Friday 11 November 2016

चालू घडामोडी : ४ नोव्हेंबर

१. सातवी तंबाखू नियंत्रण परिषद (कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज ऑन टोबॅको कंट्रोल) कोणत्या देशामध्ये पार पाडणार आहे?
उत्तर - भारत, सातवी तंबाखू नियंत्रण परिषद ७ ते १२ नोव्हेंबर दरम्यान उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे पार पडणार आहे. भारताने तंबाखू आणि तंबाखू सेवनावर केलेले उपाय, निर्बंध इ. ह्या परिषदेमध्ये इतर सहभागी देशांसोबत शेयर केले जाईल. त्याचप्रमाणे ह्या परिषदेमध्ये १८० देशांचे १५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेचे सचिव सहभागी होणार आहेत. भारतामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज मीटिंग भरावली गेली आहे.
२. 'प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान' योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयद्वारे सुरु करण्यात आली आहे?
उत्तर - केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, जगत प्रकाश नड्डा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री यांनी नुकतेच नवी दिल्ली येथे गर्भवती महिलांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी 'प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान' सुरु केले आहे. ह्या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना नवव्या महिन्यामध्ये लागणाऱ्या सर्व उपचार आणि चेक-अप्स मुफ्त दिल्या जाणार आहे. ही योजना सर्व सरकारी हॉस्पीटलमध्ये उपलब्ध असेल.
३. २०१६ च्या दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या बॉलीवुड अभिनेत्रीला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
उत्तर - रेखा, बॉलीवुड अभिनेत्री रेखाला १३ व्या दुबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
४. आशिया खंडातील सर्वात मोठी मानवनिर्मित 'जंगल सफारी' कोणत्या राज्यात सुरु करण्यात आला आहे?
उत्तर - छत्तीसगढ़, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच छत्तीसगढ़मध्ये नया रायपुर येथे आशिया खंडातील सर्वात मोठे मानवनिर्मित 'जंगल सफारी' सुरु केले आहे. ८०० ऐकर क्षेत्रामध्ये हे जंगल पसरले असून ८ विभागांमध्ये विभागले आहे. ह्या जंगलामध्ये जंगली प्राणी असून संपूर्ण मुक्त पटांगणामध्ये फिरू शकतात. इको-फ्रेंडली गाड्यांमधून पर्यटकांना फिरण्याची सोय आहे. ह्या जंगलामध्ये दररोज १०००० पर्यटक फिरू शकतात. ह्या सफ़ारीमध्ये वाघ,सिंह, अस्वल आणि इतर जंगली प्राणी असतील त्याचप्रमाणे मांसाहारी आणि शाकाहारी असे विभागही असतील.
५. लिंकेडीनने कोणत्या भारतीय केंद्रीय मंत्रालयासोबत नौकरी अप्डेट्ससाठी कोणत्या मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर - मानव संसाधन विकास मंत्रालय, लिंकेडीनने भारतीय विद्यार्थ्यांसाठी नौकरी अप्डेट्स देण्यासाठी केंद्रीय मानव विकास संसाधन मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे. ह्या कराराअंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना भारतामध्ये आणि भारताबाहेरही ३५ देशांमध्ये नौकरी शोधणे सोपे होणार आहे.
६. भीतरकनिका राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?
उत्तर - ओडिशा, भीतरकणिका राष्ट्रिय अभयारण्य ओडीषामधील केंद्रपारा जिल्यामध्ये आहे. हे अभयारण्य अद्वितीय पर्यावरणामध्ये स्थित आहे. नदीचा त्रिभुज प्रदेश, मैनग्रोव जंगल, समुद्र किनारा, नदीचे मुख, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, विविध प्रजातीच्या वनस्पती ह्या अभयारण्याचे वैशिष्ट आहे. यूनेस्कोने नुकतेच दोन सदस्यीय समिती ह्या अभयारण्याच्या पाहणीसाठी येणार आहेत. 

Monday 3 October 2016

चालू घडामोडी : २३ सप्टेंबर

१. २०१६ च्या क्लार्क आर बाविन वन्यजीवन कायदा अंमलबजावणी पुरस्कारासाठी कोणत्या दोन भारतीयांची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - संजय दत्ता आणि रितेश सारोठिया, संजय दत्ता आणि रितेश सारोठिया यांची २०१६ च्या क्लार्क आर बाविन वन्यजीवन कायदा अंमलबजावणी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. वन्यजीवन वाचवण्यासाठी वन्यजीवन कायदे अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तिंना ह्या पुरस्काराने सन्मानित केले जाते. सारोठिया हे मध्य प्रदेश राज्य वन विभागामध्ये सहाय्यक संरक्षक आहेत तर दत्ता बेलाकोबा, पश्चिम बंगालमध्ये रेंज ऑफिसर आहेत.
२. रेवती सरन शर्मा यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी निगडित होत्या?
उत्तर - लेखक, रेवती सरन शर्मा यांचे नुकतेच नवी दिल्ली येथे निधन झाले त्या प्रसिद्ध हिंदी आणि उर्दू लेखिका होत्या. ऑल इंडिया रेडियोमध्ये कार्यक्रम समीक्षणामध्ये त्या अग्रेसर होत्या. त्याचप्रमाणे २००७ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
३. 'सिटिज़न एंड सोसायटी' पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - मोहम्मद हामिद अंसारी, भारताचे उपराष्ट्रपती मोहम्मद हामिद अंसारी हे सिटीजन आणि सोसायटी पुसकचे लेखक आहेत. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनमध्ये ह्या पुस्तकाचे प्रकाशन केले. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःच्या जीवनाचे आत्मचरित्र आहे.
४. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मोनेट्री पॉलिसी कमिटीमध्ये कोणाची नेमणूक केली आहे?
उत्तर - रविन्द्र ढोलकिया, पामी दुआ, चेतन घाटे, केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या मोनेट्री पॉलिसी कमिटीमध्ये व्याजदर ठरविण्यासाठी तीन बाहेरील ताज्ञानची नेमणूक केली आहे. चेतन घाटे हे इंडियन स्टैटिकल इंस्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत, पामी दुआ ह्या दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या संचालक आहेत तर रविन्द्र ढोलकिया आईआईएम अहदाबादचे आहेत. हे तज्ञ चार वर्ष कार्यभार संभळातील आणि त्यांची पुनर्निवड़ होउ शकत नाही.
५. २०१६ चा क्लिंटन ग्लोबल सिटीजन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - आदि गोदरेज, मुंबईस्थित व्यावसायिक आणि गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदी गोदरेज यांची १० व्या क्लिंटन ग्लोबल सिटीजन अवार्ड २०१६ ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार क्लिंटन फाउंडेशनतर्फे दिला जातो. आदि गोदरेज यांच्या नेतृत्त्वला पुरस्कार देण्यात आला आहे. शाश्वत बिज़नेस स्ट्रेटेजीज आणि लीडरशिपच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय समूह जगभरात प्रसिध्द केला यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
६. 'इंद्रा २०१६' हे संयुक्त लष्करी शिबीर भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडले?
उत्तर - रशिया, ८ वी भारत-रशिया संयुक्त लष्करी शिबीर इंद्रा २०१६ रशियातील व्लादिवोस्टोक जिल्ह्यात पार पडले. ह्या संयुक्त शिबीराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पर्वतीय, जंगली भागामध्ये अतिरेक्यांच्या सामना करणे. 

चालू घडामोडी : २२ सप्टेंबर

१. जगातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प कोणत्या भारतीय राज्यामध्ये उभारण्यात आला आहे?
उत्तर - तामिळनाडू, जगातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प तामिळनाडूतील रमनथपुरम जिल्ह्यामध्ये उभारण्यात आला असून ६४८ मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प अडानी समूहद्वारे ५००० एकरामध्ये उभारण्यात आला असून त्यासाठी ४५५० कोटी खर्च झाला आहे.
२. २०१६ ची इंटरनेशनल एसोसिएशन ऑफ साइन्स पार्क्स एंड एरियाज ऑफ इनोवेशन कॉन्फ्रेंस कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - रशिया, ३३ वी इंटरनॅशनल एसोसिएशन ऑफ साइन्स पार्क्स एंड एरियाज ऑफ इनोवेशन कॉन्फ्रेंस १९-२२ सप्टेंबर दरम्यान रशियातील मॉस्को येथे पार पडली. ही परिषद जगातील ह्या क्षेत्रातील सर्वात मोठी बैठक असून तिला संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिंक आणि सामाजिक परिषदेचे विशेष सल्लागार दर्जा दिला आहे. २०१७ ची बैठक तुर्कीमधील इंस्तांबुलमध्ये होणार आहे.
३. २०१७ च्या ऑस्कर पुरस्कारामधील फॉरेन लैंग्वेज चित्रपटाअन्तर्गत कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - विसरनै, तमिळ चित्रपट विसरनैची २०१७ ऑस्कर पुरस्कारामधील फॉरेन लैंग्वेज चित्रपटाअंतर्गत निवड करण्यात आली आहे. हा चित्रपट वेत्रीमारन यांनी दिग्दर्शित केला असून, एम. चंद्रकुमार यांच्या 'लॉक अप' कादंबरीवर आधारित आहे.
४. पहिला जेसे ओवेन्स ओलिंपिक स्पिरीट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
उत्तर - मुहम्मद अली, पहिल्यांदाच प्रदान करण्यात येणारा जेसे ओवेन्स ओलिंपिक स्पिरिट पुरस्कार २०१६ मुहम्मद अली यांना मरोणोत्तर देण्यात येणार आहे. ३ जून २०१६ ला त्यांचे निधन झाले. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी लोणी अली यांना देण्यात येणार आहे. हा वार्षिक पुरस्कार असून समाजाला चांगल्या कामासाठी प्रोस्ताहित करणाऱ्या, समाजाला एकत्रित बांधून ठेवणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणार आहे.
५. अमेरिकेमधील भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - नवतेज सरना, १९८० बैचच्या भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी नवतेज सरना यांची अमेरिकेतील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी त्या लंदनमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव म्हणून काम पाहत होत्या. त्यांची ही नेमणूक अरुण सिंह यांच्या जागी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने तरणजीत सिंह यांची श्रीलंकेमध्ये भारतीय हाई कमिश्नर पदी नेमणूक केली आहे.
६. पहिली वस्तू आणि सेवा कर परिषद कोणत्या शहरामध्ये पार पडली?
उत्तर - नवी दिल्ली, पहिली वस्तु आणि सेवा कर परिषद नवी दिल्ली येथे पार पडली, अरुण जेटली ह्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. 

Sunday 2 October 2016

चालू घडामोडी : २१ सप्टेंबर

१. २१६ ची नॉर्थ ईस्ट कनेक्टिविटी समिट कोणत्या भारतीय शहरामध्ये पार पडली?
उत्तर - अगरतला, २०१६ ची नॉर्थ ईस्ट कनेक्टिविटी समिट त्रिपुरातील अगरतला येथे २३ सप्टेंबर रोजी पार पडली. दोनदिवसीय परिषदेमध्ये ईशान्य आशियाला आर्थिक, दळणवळण, ऊर्जा या साधनांसोबत आग्नेय आशियासोबत जोडणे हा ह्या चर्चेचा मुख्य हेतू होता. या परिषदेमध्ये सिंगापूर, बांग्लादेश, म्यानमार हे देश सहभागी झाले होते.
२. केंद्र सरकारने कोणत्या आईआईटी कॉलेजमध्ये 'परम-ईशान' सुपरकंप्यूटिंग सुविधा सुरु केली आहे?
उत्तर - आईआईटी गुवाहाटी, केंद्रीय मानवसंसाधन मंत्री प्रकाश जावड़ेकर यांनी नुकतेच आईआईटी गुवाहाटीमध्ये 'परम-ईशान' ह्या सुपरकंप्यूटिंग सुविधेचे उद्धघाटन केले. परम-ईशानचे २५० टेराफ्लॉपस स्पीड असून ३०० टीबी साठवणूक क्षमता आहे. त्याचा उपयोग संगणकीय रसायनशास्त्र, नाना ब्लॉक सेल्फ अस्सेम्बल, ऑप्टीमाइजेशनसाठी करण्यात येणार आहे.
३. भारतातील पहिला कोस्टल कॉरिडोर निर्मितीसाठी आशियाई विकास बँकेने किती कर्ज मंजूर केले आहे?
उत्तर - ६३१ दशलक्ष डॉलर्स, विशाखापट्नम ते चेन्नई दरम्यान भारतातील कोस्टल कॉरिडोर बनविण्यासाठी आशियाई विकास बँकेने ६३१ दशलश डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे. भारताची पश्चिम किनारपट्टी २५०० किमिची असून त्यापैकी ८०० किमीचा कॉरिडोर ह्या राक्केमेतून बनविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ह्या विकसित बंदरांतून दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांसोबत व्यापर केला जाईल.
४. कोणत्या भारतीय स्टॉक एक्सचेंजने लाइव स्टॉक अपडेट दाखविण्यासाठी ट्वीटरसोबत करार केला आहे?
उत्तर - बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने आपले लाइव स्टॉक अप्डेट्स दाखविण्यासाठी ट्वीटर ह्या सोशल मीडियासोबत करार केला आहे. ह्या कराराअंतर्गत ट्वीटर सेंसेक्स लेवल्स, स्टॉक प्राइजेस, सर्व कंपन्यांचे बाजार खुलत्यावेळचे आणि बंद होत्या वेळचे भाव दाखविले जातील. हा आशिया खंडातील करार आहे ज्यात एखाद्या स्टॉक एक्सचेंजने, सोशल मीडिया पार्टनरसोबत करार केला आहे.
५. सार्क देशांच्या सर्वोच्च सुरक्षाताज्ञानची बैठक कोणत्या देशात पार पडली?
उत्तर - भारत, सार्क देशांच्या सर्वोच्च सुरक्षाताज्ञानची बैठक भारतामध्ये नवी दिल्ली येथे २२-२३ सप्टेंबर दरम्यान पार पडली. ही परिषद भारतीय गुप्तचर विभागाचे प्रमुख दिनेश्वर शर्मा आणि सार्क देशांच्या गुप्तचर प्रमुखांनी बोलाविली होती. नेपाळ, भूटान, बांग्लादेश, श्रीलंका, अफगानिस्थान, मालदीव हे देश सहभागी झाले होते. दहशदवादाविरुद्ध सार्क देशांना मजबूत करणे हे ह्यमागचे मुख्य उद्दिष्ट होते.
६. 'डू नॉट से वी हॅव नथिंग'पुस्तकाचे लेखक/लेखिका कोण आहेत?
उत्तर - मैडेलीन थे, कैनेडियन लघुकथालेखक मेडेलिन थे हे 'डू नॉट से वी हॅव नथिंग' पुस्तकाचे लेखक असून ह्या पुस्तकाची निवड २०१६ च्या मॅन बुकर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी चीनमधील शास्त्रीय संगीताच्या जडनघडणीचे वर्णन केले आहे.

Thursday 29 September 2016

चालू घडामोडी: २० सप्टेंबर

१. शक्तिशाली टाइफून मालकस कोणत्या देशावर आदळले आहे?
उत्तर - जापान, टाइफून मालकस हे शक्तिशाली वादळ जापानच्या दक्षिण भागावर आदळले असून १८० किमी प्रती तास वेगाचे हे वादळ आहे. जापान सरकारने तब्बल ५ लाख लोकांना स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला आहे.
२. भारतीय अंतरराष्ट्रीय सागरी पदार्थ २०१६ हे प्रदर्शन कोणत्या शहरामध्ये पार पडले?
उत्तर - विशाखापट्टनम, २० वे इंडियन इंटरनॅशनल सीफ़ूड शो २०१६ २३ सप्टेंबरला आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथे पार पडले. 'सुरक्षित आणि शाश्वत भारतीय मच्छीमारी' हे यंदाची थीम होती. ह्या प्रदर्शनामध्ये २००० हून अधिक भारतीयांनी तर २०० हून अधिक परदेशी व्यक्तीनी सहभाग घेतला होता. हे प्रदर्शन भारतातील मच्छी व्यवसायिकांना, फिशरीज, उत्पादकांना आयात आणि निर्यात समाजाविण्यासाठी फ्लैटफॉर्म होते.
३. जागतिक बँकेअंतर्गत भारताच्या संचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - जुनैद अहमद, बांग्लादेशच्या जुनैद अहमद यांची जागतिक बैंकेअंतर्गत भारताच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची ही निवड ओन्नो रुहल यांच्याजागी करण्यात आली आहे. याआधी ते जागतिक बँकेच्या अध्यक्ष जिम योंग किम यांच्याअंतर्गत चीफ ऑफ स्टाफ होते.
४. ऋषिराज बरोट कोणत्या खेळाशी निगडित आहे?
उत्तर - नेमबाजी, ऋषिराज बरोट याने नुकतेच अज़रबैजान मधील गबाला येथे पार पडलेल्या २०१६ च्या आईएसएसएफ जूनियर वर्ल्ड कपमध्ये २५ मीटर फायर पिस्टल प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे.
५. २०१६ ची ब्रिक्स देशांतील कृषी आणि कृषी विकास मंत्र्यांची परिषद कोणत्या भारतीय शहरामध्ये पार पडली?
उत्तर - नवी दिल्ली, सहावी ब्रिक्स कृषी आणि कृषी विकास मंत्री परिषद नवी दिल्लीमध्ये २२ सप्टेंबर रोजी पार पडली. दोनदिवसीय परिषदेमध्ये शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काही ठोस निर्णय घेण्याचा प्रयन्त करण्यात आला. त्याचप्रमाणे शेतीविषयक माहितीची देवाणघेवाण, अन्नमलिका आणि लोकसंख्येला लक्षात घेता काही योजनांवर विचार करण्यात आला.
६. २०१६ ची फॉर्मूला वन सिंगापूर ग्रैंड प्रिक्स कोणी जिंकली आहे?
उत्तर - नीको रोसबर्ग, २०१६ ची फॉर्मूला वन सिंगापूर ग्रैंड प्रिक्स मर्सिडीज़ बेंज़च्या नीको रोसबर्गने जिंकली आहे. ही त्याच्या कारकिर्दीतील २२ चैंपियनशिप होती तर सिंगापुरमधील पहिली चैंपियनशिप. 

