला.

* आर्थिक कारणे:
१. हस्तव्यवसायाची अधोगती: भारतातील कच्चा मालावार अधोरित इंग्लंडमधील यंत्रावरील तयार माल भारतात उपलब्ध झाल्याने येथील पारंपारिक हस्तव्यवसायचा क्षय होत गेला आणि करागीर पुरते बुडाले.
२. शेतकरी-जमीनदार या वर्गात रयतवारी, महालवारी, कायमधारा आदि सदोष महसुलपद्धतीमुळे असंतोष पसरला.

* लष्करी कारणे: हिंदी शिपयांना ब्रिटिश सैन्याच्या तुलनेत मिळणारी अन्यायी वागणूक, हिंदी शिपयांवरील लष्करातील शिस्तीसंबंधीचे जाचक नियम इत्यादी कारणांमुळे सैनिकांत असंतोष होता.

* राजकीय कारणे:
१. वेलेस्लीच्या तैनाती फ़ौजेचे दुष्परिणाम: तैनाती फ़ौजेच्या पद्धतीमुळे इंग्रज फ़ौजेचा सर्व ख़र्च ती ज्याच्या पदरी असेल त्या राजाने करायचा व त्या फ़ौजेवर हुकूमत गाजवायची ती मात्र इंग्रजांनी या वेलेस्लीच्या मुत्सद्दी डावपेचामुळे तैनाती फ़ौजेच्या प्रभावाखालील राज्ये दुबळी बनली व त्यांच्यात असंतोष निर्माण झाला.
२. डलहौसीचे आक्रामक विस्तारवादी धोरण: प्रशासकीय सोयीसाठी भारतातील सर्व भूप्रदेश एकछत्री अमंलाखाली आणण्याच्या हेतूने लॉर्ड डलहौसीच्या १८४८ ते १८५६ या काळात भारतातील अनेक संस्थाने 'दत्तक वारसा नामंजूर' तत्त्वानुसार तसेच प्रशासनात गौरकारभार कारणावरून खालसा केली. याशिवाय राजेराजवाड्यांच्या पदव्या आणि तनखे बंद करून टाकले.

* तात्कालीन कारण: सौनिकांनी बंदुकीची काडतूसे वापरताना त्यांची आवरणे दातांनी तोडावी लागत, या काडतुसांना गाईची व डुकरांची चरबी लावलेली असते अशी बातमी लष्करात पसरताच हिंदू-मुस्लिम सैनिकांच्या धर्मभावना दुखावल्या आणि ते बंड करून उठले. अशाप्रकारे वर्षानुवर्षे दाटलेल्या असंतोषाच्या उद्रेक १८५७ च्या उठावाने झाला.

Saturday 23 January 2016

१८५७ चा उठाव - ब्रिटिश सत्तेचा इतिहास आणि पार्श्वभूमी

१८५७ चा उठाव हा १० मे १८५७ रोजी मेरठ मधील लष्करी छावनीतील बंडापासून सुरु झाला आणि लवकरच तो उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरला. हा लढा १८५७ चे स्वतंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वतंत्र्यलढा, शिपयांचे बंड अशा इतर नावांनीही ओळखला जातो. जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व तो तब्बल ९० वर्ष चालला आणि १९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला.

भारतामधील ब्रिटिश सत्तेचे विस्ताराचा संक्षिप्त इतिहास: ईस्ट इंडिया कंपनीने १७५७ मध्ये रॉबर्ट क्लाइवच्या नेतृत्त्वाखाली प्लासीची लढाई जिंकली. लढाईनंतर झालेल्या करारामध्ये ब्रिटिशांना बंगालमध्ये कर मुक्त व्यापर करण्याचा अधिकार मिळाला. १७६४ मध्ये बक्सरच्या लढाईमध्ये इंग्रजी फ़ौजेने नवाब, बादशहा आणि मीर कासिमाच्या संयुक्त फौंजाचा फज्जा उडविला. अशाप्रकारे प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला तर बक्सारच्या लढाईतील विजयाने हा पाया मजबूत केला गेला. ह्याचा प्रभाव असा झाला की कंपनीने संपूर्ण भारतामध्ये आपला प्रभाव निर्माण करण्यात सुरुवात केली.
१८३९ मध्ये महाराजा रणजीत सिंह यांच्या मृत्यु नंतर पंजाब कमजोर झाले आणि यातूनच १८४८ मध्ये दूसरे ब्रिटिश विरुद्ध शीख युद्ध झाले. १८४९ मध्ये कंपनीने पंजाब प्रांत ही आपल्या अधिपत्याखाली आणले. १८५३ मध्ये शेवटचे मराठा पेशवा बाजीराव यांचे दत्तक पुत्र नानासाहेब यांचा वार्षिक खर्च ही कंपनीने बंद केला. १८५४ मध्ये बरार तर १८५६ मध्ये अवध प्रांतही कंपनीने आपल्या ताब्यात घेतले.

