Sunday 28 February 2016

चालू घडामोडी : २० फेब्रुवारी

१. कोणत्या देशाने ऑस्ट्रो एच अंतराळ निरिक्षण उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले आहे?
उत्तर - जापान, जपानने आपल्या एच-आयआयए रॉकेटच्या सहाय्याने ऑस्ट्रो-एच एक्सरे ह्या अंतराळ निरिक्षण उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले आहे. हा उपग्रह अंतराळामधील ब्लॅक होल्सवर अधिक माहिती गोळा करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. हा उपग्रह १४ मीटर उंच असून २.७ टन वजनाचा आहे त्यामध्ये ४ एक्सरे दूरदर्शित दुर्बिनी असून २ गामा रेस डिटेक्टर्स आहेत.

२. कोणत्या गीतकाराने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये प्रवेश करून जगातील पहिला गीतकार होण्याचा विक्रम केला आहे?
उत्तर - समीर अंजान, सुप्रसिध्द भारतीय गीतकार समीर अंजान हे जगातील पहिले गीतकार आहेत ज्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये एखादा विक्रम करून आपले नाव नोंदविले आहे, त्यानी 'सर्वात जास्त गीत रचणारे बॉलीवुड गीतकार' नवीन श्रेणीमध्ये विक्रम केला आहे. समीर अंजान यांनी ६५० बॉलीवुड चित्रपटांसाठी 3,५२४ गाणी लिहली आहेत. १५ डिसेंबर २०१५ रोजी त्यांच्या अर्जाची पडताळणी झाली होती.

३. 'लॉ एंड स्पोर्टस इन इंडिया डेवलपमेंट, इशूस एंड चैलेंजेस' ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - मुकुल मुदगल, नुकतेच प्रकाशित झालेल्या 'लॉ एंड स्पोर्टस इन इंडिया डेवलपमेंट एंड इशूस एंड चैलेंजेस' हे पुस्तक न्यायाधीश मुकुल मुदगल आणि विदुषपत सिंघानिया ह्यांनी लिहिले आहे.

४. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
उत्तर - कोलिखो पुल, अरुणाचल प्रदेशचे नववे मुख्यमंत्री म्हणून कोलिखो पुल यांनी ईटानगरच्या राजभवनामध्ये शपथ घेतली आहे.

५. पाणी संकट निवारणासाठी पाणी फाउंडेशन कोणत्या राज्य सरकार काम करणार आहे?
उत्तर - महाराष्ट्र, आमिर खान आणि पत्नी किरण राव ह्यांची स्वयंसेवी संस्था पाणी फाउंडेशन महाराष्ट्र सरकारसोबत महराष्ट्रातील पाणी संकट निवारणासाठी एकत्र काम करणार आहेत. ही एक स्पर्धा असेल ज्यामध्ये गावे पाण्याचा वापर कसा करतात हे अभ्यासले जाईल आणि विजेत्या गावाला ५० लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल. ही स्पर्धा २५ एप्रिल ते ३१ मे दरम्यान पार पडणार आहे.

६. क्रिस्टीन लेगार्दे ह्यांची कोणत्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी दुसऱ्यांदा नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - अंतरराष्ट्रीय नाणेनिधि, फ्रान्सचे माजी अर्थमंत्री क्रिस्टीन लेगार्दे यांची इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या व्यवस्थापकीय संचालकपदी दुसऱ्यांदा नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा ५ जुलै २०१६ पासून पाच वर्षांचा कार्यकाल सुरु होईल.

