१. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम ची इंडिया इकॉनोमिक फोरम कोणत्या शहरामध्ये पार पडणार आहे?
उत्तर - नवी दिल्ली, इंडिया इकॉनोमिक फोरम नवी दिल्ली येथे ६-७ ओक्टोबर रोजी पार पडणार असून 'डिजिटल माध्यमांतून भारताचे परिवर्तन' ही ह्यमागची थीम असेल. त्याचप्रमाणे ह्या बैठकीला ५०० हून अधिक उद्योगपती, राजकारणी हजेरी लावतील.
२. संरक्षण दलातील अधिकाऱ्यांसाठी 'शौर्य होम लोन' ही स्कीम कोणत्या बँकेने सुरु केली आहे?
उत्तर - भारतीय स्टेट बैंक, भारतीय स्टेट बँकेने संरक्षण अधिकारी आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना कमी व्याज दरात होम लोन आणि लोन भरण्याची मर्यादा वयाच्या ७५ वर्षांपर्यंत असणारी योजना सुरु केली आहे. ह्या योजनेअंतर्गत दोन स्किम असून संरक्षण अधिकाऱ्यांना 'एसबीआई शौर्य होम लोन' टार इतर सरकारी कर्मचाऱ्यांना 'एसबीआई प्रिविलेज होम लोन', ह्या दोन्ही योजनांना प्रक्रिया शुक्ल शून्य रुपये असेल.
३. एंजेला रुग्गीरो यांची इंटरनैशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अथेलेटेस कमिशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, त्या कोणत्या खेळाशी निगडित आहेत?
उत्तर - आइस हॉकी, अमेरिकीच्या माजी एक हॉकी खेळाडू आणि १९९८ सालच्या ऑलिम्पिक गोल्ड विजेत्या एंजेला रुग्गीरो यांची आईओसीच्या अथेलेटेस कमिशनच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची नेमणूक क्लाउडिया बोकेल यांच्या जागी करण्यात आली असून त्यांच्या ४ वर्षाची कारकीर्द रिओ ऑलिम्पिकच्या शेवटी संपणार आहे. सध्या रुग्गीरो ह्या कमिशनच्या उपाध्यक्षा आहेत. अथेलेटस कमीशन हे आईओसीने अथेलेटसचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ठेवली आहे.
४. भारतातील पहिले अंडरग्राउंड म्यूजियम कोणत्या शहरात खुले करण्यात येणार आहे?
उत्तर - नवी दिल्ली, भारतातील पहिले अंडरग्राउंड म्यूजियम नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनमध्ये २ ओक्टोबर पासून खुले करण्यात येणार आहे. या म्यूजियममध्ये भारताच्या सर्व माजी राष्ट्रपतींच्या काही निवडक वस्तू त्याचप्रमाणे भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लागलेल्या वस्तू किंवा अवशेष यांचे प्रदर्शन असेल. हे म्यूजियम तयार होण्यासाठी ८० कोटीचा खर्च तर निर्माणासाठी २ वर्षे लागली आहेत.
५. जगातील सर्वात ऊंच गर्डर रेल्वे पुल भारतातील कोणत्या राज्यामध्ये तयार करण्यात येणार आहे?
उत्तर - मणिपुर, भारतीय रेल्वे भारतातील सर्वात मोठा बोगदा तर जगातील सर्वात ऊंच रेल्वे गर्डर पूल मणिपुरमधील जिरीबाम-तुपुल-इंफाल ह्या ब्रॉड गेज रेल्वे लाइनवर बनविणार आहे. १११ किमी लांबीच्या ह्या रेल्वे लाइनवर ३७ बोगदे असतील त्याचप्रमाणे ११.५५ किमी लांबीचा सर्वात मोठा बोगदा देखील असेल हा बोगदा पीर पंजाल बोगद्याहुनही मोठा असेल ज्याची लांबी ११.२५ किमी आहे. रेल्वे ब्रिज हा १४१ मीटर उंचीचा असेल युरोपमधील गर्डर ब्रिजहूनही ऊंच असेल ज्याची ऊंची १३९ मीटर आहे.
६. २०१६ ची वर्ल्ड मार्शियल आर्ट्स चैम्पियनशिप कोणी जिंकली आहे?
उत्तर - विवेक तेजा, ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये झालेल्या अंतिम लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाच्याच मैथ्यू रोज़ला नमवून भारताच्या मार्शियल आर्ट्स खेळाडू चेरुपल्ली विवेक तेजाने २०१६ ची वर्ल्ड मार्शियल आर्ट्स चैम्पियनशिप जिंकली आहे. त्याचप्रमाणे तो वर्ल्ड कराटे चैंपियनदेखील झाला आहे.

No comments:
Post a Comment