उठावाची पार्श्वभूमी: यामध्ये १८५७ पूर्वी भारतात ब्रिटाशांविरुध्ध झालेल्या उठावांचा समावेश आहे,
* १७६३ ते १७८० या काळातील संन्याशांचे बंड
* १७६५ ते १७८६ या काळात चुआर येथे झालेले दोन उठाव (मिदनापुर, बांकुरा जिल्हा, पश्चिम बंगाल)
* महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी रामोश्यांना एकत्रित करून इंग्रजांविरुध्ध केलेला उठाव (यासाठी त्यांना १८३२ साली फाशी देण्यात आली)
* आंध्र प्रदेशातील पाळेगारांचा उठाव
* १८४४ मधील कोल्हापुर येथील उठाव
* उत्तर भारतातील जाटांचे त्याचप्रमाणे राजपूतांचे आणि बुंदेल्याचे उठाव
* विदर्भ आणि खानदेशातील आदिवासींचे उठाव
* छोटा नागपूर भागातील कोलामांचा उठाव
* बिहारमधील संथालांचा उठाव

Friday 22 January 2016

चालू घडामोडी - १४ जानेवारी

१. कोणते भारतीय संघराज्य १००% सेंद्रिय शेती करणारे पाहिले राज्य बनले आहे?
उत्तर - सिक्किम, ७५००० हेक्टर शेतजमिनीवर सेंद्रिय शेती करुण सिक्किम हे भारतातील १००% सेंद्रिय शेती करणारे पाहिले राज्य ठरले आहे.

२. ऐलान रिकमण यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - हॉलीवुड अभिनेता, ऐलान रिकमण यांचे नुकतेच लंडनमध्ये निधन झाले ते ६९ वर्षांचे होते ते आपल्या खलनायकाच्या भूमिकेसाठी पसिद्ध आहेत. हैरी पॉटर, डाय हार्ड, रॉबिन हुड: प्रिंस ऑफ़ थीव्स, गॅलक्सी कुस्ट इ. या चित्रपटांमध्ये केलेल्या अभिनयासाठी खूप प्रसिद्ध आहेत.

३. २०१४-१५ चा  कृषी कर्मन पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - मध्य प्रदेश, दरवर्षी कृषी क्षेत्रामध्ये दिला जाणारा प्रतिशिष्ठ कृषी कर्मन पुरस्कार यंदाही मध्य प्रदेश राज्याने पटकाविला आहे (धान्याचे जास्तीत जस्ट उत्पादन घेतले म्हणून). हा पुरस्कार मध्य प्रदेश राज्याने सलग ४ थ्यांदा पटकाविला आहे. याआधी २०११, २०१२, २०१३, २०१४ या वर्षी हा पुरस्कार मध्य प्रदेश राज्यलाच मिळाला आहे.

४. भारतीय प्रजासत्ताक दिनी कोणत्या राज्य जगातील सर्वात मोठा तिरंगा फडकविण्यासाठी सज्ज झाले आहे?
उत्तर - झारखंड, २६ जानेवारी रोजी झारखंड जगातील सर्वात मोठा तिरंगा फडकविण्यासाठी  आहे. हा तिरंगा रांचीच्या पहाड़ी मंदिरावर फडकविण्यात येईल. हा तिरंगा तब्बल २९३ फूट उंच असेल म्हणजेच क़ुतुब मीनारहून ५३ फूट उंच.

