Sunday 14 August 2016

चालू घडामोडी : ८ ऑगस्ट

१. दहशवादाविरुद्धची अंतरराष्ट्रीय बैठक कोणत्या देशामध्ये पार पडली आहे?
उत्तर - इंडोनेशिया, दहशवादाविरुद्धची अंतरराष्ट्रीय बैठक इंडोनेशियातील बालीमध्ये १० ऑगस्टला पार पडली. सीमेवर होणाऱ्या दहशवादी करवाया त्याचप्रमाणे दहशदवादी संघटन यांना होणारे अर्थसहाय्य, माहिती हे या या विषयांवर बैठकीमध्ये चर्चा झाली. त्याचप्रमाणे विविध देशांच्या 'सीमेवर होणाऱ्या दहशदवादी चळवळी' हा बैठकीचा मुख्य मुद्दा होता. भरताकडून भारतीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू उपस्थित होते.
२. अभिजीत गुप्ता कोणत्या खेळाशी निगडित आहे?
उत्तर - बुद्धिबळ, भारतीय ग्रैंडमास्टर आणि माजी वर्ल्ड जूनियर चैंपियन अभिजीत गुप्ता याने नुकतीच श्रीलंकेतील कोलंबोमध्ये झालेल्या २०१६ कॉमनवेल्थ चेस चैंपियनशिप जिंकली आहे.
३. '२०१७ स्वच्छ सर्वेक्षण' अभियान कोणत्या केंद्रीय मंत्रालयने सुरु केले आहे?
उत्तर - नागरी विकास मंत्रालय, नागरी विकास मंत्री वेंकैय्या नायडू नवी दिल्लीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०१७ प्रकल्पाची सुरुवात केलि. ह्याअंतर्गत ५०० भारतीय शहरांचा अभ्यास करुन स्वच्छतेसाठी तेथील स्थानिक प्रशासनाने केलेल्या कार्याचा आराखडा तयार केला जाईल. स्वच्छता मिशनमध्ये लोकांचा सहभाग वाढावा म्हणून मंत्रालयने १९६९ ही स्वच्छता हेल्पलाइन तर स्वच्छता मोबाइल ऍप देखील सुरु केले आहे. त्याचप्रमाणे शौचलायांची निर्मिती आणि वापरासाठी 'असली तरक्की' मोहिम सुरु करण्यात आली आहे.
४. प्रत्येक नागरिकाला घरामध्ये पिण्याचे पाणी मिळावे यासाठी कोणत्या राज्य सरकारने मिशन भागरथी हा प्रमुख प्रकल्प सुरु केला आहे?
उत्तर - तेलंगाना, नरेंद्र मोदी यांनी तेलंगानातील मेडक जिहयात मिशन भागरथीच्या पहिल्या टप्प्याचे उद्धघाटन केले. प्रत्येक नागरिकाला घरामध्ये पाइपद्वारे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी तेलंगाना सरकारने मिशन भागरथी सुरु केले आहे. ह्या प्रकल्पा अंतर्गत ग्रामीण भागातील व्यक्तीला प्रति दिन १०० लीटर  स्वच्छ पिण्याचे पाणी तर शहरी भागातील व्यक्तीला १५० लीटर पाणी दिले जाईल. हा प्रकल्प मार्च २०१८ पूर्वी पूर्ण करण्याचा तेलंगाना सरकारचा प्रस्ताव आहे.
५. 'गुलबदन: पोट्रोइट ऑफ ए रोज़ प्रिंसेस एट दी मुग़ल कोर्ट' पुस्तकाचे लेखक/लेखिका कोण आहेत?
उत्तर - मार्गरेट रूमेर गोडें, गुलबदन: पोट्रॉइट ऑफ ए रोज प्रिंसेस एट दी मुग़ल कोर्ट पुस्तकाच्या मार्गरेट रूमेर गोडें लेखिका आहेत. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी बाबरची लहान मुलगी गुलबदन बेगमवर आधारित आहे. ती तिच्या वडलांच्या (बाबर), भावाच्या (हुमायूँ) आणि पुतण्या (अकबर) यांच्या राजकारभराची साक्षीदार होती.
६. 'आज़ादी ७० - याद करो कुरबानी' कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरु केला आहे?
उत्तर - मध्य प्रदेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ऑगस्टला आज़ादी ७० - याद करो क़ुरबानी कार्यक्रमाची सुरुवात केली.

No comments:

Post a Comment