चालू घडामोडी : १८, १९ सप्टेंबर

१. २०१७ च्या वाइब्रेंट गुजरात ग्लोबल समिटसाठी कोणता देश भागीदार असेल?
उत्तर - अमेरिका, ८ व्या २०१७ च्या वाइब्रेंट गुजरात ग्लोबल समिटसाठी अमेरिका भागीदार असून ही परिषद ८-९ जानेवारी २०१७ मध्ये गांधीनगरच्या महात्मा मंदिरमध्ये भरविण्यात येणार आहे. ही परिषद मुख्यतः शाश्वत विकास आणि आर्थिक विकासासाठी असेल. ह्या परिषदेमध्ये दोन्ही देश आणि राज्यांतील सरकारी मंत्री, नेते, व्यावसायिक, वरिष्ठ अर्थतज्ञ, अंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख यांचा सहभाग असेल.
२. २०१६ ची राष्ट्रीय कामगार परिषद कोणत्या शहरामध्ये पार पडणार आहे?
उत्तर - भुबनेश्वर, ओडिशा सरकार आणि अंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांच्या सहयोगाने २०१६ ची राष्ट्रीय कामगार परिषद ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये २० सप्टेंबरला पार पडली. २ दिवसीय परिषदेमध्ये भारतातील संघटित आणि असंघटित कामगार यांच्याविषयीच्या समस्यांवर विचारविनिमयासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
३. डेमोक्रेट्स एंड डिस्सेन्टर्स पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - रामचंद्र गुहा, रामचंद्र गुहा डेमोक्रेट्स एंड डिस्सेन्टर्स पुस्तकाचे लेखक रामचंद्र गुहा असून १६ निबंधनाच्या पुस्तकामध्ये त्यांनी भारताचे शेजारील राष्ट्रांसोबत असलेले नाते, देशाअंतर्गत व्यक्ती स्वातंत्र्य यांचा उल्लेख केला आहे.
४. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - अलका सिरोही, निवृत्त आईएएस अधिकारी अलका सिरोही यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी २१ सप्टेंबर पासून आपल्या कार्याची धुरा हाती घेतली आहे.
५. शुभंकर प्रामाणिक कोणत्या खेळाशी निगडित आहे?
उत्तर - नेमबाजी, अज़रबैजानच्या गाबालामध्ये झालेल्या २०१६ च्या आईएसएसएफ पिस्टल जूनियर वर्ल्ड कपमध्ये ५० मीटर राइफल प्रकारामध्ये शुभंकर प्रामाणिक याने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याचप्रमाणे २५ मीटर स्टैण्डर्ड पिस्तौल प्रकारामध्ये संभाजी पाटील याने सुवर्ण पदक जिंकले.
६. अंतरराष्ट्रीय रक्त संक्रमण सोसायटीच्या प्रमुखपदी कोणत्या भारतीय वंशीय व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - रवी रेड्डी, दक्षिण आफ्रिकेत स्थित भारतीय वंशाच्या रवी रेड्डी यांची इंटरनॅशनल सोसाइटी फॉर ब्लड ट्रान्सफ्यूशनच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे. यासोबतच ह्या संस्थेच्या प्रमुखपदी निवड होणारे अफ्रीका खंडातील ते पहिले व्यक्ती आहेत. सध्या रेड्डी हे साउथ अफ्रीकन नॅशनल ब्लड सर्विसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. रक्त संक्रमणाबद्दल जागरूकता आणि संशोधन हे आईएसबीटीचे मुख्य कार्य असून तिचे मुख्यालय एम्स्टर्डममध्ये आहे. 

Thursday 22 September 2016

चालू घडामोडी : १७ सप्टेंबर

१. २०१६ च्या अर्जुन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - अजिंक्य रहाणे, अजिंक्य रहाणेला २०१६ च्या अर्जुन पुरस्काराने तर रोहीत शर्माला २०१५ च्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना हा पुरस्कार दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये देण्यात येईल.
२. यूनाइटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स एंड क्राइमच्या सदिच्छा दुतपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - नादिया मुराद, इस्लामिक स्टेट ह्या दहशवादी संघटनेच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घेतलेल्या नादिया मुराद बासी ताहाची यूनाइटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स एंड क्राइमच्या गुडविल अम्बेसेडरपदी नेमणूक करण्यात आली आहे. नादिया ही यज़ीदी लोकांची प्रतिनिधी असून २०१६ च्या नोबेल परितोषकासाठी नामांकित आहे.
३. २०१७ ची अफ्रीकन डेवलपमेंट बैंक ग्रुप मीटिंग कोणत्या देशामध्ये भरविण्यात येणार आहे?
उत्तर - भारत, भारताने नुकतेच अफ्रीकन विकास बँकेसोबत भारतातील अहमदाबादमधील महात्मा गांधी कन्वेंशन सेंटरमध्ये वार्षिक बैठक भारविण्यासाठी सामंजस्य करार केला असून ही बैठक २२ ते २६ मे २०१६ दरम्यान पार पडणार आहे. ही परिषद २०१७ मधील एक मोठी अंतरराष्ट्रीय बैठक असेल त्याचप्रमाणे ८० देशातील गवर्नर, पॉलिसी मेकर्स, अर्थविषतज्ञ असे ५००० प्रतिनिधी उपस्थित असतील.
४. २०१६ चा मारकोनी सोसाइटी पॉल बरन यंग स्कॉलर अवार्ड कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्तीला मिळाला आहे?
उत्तर - दिनेश भराड़िया, भारतीय वंशाचे वैज्ञानिक दिनेश भराड़िया यांना प्रतिशिष्ठ मार्कोनी सोसायटी पॉल बरन पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. त्यांना हा पुरस्कार, रेडियो वेव्सचे एकाच चॅनेलमधून देवाणघेवाण करण्यासाठी मिळाला आहे. हा पुरस्कार नोबेल परितोषिका इतकाच प्रतिशिष्ठ असून ४००० डॉलर देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
५. कोणत्या देशाने तिआनगोंग-२ ह्या अवकाश प्रयोगशाळेचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे?
उत्तर - चीन, अवकाश तंत्रज्ञानाचा आणि मेडिकल त्याचप्रमाणे अवकाशामध्ये प्रयोग करण्यासाठी चीनने तिआनगोंग-२ चे प्रक्षेपण केले आहे. गोबीच्या वाळवंटामध्ये असलेल्या जिउकुआन उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून लॉन्ग मार्च २-फ टी२ रॉकेटद्वारे त्याचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
६. शक्तिशाली टाइफून मेरांतीने कोणत्या देशाचे जनजीवन विस्कळीत केले आहे?
उत्तर - चीन, चीनच्या फुजियान राज्यामध्ये १७३किमीप्रतीतास वाहणाऱ्या टाइफून मेरांतीने धडक दिली असून २०१६ मधील आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली वादळ होते. ह्या वादळाला फिलिफिंसमध्ये टाइफून फड़िए असेही संबोधिले जाते. फुजियान राज्यामध्ये प्रवेश करण्याआधी हे वादळ दक्षिण तैवान आणि चिनच्या इतरही भागात धडकले होते. 

Tuesday 20 September 2016

चालू घडामोडी : १६ सप्टेंबर

१. २०१५ च्या राष्ट्रीय मानवी पुरस्कारा (नॅशनल हयूमैनिटिज़ मैडल) साठी कोणत्या भारतीय-अमेरिकन लेखकाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - अब्राहम वेर्घीज़, अब्राहम वेर्घीज़ यांची २०१५ च्या नॅशनल हयूमैनिटिज़ मैडलसाठी निवड करण्यात आली आहे. २१ सप्टेंबर रोजी त्यांना हा पुरस्कार अमेरिकेतील वॉशिंगटनमध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार व्यक्ती किंवा समूहाला प्रदान करण्यात येतो.
२. इंदिरा गांधी कृषी विश्वविदयालय कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे?
उत्तर - छत्तीसगढ़, एग्रीकल्चर म्यूजियमने छत्तीसगढ़मधील रायपुरमध्ये  इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालयाचे उद्धघाटन केले आहे. त्याचप्रमाणे ह्यप्रकारचे हे भारतातील पहिले कृषी विद्यापीठ आहे. ग्रामीण भागातील लोकांना शेती पद्धती, शेतीविषक समस्या आणि त्यांचे उपाय देणे यामागचे मुख्य उदिष्ट आहे. त्याचप्रमाणे छत्तीसगढ़मधील शेती आणि आदिवासी संस्कृतीचे प्रदशन करणे हेही असेल.
३. 'शांति की तलाश मैं जिंदगी' पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?
उत्तर - राधिका नागरथ, हरिद्वारच्या लेखिका आणि पत्रकार राधिका नागरथ यांनी शांति की तलाश मैं जिंदगी पुस्तकाचे लेखन केले आहे. त्याने ही पुस्तक साध्या तात्विक भाषेमध्ये लिहले असून त्यांना जोड म्हणून दररोजच्या जीवनातील किस्सयांची जोड दिली आहे. ह्या पुस्तकाचे प्रकाशन उत्त्तराखंडच्या राज्यपाल के के पॉल यांच्या हस्ते करण्यात आले.
४. रामकुमार रामनाथन कोणत्या खेळाशी निगडित आहे?
उत्तर - टेनिस, रामकुमार रामनाथन हा भारतीय टेनिस खेळाडू असून डेविस कपच्या एकेरी प्ले ऑफमध्ये त्याची लढत १४ वेळा ग्रैंड स्लैम विजेत्या राफेल नदलसोबत होणार आहे.
५. ओज़ोन थराच्या रक्षणासाठी अंतरराष्ट्रिय दिन साजरा केला जातो त्यासाठीची यंदाची थीम काय आहे?
उत्तर - ओज़ोन एंड क्लाइमेट: रेस्टोर बाय ए वर्ल्ड यूनाइटेड, ओजोन थराच्या रक्षणासाठी १९८७ पासून मोंटेरल प्रोटोकॉलनुसार दरवर्षी १६ सप्टेंबरला अंतरराष्ट्रीय प्रिजर्वेशन दिन साजरा केला जातो.
६. डाळींच्या पुरवठ्यामध्ये आलेल्या तूटीला हाताळण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली आहे?
उत्तर - अरविंद सुब्रमनियन समिती, डाळींच्या पुरवठ्यामध्ये आलेल्या तूटीला हाताळण्यासाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून तिचे प्रमुख मुख्य आर्थिक सल्लागार अरविन्द सुब्रमनियन आहेत. ही समिती आपला अहवाल अर्थमंत्री अरुण जेठली यांना देणार आहे. ही समिती डाळींसाठी मिनिमम सपोर्ट प्राइस, डाळ उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बोनस हे विषय देखील हाताळणार आहे. 

Monday 5 September 2016

चालू घडामोडी : १५ सप्टेंबर

१. २०१६ ची दुलीप क्रिकेट टूर्नामेंट कोणी जिंकली आहे?
उत्तर - इंडिया ब्लू, ५५ वी २०१६ ची दुलीप क्रिकेट टूर्नामेंट इंडिया ब्लू संघाने जिंकली आहे. नोएडामध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये इंडिया ब्लूने इंडिया रेडचा ३५५ धावांनी पराभव केला. ही पहिला क्रिकेट मालिका होती जी डे/नाईट आणि गुलाबी बॉलने खेळली गेली.
२. २०१६ ची नॉन अलायंग मूवमेंट परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - वेनेज़ुएला, १७ वी २०१६ ची नॉन अलायंग मूवमेंट परिषद वेनेज़ुएलाच्या मार्गरिटा आइलैंड मध्ये १७-१८ सप्टेंबर रोजी पार पडली. ही परिषद जगातील दूसरी सर्वात मोठी परिषद असून भारत ह्या परिषदेचा संस्थापक सदस्य आहे. ह्या परिषदेची स्थापना ५५ वर्षांपूर्वी २५ विकसशील देशातील नेत्यांनी केली होती, ह्या नेत्यांमध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू देखील होते. पहिली परिषद १९६१ मध्ये झाली होती.
३. अरुणाचल प्रदेशचे नवनिर्वाचित राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
उत्तर - व्ही शंमुगनाथन, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून व्ही शंमुगनाथन यांनी शपथ ते सध्या मेघालय राज्याचे राज्यपाल असून त्यांना अरुणाचलचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे.
४. स्वच्छ भारत अभियानाच्या मैस्कॉट म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - कुंवर बाई, १०५ वर्षाच्या कुंवर बाई यांची स्वच्छ भारत अभियानाच्या मैस्कॉट म्हणून निवड करण्यात आली आहे. स्वतःच्या शेळ्या विकून त्यांनी गावामध्ये शौचालये बांधून दिली आहेत. १७ सप्टेंबर २०१६ रोजी मोदींनी स्वच्छता दिवस साजरा केला आणि त्यांची निवड ही केली.
५. कोणत्या भारतीय व्यक्तीला ज्यूइश मानाधिकार संघटनने मानवतावादी पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे?
उत्तर - श्री श्री रवी शंकर, आध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांना ज्यूइश मानवाधिकार संघटनने मानतावादी पुरस्कार देऊन करणार आहे. ते आर्ट ऑफ़ लिविंगचे संस्थापक असून  त्यांनी त्यामार्फत लोकांमध्ये सहिष्णुता, मानवतावाद, एकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. २१ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांना साइमन वीएसएंथल सेंटरच्या 'दी साइमन वीएसएंथल ह्यूमैनिटेरिअन लॉरेट' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
६. निसर्गाचे सहकारी (फेलोस ऑफ नेचर) दक्षिण आशयाई लघुकथा पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर - मेघना पंत, मेघना पंत यांना फेलोस ऑफ नेचर दक्षिण आशयाई लघुकथा पुरस्काराने ऑक्टोबर २०१६ मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या 'पीपल ऑफ़ दी सन' या लघुकथेसाठी मिळणार आहे. हा पुरस्कार फ्रेंच इंस्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या सहयोगाने दिला जातो. निसर्गाचे होणारे नुकसान साहित्याच्या माध्यमातून लोकांच्या नजरेत यावे यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. 

Saturday 3 September 2016

चालू घडामोडी : २५ ऑगस्ट

१. केंद्र सरकारने दिव्यांग जनतेसाठी केंद्र सरकारने कोणती ई-लायब्रेरी सुरु केली आहे?
उत्तर - सुगम्य पुस्तकालय, प्रधानमंत्री सुगम्य भारत आभियानाअंतर्गत केंद्र सरकारने सुगम्य पुस्तकालय ही ई-लायब्रेरी सुरु केली आहे. ही ऑनलाइन लाइब्रेरी असून दिव्यांग व्यक्ती कोणत्याही प्रकाशकाचे कोणत्याही भाषेतील पुस्तक वाचू शकते आणि ही पुस्तके वेगवेगळ्या फॉर्मेट्समध्ये उपलब्ध आहेत. ह्या पुस्तकालयामध्ये विविध भाषेतील मिळून २ लाखाहून अधिक पुस्तके आहेत. ही ऑनलाइन लाइब्रेरी बुकशेयर आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ विसुअली हैंडीकैप्ड, मेंबर आर्गेनाईजेशन ऑफ डेज़ी फोरम ऑफ इंडियाच्या सहकार्यातून सुरु करण्यात आली आहे.
२. के के श्रीधरन नायर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - पत्रकारिता, के के श्रीधरन यांचे नुकतेच केरळमधील कोची येथे निधन झाले ते ८६ वर्षाचे होते ते मातृभूमी मासिकाचे संपादक होते.
३. डॉ. ए आर किडवाई यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या कार्यक्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - राजकारण, डॉ. अख़लाक़ उर रहमान किडवाई यांचे नुकतेच निधन झाले ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते, खासदार आणि प्रशासक होते. त्याचप्रमाणे ते बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थान राज्यांचे माजी  होते त्याचप्रमाणे त्यांना २०११ मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.
४. दक्षिण भारतातील पहिले अल्पवयीन मुलांसाठी असलेले चिल्ड्रन कोर्ट कोणत्या शहरामध्ये सुरु करण्यात आले आहे?
उत्तर - हैद्राबाद, अल्पवयीन मुलांसाठी असलेले दक्षिण भारतातील चिल्ड्रन कोर्ट हैद्राबादमधील नामपल्ली क्रिमीनल कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये सुरु करण्यात आली आहे. अशा प्रकारचे भारतातील हे सहावे कोर्ट असून मुलांसाठी वेगळी वेटिंग रूम, आरोपीसाठी वेगळी व्हिडीओ ट्रायल रम यांची सोय आहे.
५. भारताने कोणत्या शेजारील देशातील श्रोत्यांसाठी आकाशवाणी मैत्री हा नवीन चैनल सुरु केला आहे?
उत्तर - बांग्लादेश, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कलकत्ता राजभवनामध्ये बंगाली श्रोत्यांसाठी आकाशवाणी मैत्री चैनल सुरु केला आहे. हा चैनल ऑल इंडिया रेडियोच्या माध्यमातुन सुरु करण्यात आला असून भारत आणि बांग्लादेश मधील सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि नैतिक दूरी कमी होण्यासाठी सुरु करण्यात आला आहे.
६. रिओ २०१६ मध्ये भारतीय नेमबाजांचा झालेल्या बोजवाऱ्यावर नॅशनल राइफल एसोसिएशन ऑफ इंडिया कमिटी स्थापन करण्यात आली आहे तिच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - अभिनव बिंद्रा, रिओ २०१६ मध्ये भारतीय नेमबाजांचा बोजवारा झाला त्यासाठी ५ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून अभिनव बिंद्रा हा ह्या समितीचा अध्यक्ष आहे. अभिनव बिंद्रा हा भारतीय संघाचा सदस्य होता, तो प्रत्येक नेमबजाला प्रश्न विचारुन त्यांची मुलाखत घेणार आहे. त्यानंतर ही समिती भविष्यातील ओलंपिक्ससाठी आपले बदल आणि अहवाल सादर करेल.
७. २०१६ च्या भारतीय अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणता देश फोकस्ड देश असेल?
उत्तर - दक्षिण कोरिया, ४७ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया २०१६ मध्ये दक्षिण कोरिया हा देश फोकस्ड देश असेल. यादरम्यान दक्षिण कोरियाचे चित्रपट आणि चित्रपट व्यक्तिमत्व उपस्थित राहतील. हा महोत्सव नोव्हेम्बर मध्ये गोव्यात पार पडणार आहे. 