५. क्रिएटिंग लीडरशिप या पुस्तकाचे लेखक/लेखिका कोण आहेत?
उत्त्तर - किरण बेदी, किरण बेदी यांनी क्रिएटिंग लीडरशिप हे पुस्तक लिहिले असून त्यात त्यांनी पोलिस सेवाकाळातील उदाहरणे दिली आहेत.

६. २०१६ चा जागतिक विकास अहवाल कोणी प्रकाशित केला आहे?
उत्तर - जागतिक बँक, जागतिक बँकेने २०१६ च जागतिक विकास अहवाल प्रकाशित केला असून त्यात सर्वांगीण विकासासाठी आपण इंफोर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलजीचा कसा वापर करू शकतो यावर चर्चा केली आहे.

Sunday 17 January 2016

पंचायत राज

पंचायत राजमध्ये गाव, तालुका आणि जिल्हा येतात. भारतामध्ये प्राचीन काळापासून पचायत राज व्यवस्था अस्तित्वात आहे. आधुनिक भारतामध्ये मेहता समितीच्या शिफारशीनुसार भारत सरकारने १९५८ मध्ये तर राष्ट्रिय विकास परिषदेने जुलै १९५८ मध्ये स्वीकारल्या त्यानुसार २ ऑक्टोबर १९५९ या दिवशी पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे देशातील पाहिले राज्य बनले. राजस्थानातील 'नागौर' जिल्ह्यात पंचायत राजची सर्वप्रथम सुरुवात करण्यात आली.

घटनात्मक तरतुदी: भारतीय संविधानाच्या कलम ४० नुसार ग्रामपंचयतीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे. १९९२ च्या ७३ व्या घटना दुरुस्तीमध्ये पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आला. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने पंचायत राजवर स्थापन केलेल्या काही समित्या:
  • बलवंतराय मेहता समिती - १९५७ (केंद्रशासन पुरुस्कृत)
  • वसंतराव नाईक समिति - १९६० (महाराष्ट्र शासन पुरस्कृत)
  • ल. ना. बोंगिरवार समिती - १९७० (महाराष्ट्र शासन पुरस्कृत)
  • अशोक मेहता समिती - १९७७ (केंद्रशासन पुरस्कृत)
  • बाबुराव काळे समिती - १९८० (महाराष्ट्र शासन पुरस्कृत)
  • पी. बी. पाटील समिती - १९८४ (महाराष्ट्र शासन पुरस्कृत)
पंचायत राजवर एक नजर:
२४ एप्रिल १९९३ भारतामध्ये ७३ व्या घटना दुरुस्तीनुासर पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला, पंचायतराज हे महात्मा गांधीचे स्वप्न होते.
७३ व्या घटना दुरुस्तीमध्ये खालील तरतुदी करण्यात आल्या,
  • त्रिस्तरीय स्वराज्य संस्थांची स्थापना - ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा पंचायत
  • गाव पातळीवरती ग्रामसभेची स्थापना, ग्रामसभा बंधनकारक (ग्रामसभेस घटनात्मक दर्जा)
  • दर पाच वर्षांनंतर नियमित पंचायतीच्या निवडणुका घेणे बंधनकारक (पंचायतींची मुदत पाच वर्षे)
  • अनुसूचित जाती / जमतींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षित जागा 
  • महिलांसाठी एक तृतीयांश आरक्षित जागा 
  • राज्य निवडणूक आयोगाची स्थापना
  • राज्य वित्त आयोगाची स्थापना 
  • निवडणूकीला उभे राहण्याकरिता वयाची अट, वय वर्षे २१ पूर्ण असणे अनिवार्य
  • एखादी पंचायत बरखास्त केल्यास सहा महिन्यात निवडणुका घेणे आवश्यक

चालू घडामोडी

१. भारतीय सैन्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - १५ जानेवारी, भरतीय सैन्य दिन हा दरवर्षी १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. १५ जानेवारी १९४९ रोजी लेफ्टनंट जनरल के. एम. करिप्पा यांनी सर फ्रांसिस बुचर यांच्याकडून भारतीय सैन्य दलाच्या सरसेनापतीची धुरा घेतली. ते स्वातंत्र्य भारताचे पाहिले भारतीय सरसेनापती होते.