Saturday 27 February 2016

रेल्वे बजेट २०१६-१७ मुख्य मुद्दे

गुरुवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सादर केलेला रेल्वे बजेट २०१६-१७ हा त्यांचा दूसरा तर मोदी सरकारचा दूसरा रेल्वे बजेट होता. त्यांनी नवीन चार ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली असून कोणत्याही प्रकारची भाडेवाढ केली नाही. प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी डब्ब्यांमध्ये सीसीसटीवी कॅमरा लावण्याचे संकेत दिले आहेत. अंत्योदय, तेजस, उदय, हमसफर ह्या नवीन ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. हमसफर ही ४जी ची विशेष सेवा असणारी ट्रेन असून ही सेवा फक्त ३ एसी डब्ब्यांमध्येच असेल. तेजस ही १३० तासी वेगाने चालणारी ट्रेन असेल तर उदय ही रात्री धावणारी ट्रेन असेल. २०१६-१७ रेल्वे बजेट मधील प्रमुख मुद्दे:
  • रेल्वे मंत्र्यांनी काही नवीन ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे, हमसफर, तेजस, उदय आणि अंत्योदय.
  • आधुनिक सोयी सुविधानानी सज्ज अशी महामना एक्सप्रेस सुरु करण्याची घोषणा.
  • २०१६-१७ ह्या आर्थिक वर्षासाठी १.२१ लाख कोटींचे बजेट ठेवण्यात आले असून, त्यातील ४० हजार कोटी सरकारने मदत करावी असे त्यांचे मत आहे.
  • प्रवाशी डब्ब्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ५०% अधिक आरक्षण देण्याची कल्पना.
  • गूगल सोबत करार करून ह्यावर्षी १०० स्टेशनवरती येत्या २ वर्षांमध्ये ४०० स्टेशनवरती वाय-फाय सेवा सुरु करण्याचा प्रस्ताव.
  • ह्या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत १७००० शौचालये उपलब्ध करून देण्याची घोषणा.
  • पॅसेंजर ट्रेनची गती ८० किमी तासी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
  • दर १ मिनिटाला तब्बल ७२०० ई-टिकिट देण्याचे लक्ष्य समोर ठेवून सर्व्हरची क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव
  • प्रवाश्यांच्या अधिक सुरक्षेसाठी सर्व मोठया स्टेशनवरती होणाऱ्या सर्व घडामोडींवर सीसीटीवीने लक्ष ठेवले जाईल.
  • प्रवाश्यांच्या अधिक सेवेसाठी १३९ वरती फोन करून टिकिट कॅन्सल करण्याची सुविधा

Thursday 25 February 2016

भारतातील प्रमुख बंदरे : पश्चिम किनारपट्टी

भारतीय जलमार्ग प्राधिकरणाने भारतातील प्रमुख बंदरांचे ३ गटात वर्गीकरण केले आहे, मोठी बंदरे, मध्यम बंदरे, लहान बंदरे. भारताला जवळपास ७५१६.६ किमीचा समुद्र किनारा लाभला असून भारतातील महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, केरळ, गोवा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल ह्या ९ राज्यांमध्ये विस्तारला आहे. एकूण ९ राज्यांमध्ये १३ प्रमुख बंदरे असून २०० हून अधिक मध्यम व लहान बंदरे आहेत.
१३ प्रमुख बंदरांपैकी १२ सरकार चलित बंदरे असून भारतामध्ये फक्त चेन्नईमधील एन्नोर बंदर हे सहकर तत्वावर चालविले जाते.