चालू घडामोडी : २४ ऑगस्ट

१. बिश्वेश्वर नंदी यांची २०१६ च्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, ते कोणत्या खेळाशी निगडित आहेत?
उत्तर - जिमनास्टिक्स, २०१६ चा द्रोणाचार्य पुरस्कार ६ प्रशिक्षकांना प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये दीपा करमकरचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी, विराट कोहलीचे गुरु राजकुमार शर्मा, नागपुरी रमेश (एथेलेटिक्स), सागर माल धायल (बॉक्सिंग), एस प्रदीप कुमार (पोहणे), महाबीर सिंग (कुस्ती) यांचा समावेश आहे. यासोबतच ह्या पुरस्कारांसोबत १५ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार तर ३ ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
२. ओ पी जैशा कोणत्या खेळाशी निगडित आहे?
उत्तर - अथेलेट, केरळची असणारी भारतीय धावपटू ओ पी जैशा हीने भारतीय ओलिंपिक अधिकाऱ्यांवर आरोप केल्यामुळे नुकतीच चर्चेमध्ये होती. रिओमध्ये रेस दरम्यान तिला कोणत्याही प्रकारचे पाणी, एनर्जी ड्रिंक उपलब्ध नसल्यामुळे ती ट्रैकवार पडली. ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी खेळ मंत्रालयाने ओंकार केडिया, विनायक नारायण ही दोन-सदस्यीय समिती नेमली आहे. ती समिती ७ दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करेल.
३. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयासोबत १० नॉन-फंक्शनल रिजनल विमानतळांसाठी कोणत्या राज्याने करार केला आहे?
उत्तर - महाराष्ट्र, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयासोबत १० नॉन-फंक्शनल रीजनल विमानतळांसाठी करार महाराष्ट्र राज्य सरकारने केला असून असे करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. सामान्य जनतेला विमान प्रवास परवडणारा आणि सोयीस्कर व्हावा यासाठी मंत्रिमंडळाने जून २०१६ मध्ये नॅशनल सिविल एविएशन पॉलिसी केली होती ह्याअंतर्गतच विमानतळांची निर्मिती करण्यात येणार आहे. ह्या विमानतळांमध्ये कोल्हापूर, शिर्डी, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड़, सोलापुर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग यांचा समावेश आहे. ह्या प्रकल्पामध्ये राज्य सरकार २०% गुंतविणार असून बाकी केंद्र सरकार मदत करेल.
४. व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे?
उत्तर - जर्मनी, व्यावसायिक प्रशिक्षणासाठी भारताने जर्मनीसोबत करार केला आहे. ह्या कराराअंतर्गत जर्मन टेक्नलॉजीचा वापर करून भारतीय आणि जर्मन कंपन्यांदरम्यान भागीदारी करून स्थानिक प्रशिक्षण संस्था, उद्योगांमध्ये लिंकेज वाढवून भारतीय उद्योगांना चालना देने.
५. जगातील सर्वात मोठी इंडोर थीम पार्क कोणत्या शहरामध्ये सुरु करण्यात आली आहे?
उत्तर - दुबई, जगातील सर्वात मोठे इंडोर थीम पार्क यूनाइटेड अरब इमिरतीमधील दुबई शहरामध्ये सुरु करण्यात आली आहे. आईएमजी वर्ल्ड ऑफ़ एडवेंचर ही सर्वात मोठी इंडोर थीम पार्क दुबईमध्ये येणाऱ्या प्रवाश्यांना आकर्षक करण्यासाठी उभारण्यात आली आहे.
६. पहिला ब्रिक्स फिल्म फेस्टिवल कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे?
उत्तर - भारत, पहिली ब्रिक्स फिल्म फेस्टिवल भारतामध्ये नवी दिल्लीतील सिरीफोर्ट ऑडिटोरियम कॉम्प्लेक्समध्ये २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. ब्रिक्स देशांमधील सदस्य देशांमधील कलाकार, चित्रपट, संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असून सर्वोत्कृष्ट चित्रपटांना, कलाकारांना, निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 

Sunday 28 August 2016

चालू घडामोडी : २३ ऑगस्ट

१. इंडिया पोस्ट पेमेंट बँक्सच्या बोर्डवर स्वतंत्र्यसंचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - आर एस सोढ़ी, अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोढ़ी यांची इंडिया पोस्ट पेमेंट बँक्सच्या बोर्डवर संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ते मंडळातील ५ स्वातंत्र्य सदसयांपैकी एक असतील, हे मंडळ मार्च २०१७ पासून कार्यान्वित होणार आहे. ही विशिष्ठ बँक असून डिमांड डिपाजिट, रेमिटांस सर्विसेस, इंटरनेट बँकिंग आणि इतर सुविधा देईल.
२. 'वन इंडियन गर्ल' ही कादंबरी कोणी लिहली आहे?
उत्तर - चेतन भगत, वन इंडियन गर्ल ह्या कादंबरीचे लेखन चेतन भगत यांनी केले असून ह्या कादंबरीमध्ये त्यांनी एका हुशार, यशस्वी भारतीय मुलीची कथा मांडली आहे जिला आपले प्रेम मिळविण्यासाठी खूप अडथळे पार करावे लागतात.
३. रिओ ओलिंपिक २०१६ च्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये भारताकडून कोणी भारतीय ध्वज घेवून गेले?
उत्तर - साक्षी मलिक, फ्रीस्टाइल कुस्तीपटु साक्षी मलिक ही रिओ ओलिंपिकच्या क्लोजिंग सेरेमनीमध्ये  फ्लैग बेयरर होती. तीने भारतासाठी फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये ५८ किलो वजनीगटामध्ये कांस्य पदक जिंकले. यासोबतच ओलिंपिक कुस्तीमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महीला खेळाडू बनली आहे.
४. कोणत्या भारतीय राज्याने स्वतःचा अंतर्गत सुरक्षा कायदा तयार करणारे पहिले राज्य बनले आहे?
उत्तर - महाराष्ट्र, स्वतःचे अंतर्गत सुरक्षा कायदा (इंटर्नल सिक्यूरिटी एक्ट) म्हणजेच '२०१६ महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटर्नल सिक्यूरिटी एक्ट' निर्माण करणारे महाराष्ट्र पहिले भारतीय राज्य आहे. दहशदवाद, बंद, जातीयवाद, हिंसाचार यांना तोड़ देण्यासाठी हा कायदा निर्माण करण्यात येणार असून या कायद्याचा भांग करणाऱ्याला तीन वर्षे ते आजन्म कारावासाची शिक्षा होउ शकते. त्याचप्रमाणे पोलिसांना ह्या कायद्याअंतर्गत ज्यादा अधिकार देण्यात येणार आहेत.
५. पंजाबच्या राज्यपालपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - व्ही पी सिंग बंदोर, पंजाबचे नवे राज्यपाल म्हणून व्ही पी सिंग बंदोर यांनी शपथ घेतली असून ते चंडीगढ़चे प्रशासक ही आहेत. त्यांनी ही शपथ पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश वजीफदारकडून घेतली. त्यांची ही नेमणूक कप्तानसिंग सोलंकी यांच्या जागी करण्यात आली आहे. कप्तानसिंग सोलंकी हे हरियाणाचे राज्यपाल आहेत.
६. २०१६ चा कबड्डी वर्ल्ड कप कोणते भारतीय राज्य भारविणार आहे?
उत्तर - गुजरात, २०१६ चा कबड्डी वर्ल्ड कप गुजरातमधील अहमदाबादमध्ये ७ ते २२ ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे. ह्या चषकामध्ये १२ देशांचे संघ सहभागी होणार आहेत, अमेरिका, कनाडा, यूनाइटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, ईरान, पोलैंड, पाकिस्तान, बांग्लादेश, कोरिया, जापान, केनिया. स्टार स्पोर्ट्स हा ह्या मालिकेचा अधिकृत प्रसारक असेल.
७. २०१६ च्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने किती खेळाडूंना प्रदान करण्यात येणार
आहे?
उत्तर - चार, २०१६ च्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने चार भारतीय खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये ओलिंपिक पदक विजेत्या पी व्ही सिंधू, साक्षी मालिक, जिमनीस्ट दीपा करमकर, नेमबाज जीतू राय यांचा समावेश आहे. पहिल्यांदाच भारतातील खेळामधील सर्वोच्च पुरस्कार ४ जणांना प्रदान करण्यात येणार आहे. हे पुरस्कार २९ ऑगस्टला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. 

चालू घडामोडी : २१, २२ ऑगस्ट

१. फ़्रांसचा सर्वोच्च पुरस्कार शेवलिएर पुरस्कारासाठी कोणत्या भारतीयाची निवड करण्यात आली आहे?उत्तर
उत्तर - कमल हसन, सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांची फ्रांसच्या सर्वोच्च पुरस्काराअंतर्गत दी नाइट ऑफ दी ऑर्डर ऑफ आर्टस एंड लेटर्स पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार मिळविणारे ते २६ वे भारतीय असून तमिळ चित्रपटसृष्ठीमध्ये हा पुरस्कार मिळविणारे दूसरे अभिनेते आहेत.
२. मुंबईमध्ये असलेल्या होमी भाभा नॅशनल इंस्टिट्यूटच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - पी डी गुप्ता, प्रसिद्ध वैज्ञानिक पी डी गुप्ता यांची मुंबईमधील होमी भाभा नॅशनल इंस्टिट्यूटच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. होमी भाभा इंटीट्यूट हे युजीसी कायद्याअंतर्गत आण्विक ऊर्जेसाठीचे डीम्ड विद्यापीठ आहे. ही संस्था आण्विक तंत्रज्ञानाअन्तर्गत इंजिनीरिंग साइन्स, गणिती अभ्यास यांना प्रोत्साहन देण्याचे काम करते.
३. २०१६ ची ब्रिक्स आपत्ती व्यवस्थापन परिषद भारतातील कोणत्या शहरामध्ये पार पडली?
उत्तर - उदयपुर, दूसरी ब्रिक्स आपत्ती व्यवस्थापन परिषद २०१६ राजस्थानातील उदयपुरमध्ये २२, २३ ऑगस्ट रोजी पार पडली. ही परिषद दोन मुख्य मुद्द्यांवर आधारित होती, 'पूर जोखीम व्यवस्थापन' आणि 'हवामान बदलासंदर्भात आगामी हवामानाचा अंदाज करणे'. ह्या दोन दिवसीय बैठकीमध्ये ब्रिक्सदेशांनी त्यांच्या देशातील पूर व्यवस्थापनातील अनुभव त्याचप्रमाणे सध्याची फोरकास्टिंग टेक्निकस एकमेकांना शेयर केल्या.
४. भारत संचार निगम लिमिटेड दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान सुविधांसाठी कोणत्या बड्या कंपनीसोबत करार केला आहे?
उत्तर - माइक्रोसॉफ्ट, भारत संचार निगम लिमिटेड अर्थातच बीएसएनएलने आपल्या मोठया बिज़नेस ग्राहकांना माहिती तंत्रज्ञान आणि क्लाउड सर्विसेससाठी माइक्रोसॉफ्टसोबत सामंजस्य करार केला आहे. ह्या करारामुळे सरकारी संस्था त्याचप्रमाणे बीएसएनएलचे मोठे ग्राहक यांना व्हिडिओ कांफेरेंस, इतर ऑडियो सुविधांचा लाभ घेणे सोपे जाणार आहे.
५. जागतिक मच्छर दिन कोणत्या दिवशी पाळाला जातो?
उत्तर - ऑगस्ट २०, माच्छरांपासून होणाऱ्या मलेरियाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे मलेरिया ठीक करण्यासाठी लागणाऱ्या संशोधनासाठी फंड गोळा करण्यासाठी जागतिक मच्छर दिन दरवर्षी २० ऑगस्टला पाळाला जातो. १८९७ मध्ये ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी मलेरियाचा शोध लावला याच घटनेला उजाळा देण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो. मलेरिया हा एनोफेलीजच्या मादी डासापासून मानवामध्ये प्रक्षेपित होतो.
६. सुब्रता बॅनर्जी यांचे नुकतेच निधन झाले ते खेळाशी संबंधित होते?
उत्तर - क्रिकेट, माजी अंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच सुब्रता बॅनर्जी यांचे नुकतेच कलकत्त्यामध्ये निधन झाले ते ७१ वर्षांचे होते. त्यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाची (पंच) कारकीर्द १५ वर्षांची होती. मे १९९८ ग्वालियरमध्ये झालेल्या भारत आणि केनिया मधील मैच त्यांची शेवटची मैच होती. त्यांनी बीसीसीआय अंतर्गत पंच प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.
७. कोणत्या भारतीयाला ओलिंपिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित केले आहे?
उत्तर - एन रामचंद्रन, भारतीय ओलिंपिक एसोसिएशनचे अध्यक्ष एन रामचंद्रन यांना ओलिंपिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांनी ओलिंपिक चळवळीसाठी केलेल्या कार्यासाठी मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाच यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ओलिंपिक आर्डर हा ओलिंपिक चळवळींसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. 

Saturday 27 August 2016

चालू घडामोडी : २० ऑगस्ट

१. २०१६ च्या ब्रिक्स महिला खासदार परिषद कोणत्या भारतीय शहरामध्ये पार पडली?
उत्तर - जयपुर, २०१६ ची ब्रिक्स महिला खासदार परिषद राजस्थानातील जयपूर शहरामध्ये पार पडली. दोन दिवसीय परिषदेचे उद्धघाटन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी केले. ह्या परिषदेमध्ये ब्रिस्क देशांमधील ४२ महिला खासदारांनी सहभाग घेतला होता.
२. २०१६ ची तरुण मतदार फेस्टिवल कोणत्या भारतीय राज्यामध्ये पार पडणार आहे?
उत्तर - नागालैंड, २०१६ ची तरुण मतदार फेस्टिवल नागालैंडमध्ये सप्टेंबर ५ ते सप्टेंबर ९ दरम्यान पार पडेल. हा कार्यक्रम भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्फत पडेल. ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे मतदानामध्ये तरुण मतदारांची टक्केवारी वाढविणे त्याचप्रमाणे स्वच्छ आणि नैतिक मतदार वाढवून लोकशाहीला बळकट बनविणे.
३. २०१५ च्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - सुनीता जैन, हिंदी भाषेच्या लेखिका सुनीता जैन यांना २०१५ च्या व्यास सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार के के बिर्ला फाउंडेशनद्वारे दिला जातो त्याचप्रमाणे रु. २.५० रोख असे पुस्काराचे स्वरुप आहे.
४. जागतिक मानवतावादी दिन (वर्ल्ड ह्यूमैनिटेरिअन डे) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - १९ ऑगस्ट, जागतिक मानवतावादी दिन दरवर्षी १९ ऑगस्टला सामाजिक कार्यकर्ता उदा. ऐड वर्कर्स आपले जीवन धोक्यात टाकून मानवतावादी सेवा देत असतात त्यांच्या या कार्याला उजाळा देण्यासाठी हा दिन पळाला जातो. ह्या दिवसाबाबत वन ह्यूमैनिटी ही २०१६ ची थीम होती.
५. 'दी ओसियन ऑफ चर्ण: हाउ दी इंडियन ओसियन शेप्ड ह्यूमन हिस्ट्री' पुस्तक कोणी लिहले आहे?
उत्तर - संजीव संयाल, 'दी ओसियन ऑफ चर्ण: हाउ दी इंडियन ओसियन शेप्ड ह्यूमन हिस्ट्री' पुस्तकाचे लेखक संजीव संयाल असून त्यांनी ह्या पुस्तकामध्ये हिंदी महासागराचा मध्ययुगीन इतिहास, त्याच्यावरून झालेले भौतिकराजकरण त्याचप्रमाणे मानवाचा उदय, त्याने निर्माण केलेली संस्कृती याचे वर्णन केले आहे.
६. संयुक्त राष्ट्राच्या आशिया पैसिफिकसाठी असलेल्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाच्या अहवालानुसार फिक्स्ड ब्रॉडबैंड एडॉप्शन सर्वेमध्ये भारत कोणत्या स्थानी आहे?
उत्तर - ३९ व्या, संयुक्त राष्ट्राच्या आशिया पैसिफिक आर्थिक आणि सामाजिक आयोगाच्या आशिया पैसिफिक माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान २०१६ अहवालानुसार फिक्स्ड ब्रॉडबैंड एडॉप्शन क्रमवारीमध्ये भारत ३९ व्या स्थानी आहे. ह्या यादीमध्ये आशिया पैसिफिक विभागातील ५३ देशांचा समावेश होता, ह्या यादीमध्ये प्रथम स्थानी आहे होंगकॉन्ग त्याखालोखाल न्यूज़ीलैंड, जापान, माको, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर.
७. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - उर्जित पटेल, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि बैंकर उर्जित पटेल यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली आहे. सध्या ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे उप-गव्हर्नर असून रघुराम राजन यांच्या जागी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते आपला पदभार ४ सप्टेंबर पासून स्वीकारतील. 