२. भारतीय मंत्रिमंडळाने कोणत्या नवीन पीक विमा योजनेला मंजूरी दिली आहे?
उत्तर - प्रधानमंत्री पीक विमा योजना, भारतीय मंत्रिमंडळाने 'प्रधानमंत्री पीक विमा योजना' ह्या नवीन पीक विमा योजनेला मंजूरी दिली आहे. ही नवीन पीक विमा योजना सध्या सुरु असलेल्या राष्ट्रिय कृषी विमा योजनेच्या जगी अमलात येईल. ह्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप पिकांना २% तर रबी पिकांना १.५% दराने एकसमान पीक विमा प्रीमियम भरवा लागेल.

३. यूनिवर्सल अकाउंट नंबर सुरुसाठी करण्यासाठी कोणत्या सरकारी संस्थेला २०१५-१६ चा 'इ-गवर्नन्स' राष्ट्रिय पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी या सरकारी संस्थेला यंदाचा इ-गवर्नन्सचा राष्ट्रिय पुरस्कार मिळाला आहे. इ-गवर्नन्स तंत्रज्ञानाचा अभिनव वापर करण्यासाठी म्हणजेच यूनिवर्सल अकाउंट नंबर सुरु करण्यासाठी हा पुरस्कार ह्या संस्थेला मिळाला आहे.

४. नागजी अंतरराष्ट्रिय फुटबॉल स्पर्धा कोणत्या भारतीय राज्यामध्ये होणार आहे?
उत्तर - केरळ, ब्राज़ीलचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो गौचोच्या हस्ते नागजी आन्तराराष्ट्रिय फुटबॉल स्पर्धेचे उद्धघाटन होणार असून ही स्पर्धा भारतातील केरळ राज्यामध्ये ५ फेब्रुवारी पासून पार पडेल तर अंतिम सामना हा २१ फेब्रुवारी रोजी असेल. ही स्पर्धा तब्बल २१ वर्षांनंतर भरविण्यात आली आहे.

५. २०१५ चा फीफा बैलन डी'और पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर - लिओनेल मेस्सी, बार्सिलोना फसीचा लिओनेल मेस्सिनी २०१५ चा बैलन डी'और पुरस्कार जिंकला आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणुन त्याची हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्याने हा  पुरस्कार पाचव्यांदा पटकाविला आहे. याआधी त्याला २००९, २०१०, २०११, २०१२ साली हा पुरस्कार मिळाला आहे.

६. फ्लेमिंगो उस्तव २०१६ कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला  होता?
उत्तर - आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश सरकारने दर सालप्रमाणे ह्यावर्षीही ९-१० जानेवारीला फ्लेमिंगो फेस्टिवल आयोजित केला. राज्य सरकार हा उस्तव मागील १० वर्षांपासून आयोजित करत आहे. हा महोस्तव पुलिकत लेक आणि नेल्लापट्टू पक्षी अभयारण्यामध्ये आयोजित केला जातो.

७. २०१६ - चेन्नई ओपन टाइटलचा (टेनिस) मानकरी कोण ठरला आहे?
उत्तर - स्टैन वावरिंका, स्वित्झर्लंडच्या स्टैन वावरिंकाने २०१६ चेन्नई ओपन टाइटल जिंकली, त्याने बोर्न कोरिक ह्याचा सलग दोन सेटमध्ये  पराभव करत ही मलिका जिंकली.