भारतातील १२ प्रमुख बंदरे असून पश्चिम किनारपट्टीवर सहा बंदरे आहेत:
१. जवाहरलाल नेहरू बंदर (महाराष्ट्र): पश्चिम घाटावर कोकणातील मुख्यभूमीवर वसलेले जवाहरलाल नेहरू पोर्ट हे भारतातील सर्वात मुख्य बंदर आहे. किंग ऑफ पोर्ट्स असे संबोधिले जाणारे हे अरबी समुद्रामधील मुख्य बंदर आहे. त्याचप्रमाणे हे बंदर अंतरराष्ट्रिय कंटेनर हाताळणारे देशातील अग्रेसर बंदर आहे. ह्या बंदरातून यांत्रिक वस्तु, रसायने, खाद्य तेल, फळे, दुग्धजन्य पदार्थ ह्यांचे मोठया प्रमाणात निर्यात होते. जवाहरलाल नेहरू बंदर हे भारतील सर्वात जास्त कंटेनर हाताळनारे बंदर आहे. हे बंदर पूर्वी न्हावा-शेवा पोर्ट नावाने ओळखले जात होते.
२. मुंबई बंदर (महाराष्ट्र): पश्चिम मुंबईच्या मुख्यभूमीवर वसलेले मुंबई बंदर हे  भारतातील सर्वात मोठे बंदर आहे. हे भारतातील जुन्या बंदरांपैकी एक असून मोठया प्रमाणात होणाऱ्या माल वाहतुकीसाठी सक्षम आहे, ह्या बंदरातून रसायने, कच्चे तेल त्याचप्रमाणे इतर पेट्रोलियम उत्पादने यांची मोठया प्रमाणात आयात होते. पूर्वी आयात होणारे कंटेनर ह्याच बंदरावर येत असत परंतु मुंबईनजिक नव्याने सुरु करण्यात आलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्टवर ही वाहतूक वळविण्यात आली आहे.
३. मार्मागोवा बंदर (गोवा): मार्मागोवा बंदर हे गोव्यातील प्रमुख बंदर असून गोव्याच्या दक्षिण भागात आहे हे एक उत्तम नौसर्गिक बंदर आहे. मार्मागोवा बंदरातून लोहखनिज निर्मितीसाठी लागणारे कच्चे लोहखनिज व इतर कच्चा माल निर्यात केला जातो. गोव्यातील अंतरराष्ट्रीय विमानतळ डाबोलिम, वास्को दा गामा शहराप्रमाणेच मार्मागोवा बंदर हे प्रवाश्यांचे विशेष आकर्षणाचे ठिकाण आहे. हे नौसर्गिक बंदर सुरुवातीच्या काळातील भारतातील सर्वाधिक आधुनिक बंदर होते.
४. पनम्बुर बंदर (कर्नाटक): पनम्बुर बंदर हे नवीन मंगलोर बंदर नावाने ही ओळखले जाते. हे बंदर कर्नाटकमधील दक्षिण कन्नड़ा जिल्ह्यामध्ये आहे. पनम्बुर हे नैसर्गिक बंदर असून कर्नाटकातील सर्वात मोठे बंदर आहे. पनम्बुर बंदरामधून मैग्नेशियम, ग्रेनाइट, कॉफी आणि काजू यांचे मोठया प्रमाणात निर्यात होते तर बांबू, नौसर्गिक वायु, पेट्रोलियम उत्पादने, कंटेनर यांची मोठया प्रमाणात आयत होते. पनम्बुर बंदराच्या दक्षिणेला सुंदर असा अरबी समुद्राचा किनारा आहे आणि प्रवाश्यांची येथे सतत रेलचेल असते.
५. कोचीन बंदर (केरळ): कोचीन हे भारतातील प्रमुख बंदरांपैकी एक असून अरबी समुद्रामध्ये वसलेल्या बंदरापैकी प्रमुख बन्दर आहे. कोचीन येथे भारत पेट्रोलियमची कोचीन रिफायनरी असल्यामुळे नौकाविहारासाठी तयार करण्यात आलेले हे बंदर आहे. त्याचप्रमाणे कोचीन मसाल्याच्या पदार्थांसाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे.
६. कांडला बंदर (गुजरात): कच्छच्या आखातामध्ये वसलेले हे बंदर भारतातील त्याचप्रमाणे आशिया खंडातील पाहिले विशेष आर्थिक क्षेत्र अर्थातच स्पेशल इकॉनोमिक झोन आहे. रसायने, पेट्रोलियम उत्पादने, लोखंड यांचे येथे मोठया प्रमाणात आयात होते तर धान्य, मीठ, कापड यांचे निर्यात होते. उत्पादनाच्या बाबतीत हे देशातील अग्रेसर बंदरांपैकी एक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदर हे भारतातील सर्वात मोठे खाजगी बंदर आहे.