Tuesday 23 August 2016

चालू घडामोडी : १८, १९ ऑगस्ट

१. 'एयरलैंडर १०' जगातील सर्वात मोठया विमानाने यशस्वी उड़ान घेतले ते कोणत्या देशासोबत निगडित आहे?
उत्तर - यूनाइटेड किंगडम, जगातील सर्वात मोठे (लांब) विमान एयरलैंडर १० ने मध्य इंग्लैंडमधील कार्डिंगटन हवाई क्षेत्रातून यशस्वीरित्या उडान केले. हे एक हायब्रिड विमान असून ते हाइब्रिड एयर वेहिकल्स कंपनीने यूनाइटेड किंगडममध्ये बनविले आहे. हे विमान ९२ मीटर लांब असून ह्यामध्ये हेलियम वायू भरला आहे. हे विमान ४८८० मीटर ऊंच उडू शकते आणि १४८ किमी प्रती तास वेगापर्यंत जाऊ शकते. २ आठवड्यापर्यंत हे विमान विनामाणसाचे उडू शकते तर कोणी आपल्या व्यावसायिक कारणासाठी वापर केला तर ५ दिवस मानवासोबत राहू शकते.
२. बांधकाम चालू असणाऱ्या पॉवर ट्रांसमिशन प्रोजेक्टसवार लक्ष ठेवून अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते मोबाइल ऍप सुरु केले आहे?
उत्तर - तरंग, ऊर्जा मंत्रालयाने बांधकाम चालू असलेल्या पॉवर ट्रांसमिशन प्रोजेक्ट्सवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रांसमिशन ऍप फॉर रियल टाइम मॉनिटरिंग एंड ग्रोथ (तरंग) ऍप सुरु केले आहे. हे एक प्रभावी ऍप असून नवीन येणाऱ्या ट्रांसमिशन प्रोजेक्टसवर त्याचप्रमाणे देशामध्ये आणि देशाबाहेरील ट्रांसमिशन प्रोजेक्ट्सवर लक्ष ठेवून असेल आणि अंमलबजावणी ही करेल. यासोबतच ऊर्जा मंत्रालयाने 'डीप' (ऑनलाइन बोलीसाठी) इ-बिडिंग सुरु केली आहे.
३. वर्ल्ड ट्रॉमा काँग्रेस २०१६ कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - भारत, २०१६ ची वर्ल्ड ट्रॉमा काँग्रेस भारतामध्ये नवी दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये १८ ते २० ऑगस्ट दरम्यान पार पडली. ह्या परिषदेचे उद्धघाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी केले. यंदाचे वर्ष ह्या परिषदेचे तीसरे वर्ष होते. ट्रॉमा केयर क्षेत्रातील विचार, कल्पना, अनुभव, केस स्टडीज शेयर करने आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर स्विकारलेले प्रोटोकॉल्स आणि सिस्टम्स यांची भूमिका समजावून घेणे हे ह्या परिषदेचे मुख्य उद्देश होते.
४. भारताने कोणत्या शेजारील देशासोबत पेट्रोलियम उत्पादनाच्या वाहतुकीसाठी अल्पकालीन मार्ग करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - बांग्लादेश, भारत सरकारने बांग्लादेशसोबत आसाममधून त्रिपुरामध्ये पेट्रोलियम उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी शॉर्ट टर्म रूट एग्रीमेंट केले आहे. आग्नेय भारतामध्ये नुकत्याच पुरामुळे तेथील रस्त्यांची अवस्था खूप ख़राब झाली आहे म्हणून हा करार करण्यात आला आहे. ह्या करारानुसार भारत सप्टेंबर २०१६ पर्यंत पेट्रोलियम उत्पादने उदा. पेट्रोल, डीजल, केरोसिन, एलपीजीची वाहतूक करेल.
५. 'दी ओर्फनेज ऑफ़ वर्ड्स' हे पुस्तक कोणी लिहले आहे?
उत्तर - शीनी एंथोनी, दी ओर्फनेज ऑफ़ वर्ड्स पुस्तकाच्या लेखिका शीनी एंथोनी आहेत.
६. जगातील सर्वात ऊंच आणि सर्वात लांब ग्लास बॉटम ब्रिज कोणत्या देशामध्ये सुरु करण्यात आला आहे?
उत्तर - चीन, चीनच्या जहांगजिएजि प्रांतामध्ये प्रवाश्यांसाठी जगातील सर्वात ऊंच आणि लांब ग्लास बॉटम ब्रिज खुला करण्यात आला आहे. हा पूल ४३० मीटर लांब असून ६ मीटर रुंद आहे त्याचप्रमाणे तीन लेयरच्या पारदर्शक ९९ पैनेल्सपासून बनविण्यात आला असून तो दोन पर्वतांना जोडतो. हा पूल जमिनीपासून ३०० मीटर उंचीवर आहे. दररोज ८००० प्रवाशी ह्या पूलावरून जाऊ शकतात, त्याचप्रमाणे ह्या पुलाला भेट देण्यासाठी आरक्षण करने गरजेचे आहे. ह्या पुलाने डिजाईन आणि बांधकामामध्ये १० जागतिक विक्रम केले आहेत. 

Sunday 21 August 2016

चर्चेतील व्यक्ती

उर्जित पटेल - रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर
केंद्र सरकारने उर्जित पटेल यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक केली असून ते रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर आहेत. त्यांचा हा गव्हर्नरपदाचा कारभार तीन वर्षांचा असून त्यांची ही नेमणूक रघूराम राजन यांच्या जागी करण्यात आली आहे. हे रिझर्व्ह बँकेचे ८वे उप-गव्हर्नर आहेत त्यांची गव्हर्नरपदी वर्णी लागली आहे.
उर्जित पटेल यांच्याविषयी:
* २८ ऑक्टोबर १९६३ रोजी गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला, १९९० मध्ये त्यांनी येल यूनिवर्सिटीकडून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली तर १९८६ मध्ये ऑक्सफ़ोर्ड यूनिवर्सिटीकडून एम फिल पदवी मिळविली.
* व्यवसायने ते ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ, सल्लागार आणि बैंकर आहेत. त्यांना आर्थिक, एनर्जी, इंफ्रास्ट्रक्टरए क्षेत्रामधील २० हून अधिक वर्षांचा अनुभव आहे.
त्यांनी १९९० ते १९९५ दरम्यान अंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये अंतर्गत अमेरिका, भारत, बहामास, म्यानमारमध्ये काम केले आहे.
* जानेवारी २०१३ त्यांची प्रथमच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उप-गव्हर्नरपदी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नेमणूक करण्यात आली होती नंतर जानेवारी २०१६ त्यांची पुन्हा त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला.
* यासोबतच त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विशेष समित्यांवरही काम केले आहे उदा. प्रत्यक्ष कर, विमानचलन, ऊर्जा, पेंशन्स इ.
नोट: भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील केंद्रीय बँक असून बँका, नोट छपाई, आर्थिक अस्थिरता यांचे नियमन करते. त्याचप्रमाणे ही सरकारची बँक म्हणूनही ओळखली जाते.

पी व्ही सिंधुने रिओ २०१६ मध्ये रौप्यपदक पटकविले
भारताची बैडमिंटन खेळाडू पुसराला वेंकटा सिंधुने रिओ २०१६ मध्ये बैडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकाविले. अंतिम सामन्यामध्ये ती जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या कैरोलिना मरीनकडून पराभूत झाली तर उपांत्यफेरीत तीने जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी असलेल्या जापानच्या वांग यिहानचा पराभव केला.
यासोबतच ओलंपिक्समध्ये बैडमिंटनमध्ये रौप्य पदक मिळविणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे, ओलंपिक्समध्ये पदक मिळविणारी ती पाचवी भारतीय महिला खेळाडू बनली आहे.
ओलंपिक्समध्ये रौप्य पदक जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू बनली याआधी २००४ एथेंस ओलंपिक्समध्ये राज्यवर्धन सिंग राठोड (नेमबाजी), २०१२ लंडन ओलंपिक्समध्ये सुशिल कुमार (कुस्ती) आणि विजय कुमार (नेमबाजी).

चालू घडामोडी : १७ ऑगस्ट

१. २०१६ चा ग्लोबल इनोवेशन इंडेक्स (जागतिक नावीन्यपूर्ण निर्देशांक) मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
उत्तर - ६६ व्या, २०१६ च्या ग्लोबल इनोवेशन इंडेक्समध्ये भारत ६६ व्या स्थानी आहे. हा रिपोर्ट कॉर्नेल यूनिवर्सिटी आणि वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आर्गेनाईजेशनने प्रसिद्ध केला आहे. ह्या निर्देशांकामध्ये १४१ देशांचा समावेश आहे. स्विट्ज़रलैंड प्रथमस्थानी असून यूनाइटेड किंगडम, अमेरिका, फ़िनलैंड आणि सिंगापूर असे खालोखाल आहेत.
२. भारतातील पहिली व्यापक अशी 'क्राइम क्रिमीनल ट्रैकिंग नेटवर्क सिस्टम' ही कोणत्या राज्य सरकारने सुरु केली आहे?
उत्तर - महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच भारतातील पहिली क्राइम क्रिमीनल ट्रैकिंग नेटवर्क सिस्टम महाराष्ट्रातील ४२ साइबर लैबद्वारे मुंबई मध्ये १५ ऑगस्ट ला सुरु केली. ह्या नवीन प्रणालीनुसार महाराष्ट्रातील सर्व पोलिस ठाणी एकमेकांना जोडली जाणार असून गुन्हा, त्याची माहिती, गुन्हेगार हे सर्व शेअर केले जाईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलिसांच्या डिजिटलाइजेशन साठी मार्ग मोकळा झाला आहे.
३. कोणत्या भारतीय शास्त्राज्ञाला २०१६ चा डॉ. ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - पी शन्मुगम, सेन्ट्रल लेदर रिसर्च इंस्टिट्यूटचे मुख्य शास्त्रज्ञ पी शन्मुगम यांनी यंदाचा डॉ. ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार पटाकाविला आहे. हा पुरस्कार तामिळनाडू सरकारतर्फे दिला जातो. ५ लाख, ८ ग्रामचे सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
४. आसमाच्या राज्यपालपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - बनवारीलाल पुरोहीत, नागपूरमधून ३ वेळा लोकसभा सदस्य राहिलेले आणि हितवादा नियतकालिकाचे व्यवस्थापकीय संपादक बनवारीलाल पुरोहीत यांची आसामच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची ही नेमणूक बालकृष्ण आचार्य यांच्या जागी करण्यात आली आहे.
५. मणिपूरच्या राज्यपालपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - नजमा हेपतुल्लाह, माजी केंद्रीय मंत्री नजमा हेपतुल्लाह यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नेमणूक झाली आहे. त्यांची ही नेमणूक व्ही शंमुगनाथन यांच्या जागी करण्यात आली आहे. शंमुगनाथन हे मेघालयचे राज्यपाल असून सप्टेंबर २०१५ पासून मणिपूरचे ही अतिरक्त राज्यपाल होते.
६. 'शांतता आणि विकासासाठी सुसंवाद'  ही २०१६ ची सार्क तरुण खासदार परिषद कोणत्या शहरामध्ये पार पडली?
उत्तर - इस्लामाबाद, शांतता आणि विकासासाठी सुसंवाद २०१६ ची सार्क युथ पार्लिमेंटेरिअन्स कॉन्फ्रेंस पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान पार पडली. ह्या परिषदेला भारतातून ३ तरुण खासदार सहभागी झाले असून त्यांचे नेतृत्त्व लोकसभा सदस्य कैलाश नारायण सिन देव यांनी केले आहे. 

Saturday 20 August 2016

चालू घडामोडी : १५, १६ ऑगस्ट

१. कोणत्या शहरामध्ये भारतातील पहिले बायो-सीएनजी प्लांट सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात आले आहे?
उत्तर - पुणे, भारतातील पहिल्या बायो-सीएनजी प्लांटचे उद्घाटन महाराष्ट्रातील पुण्यात करण्यात आले आहे. हा प्रकल्प शहरातीलच प्रामूव इंजीनियरिंग प्रायवेट लिमिटेड सुरु करणार असून ह्यामध्ये वाहनांमध्ये लागणाऱ्या सीएनजी निर्मितीसाठी कृषी अवशेषांचा उपयोग करण्यात येणार आहे. ह्या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी आणि संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते करण्यात आले. बायो-फ्यूल निर्मितीमुळे भारतामध्ये येणाऱ्या ५०% डीजलच्या आयतीवर रोक लागू शकतो.
२. भारतामध्ये पहिल्यांदाच आण्विक पुरवठादार (नुक्लेअर सप्लायर) साठी 'इन्शुरन्स पॉलिसी फॉर राईट टूरिकोर्स' कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
उत्तर - महाराष्ट्र, नुक्लेअर सप्प्लायर्ससाठी इन्शुरन्स पॉलिसी फॉर राईट टू रिकोर्स प्रोग्राम इंडिया नुक्लेअर इन्शुरन्स पूलने सुरु केला आहे. ह्या पॉलिसीचे अनावरण अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष शेखरबासु यांच्या हस्ते मुंबईमध्ये करण्यात आले.इंडिया न्युकिलर इन्शुरन्स पूल ही २७वी जागतिक नुक्लेअर इन्शुरन्स पूल असून तिची स्थापना केंद्र सरकारमार्फ़त चालविल्या जाणाऱ्या जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केली आहे.
३. रिओ २०१६ ओलंपिक्समध्ये पुरुष एकेरी टेनिसमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे?
उत्तर - एंडी मर्रे, ब्रिटिश टेनिस खेळाडू एंडी मर्रे याने रिओ २०१६ ओलंपिक्समध्ये पुरुष एकेरीमधील सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याने अंतिम सामन्यामध्ये अर्जेंटीनाच्या जुआन मार्टिन देल पोट्रोचा ७-५, ४-६, ६-२, ७-५ असा पराभव केला. त्याचप्रमाणे टेनिस इतिहासामध्ये सलग दुसर्यान्दा ओलिंपिक सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रमही केला आहे.
४. ७० व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर कोणाला मरणोत्तर अशोकचक्र देण्यात आले?
उत्तर - हवालदार हंगपन दादा, ७० व्या स्वातंत्र्यदिनी भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजेच अशोक चक्र हवालदार हंगपन दादा यांना मरणोत्तर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हंगपन दादा हे आसाम रेजिमेंट/ राष्ट्रीय राइफल्सच्या ३५ व्या बटालियनचे सैनिक होते. २७ मे २०१६ ला जम्मू काश्मीर मधील कुपवाड़ा येथे झालेल्या चकमकित ३ दहशदवादी मारल्यानंतर ते शहीद झाले. या वर्षी ८२ शौर्यपदके प्रदान करण्यात आली त्यामध्ये १ अशोकचक्र, १४ शौर्य चक्र, ६३ सेना मेडल्स, २ नौसेना मेडल्स, २ वायुसेना मेडल्सचा समावेश आहे.
५. जगातील पहिला हैक-प्रूफ सॅटॅलाइट कोणत्या देशाने प्रेक्षेपित केला आहे?
उत्तर - चीन, जगातील पहिला हैक-प्रूफ क्वांटम कम्युनिकेशन सॅटॅलाइट चीनने अवकाशामध्ये प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह अल्ट्रा हाई सिक्यूरिटीपासून बनविला असून वायरटैपिंग आणि इतर हैकिंगला विरोध करू शकतो.
६. ज़ाम्बियाच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - एडगर लूंगा, पेट्रियोटिक फ्रंटचे नेते एडगर लूंगा यांची दुसर्यान्दा ज़ाम्बियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी ही निवड जिंकली त्यामध्ये त्यांना ५०.३५% मात मिळाली त्यांच्या विरुद्ध यूनाइटेड पार्टी फॉर नॅशनल डेवलपमेंटचे हिचिलमा होते त्यांना ४७.६७% मते मिळाली. 

Thursday 18 August 2016

चालू घडामोडी : १३, १४ ऑगस्ट

१. भारतातील कोणत्या राज्यामध्ये अंधांसाठी टच एंड फील गार्डन सुरु करण्यात आले आहे?
उत्तर - केरळ, भारतातील पहिले अंधांसाठी टच एंड फील गार्डन केरळ राज्यातील थेजिपलाममध्ये कालीकट विद्यापीठाच्या आवारामध्ये सुरु करण्यात आले आहे. ह्या गार्डनचे उद्धघाटन केरळच्या विधानसभा अध्यक्षा पी श्रीरामकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या बगीच्यामध्ये ६ सुगंधी झाडांचा समावेश असेल, ज्यामुळे अंध व्यक्तीला शिकण्याची संधी मिळणार आहे.
२. कोणत्या भारतीय राज्यामध्ये पहिल्यांदाच निकेल धातू निर्मितीसाठी सुविधा तयार करण्यात आली आहे?
उत्तर - झारखंड, भारत निकेल धातूसाठी पूर्णपणे आयतीवर अवलंबून आहे, भारतामध्ये पहिल्यांदाच निकेल निर्मितीसाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने तिच्या उपकंपनीमार्फत सुविधा उपलब्ध केली आहे. एचसीएल तिची उपकंपनी इंडियन कॉपर कॉम्पलेक्सद्वारे घाटशिलामध्ये निकेल निर्मिती करेल. ह्या प्रकल्पामध्ये निकेल, तांबे आणि एसिड रिकवरी प्लांट असेल. भारतामध्ये दरवर्षी ४५,००० मैट्रिक टन निकेलची गरज भासते आणि भारत यासाठी पूर्णतः आयातीवर अवलंबून असतो.
३. २०१६ ची पीएसए ऑस्ट्रेलियन ओपन कोणी जिंकली आहे?
उत्तर - दीपिका पल्लीकल, भारताची टॉप स्क्वाश खेळाडू दीपिका पल्लीकलने पीएसए ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये तीने इजिप्तच्या मायर हनीचा १०-१२, ११-५, ११-६, ११-४ असा पराभव केला.
४. व्यापार सुलभतेसाठी (ट्रेड फ़ैसिलिएशन) केंद्र सरकारने कोणत्या समितीची स्थापना केली आहे?
उत्तर - प्रदीप कुमार सिन्हा समिती, केंद्र सरकारने प्रदीपकुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भारतामध्ये व्यापार सुलभतेसाठी रस्त्यांची स्थिती आणि नकाशे बनविण्यासाठी नॅशनल कमिटी ऑन ट्रेड फ़ैसिलिएशनची स्थापना केली आहे. ही समिती एप्रिल २०१६ मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या ट्रेड फ़ैसिलिएशन एग्रीमेंटला अनुसरून बनविण्यात आली आहे.
५. जागतिक हत्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - ऑगस्ट १२, वर्ल्ड एलीफैंट डे दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी अफ्रीकन आणि आशियाई हत्ती वरील संकट, त्यांच्याविषयी माहिती आणि सल्ला देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांच्यावरील उपचार, जंगली हत्ती व्यवस्थापन यासाठी साजरा केला जातो.
६. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - मंजुळा चेल्लूर, न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची ही नेमणूक धीरेन्द्र हीरालाल वाघेला यांच्याजागी करण्यात आली आहे. सध्या त्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आहेत.
७. टी. मुथुकुमार यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - चित्रपट, टी. मुथुकुमार यांचे नुकतेच निधन झाले ते दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते तमिळ गीतकार होते. त्यांनी १००० हून अधिक गण्यांची बोल लिहले आहेत. 