Thursday 14 January 2016

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रातील  खनिजसंपत्तीची प्रमुख क्षेत्रे:
१. पूर्व विदर्भ:  चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, नागपुर व यवतमाळ जिल्हे.
२. कोकण व दक्षिण महाराष्ट्र: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि कोल्हापुर जिल्हे.
महाराष्ट्रात प्रमुख खनिजांचे २८५ पट्टे व गौण खनिजांचे २०३ पट्टे आहेत.
* मैंगनीज: भारताचा ४०% साठा  एकट्या महाराष्ट्रात असून, प्रमुख साठे भंडारा, नागपूर या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्हा येतो.
  • भंडारा-गोंदिया - डोंगरी बुद्रुक, चिखला व इतर १३ ठिकाणे. 
  • पूर्व विदर्भ - गुमगाव, रामडोंगरी, कोदेगाव, मनसर कंट्री, जुनेवाणी, माटक, बैलडोंगरी, पारसीवणी. 
  • सिंधुदुर्ग - सावंतवाडी आणि वेंगुर्ला परिसर.
* लोहखनिज: भारताचा २०% लोहखनिज साठा महाराष्ट्रात आहे. प्रमुख साठे - चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्हे.
  • चंद्रपूर व गडचिरोली: लोहरा, असोला, देवळगाव, बिआसी, पिंपळगाव, फुसेर, रतनपुर, सुरजागड, वाढवी, दामकोट, मेटा, विभागात २७५ दशलक्ष टन लोहखनिज साठा आहे.
  • भंडारा-गोंदिया: खुर्सीपुर
  • सिंधुदुर्ग: वेंगुर्ला, सावंतवाडी, रेडी
* बॉक्साइट: महाराष्ट्रामध्ये जवळपास ६२ दशलक्ष टन साठे असून ते कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सांगली, आणि सातारा
  • कोल्हापुर: राधानगरी, गारगोटी, वाकी, उदगिरी, कसरवाडा, नागरतावाडी
  • रायगड: मुरुड, रोहा, श्रीवर्धन
  • ठाणे: सालसेट बेट, टुंगर टेकड्या
  • सिंधुदुर्ग व रत्नागिरी: अंबोली घाट, दापोली व मंडणगड
* क्रोमाइट: महाराष्ट्रात १०% साठा  असून सिंधुदुर्ग, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये प्रमुख साठे आहेत.
  • सिंधुदुर्ग: कणकवली, जानोली व बागदा
  • भंडारा: मौनी
  • नागपूर: टाका
* चूनखड़ी: यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात प्रमुख साठे आहेत.
  • चंद्रपूर: वरोडा (पुरकेपार, कोंडरा, परथा), राजुरा तालुका (संगोडा, चांदुर, गंगापूर)
  • अहमदनगर: कायूर, कंडुर

Monday 11 January 2016

महाराष्ट्र: कोकण विभाग

कोकण विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई त्याच प्रमाणे मुंबई उपनगर हे देखील कोकण विभागमध्येच येतात.

इतिहास: ब्रिटिश काळात कोकण विभाग हा मुंबई इलाख्यातील उत्तर किंवा गुजरात विभागात मोडत होता. ब्रिटिश काळात कोकण विभागात ठाणे, कुलाबा, रत्नागिरी हे तीनच जिल्हे होते.  १९६१ मध्ये कोकण विभाग हा नव्याने स्थापित झालेल्या महाराष्ट्राचा भाग बनला. १९८१ साली सत्नगिरी जिल्यापासून सिंधुदुर्ग जिल्याची निर्मिति झाली. कुलाबा जिल्याचे रायगड असे नामांतर करण्यात आले. २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यावरील प्रशासकीय कारभार कमी करण्यासाठी  ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्याची निर्मिति करण्यात आली.

चतुःसीमा: कोकण विभागाच्या पश्चिमेस अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे तर पूर्वेस पुणे विभाग आहे ज्याला पश्चिम महाराष्ट्र असेही संबोधले जाते. उत्तरेस गुजरात राज्य तर दक्षिणेस गोवा राज्य आहे.