Wednesday 24 February 2016

चालू घडामोडी : १४ फेब्रुवारी

१. स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१६ नुसार भारतातील कोणते शहर सर्वात स्वच्छ शहर घोषित करण्यात आले आहे?
उत्तर - मैसूर, भारतीय गुणवत्ता परिषदने स्वच्च सर्वेक्षण २०१६ च्या अंतर्गत ७३ शहरांचे स्वच्छतेला लक्षात घेऊन सर्वेक्षण केले. कर्नाटकातील मैसूर शहर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर असून त्याखालोखाल चंदीगड, तिरुचिलापल्ली, नवी दिल्ली महानगरपालिका, विशाखापट्टनम, सूरत, राजकोट, पिंपरी-चिंचवड, मुंबई. त्याचप्रमाणे बिहारमधील धनबाद हे ७३ व्या क्रमांकावर आहे. हे सर्वेक्षण स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवीन शौचालय बांधने, घन कचरा व्यवस्थापन हे ग्राह्य धरले होते.

२. भारत कोणत्या देशासोबत लमित्ये २०१६ संयुक्त लष्करी अभ्यास शिबिर करणार आहे?
उत्तर - सेशेल्स, १४ दिवसाचे संयुक्त लष्करी अभ्यास शिबिर हे भारतीय सैन्य व सेशेल्सच्या सैन्यासोबत होत आहे. हे अभ्यास शिबिर १५ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. ही भारत व सेशेल्स ह्यांच्यामधील सातवे अभ्यास शिबिर आहे.

३. टाटा टेलीसर्विसेसच्या कोणत्या उपकंपनीने सोप्या पेमेंटसाठी आयआरसीटीसी सोबत करार केला आहे?
उत्तर - एम रूपी, टाटा टेलीसर्विसेसच्या उपकंपनीने म्हणजेच एम रुपीने इंडियन रेल्वे कैटरिंग एंड टुरिज़म कॉर्पोरेशन सोबत ऑनलाइन टिकिट बुकिंग करतेवेळी येणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी वन-टैप ईसी पेमेंट सुविधेसाठी करार केला आहे.

४. भारतातील सर्वात मोठी कोल वॉशरी कोणत्या राज्यामध्ये उभारली जाणार आहे?
उत्तर - छत्तीसगढ़, कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी साऊथ ईस्टन कोलफील्ड्स लिमिटेड भारतातील सर्वात मोठी कोल वॉशरी उभारणार असून तिची क्षमता तब्बल २५ दश लक्ष टन इतकी असेल. ही वॉशरी छत्तीसगढ़ राज्यातील कोब्रा जिल्ह्यामध्ये दुप्रा आणि जरहजेल ह्या गावातील ४१.२३ हेक्टर जमिनीवर उभारली जाणार आहे. सध्या भारतातील सर्वात मोठी वॉशरी ही छत्तीसगढ़ मध्येच आहे.

५. असोशिएन ऑफ टेनिस प्रोफशनल्स अर्जेंटीना ओपन २०१६ कोणी जिंकली आहे?
उत्तर - डोमिनिक थीम, ऑस्ट्रेलियाच्या डोमिनिक थीम याने निकोलस अल्माग्रोला पराभूत करून एटीपी २०१६ जिंकली आहे. उपांत्य फेरीमध्ये त्याने जागतिक क्रमवारीमध्ये अव्वलस्थानी असलेल्या राफेल नदालचा पराभव केला होता. ह्या विजयासोबत त्याने आपल्या आयुष्यातील चौथे एटीपी चषक जिंकले आहे.

६. फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार लीजन ऑफ ऑनर कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - मनीष अरोरा, फैशन क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल फैशन डिजायनर मनीष अरोरा ह्याला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Sunday 21 February 2016

चालू घडामोडी : १२ फेब्रुवारी

१. भारतामध्ये जनुकीय सुधार करून नव्याने तयार करण्यात आलेल्या मोहरीचे नव काय आहे?
उत्तर - डीएमएच-११, दिल्ली विद्यापीठाचे शास्त्रज्ञ दीपक पेंटल यांनी जनुकीय सुधर करून नव्याने मोहरी तयार केली आहे. अजून विक्रीसाठी ह्या सुधारित मोहरीला मान्यता मिळाली नसून जेनेटिक इंजीनियरिंग अप्रेसल कमिटीने निर्मात्यांकडून अधिक महितीची मागणी केली आहे.