चालू घडामोडी : १२ ऑगस्ट

१. माइक्रो, स्मॉल एंड मीडियम इंटरप्राइजेज डेटाबैंक पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरु केली आहे?
उत्तर - अर्थमंत्रालय, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीमध्ये माइक्रो, स्मॉल आणि मीडियम उद्योगांसाठी डेटाबैंक पोर्टल सुरु केले आहे. माइक्रो, स्मॉल आणि मीडियम उद्योगांबद्दलची माहिती साठवून ठेवणे हे ह्या पोर्टलचे मुख्य कार्य असेल. यासोबतच लघुउद्योगांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी ऑनलाइन अर्थ सुलभीकरण (फाइनेंस फ़ैसिलिएशन) पोर्टलदेखील सुरु करण्यात आली असून तीचे जालंधर, लुधियाना, गुवाहाटी, लखनऊ, बंगलोरजवळ पीन्या, दिल्ली ह्या सहा ठिकाणी सेंटर्स सुरु करण्यात आली आहेत.
२. इंटरनॅशनल बायोडीजल डे कोणत्या दिवशी पळाला जातो?
उत्तर - १० ऑगस्ट, अंतरराष्ट्रीय बायोडीजल दिन दरवर्षी १० ऑगस्ट रोजी लोकांमध्ये नैसर्गिक इंधनाचा वापर आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
३. जीएसटीच्या घटनात्मक दुरुस्तीला मंजूरी देणारे पहिले राज्य कोणते आहेत?
उत्तर - आसाम, जीएसटी बील नुकतेच भारतीय संसदेमध्ये पास झाले, ह्या बिलाला मंजूरी देणारे आसाम भारतातील पहिले राज्य बनले आहे. १२२ वे घटना दुरुस्ती बील राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठविण्याच्या आधी ५०% राज्यांनी त्याला मंजूरी देणे आवश्यक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंतचा वस्तू आणि सेवा कर हा महत्त्वाचा अप्रत्यक्ष कर आहे. ह्याअंतर्गत जीएसटी कर हा वस्तू आणि सेवांच्या हस्तांतरणासाठी विविध करांमध्ये विभागला जाणार आहे.
४. कौशल्य विकासवार आधारित भारतातील पहिला टीव्ही चॅनल कोणत्या शहरामध्ये सुरु करण्यात आला आहे?
उत्तर - पुणे, कौशल्य विकास अणि उच्च शिक्षणावर आधारित भारतातील टीव्ही चॅनल पुण्यामध्ये मिलियनलाइट्स (शिक्षण सामग्री पुरस्कर्ता) आणि डेन मनोरंजन सॅटॅलाइट पुणे यांच्या सहयोगाने सुरु करण्यात आला आहे. मिलियनलाइट्सचे मुख्य उद्देश्य आहे की शिक्षण सामग्री पुरवणे आणि मुलांना रोजगार मिळवून देणे.
५. 'प्रोजेक्ट अनन्या' कोणत्या भारतीय बँकेने सुरु केला आहे?
उत्तर - सिंडिकेट बँक, डिजिटल ट्रांसफॉर्मेशन कार्यक्रमाअंतर्गत सिंडिकेट बँकेने 'प्रोजेक्ट अनन्या' सुरु केला आहे. ह्यामध्ये ग्राहक सेवा सुधार, ग्राहकांना नविन सेवा उपलब्ध करुन देणे त्याचप्रमाणे संपूर्ण बँकेचे नूतनीकरण याचा समावेश आहे. ह्या कार्यक्रमामध्ये बँकेची सेवा विक्री करणे ह्यावरही अधिक भर असेल.
६. हनीफ मोहम्मद यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे प्रसिद्ध क्रिकेटर होते?
उत्तर - पाकिस्तान, हनीफ मोहम्मद यांचे नुकतेच कराचीमध्ये निधन झाले ते पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिकेटर होते. त्यांना खऱ्या लिटिल मास्टर नावानेही ओळखले जाते कालांतराने ही उपमा भारताच्या सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनाही देण्यात आली आहे. 

Monday 15 August 2016

चालू घडामोडी : १०, ११ ऑगस्ट

१. वाघांवर आधारित भारतातील पहिली रिपोसिट्री (भांडार) कोणत्या शहरामध्ये उघडण्यात येणार आहे?
उत्तर - देहरादून, वाघांवर आधारित भारतातील पहिले भांडार वाइल्डलाइफ इंस्टिट्यूट ऑफ इंडिया आपल्या टाइगर सेल अंतर्गत देहरादूनमध्ये उभारणार आहे. ह्या भांडारामध्ये देशातील ५० हून अधिक व्याघ्र प्रकल्पातून माहिती, वाघांचे डीएनए, पट्ट्यांचे सैम्पल्स उपलब्ध असतील. वाघांचे सवंर्धन हे ह्या सेल मागचे मुख्य कारण आहे. त्याचप्रमाणे ही सेल संपूर्ण भारतातील वाघांची संख्या देखील तपासत राहणार आहे. ह्या टाइगर सेलला अर्थसहाय्य पर्यावरण मंत्रालया अंतर्गत असणारी नॅशनल टाइगर कंसर्वेशन अथॉरिटी करणार आहे.
२. सेन्ट्रल सिल्क बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - के एम हनुमंथरायप्पा, पुढील तीन वर्षांसाठी के एम हनुमंथरायप्पा यांची केंद्रीय रेशीम मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची नेमणूक एन एस बिसेगौड़ा यांच्या जागी करण्यात आली आहे. हनुमंथरायप्पा हे भाजपच्या डोबाबल्लापुरचे ज्येष्ठ नेते असून त्यांना कर्नाटकातील पारंपरिक रेशीम शेतीबद्दल माहिती आहे. रेशीम बोर्ड हे भारत सरकारच्या कापड मंत्रालयाअंतर्गत येणारी आणि देशातील रेशीम उद्योगांच्या विकासासाठी काम करणारी राष्ट्रीय संस्था आहे.
३. भारतामध्ये मेंटेनेंस फ्री हाईवे तयार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय हाईवे प्राधिकरणाने कोणत्या आईआईटी सोबत करार केला आहे?
उत्तर - आईआईटी खरगपुर, नॅशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडियाने भारतामध्ये मैंटेनस फ्री हाईवे विकसित करण्यासाठी आईआईटी खरगपुरसोबत सामंजस्य करार केला आहे. आईआईटी खरगपुर करारा दरम्यान चांगल्या क्वालिटीचे सीमेंट कंक्रीट पवेमेन्ट्स तयार करणार आहे. ह्या कराराची मर्यादा ३ वर्ष असेल.
४. मुलगी दिनला लक्षात ठेवून कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सोशल मीडियावर मोहिम सुरु केली आहे?
उत्तर - महिला आणि बालविकास मंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी ११ ऑगस्ट डॉटर्स डेला लक्षात ठेवून सोशल मीडियावर मोहिम सुरु केली आहे. ११ ऑगस्ट पासून पूर्ण आठवडा सरकारच्या 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' अभियानाअंतर्गत डॉटर्स वीक म्हणून साजरा केला जाईल. त्याचप्रमाणे सरकारने जनतेला आव्हान केले आहे की त्यांनी त्यांच्या सुनेसोबत, नातीसोबत असलेले फोटो ट्वीटरवर शेयर करावेत.
५. भारतातील इ-कॉमर्स नियम अभ्यासण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या समितीची स्थापना केली आहे?
उत्तर - अमिताभ कांत समिती, केंद्र सरकारने भारतातील इ-कॉमर्स नियम अभ्यासण्यासाठी अमिताभ कांत समितीची स्थापना केली आहे. अमिताभ कांत हे नीती आयोगाचे मुख्यकार्यकारी अधिकारी आहेत. भारतामध्ये सध्या इ-कॉमर्स वाढत आहे त्यालाच संबंधित असलेले मुद्दे उदा. थेट विदेशी गुंतवणूक यावर ही समिती अभ्यास करेल. ही समिती इ-कॉमर्स सेक्टरची वाढ करण्यासाठी उपाय देखील सुचवेल.
६. 'गॉफिन-३' हा पृथ्वीवर लक्ष/निरिक्षण करण्यासाठी उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे?
उत्तर - चीन, चीनने लॉन्ग मार्च ४सी उपग्रहवाहू वाहनाच्या सहाय्याने अवकाशामध्ये गॉफिन-३ पृथ्वीचे निरिक्षण करण्यासाठीचा उपग्रह अवकाशामध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह अवकाशामध्ये कमी उंचीवर परिभ्रमण करेल त्यामुळे हाई रेसोलुशनचे फोटो सहजरित्या घेऊ शकतो. याचा उपयोग आपत्ती चेतावनी, हवामान अंदाज आणि समुद्री सीमेवार संरक्षण यासाठी केला जाणार आहे. या उपग्रहाचे वयोमान ८ वर्षे असून सर्व प्रकारच्या हवामानामध्ये २४ तास निरिक्षण करू शकतो. 

Sunday 14 August 2016

भारतीय स्वातंत्र्य संग्राम

भारतीय स्वातंत्र्य संग्राम हा राष्ट्रिय आणि स्थानिक आव्हानातून प्रोत्साहित, प्रयत्नामधून प्रेरित, भारतातील राजकीय संघाटनांद्वारा संचालित अहिंसावादी त्याचप्रमाणे सैन्यवादी आंदोलन होते. ज्याचे फक्त एकच उद्दिष्ट होते इंग्रजी शासकांना भारतीय महाद्वीपातून हुसकावून लावणे. ह्या आंदोलनाची सुरुवात १८५७ मध्ये शिपायांच्या बंडातून झाली असे मानले जाते. स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतिवीरांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली. त्यामध्ये अनेक छोटे मोठे क्रांतिकारक सहभागी होते. १९२० पर्यंत स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्त्व लोकमान्य टिळकांनी केले तर त्यांच्या निधनानंतर महात्मा गांधींनी नेतृत्त्व केले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काही महत्त्वाच्या गोष्ठी:
* १४९८ - वास्को दा गामा भारतीय जमिनीवर उतरला
* १६०० - ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली
* १७४८ - भारतामध्ये एंग्लो-फ़्रांस/कर्नाटक युद्ध झाले (ब्रिटिशांनी जिंकले)
* १७५७ - प्लासीची लढाई (ब्रिटिशांनी लढाई जिंकली)
* १७७५ - पहिले एंग्लो मराठा युद्ध (मराठे जिंकले)
* १७९९ - ब्रिटिशांनी टीपू सुलतानाला हरविले
* १८०३ - एंग्लो मराठा युद्ध (ब्रिटिशांनी जिंकले)
* १८१७ - तीसरे एंग्लो मराठा युद्ध (ब्रिटिशांनी जिंकले)
* १८४६ - एंग्लो शिख युद्ध (शिखांचा पराभव)
* १८५७ - भारतीय स्वातंत्र्याचे पहिले बंड/ १८५७ चा उठाव
* १८८५ - भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
* १९०५ - इंग्रजांनी बंगालची फाळणी केली
* ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना ढाक्यामध्ये
* १९१५ - एनी बेसेंट यांनी होमरूल चळवळीची स्थापना केली
* १९१९ - खिलाफत आंदोलन, जलियानवाला बाग हत्याकांड, रौलट कायदा
* १९२१ - महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली
* १९२२ - चौरीचौरा कांड, गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली
* १९२८ - साइमन कमिशनचा विरोध करतेवेळी लाला लाजपत राय यांच्यावर लाठीचार्ज झाला त्यात ते गंभीर जखमी झाले
* १९३० - गांधीजीनी दांडी यात्रा काढली आणि मिठाचा सत्याग्रह केला, पहिली गोलमेज परिषद
* १९३१ - दूसरी गोलमेज परिषद आणि गांधी-इरविन करार
* १९३२ - तीसरी गोलमेज परिषद
* १९४२ - भारत छोड़ो आंदोलन
* १९४६ - नौसेनेचा उद्रेक (मुंबई)
* १९४७ - भारताचे विभाजन, इंग्रजांनी भारत सोडला, अर्ध्या रात्रीमध्ये भारत इंग्रजांपासून मुक्त
* १९६१ - गोवा पुर्तगालपासून मुक्त

चालू घडामोडी : ९ ऑगस्ट

१. रिझर्व्ह बँकेच्या तिसऱ्या दु-मासिक मोनेट्री पॉलिसी आढाव्यानुसार सध्याचा रेपो रेट किती आहे?
उत्तर - ६.५%, रिझर्व्ह बँकेने तिसऱ्या दु-मासिक मोनट्री पॉलिसी नुसार रिझर्व्ह बँकेने आपल्या पॉलिसी दर जसाच्या तसेच ठेवले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपो दर ६.५% तर रिव्हर्स रेपो रेट ६% ठेवला आहे. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेने कॅश रिव्हर्स रेशो ४% आणि सटूटोरी लिक्विडिटी रेशो २१.२५% ठेवले आहेत. मार्जिनल स्टैंडिंग फैसिलिटी रेट आणि बैंक रेट ७% ठेवला आहे.
२. कालिखो पुल यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?
उत्तर - अरुणाचल प्रदेश, कोलिखो पुल यांचे नुकतेच अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री निवासस्थानी निधन झाले ते अरुणाचल प्रदेशचे ८ वे मुख्यमंत्री होते. ते १९ फेब्रुवारी २०१६ ते १३ जुलै २०१६ पर्यंत अरुणाचलचे मुख्यमंत्री होते.
३. अंतरराष्ट्रीय मूळदेशी लोकदिन कोणत्या दिवशी पळाला जातो आणि २०१६ साठीचा विषय काय होता?
उत्तर - मूलदेशी लोकांना शिक्षणाचा अधिकार, जगातील मूलदेशी नागरिकांचे अधिकार आणि त्यांचे रक्षण व्हावे म्हणून अंतरराष्ट्रीय मूलदेशी लोकदिन दरवर्षी ९ ऑगस्टला साजरा केला जातो. मूलदेशी लोकांना शिक्षणाचा अधिकार देणे हा ह्यावर्षीचा विषय होता. हा दिवस दरवर्षी यूनाइटेड नेशन्सद्वारे पळाला जातो.
४. तिरंगा यात्रेसाठी तयार करण्यात आलेले '७० साल आज़ादी याद करो क़ुरबानी' हे गाणे कोणी बनविले (कंपोज़) आहे?
उत्तर - केसिराजू श्रीनिवास, भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष पूर्ण होतील यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा यात्रेसाठी '७० साल आज़ादी याद करो क़ुरबानी' हे थीम सॉन्ग प्रकाशित केले. हे गाणे केसिराजू श्रीनिवास यांनी बनविले आहे. तिरंगा यात्रा १६ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट दरम्यान देशभरात आयोजित करण्यात आली आहे. केसिराजू श्रीनिवास हे ग़ज़ल श्रीनिवास म्हणून ही ओळखले जातात.
५. भारत छोड़ो चळवळीला ध्यानात घेवून 'क्विट इंडिया २ - फ्रॉम स्वराज टू  सूरज' इनिशिएटिव कोणत्या राज्य सरकारने सुरु केला आहे?
उत्तर - महाराष्ट्र, १९४२ मध्ये झालेल्या भारत छोड़ो चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाली त्यालाच स्मरून महाराष्ट्र सरकारने अगस्त क्रांती मैदानामध्ये 'क्विट इंडिया २ - फ्रॉम स्वराज टू सूरज कार्यक्रम सुरु केला आहे. ह्या कार्यक्रमाअंतर्गत निरक्षरता, शेतकरी आत्महत्या, पाण्याचा अपव्यय, युवकांमध्ये व्यसन, भ्रष्ठाचार पासून स्वातंत्र्य मिळविणे ह्यावर भर दिला जाणार आहे. ऑगस्ट क्रांती मैदान याच ठिकाणी महात्मा गांधी यांनी ८ ऑगस्ट १९४२ भारत छोड़ो आंदोलन सुरु केले होते आणि जगा किंवा मराचा नारा दिला होता.
६. कोणत्या भारतीय कंपनी लंडन स्टॉक एक्सचेंजमध्ये ग्रीन मसाला बॉन्ड विकणारी पहिली भारतीय कंपनी बनाली आहे?
उत्तर - नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने ग्रीन मसाला बॉन्ड विकणारी जगातील पहिली कंपनी बनाली आहे. हे बॉण्ड्स प्रमाणित असून लंडन स्टॉक एक्सचेंजच्या ग्रीन बॉन्ड विभागामध्ये विकले जाणार आहेत. एनटीपीसी ह्या बॉन्डद्वारे येणारे रक्कम सौर ऊर्जा, पवन ऊर्जा निर्मितीसाठी वापर असून २०२० पर्यन्त १७५ गिगावॉटस निर्माण करण्याच्या भारत सरकारच्या ध्येयाला मदत करेल.
७. ७० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिम्मित कोणत्या भारतीय व्यक्तीला यूनाइटेड नेशंसमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे?
उत्तर - एम्. एस. सुब्बालक्ष्मी, भारतीय कर्नाटकी संगीताच्या महान गायक एम एस सुब्बालक्ष्मी यांना ७० व्या भारतीय स्वातंत्र्यदिनादिवशी मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार आहे. सुब्बालक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी निम्मित संयुक्त राष्ट्रांच्या सामान्य सभेमध्ये ऑस्करविजेता ए आर रेहमान आपले गायन सादर करणार आहे. यासोबतच रेहमान हा संयुक्त राष्ट्र सभेमध्ये गायन करणारी दूसरी भारतीय असेल, याआधी ५० वर्षांपूर्वी सुब्बालक्ष्मी यांनी गायन केले होते. 