थोडक्यात माहिती:
  • क्षेत्रफल: ३०,७४६ किमी वर्ग
  • लोकसंख्या: २,४८,०७,३५७ (२००१ ची जनगणना)
  • जिल्हे: मुंबई, मुंबई उपनगर, रायगढ़, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • साक्षरता: ८१.३६%
  • कोकण विभागातील मुंबई हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा तर सिंधुदुर्ग हा सर्वत कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

Saturday 9 January 2016

जागतिक संघटना व त्यांचे मुख्यालय

जग भरातील मुख्य जागतिक संघटनाचा आढावा आपण घेणार आहोत, ह्या संघटना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अनेक वेळा विचारल्या गेल्या आहेत. येथे जागतिक संघटनांची पूर्ण लिस्ट आहे ज्यामध्ये त्यांचे नाव, मुख्यालय, स्थापना वर्ष लिहिले आहे.
 जागतिक संघटनचे नाव
मुख्यालय
स्थापना वर्ष
संयुक्त राष्ट्रे
न्यु यॉर्क
१९४६
खाद्य आणि कृषी संस्था
रोम, ईटाली
१९४५
अंतरराष्ट्रिय अणुऊर्जा संस्था
विएना
१९५७
अंतरराष्ट्रिय नागरी उड्डाण संस्था
मोंटेराल
१९४४
अंतरराष्ट्रिय कामगार संस्था
जिनीवा
१९४५
अंतरराष्ट्रिय सागरी संस्था
लंडन
१९६०
अंतरराष्ट्रिय समुद्री संस्था
किंग्स्टन
१९९४
अंतरराष्ट्रिय दूरसंचार यूनियन
जिनीवा
१९४९
अंतरराष्ट्रिय समुद्री कायदे लवादा
हैम्बर्ग
१९६९
संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था
पॅरिस
१९६४
यूनिवर्सल पोस्टल यूनियन
बार्न
१८७४
जागतिक आरोग्य संघटना
जिनीवा
१९४८
जागतिक बैद्धिक संपदा संघटना
जिनीवा
१९८६
जागतिक हवामान संघटना
जिनीवा
१९५०
जागतिक व्यापर संघटना
जिनीवा
१९६८

चालू घडामोडी

१. कसोटी, एक-दिवसीय त्याचप्रमाणे टी-२० सामने एकत्रित केल्यानंतर कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने अंतरराष्ट्रिय क्रिकेट विश्वामध्ये १००० शतके झळकाविण्याचा मान पटकाविला आहे?
उत्तर - ऑस्ट्रेलिया
२. बीसीसीआयचा यंदाचा सी. के. नायडू पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर - सैय्यद किरमाणी
३. पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेच्या इमरतीचे उद्धघाटन केले?
उत्त्तर - अफगानिस्तान 

४. केंद्र सरकारने कोणास योग रिसॉर्ट तयार करण्यासाठी बेट देऊ केले आहे?
उत्तर - बाबा रामदेव
५. कोणत्या भारतीय उद्योगसमुहाने ३७० कोटी रुपयांना पिनिन फॉरिना (इटालियन कार डिजाइन कंपनी) ताब्यात घेतली आहे?
उत्त्तर - महिंद्रा ग्रुप
६. मार्च २०१६ पर्यंत कोणते राज्य वगळता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अन्नसुरक्षा कायदा लागु करण्याची तयारी दर्शविली आहे?
उत्त्तर - तामिळनाडू

७. कोणाची विप्रोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन नेमणूक केली आहे?
उत्त्तर - आबीद अली निमुचवाला
८. २०१५ चे कोस्टा नावेल पारितोषिक कोणी जिंकले आहे?
उत्तर - केट एटकिंसन
९. कोणत्या तारखेला अंतरराष्ट्रिय ब्रेल दिन पळाला जातो?
उत्तर - ४ जानेवारी
१०. कोणत्या भारतीय संघराज्याने उज्वल डिस्कॉम असुरांस योजनेसाठी लागणाऱ्या सामंजस्य करारावरती सर्वप्रथम स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - झारखंड

Friday 8 January 2016

श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ मध्ये इरोड (तंजावर), तामिळनाडू येथे एका ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. ते एक महान भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदु गणिताचाच विचार करत असे, आणि म्हणूनच की काय अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.