चालू घडामोडी : ८ ऑगस्ट

१. दहशवादाविरुद्धची अंतरराष्ट्रीय बैठक कोणत्या देशामध्ये पार पडली आहे?
उत्तर - इंडोनेशिया, दहशवादाविरुद्धची अंतरराष्ट्रीय बैठक इंडोनेशियातील बालीमध्ये १० ऑगस्टला पार पडली. सीमेवर होणाऱ्या दहशवादी करवाया त्याचप्रमाणे दहशदवादी संघटन यांना होणारे अर्थसहाय्य, माहिती हे या या विषयांवर बैठकीमध्ये चर्चा झाली. त्याचप्रमाणे विविध देशांच्या 'सीमेवर होणाऱ्या दहशदवादी चळवळी' हा बैठकीचा मुख्य मुद्दा होता. भरताकडून भारतीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू उपस्थित होते.
२. अभिजीत गुप्ता कोणत्या खेळाशी निगडित आहे?
उत्तर - बुद्धिबळ, भारतीय ग्रैंडमास्टर आणि माजी वर्ल्ड जूनियर चैंपियन अभिजीत गुप्ता याने नुकतीच श्रीलंकेतील कोलंबोमध्ये झालेल्या २०१६ कॉमनवेल्थ चेस चैंपियनशिप जिंकली आहे.
३. '२०१७ स्वच्छ सर्वेक्षण' अभियान कोणत्या केंद्रीय मंत्रालयने सुरु केले आहे?
उत्तर - नागरी विकास मंत्रालय, नागरी विकास मंत्री वेंकैय्या नायडू नवी दिल्लीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१७ प्रकल्पाची सुरुवात केलि. ह्याअंतर्गत ५०० भारतीय शहरांचा अभ्यास करुन स्वच्छतेसाठी तेथील स्थानिक प्रशासनाने केलेल्या कार्याचा आराखडा तयार केला जाईल. स्वच्छता मिशनमध्ये लोकांचा सहभाग वाढावा म्हणून मंत्रालयने १९६९ ही स्वच्छता हेल्पलाइन तर स्वच्छता मोबाइल ऍप देखील सुरु केले आहे. त्याचप्रमाणे शौचलायांची निर्मिती आणि वापरासाठी 'असली तरक्की' मोहिम सुरु करण्यात आली आहे.
४. प्रत्येक नागरिकाला घरामध्ये पिण्याचे पाणी मिळावे यासाठी कोणत्या राज्य सरकारने मिशन भागरथी हा प्रमुख प्रकल्प सुरु केला आहे?
उत्तर - तेलंगाना, नरेंद्र मोदी यांनी तेलंगानातील मेडक जिहयात मिशन भागरथीच्या पहिल्या टप्प्याचे उद्धघाटन केले. प्रत्येक नागरिकाला घरामध्ये पाइपद्वारे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी तेलंगाना सरकारने मिशन भागरथी सुरु केले आहे. ह्या प्रकल्पा अंतर्गत ग्रामीण भागातील व्यक्तीला प्रति दिन १०० लीटर  स्वच्छ पिण्याचे पाणी तर शहरी भागातील व्यक्तीला १५० लीटर पाणी दिले जाईल. हा प्रकल्प मार्च २०१८ पूर्वी पूर्ण करण्याचा तेलंगाना सरकारचा प्रस्ताव आहे.
५. 'गुलबदन: पोट्रोइट ऑफ ए रोज़ प्रिंसेस एट दी मुग़ल कोर्ट' पुस्तकाचे लेखक/लेखिका कोण आहेत?
उत्तर - मार्गरेट रूमेर गोडें, गुलबदन: पोट्रॉइट ऑफ ए रोज प्रिंसेस एट दी मुग़ल कोर्ट पुस्तकाच्या मार्गरेट रूमेर गोडें लेखिका आहेत. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी बाबरची लहान मुलगी गुलबदन बेगमवर आधारित आहे. ती तिच्या वडलांच्या (बाबर), भावाच्या (हुमायूँ) आणि पुतण्या (अकबर) यांच्या राजकारभराची साक्षीदार होती.
६. 'आज़ादी ७० - याद करो कुरबानी' कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरु केला आहे?
उत्तर - मध्य प्रदेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ऑगस्टला आज़ादी ७० - याद करो क़ुरबानी कार्यक्रमाची सुरुवात केली.

Saturday 13 August 2016

चालू घडामोडी : ६, ७ ऑगस्ट

१. भारतामध्ये राष्ट्रीय हातमाग दिन कोणत्या दिवशी पळाला जातो?
उत्तर - ७ ऑगस्ट, १९०५ साली भारतीयांनी ब्रिटिश वस्तुंवर बहिष्कार टाकला होता त्यालाच स्मरून दरवर्षी ७ ऑगस्टला भारतामध्ये राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो.
२. केंद्र सरकारने मोनेट्री पॉलीसी अंतर्गत ५ वर्षाच्या कांसुमर प्राइस इंफ्लेशनसाठी किती टक्के लक्ष्य ठेवले आहे?
उत्तर - ४%, केंद्र सरकारने कंसुमर प्राइस इंफ्लेशनसाठी ४ % (प्लस किंवा माइनस २%) लक्ष्य ठेवले असून हे धोरण मोनेट्री पॉलिसी अंतर्गत असून ह्यासाठी ऑगस्ट २०१६ ते ३१ मार्च २०२१ असा ५ वर्षीय कालखंड नेमला आहे.
३. आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची नव्याने निवड करण्यात आली आहे?
उत्तर - ताकेहिको नाकाओ, जापानच्या ताकेहिको नाकाओ यांची दुसर्यान्दा आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची नवीन कारकीर्द नोवेम्बर २०१६ पासून सुरु होणार आहे. याआधी मार्च २०१३ मध्ये त्यांची पहिल्यांदा अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती.
४. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने संपूर्ण भारतामध्ये स्तनपान कार्यक्रम 'माँ' सुरु केला आहे?
उत्तर - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी स्तनपानाला प्रोस्ताहन देण्यासाठी भारतभर राबविण्यासाठी 'माँ' कार्यक्रम सुरु केला आहे. माधुरी दीक्षित नेने या ह्या कार्यक्रमाच्या ब्रैंड अम्बेसडर आहेत. हा कार्यक्रम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यूनिसेफ इंडियाच्या मदतीने करणार आहे.
५. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - विजय रूपानी, विजय रूपानी यांची गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक करण्यात आली आहे. याआधी ते भारतीय जनता पार्टीच्या गुजरात कार्यकारणीचे अध्यक्ष होते.
६. कोणत्या देशाने पहिला मोबाइल टेलीकॉम सॅटॅलाइट यशस्वीरित्या अवकाशामध्ये प्रक्षेपित केला आहे?
उत्तर - चीन, चीनने जगातील पहिला मोबाइल टेलीकॉम सॅटॅलाइट 'टिनटोंग-०१' अवकाशमध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे. ह्या उपग्रहाचे प्रक्षेपण क्सिचंग सॅटॅलाइट लॉंच सेंटरमधून लॉन्ग मार्च-३बी च्या मदतीने करण्यात आली. हा उपग्रह चीन, मध्य-पूर्व आशिया, अफ्रीका आणि इतर भागांना मोबाइल नेटवर्क आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.
७. क्रेडिट एनालिसिस एंड रिसर्च लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्यकार्यकारी अधिकरिपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - राजेश मोकाशी, राजेश मोकाशी यांची केयर (क्रेडिट एनालिसिस एंड रिसर्च लिमिटेडच्या) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्यकार्यकारी अधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. केयर रेटिंग्स कॉर्पोरेट क्षेत्रातील कॉरपोरेट्सना भांडवल वाढविण्यासाठी मदत करते. डॉ. दुर्गा यांच्या जागी त्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा कार्यभार २१ ऑगस्ट २०१६ ला संपणार आहे. मोकाशी हे सध्या केयरचे उपव्यवस्थापकीय संचालक आहेत. 

Tuesday 9 August 2016

चालू घडामोडी : ५ ऑगस्ट

१. २०१६ ची इंडिया इंटरनेशनल फुटवेअर फेयर कोणत्या शहरामध्ये पार पडली?
उत्तर - नवी दिल्ली, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ५ ऑगस्ट रोजी दुसऱ्या इंडिया इंटरनेशनल फुटवेअर फेयरचे नवी दिल्लीच्या प्रगती मैदानामध्ये उद्धघाटन केले. हे प्रदर्शन इंडिया ट्रेड प्रमोशन आर्गेनाईजेशन आणि कॉन्फ़ेडरेशन ऑफ इडियन फुटवेअर इंडसट्रीज़ यांच्यादरम्यान बीटूबी प्रीमियर साठी होते.
२. इंटरनेशनल ऑलंपिक कमिटीने २०२० टोकयो ओलंपिक्समध्ये कोणत्या खेळांचा समावेश केला आहे?
उत्तर - बेसबॉल, कराटे, स्केटबोर्ड, स्पोर्ट्स क्लाइम्बिंग आणि सर्फिंग, अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने २०२० मध्ये टोकियोमध्ये ओलंपिक्ससाठी बेसबॉल, कराटे, स्केटबोर्ड, स्पोर्ट्स क्लाइम्बिंग, सर्फिंग अश्या ५ खेळांचा समावेश केला आहे. यासोबतच २०२० टोकियो खेळांमध्ये ३३ खेळप्रकार आणि ११००० सहभागी खेळाडू असतील. यंदाच्या ओलंपिक्स खेळांमध्ये २८ खेळ प्रकारांमध्ये १०५०० खेळाडू सहभागी आहेत.
३. कोणत्या राज्याचे राज्य पर्यटन विभाग १५ ऑगस्ट रोजी 'फ्रीडम राइड' आयोजित करणार आहे?
उत्तर - गोवा, गोवा राज्याचे राज्य पर्यटन मंडळ १५ ऑगस्ट रोजी विशेष 'फ्रीडम राइड' बाइक रैली आयोजित करणार आहे. ह्या फ्रीडम राइड रैलीमध्ये बाइकस्वारांना पावसाळी हवामानातील गोव्यातील रमणीय प्रदेशाचा अस्वाद लुटाता येणार आहे. ह्या राइडमध्ये ते गोव्यातील चर्च, नदया, बीच, मंदिरे, गावे फिरण्यास भेटणार आहेत.
४. इंटरनेशनल ऑलिम्पिक कमिटीमध्ये सदस्य म्हणून निवडल्या जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत?
उत्तर - नीता अम्बानी, मुंबई इंडियंस संघाच्या मालक आणि रिलायंस फाउंडेशनच्या संस्थापक सदस्य नीता अंबानी यांची अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. यासोबतच त्या इंटरनेशनल  ओलिंपिक कमिटीमध्ये एकमेव भारतीय सदस्य असून वयाच्या ७० वर्षांपर्यंत ह्या समितीच्या जागतिक पातळीवरील सक्रीय सदस्य राहतील. जून २०१६ मध्ये आईओसीच्या कार्यकारी मंडळाने त्यांच्या नावाचे नामंकन केले होते आणि ब्राझीलच्या रियो दी जेनेरो मध्ये झालेल्या १२९ व्या आईओसी सत्रामध्ये त्यांची निवड करण्यात आली.
५. भारतातील पहिले टाइगर सेल (भांडार) कोणत्या शहरामध्ये सुरु करण्यात येणार आहे?
उत्तर - देहरादून, भारतातील पहिले टाइगर सेल उत्तराखंडमधील देहरादून मध्ये वाइल्डलाइफ इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या आवारामध्ये सुरु करण्यात येणार आहे. या भांडारासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. या भांडारामध्ये वाघांबद्दल सर्व माहिती उपलब्ध असेल उदा. डीएनए, ५० हून अधिक व्याघ्र अभयारण्यातून वाघांच्या पट्टयांचे विविध नमूने, वाघाच्या शिकारीवर निर्बंध ठेवण्यासाठी उपाय, वाघांची संख्या सतत अपडेट ठेवणे हेही ह्या सेलचे महत्त्वाचे काम असेल.
६. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने कोणत्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजीसोबत साइबर सिक्यूरिटीसाठी करार केला आहे?
उत्तर - आईआईटी कानपूर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने साइबर सिक्यूरिटीसाठी आईआईटी कानपूरसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. ह्या कराराअंतर्गत आईआईटी कानपूर आर्थिक विपणन, सध्याच्या परिस्थितींचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढून ते जोपासणे, भविष्यातील साइबर सिक्यूरिटी अव्हानांना स्वीकारून त्यांच्याविरुद्ध उपाय शोधणे त्याचप्रमाणे बीएसईला साइबर समस्यांबद्दल सल्ला देणे हे काम करेल. 

Monday 8 August 2016

चालू घडामोडी : ४ ऑगस्ट

१. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम ची इंडिया इकॉनोमिक फोरम कोणत्या शहरामध्ये पार पडणार आहे?
उत्तर - नवी दिल्ली, इंडिया इकॉनोमिक फोरम नवी दिल्ली येथे ६-७ ओक्टोबर रोजी पार पडणार असून 'डिजिटल माध्यमांतून भारताचे परिवर्तन' ही ह्यमागची थीम असेल. त्याचप्रमाणे ह्या बैठकीला ५०० हून अधिक उद्योगपती, राजकारणी हजेरी लावतील.
२. संरक्षण दलातील अधिकाऱ्यांसाठी 'शौर्य होम लोन' ही स्कीम कोणत्या बँकेने सुरु केली आहे?
उत्तर - भारतीय स्टेट बैंक, भारतीय स्टेट बँकेने संरक्षण अधिकारी आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना कमी व्याज दरात होम लोन आणि लोन भरण्याची मर्यादा वयाच्या ७५ वर्षांपर्यंत असणारी योजना सुरु केली आहे. ह्या योजनेअंतर्गत दोन स्किम असून संरक्षण अधिकाऱ्यांना 'एसबीआई शौर्य होम लोन' टार इतर सरकारी कर्मचाऱ्यांना 'एसबीआई प्रिविलेज होम लोन', ह्या दोन्ही योजनांना प्रक्रिया शुक्ल शून्य रुपये असेल.
३. एंजेला रुग्गीरो यांची इंटरनैशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अथेलेटेस कमिशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, त्या कोणत्या खेळाशी निगडित आहेत?
उत्तर - आइस हॉकी, अमेरिकीच्या माजी एक हॉकी खेळाडू आणि १९९८ सालच्या ऑलिम्पिक गोल्ड विजेत्या एंजेला रुग्गीरो यांची आईओसीच्या अथेलेटेस कमिशनच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची नेमणूक क्लाउडिया बोकेल यांच्या जागी करण्यात आली असून त्यांच्या ४ वर्षाची कारकीर्द रिओ ऑलिम्पिकच्या शेवटी संपणार आहे. सध्या रुग्गीरो ह्या कमिशनच्या उपाध्यक्षा आहेत. अथेलेटस कमीशन हे आईओसीने अथेलेटसचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ठेवली आहे.
४. भारतातील पहिले अंडरग्राउंड म्यूजियम कोणत्या शहरात खुले करण्यात येणार आहे?
उत्तर - नवी दिल्ली, भारतातील पहिले अंडरग्राउंड म्यूजियम नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनमध्ये २ ओक्टोबर पासून खुले करण्यात येणार आहे. या म्यूजियममध्ये भारताच्या सर्व माजी राष्ट्रपतींच्या काही निवडक वस्तू त्याचप्रमाणे भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लागलेल्या वस्तू किंवा अवशेष यांचे प्रदर्शन असेल. हे म्यूजियम तयार होण्यासाठी ८० कोटीचा खर्च तर निर्माणासाठी २ वर्षे लागली आहेत.
५. जगातील सर्वात ऊंच गर्डर रेल्वे पुल भारतातील कोणत्या राज्यामध्ये तयार करण्यात येणार आहे?
उत्तर - मणिपुर, भारतीय रेल्वे भारतातील सर्वात मोठा बोगदा तर जगातील सर्वात ऊंच रेल्वे गर्डर पूल मणिपुरमधील जिरीबाम-तुपुल-इंफाल ह्या ब्रॉड गेज रेल्वे लाइनवर बनविणार आहे. १११ किमी लांबीच्या ह्या रेल्वे लाइनवर ३७ बोगदे असतील त्याचप्रमाणे ११.५५ किमी लांबीचा सर्वात मोठा बोगदा देखील असेल हा बोगदा पीर पंजाल बोगद्याहुनही मोठा असेल ज्याची लांबी ११.२५ किमी आहे. रेल्वे ब्रिज हा १४१ मीटर उंचीचा असेल युरोपमधील गर्डर ब्रिजहूनही ऊंच असेल ज्याची ऊंची १३९ मीटर आहे.
६. २०१६ ची वर्ल्ड मार्शियल आर्ट्स चैम्पियनशिप कोणी जिंकली आहे?
उत्तर - विवेक तेजा, ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये झालेल्या अंतिम लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाच्याच मैथ्यू रोज़ला नमवून भारताच्या मार्शियल आर्ट्स खेळाडू चेरुपल्ली विवेक तेजाने २०१६ ची वर्ल्ड मार्शियल आर्ट्स चैम्पियनशिप जिंकली आहे. त्याचप्रमाणे तो वर्ल्ड कराटे चैंपियनदेखील झाला आहे.

Sunday 7 August 2016

चर्चेतील व्यक्ती

* पुष्प कमल दहल नेपाळचे ३९ वे पंतप्रधान 
नेपाळ-माओइस्ट कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांची नेपाळचे ३९ वे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. जुलै २०१६ मध्ये माजी पंतप्रधान के पी ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची निवड बिनविरोध निवड करण्यात आली आहे. धर्मनिरपेक्ष, लोकशाहीप्रधान नेपाळचे दूसरे पंतप्रधान आहेत. ते आपल्या करकिर्दीतील दुसर्यान्दा पंतप्रधानपद भूषविणार आहेत, याआधी २००८ ते २००९ दरम्यान ते पंतप्रधान होते.

* शुभा मुदगल यांची राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कारासाठी निवड 
२३ व्या २०१६ च्या राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कारासाठी गायिका शुभा मुदगल यांची निवड करण्यात आली आहे. समाजामध्ये जातीय सलोख्याची भावना, शांतता आणि सदभावना यांना प्रोस्ताहन दिल्याबद्दल दिला जाणार आहे.
शुभा मुदगल यांच्याबाबत: शुभा मुदगल या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, ठुमरी, ख्यायल, दादरा आणि भारतीय पॉप संगीताच्या गायिका आहेत. १९९६ मध्ये त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने तसेच २००० मध्ये पद्म श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार: हा पुरस्कार भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना स्मरून त्यांच्या जयंती दिवशी म्हणजेच २० ऑगस्टला दिला जातो. ह्या पुरस्काराची स्थापना १९९२ मध्ये भारतीय कांग्रेसच्या ऑल इंडिया कांग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली आहे. १० रुपये आणि सन्मान चिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे. हे पुरस्कार मदर टेरेसा, मोहमद यूनुस,लता मंगेशकर, उस्ताद बसमिल्लाह खान, सुनील दत्त, उस्ताद अमजद अली खान यांना प्रदान करण्यात आला आहे.

* नीता अंबानी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या पहिल्या भारतीय महिला सदस्य बनल्या
रिलायंस फाउंडेशनच्या संस्थापकीय सदस्य आणि मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांची अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या वैयक्तिक सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
नीता अंबानी सध्या आईओसी मधील एकमेव भारतीय सदस्य असून कदाचित वयाच्या ७० वर्षापर्यंत ह्या समितीच्या जागतिक पातळीवरील सक्रीय सदस्य राहतील. जून २०१६ मध्ये आईओसीच्या कार्यकारी मंडळाने त्यांच्या नावाचे नामांकन केले होते आणि ब्राझीलच्या रिओ दी जनेरो मध्ये झालेल्या १२९ व्या आईओसी सत्रामध्ये त्यांची निवड करण्यात आली. सर डार्बोजी टाटा हे आईओसीमध्ये पहिले भारतीय प्रतिनिधी होते तर राजा रणधीर सिंग हे २००१-२०१४ दरम्यान आईओसीचे सदस्य होते तर २००२ पासून ते आईओसीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत.
आईओसी बाबत: इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे मुख्यालय स्विट्ज़रलैंडमधील लुसानेमध्ये आहे. ऑलिम्पिक गेम्स नित्त्य नियमाने खेळले जावेत यासाठी ही समिती कार्यरत असते. 

चालू घडामोडी : ३ ऑगस्ट

१. २०१६ च्या गोवा स्टेट फिल्म फेस्टिवल मध्ये कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - एन चंद्र, बॉलीवुड चित्रपट निर्माते एन चंद्र यांना ८ व्या गोवा स्टेट फिल्म फेस्टिवलमध्ये जीवन गौरव पुरस्कराने सन्मानित करण्यात आले आहे. चंद्र हे त्यांच्या अंकुश, प्रतिघात, तेज़ाब, नरसिम्हा चित्रपटांसाठी ओळखले जातात. गोवा स्टेट फिल्म फेस्टिवल ५ ते ८ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे.
२. कोणत्या देशावर तीव्र अशा निदा चक्रीवादळ आदळले आहे?
उत्तर - चीन, तीव्र अश्या निदा चक्रीवादळ चीनच्या ग्वांगडोंग राज्यामध्ये आदळले आहे ह्या वादळाला फिलीपींसमध्ये करीना नावानेही ओळखले जाते. ह्या चक्री वादळाची गती १५० किमीप्रति तास असून पर्ल नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये १९८३ नंतरचे सर्वात प्रभावी वादळ आहे. मनिला, फिलीपींसपासून पूर्व आग्नेयकडे १०२० किमी दूर भागात हवेमध्ये झालेल्या उदासीनतेमुळे हे वादळ निर्माण झाले आहे.
३. नेपाळचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर - पुष्प कमल दहल, प्रचंड अर्थातच पुष्प कमल दहल यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ते नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे अध्यक्ष देखील आहेत.
४. अहमद जेवेल यांचे नुकतेच निधन झाले त्यांना १९९९ साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, त्यांना कोणत्या क्षेत्रातले नोबेल पारितोषिक मिळाले होते?
उत्तर - रसायनशास्त्र, इजिप्टियन रासायनशास्त्रज्ञ आणि नोबेल विजेते प्रा. अहमद जेवेल यांचे नुकतेच अमेरिकेत निधन झाले त्यांना १९९९ सालाचा रासायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांना हा पुरस्कार भौतिक रसायनशास्त्रातील कार्याबद्दल मिळाला होता. ते अमेरिकेतील कैलिफ़ोर्निया इंस्टिट्यूटमध्ये प्राध्यापक होते त्याचप्रमाणे बराक ओबामांचे वैज्ञानिक सल्लागार ही होते.
५. मल आणि सांडपाणी धोरण पास करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे?
उत्तर - राजस्थान, मल, सांडपाणी धोरण पास करणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य आहे. ह्या धोरणानुसार सर्व जिल्हा मुख्यालय शहरे, वारसा शहरे आणि १००,००० हून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हे धोरण राबविले जाईल. ह्या धोरणामध्ये पुढील ३० वर्षांसाठीच्या गरजा आखून ठेवल्या आहेत. पुढील पाच वर्षात ही शहरे सांडपाणी मुक्त करणे हा ह्यमागचा हेतू आहे.
६. माइक्रोसॉफ्ट इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - अनंत माहेश्वरी, माइक्रोसॉफ्ट इंडिया तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकन कंपनी मिक्रोसॉफ्टची उपकंपनी असून तंत्रज्ञ अनंत माहेश्वरी यांची माइक्रोसॉफ्ट इंडियाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. मार्च २०१७ मध्ये ते भास्कर प्रामाणिक यांच्या जागी पदभार स्विकारणार आहेत. माहेश्वरी हे भारतातील माइक्रोसॉफ्टच्या प्रोडक्ट, सर्विस, सपोर्टसाठी जबाबदार असतील. 

Saturday 6 August 2016

रिओ ऒलीम्पिक्स फैक्ट्स एंड नंबर्स

५ ऑगस्ट २०१६ ला रिओ दी जनेरियोमध्ये ऑलम्पिक गेम्सचे उद्घाटन झाले त्याचप्रमाणे पहिल्यांदाच दक्षिण अमेरिकी देशांमध्ये ऑलिम्पिक गेम्स भरविण्यात आले आहेत. ह्या गेम्सबद्दल काही फैक्ट्स एंड नंबर्स

१०: रिओ ऑलिम्पिक गेम्सच्या ओपनिंग सेरेमनीचा बजट हा लंडन २०१२ ओपनिंग सेरेमनीच्या १० पट कमी होता.
१२,०००: ऑलिम्पिक मशालबाजांची संख्या, ऑलिम्पिक मशाल २६ ब्राझिलिअन राज्यांतून गेली असून ब्राझीलच्या ९०% लोकसंख्येतून पास झाली आहे. 
१०,५००: खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. 
२८: खेळांचा रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये समावेश आहे.
२०६: देशांचे खेळाडू गेम्समध्ये सहभागी आहेत. 
२,४८८: ऑलिम्पिक मेडल्स/पदक विविध खेळातील खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहेत. त्यामध्ये ८२१ सुवर्ण, ८१२ रौप्य आणि ८६४ कांस्य पदकांचा समावेश आहे. 
१०: पहिल्यांदाच १० निर्वासित खेळाडू ऑलिम्पिक गेम्समध्ये सहभागी होत आहेत. १० पैकी ६ पुरुष आणि ४ महिला खेळाडू आहेत आणि सर्व ऑलिम्पिक फ्लैग अंतर्गत खेळणार आहेत. 
१८,६६८: गुम हा देश रिओपासून १८,६६८ किमी दूर असून रिओ गेम्समध्ये सर्वात दूरहून खेळाडू पाठविणारा देश आहे. 
५५५: रिओ गेम्समध्ये सर्वाधिक खेळाडू पाठविणारा देश 'अमेरिका ऑलिम्पिक टीम' २६३ पुरुष आणि २९२ महिला खेळाडू. 
३९: सर्वात तरुण खेळाडू आणि सर्वात वयस्कर खेळाडू यांच्या वयातील फर्क. रिओ गेम्समध्ये सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडूचे वय १३ (गौरिका सिंह, नेपाळ) सर्वात वयस्कर खेळाडूचे वय ५२ (एक्वेस्ट्रियन फिलिप डटन, अमेरिका). 
. नवीन खेळांचा समावेश. ११२ वर्षांच्या खंडानंतर गोल्फचा पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे तर रग्बी सेवन हा पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेला खेळ आहे.
३,६०४: रिओ अथेलेटेस विलेजमध्ये असलेले अपार्टमेंट्स जे ११,००० खेळाडू आणि ६,००० प्रशिक्षकांसाठी घर असेल. 

चालू घडामोडी : २ ऑगस्ट

१. आंध्र प्रदेश सरकारने कोणत्या देशासोबत अन्न साखळी विकासासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - जापान, आंध्र प्रदेश सरकारने राज्यामध्ये अन्न साखळी निर्माण करण्यासाठी जापानसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. ह्या कराराअंतर्गत जापानची मिनस्ट्री ऑफ अग्रिकल्चरल, फॉरेस्ट्री एंड फिशरीज जापानमधील उद्योजकांना आंध्र प्रदेशामध्ये शेती आणि खाद्य किंवा त्याला निगडित क्षेत्रामध्ये थेट गुंतवणुकीसाठी प्रोस्ताहित करणार आहे. त्याचप्रमाणे जापान अग्रिकल्चरल मिनिस्ट्री फ़ूड इंडस्ट्रियल पार्क्स आणि कोल्ड चेन्देखील विकसित करणार आहे.
२. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (नॅशनल डेरी डेवलपमेंट बोर्ड) च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - दलीप रथ, दलीप रथ यांची नॅशनल डेरी डेवलपमेंट बोर्डाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. जोपर्यंत नियमित पदाधिकाऱ्याची नेमणूक होत नाही तोपर्यंत ते अध्यक्षपदाचा पदभार संभाळणार आहेत. टी नंदकुमार यांनी आपल्या पदाभाराची ५ वर्ष पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला होता म्हणून त्यांचीअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नॅशनल डेरी डेवलपमेंट बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - भास्कर खुल्बे, १९८३ बैचचे आईएएस ऑफिसर भास्कर खुल्बे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सचिव (सेक्रेटरी)पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते पंतप्रधान कार्यालयामध्ये अतिरिक्त सचिवपदी कार्यारित होते.
४. 'इंडिया राइजिंग: फ्रेश होप, न्यू फियर्स' पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - रवी वेल्लूर, सिंगापुरचे वर्तमानपत्र दी स्ट्रेट्स टाइम्सचे सहाय्यक संपादक रवी वेल्लूर हे इंडिया राइजिंग: फ्रेश होप, न्यू फियर्स पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी ह्या पुस्तकामध्ये नरेंद्र मोदीच्या आधीच्या दशकाचे वर्णन केले आहे. मनमोहन सिंगांच्या नेतृत्त्वखाली भारतामध्ये किंवा भारतासोबत झालेले लक्षणीय घडामोडी यांचा अभ्यास करुन त्याची कारणमीमांसा केली आहे.
५. २०१६ चे रॉजर क्लब टाइटल पुरुष कोणी जिंकले आहे?
उत्तर - नोवाक जोकोविच, सर्बियाच्या नोवाक जोकविचने २०१६ एटीपी टोरंटो मास्टर्स अर्थातच रॉजर क्लब टाइटल (पुरुष) जिंकले आहे. टोरंटो येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये त्याने केई निशिकोरीचा ६-३, ७-५ असा पराभव केला आहे. यासोबतच त्याने आपल्या करकिर्दीतील ६६ वे चषक आणि ४ थ्यांदा कैनेडियन चषक जिंकले आहे.
६. २०१६ चे रॉजर क्लब महिला टाइटल कोणी जिंकले आहे?
उत्तर - सिमोना हालेप, रोमच्या सिमोना हालेपने अमिरेकीच्या मैडिसन कैसचा टोरंटोमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पराभव करून महिला टाइटल जिंकले आहे.

Thursday 4 August 2016

चालू घडामोडी : १ ऑगस्ट

१. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - राणी नायर, १९७९ बैचच्या भारतीय महसूल अधिकारी राणी सिंग नायर यांची सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टैक्सेसच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्या अतुलेश जिंदल यांच्याजागी येणार असून त्या ३१ ओक्टोबर २०१६ पर्यंत आपल्या पदाचा कार्यभार संभाळणार आहेत. याआधी त्या सीबीडीटी मध्ये कायदे आणि संगणकीकरण विभागाच्या सदस्य आहेत.
२. २०१६ चा कबड्डी वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये पार पडेल?
उत्तर - भारत, २०१६ चा कबड्डी वर्ल्ड कप भारतामध्ये ओक्टोबर २०१६ मध्ये पार पडेल. ह्या वर्ल्ड कपमध्ये १२ देश सहभागी होणार असून भारत, अमेरिका, कनाडा, यूनाइटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, पोलंड, पाकिस्तान, बांग्लादेश, कोरिया, जापान, केनिया यांचा समावेश आहे.
३. २०१६ ची फॉर्मूला वन जर्मन ग्रैंड प्रिक्स कोणी जिंकलेली आहे?
उत्तर - लेविस हैमिलटन, ब्रिटिश फॉर्मूला वन मर्सिडीज़ रेसिंग ड्राइवर लेविस हैमिलटन याने यंदाची जर्मन फॉर्मूला वन ग्रैंड प्रिक्स जिंकली आहे. हे त्याचे २०१६ मधील सहावे जेतेपद आहे. याआधी त्याने मोनाको ग्रैंड प्रिक्स, कैनेडियन ग्रैंड प्रिक्स, ऑस्ट्रियन ग्रैंड प्रिक्स, ब्रिटिश ग्रैंड प्रिक्स, हंगेरियन ग्रैंड प्रिक्स जिंकली आहे.
४. लुक ऐकिन्स हा जगातील पहिली व्यक्ती आहे जीने विमानातून उडी मारून जमिनीवर बिनापैराशूट उतारण्याचा विक्रम केला आहे, तो कोणत्या देशाचा नागरिक आहे?
उत्तर - अमेरिका, अमेरिकीतील दक्षिण कैलिफोर्नियामधील सिमी वैलीमध्ये अमेरिकेच्या स्काईडाइवर लुक ऐकिन्सने विमानातून उडी मारून  जमिनीवर बिनापैराशूट उतारण्याचा विक्रम केला आहे. त्याने या विक्रमासाठी जमिनीवर उतरण्यासाठी नेटचा वापर केला आहे. यासोबतच असे करणारा जगातील पहिला मानव बनला आहे. यासाठी त्याने २५००० फूट उंचीवरून विमानातून उडी मारली आणि अवघ्या दोन मिनिटांमध्ये तो पैराशूट किंवा विंगसूटच्या मदतीविना १०० बाय १०० च्या नेटवर उतरला.
५. २०१६ ची स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीग कोणी जिंकली आहे?
उत्तर - पटना पाइरेट्स, २०१६ ची स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीग जयपूर पिंक पैथर्सला हरवून पटना पाइरेट्सने सलग दुसर्यान्दा आपल्या खिशात टाकली आहे. हैद्राबादच्या गाचीबौली स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यामध्ये पटनाने जयपूरचा ३७-२९ असा पराभव केला. यासोबतच सलग दोन वेळा जेतेपद जिंकण्याचा विक्रमही त्यांनी केला असून गतवर्षीचे जेतेपद राखनारी पटना ही पहिलीच टीम आहे.
६. केईबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे?
उत्तर - मणिपुर. केईबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान मणिपूरच्या बिष्णुपुर जिल्यामध्ये ४० वर्गकिमी परिसरामध्ये पसरले आहे. हे जगातील एकमेव तरंगते उद्यान असून लोकटक तलावाचा अविभाज्य घटक आहे.