संशोधन: वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. ते आपल्या शाळेतच नव्हे तर आपल्या जिल्ह्यात गणितामध्ये सतत अव्वल राहत होते. त्यांच्या असामान्य बिद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यावृत्तिही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.
१९०४ मध्ये त्यांचे मद्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यावेळी त्यांचे भविष्य खूपच उज्ज्वल होते त्यांना गणितामध्ये खूप बक्षिशे, शिष्यवृत्त्या ही मिळाल्या. ह्याच त्यांच्या गुणामुळे त्यांना कुंभकोणमच्या सरकारी कला कॉलेजमध्ये दाखला मिळाला.
रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापूण आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा गौरव झाला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रोफेसर हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरु केला. प्रोफेसर हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्यामुळे रामानुजन यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणितचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत,असे मत प्रोफेसर हार्डी यांनी व्यक्त केले. लवकरच रामानुजन यांना इंग्लडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षाच्या काळात रामानुजन यांनी बत्तीस संशोधनपर लेख लिहले. १९१८ साली रॉयल सोसयटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळविणारे ते पाहिले भारतीय होते.

मुर्त्यु: १९१९ साली रामानुजन इंग्लडमधून मयादेशी परत आले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षी अंथुरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहतिसाव्या २७ एप्रिल १९२० रोजी महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणिती विश्वाचीच अपरिमित हानी झाली.

Monday 4 January 2016

चालू घडामोडी - २ - ३ जानेवारी २०१६

१. कोणत्या राज्य सरकारने 'जन्मा भूमी - माँ वुरु' नविन योजना सुरु केला आहे?
उत्तर - आंध्र प्रदेश, २ जानेवारी २०१६ रोजी आंध्र प्रदेश सरकारने 'जन्मा भूमी - माँ वुरु' (माझे जन्मस्थान - माझे गाव) हो योजना सुरु केली आहे. ही योजना 'स्मार्ट गाव, स्मार्ट वार्ड, स्मार्ट आंध्र प्रदेश'ला उद्देशून केला आहे.

२. कोणते शहर १०३ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे आयोजन करणार आहे?
उत्तर - मैसुर, १०३ व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ जानेवारी २०१६ रोजी मैसूर येथे केले. यावेळी त्यांनी ५ ई  चा नविन मंत्र दिला - इकोनॉमी, एन्वारोमेंट, इनर्जी, इम्पथी आणि इक्विटी.

३. कोणत्या देशाने सैफ सुजुकी कप २०१५ वर आपले नाव कोरले आहे?
उत्तर - भारत, भारताने सैफच्या अंतिम लढतीमध्ये गतविजेत्या अफ़ग़निस्तानचा २-१ असा धुव्वा उडविला. भरतने आजवर ७ वेळा सैफ चषक जिंकला आहे. सहभागी संघ - बांग्लादेश, भूटान, भारत, मालदीव, नेपाल, पाकिस्तान, श्री लंका, अफगानिस्तान.

४. अरुणिमा सिन्हा ही भारतीय महिला कशाशी निगडित आहे?
उत्तर - गिर्यारोहक, नुकतेच अरुणिमा सिन्हाने माउंट अकोनकागुआ, अर्जेंटीना, दक्षिण अमेरिका हा पर्वत सर केला. यासोबतच ती जगातील पहिली अपंग महिला गिर्यारोहक जिने ५ पर्वत सर केले आहेत. तिने आज पर्यंत माउंट एवेरेस्ट (आशिया), माउंट किलिमंजारो (अफ्रीका), माउंट एल्ब्रुस (यूरोप), माउंट कॉसिज़्को (ऑस्ट्रेलिया), माउंट अकोनकागुआ (दक्षिण अमेरिका)

५. कोणते भारतीय संघराज्यात राजा-राणी संगीत उस्तव साजरा केला जातो?
उत्तर - ओडिशा, राजा-राणी महोस्तव हा ओडिशामधील महत्त्वाचा उस्तव आहे. हा उस्तव राजरानी मंदिर ट्रस्टतर्फे १८ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान साजरा केला जातो. राजरानी मंदिर हे ११ व्या शतकामध्ये बांधले असून ते भुवनेश्वर मध्ये स्थित आहे.

६. नुकतीच कोणाची भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
उत्तर - अतुल सोबती, अतुल सोबती यांची पुढील पांच वर्षांसाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या अधयक्ष व व्यवस्थाथपकीय संचालक म्हणून नेमणूक झाली आहे.