Wednesday 3 August 2016

चालू घडामोडी : ३०, ३१ जुलै

१. पंडित लाचू महाराज यांचे नुकतेच निधन झाले ते संगीतातील कोणत्या वाद्याचे उस्ताद/माइस्ट्रो आहेत?
उत्तर - तबला, प्रसिद्ध तबलावादक उस्ताद पंडित लाचू महाराज यांचे उत्तर प्रदेशातील वाराणसी मध्ये नुकतेच निधन झाले ते ७३ वर्षांचे होते. ते जागतिक दर्जाचे तबलावादक होतेच आणि त्यांनी भारत आणि भारताबाहेर आपल्या वाद्यकलेचे प्रदर्शन केले आहे.
२. बुचेन अंतरराष्ट्रीय विलक्षण चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फण्टास्टिक फिल्म फेस्टिवल) मध्ये सर्वोत्कृष्ट आशियाई  शैली पुरस्कार कोणत्या भारतीय चित्रपटाला मिळाला आहे?
उत्तर - सायको रामन, दक्षिण कोरयामध्ये मध्ये पार पडलेल्या २० व्या बुचेन इंटरनॅशनल फण्टास्टिक फिल्म फेस्टिवलमध्ये  सायकोलॉजिकल थ्रिलर 'सायको रामन' ह्या भारतीय चित्रपटाला बेस्ट एशियाई जेनेरे फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर अनुराग कश्यप दिग्दर्शित 'सायको रामन' चित्रपटाला यूरोप फण्टास्टिक फिल्म फेस्टिवल फेडरेशन एशियाई पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट रामन राघव ह्या सीरियल किलरवर आधारित आहे. हा चित्रपट भारतामध्ये २०१६ मध्ये 'रामन राघव' नावाने प्रकाशित झाला आहे. त्याचप्रमाणे दीपक संपत याला 'ऑटहेड' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
३. भारताने कोणत्या शेजारील राष्ट्रासोबत मिलिट्री हॉटलाइनस निर्माण केल्या आहेत?
उत्तर - चीन, बॉर्डर पर्सनल मीटिंगमध्ये भारताने चीनसोबत ३ ठिकाणी सीमेवर बॉर्डर हॉटलाइनस निर्माण केल्या आहेत. ह्या हॉटलाइनस निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांच्या मिल्ट्री मुख्यालयांनी परवानगी दिली असून ह्या हॉटलाइनस संगपुर, नाथू ला आणि किबिथू ह्या ठिकाणी सक्रीय करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे भारत इतरही शेजारील राष्ट्रांसोबत (पाकिस्तान, म्यानमार आणि नेपाळ) हॉटलाइनस निर्माण करण्याच्या तयारीत आहे.
४. कोणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे?
उत्तर - दिलीप बाबासाहेब भोसले, न्यायाधीश दिलीप बाबासाहेब भोसले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. सध्या नियुक्तीपुर्वी ते आंध्र प्रदेश आणि तेलंगाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. याआधी डी वाय चंद्रचूड़ हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
५. तंबाखू नियंत्रणावर २०१६ ची अंतरराष्ट्रीय बैठक कोणत्या देशामध्ये भारविली जाणार आहे?
उत्तर - भारत, २०१६ ची अंतरराष्ट्रीय तंबाखू नियंत्रण बैठक भारतामध्ये नोव्हेम्बर २०१६ मध्ये नोएडा मध्ये भारविण्यात येणार आहे. ह्या बैठकीचे मुख्य उद्देश्य म्हणजे जगभरामध्ये तंबाखूचा होणारा बेकायदेशीर व्यापार. ह्या बैठकीसाठी १८० देशांचे १००० ते १५०० प्रतिनिधी येणार आहेत.
६. 'मैत्री' ही संयुक्य सैनिकी अभ्यास शिबिर भारत आणि कोणत्या देशाच्या सैन्यासोबत पार पडले?
उत्तर - थाईलैंड, २०१६ ची संयुक्त सैनिकी अभ्यास शिबिर मैत्री थाईलैंडच्या क्राबी मध्ये भारत आणि थाईलैंड या देशांच्या सैन्यांमध्ये पार पडले. ह्या अभ्यासमालिकेचा हेतू होता की दोन्ही सैन्यांमधील समन्वय वाढविणे आणि दहशदवादाविरुद्ध करवाई करने. त्याचप्रमाणे भारतीय सैन्यदल आणि रॉयल थाईलैंड आर्मी यांच्यामधील सहकार्य आणि क्षमता वाढविणे.
७. हाशिमपुरा २२ मे: दी फॉरगॉटेन स्टोरी ऑफ वन ऑफ इंडियास बिग्गेस्ट कस्टोडियल किलिंग' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - विभूती नारायण राय, माजी पोलीस अधिकारी विभूती नारायण राय हे हाशिमपुर २२ मे: दी फॉरगॉटेन स्टोरी ऑफ वन ऑफ़ इंडियास बिग्गेस्ट कस्टोडियल किलिंग पुस्तकाचे लेखक आहेत. जेव्हा विभूती नारायण राय ग़ाज़ियाबादचे पोलिस अधीक्षक होते त्यावेळी हाशिमपुर हत्यकांड घडले होते. त्यांनी ह्या पुस्तकामध्ये हत्याकांड आणि त्याचा झालेला परिणाम नमूद केला आहे. 

Tuesday 2 August 2016

चालू घडामोडी : २९ जुलै

१. 'दी सियालकोट सागा' पुस्तक कोणी लिहले आहे?
उत्तर - आश्विन संघी, भारतीय लेखक आश्विन संघी यांनी 'दी सियालकोट सागा' पुस्तक लिहले आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी विभाजनानंतर सियालकोटवर झालेला परिणाम लिहला आहे. त्यांनी सध्याच्या सियालकोटची तुलना भूतकाळातील सियालकोट सोबत केली आहे. ह्या तुलना त्यांनी व्यवसाय, राजकरण, फैक्ट्स, इतिहास पायावर केल्या आहेत.
२. २०१५ चा भारतीय ज्ञानपीठ अंतर्गत दिला जाणारा नावेलखान पुरस्कार किती जणांना मिळाला आहे?
उत्तर - चार, भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारांअंतर्गत दिला जाणारा ११ वा २०१५ चा नावेलखान पुरस्कार चार भारतीय लेखकांना प्रदान करण्यात आला आहे. अमलेंदु तिवारी यांच्या 'परित्यक्त' आणि बलराम कवांट यांच्या 'सारा मोरिला' ह्या कादंबरीसाठी तर ओम नागर यांच्या 'निब के चीरे से; आणि तंसीम खान यांच्या 'ये मेरे रहनुमा' ह्या नॉन-फिक्शन पुस्तकांना मिळाला आहे. हे पुरस्कार ज्ञानपीठच्या संचालक लीलाधर मंडलोई यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आले.
३. केंद्र सरकारच्या योजनाचे वेळेवर अम्बलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली आहे?
उत्तर - दिशा, केंद्र सरकार जिल्हा विकास आणि समन्वय समिती (डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट कॉऑर्डिनेशन एंड मॉनिटरिंग कमिटी) स्थापन करणार असून ती 'दिशा' नावाने ओळखली जाईल त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या योजनांचा विकास आणि समन्वय पाहणे ही जबाबदारी त्या समितीचे असेल. दिशा ग्रामीण विकास मंत्रालयाच्या २८ योजना आणि कार्यक्रमांवर लक्ष ठेवून असेल. ह्या समितीचे काम म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ग्राम पंचायत यांच्यामध्ये समन्वय घडवून आणणे. दिशाची पहिली सभा २३ ऑगस्टला होणार असून लोकसभेचे सर्वात वयस्कर सदस्य ह्या सभेच्या अध्यक्षस्थानी असतील.
४. जागतिक निसर्ग संवर्धन दिन कोणत्या दिवशी पाळला गेला?
उत्तर - २८ जुलै, जागतिक निसर्ग संवर्धन दिन दरवर्षी २८ जुलैला लोकांच्या मनामध्ये निसर्ग संवर्धन आणि निसर्गाच्या सुरक्षेसाठीबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून साजरा केला जातो.
५. २०१५ ची ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड राइस इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट अवॉर्ड (अखिल भारतीय तांदूळ सुधारणा प्रकल्प पुरस्कार) कोणत्या राज्याने जिंकला आहे?
उत्तर - पश्चिम बंगाल, इंदिरा गांधी कृषी विकास केंद्राच्या ५१ व्या समितीनतर्फे दिला गेलेला २०१५ चा ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड राइस इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट अवॉर्ड पश्चिम बंगाल राज्याने जिंकला आहे. हा पुरस्कार मिळविणारे पश्चिम बंगाल हे पहिले राज्य आहे. ह्या पुरस्कारमध्ये ४ महत्त्वाच्या बाजू लक्षात घेतल्या जातात, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीयांवर केलेले वैज्ञानिक संशोधन. जुलै २०१६ मध्ये दिल्ली मध्ये झालेल्या अंतरराष्ट्रीय शेती आणि फळबाग एक्सपोमध्ये सहभागी होवून पश्चिम बंगालने दुसऱ्या क्रमांकाचेही बक्षिस मिळवले आहे.
६. 'इनसैट ३डीआर' ह्या भारतीय हवामान उपग्रहाला अवकाशामध्ये नेण्याचे काम कोणते लॉंच वेहिकल करणार आहे?
उत्तर - जीएसएलव्ही-मार्क २, भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) 'इनसैट ३डीआर' चे अवकाशामध्ये जिओसिंक्रोनॉस सैटेलाइट लॉंच वेहिकल मार्क २ द्वारे प्रक्षेपण करणार आहे. ह्या उपग्रहाचे प्रक्षेपण ऑगस्ट महिन्यामध्ये आंध्र प्रदेशातील सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथून होणार आहे. हा उपग्रह २०१३ मध्ये प्रक्षेपित केलेल्या इनसेट ३डी च्या जागी असणार आहे. 

Monday 1 August 2016

लोकमान्य टिळक

बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख होतो.
जन्म : २३ जुलै १८५६, चिखली रत्नागिरी, महाराष्ट्र
मृत्यु : १ ऑगस्ट १९२०, मुंबई
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

बालपण: टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरीमधील चिखलीमध्ये, एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्नागिरीजवळील चिखलीचे खोत होते. त्यांचे वडील गंगाधर टिळक प्रसिध्द शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार होते आणि त्यांना अन्यायाविरुद्ध चीड होती. अभ्यासासोबतच ते दररोज नियमित व्यायाम करत असत त्यामुळे त्यांचे शरीर स्वस्थ आणि पुष्ट होते. १८७७ मध्ये त्यांनी बीए पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यांनतर त्यांनी शिक्षण क्षेत्रातही काम केले. १८८० मध्ये त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल आणि १८८५ मध्ये फर्गुसन कॉलेजची स्थापना केली. ते त्या काळातील भारतातील प्रमुख नेते, समाज सुधारक, स्वातंत्र्यसेनानी होते. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील ते पहिले लोकप्रिय नेते होते. टिळकांनी ब्रिटिश राज दरम्यान सर्वप्रथम पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. टिळकांचे 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' हे वाक्य खूप प्रसिद्ध होते. त्यांना लोक 'लोकमान्य' नावाने बोलावून सन्मानित करत असत. त्यांना हिंदू राष्ट्रवाद पिता म्हणूनही ओळखले जाते.
टिळकांनी जनजागृतीसाठी महाराष्ट्रामध्ये गणेशोस्तव आणि शिवाजीउत्सव असे कार्यक्रम सुरु केले. ह्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी सर्वसामान्य जानतेमध्ये देशप्रेम आणि इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचे साहस भरण्याचा प्रयत्न केला. टिळकांच्या ह्या क्रांतिकारी पाउलामुळे इंग्रज घाबरले आणि त्यांनी लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला चालविला आणि त्यांना सहा वर्षाच्या शिक्षा सुनावली. टिळकांना ब्रम्हादेशातील मंडाले तुरुंगात पाठविण्यात आले होते. याच कालखंडमध्ये टिळकांनी गीतेचा अभ्यास करून गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. जेव्हा टिळक तुरुंगातून बाहेर आले त्यानंतर त्यांचा गीता रहस्य ग्रंथ प्रकाशित झाला आणि त्याचा प्रसार वाऱ्यासारखा झाला आणि जनसामन्यामध्ये आंदोलित होण्याची साधना निर्माण झाली.
टिळकांनी १८८१ मध्ये मराठा आणि केसरी ही दोन वर्तमानपत्रे सुरु केली. मराठा हे इंग्रजीतून तर केसरी हे मराठीतून प्रकाशित होत होती. १८८२ च्या अखेरीस केसरी हे सर्वाधिक खपाचे प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्र होते. ह्या दोन्ही वर्तमानपत्रांच्या सहाय्याने त्यांनी इंग्रज कशाप्रकारे भारतियांविरुद्ध क्रूर आहेत आणि भारतीय संस्कृती प्रती त्यांची असणारी हीनभावना यांचे आलोचना करत. त्याचप्रमाणे त्यांनी ब्रिटिश सरकारला अनेक वेळा भारतीयांना पूर्णपणे स्वराज्य देण्याची मागणी केली, त्यासाठी त्यांना अनेकवेळा तुरुंगात ही जावे लागले.
टिळक क्रांतिकारी विचारांचे होते. अशा ह्या वीर स्वातंत्र्यता सेनानीचे १ ऑगस्ट १९२० ला मुंबई येथे निधन झाले. 

Sunday 31 July 2016

चर्चेतील व्यक्ती

* न्यायाधीश दिलीप बाबासाहेब भोसले यांनी अलाहाबाद उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली.
मराठी न्यायाधीश दिलीप बाबासाहेब भोसले यांनी ३० जुलैला अलाहाबाद उच्चन्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. डी वाय चंद्रचूड़ हे याआधीचे मुख्य न्यायाधीश होते त्यांची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. दिलीप भोसले यांनी उत्तर प्रदेश राज्यपाल राम नाईक यांच्याकडून अलाहाबाद मध्ये घटनेच्या आर्टिकल २१९ नुसार शपथ घेतली.
दिलीप भोसलेबाबत अधिक माहिती:
त्यांचा जन्म मुंबईमध्ये १९५६ साली झाला. २००१ मध्ये प्रथम त्यांची मुंबई उच्चन्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. नंतर २०१२ मध्ये त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये बदली झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक होण्याआधी ते आंध्र प्रदेश आणि तेलंगाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

* सईद नईमुद्दीन यांना मोहन बागान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
कलकत्याच्या मोहन बागान एफसीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मोहन बागान रत्न पुरस्कार यावर्षी भारतीय फुटबॉलपटू सईद नईमुद्दीन यांना प्रदान करण्यात आला आहे. यासोबतच ते हा पुरस्कार मिळविणारे १६ वे व्यक्ती ठरले आहेत.
सईद नईमुद्दीनबाबत अधिक माहिती:
सईद नईमुद्दीन हे भारतीय फुटबॉल खेळाडू आणि भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आहेत. १९७० मध्ये झालेल्या एशियाई खेळांमध्ये त्यांनी भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. १९९७ मध्ये त्यांना भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नेमण्यात आले होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने दक्षिण एशियाई फुटबॉल फेडरेशन कप जिंकला आहे. अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार मिळविणारे ते एकटे खेळाडू आहेत.
मोहन बागान रत्न बाबत अधिक माहिती:
मोहन बागान पुरस्कार हा मोहन बागान एफसी तर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. फुटबॉल क्षेत्रामध्ये वैयक्तिक किंवा विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी २९ जुलैला प्रदान करण्यात येतो. 

चालू घडामोडी : २८ जुलै

१. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला औपचारिकरित्या गोवरमुक्त देश म्हणून घोषित केले आहे?
उत्तर - ब्राझिल, २०१५ मध्ये ब्राझिलमध्ये एकाही गोवरच्या रुग्णाची नोंद झालेली नाही यावरूनच जागतिक आरोग्य संघटनेने ब्राझिलला गोवर मुक्त देश घोषित केले आहे.
२. भारताने कोणत्या देशासोबत ४ पी-८आई लष्करी विमानांसाठी १ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे?
उत्तर - अमेरिका, भारताने अमेरिकन विमान निर्मिती करणाऱ्या बोइंगसोबत विमान खरेदीसाठी १ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. ह्या विमानामुळे भारतीय नौदलला भारतीय समुद्री सीमेवर पाळत ठेवणे सोपे जाणार आहे. हे विमान पानबुडी विरोधी श्रेणीतील असून शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे.
३. भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये विदेशी गुंतवणूक ५% हून कितीपर्यंत वाढविण्यात आली आहे?
उत्तर - १५%, केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडियन स्टॉक एक्सचेंज त्याचप्रमाणे बँकिंग कंपनी, इन्शुरन्स कंपनी मध्ये परदेशी गुंतवणुकीची मर्यादा ५% हून १५% पर्यंत वाढविण्यात आली आहे. ह्या निर्णयामुळे भारत लेटेस्ट टेक्नोलॉजीचा वापर करून आर्थिक दृष्टया प्रगती करेल त्याचप्रमाणे भारतीय स्टॉक एक्सचेंज आजच्या स्पर्धेच्या युगात शक्तिशाली बनेल.
४. यूरोपियन कमीशनने ब्रेक्सिटवर यूनाइटेड किंगडमसोबत बोलणी करण्यासाठी कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - मिचेल बर्नियर, यूरोपियन कमिशनचे माजी उपाध्यक्ष आणि फ़्रांसचे माजी मंत्री मिचेल बर्नियर यांची यूरोपियन कमिशनने ब्रेक्सिटवर यूनाइटेड किंगडमसोबत चर्चा करण्यासाठी नियुक्ती केली आहे. यासोबतच ते कमीशन टास्कफोर्सचे प्रमुख असणार आहेत, त्याचप्रमाणे यूरोपियन यूनियन करार अंतर्गत आर्टिकल ५० नुसार ते यूनाइटेड किंगडमसोबत ब्रेक्सिटवर बोलणी करणार आहेत.
५. नंदू पोळ यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या कार्यक्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - कलाकार, मराठी थिअटर कलाकार नंदू पोळ यांचे नुकतेच निधन झाले. थिअटर अकैडमीचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी अनेक लघुपट, माहितीपट, टीव्ही मालिका, शैक्षणिक पटांमध्ये काम केले आहे उदा. तीन पैशाचा तमाशा, महानिर्वाण, सामना, सिंहासन इ. त्यांनी त्यांच्या ५० वर्षाच्या कार्याची कथा 'मी नंदू पोळ' ह्या पुस्तकामध्ये लिहली आहे.
६. २०१६ ची सार्क गृह मंत्री परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - पाकिस्तान, पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये २०१६ ची सार्क होम मिनिस्टर्स कॉनफेरेन्स पार पडली. ह्या बैठकीचे मुख्य उद्देश्य होते सार्क देशांतील पोलिसांमध्ये नेटवर्किंग निर्माण करने आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनामध्ये माहिती शेयरिंग वाढविणे. भारताकडून गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ह्या परिषदेमध्ये भारताचे नेतृत्त्व केले.
७. वर्ल्ड हेपेटाइटिस डे कोणत्या दिवशी पळाला जातो?
उत्तर - २८ जुलै, वर्ल्ड हेपेटाइटिस डे दरवर्षी २८ जुलैला लोकांमध्ये हेपेटाइटिसबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पळाला जातो. ह्या रोगाचे हेपेटाइटिस ए, बी, सी, डी, ई असे प्रकार आहेत. यंदाची वर्ल्ड हेपेटाइटिस डेची थीम होती 'एलिमिनेशन'.