२. जागतिक रेडिओ दिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर - १३ फेब्रुवारी, जागतिक रेडिओ दिन हा दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी वेग-वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. ह्या वर्षीची थीम होती आपात्कालीन समयी रेडिओचा कसा योग्य प्रकारे वापर करावा.

३. नुकत्याच प्रकाशित झालेल्या माहितीच्या आधारे भारतामध्ये असंघटीत कामगारांची टक्केवारी किती आहे?
उत्तर - ८९%, सरकारने नुकात्याच प्रकाशित केलेल्या आकडेवारी नुसार भारतामध्ये असंघटित कामगारांची संख्या ४० कोटी असून टक्केवारी तब्बल ८९% आहे.

४. प्राईड ऑफ केरळ ह्या पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - विद्या बालन, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेती विद्या बलन जी मुळची केरळचीच आहे, तिला प्राईड ऑफ केरळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार जागतिक मल्याळी  परिषद व कैराली टीवी ह्यांच्या सहयोगाने दिला जातो.

५. कोणत्या देशाने १९ वर्ष वयोगटाखालील क्रिकेट विश्व चषक २०१६ जिंकला आहे?
उत्तर - वेस्ट इंडीज, तीन वेळा १९ वर्ष वयोगटाखालील विश्व चषक विजेते भारतीय संघाला वेस्ट इंडिजने २०१६ चा १९ वर्ष वयोगटाखालील विश्व चषक मालिकेमध्ये सहज चित केले आणि आपला पहिला विश्व चषक जिंकला. हा अंतिम सामना बांग्लादेशमधील मीरपुर येथे पार पडला. बांग्लादेशाचा कर्णधार मेहंदी हसनची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली तर इंग्लंडच्या जैक बुरनहमने स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा तर नामबियाच्या फ्रिट्ज कोएट्ज़ीने स्पर्धेमध्ये सर्वात जास्त बळी घेतले.

६. २०१६ ची सेंट पिट्सबर्ग महिला ट्रॉफी कोणत्या जोडीने जिंकली आहे?
उत्तर - मार्टिना हिंगिस-सानिया मिर्जा, भारतीय-स्वीस महिला जोडी मार्टिना हिंगिस-सानिया मिर्जा यांनी २०१६ ची सेंट पिट्सबर्ग महिला ट्रॉफी जिंकली. त्यांनी अंतिम सामन्यामध्ये रशियन-चेक जोडी वेरा दुशेविना-बरबोरा यांचा सरळ सेट्स मध्ये पराभव केला. २०१६ मधील त्यांचे हे चौथे विजेतेपद आहे. 

Saturday 20 February 2016

चालू घडामोडी : १० फेब्रुवारी

१. ईशान्येकडील ८ राज्यांमध्ये एड्सवरती प्रतिबंध ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना हाती घेतली आहे?
उत्तर - सूर्योदय (प्रोजेक्ट सनराइज), केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्यांमध्ये एड्सवरती प्रतिबंध आणण्यासाठी प्रोजेक्ट सनराइज योजना सुरु केली आहे. ही पाच वर्षीय योजना असून २०१५ ते २०२० दरम्यान राबविण्यात येणार असून ह्या योजनेचा समावेश राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेत स्थित सेंटर फॉर डिसिस कंट्रोलचे ह्या योजनेला सहकार्य लाभले असून फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल ३६० ही संस्था हा कार्यक्रम राबविणार आहे.

२. सुधीर तैलंग यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या कार्यक्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर - व्यंगचित्रकार, सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुधीर तैलंग यांचे अवघ्या ५६ व्या वर्षी गडगाव येथे निधान झाले. त्यांनी नुकतेच १ प्रकाशित केले होते, नो प्राइम मिनिस्टर हे पुस्तकाचे शीर्षक असून ते माजी पंतप्रधान मनमोहनसिंग ह्यांच्यावर आधारित आहे. त्यांनी हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ़ इंडिया, इंडियन एस्प्रेस, एशियन एज अश्या नामांकित वृत्तपत्रांसाठी व्यंगचित्रे तयार केली आहेत.

३. भारत आणि चीन दरम्यान पहिले संयुक्त लष्कर अभ्यास शिबिर कोणत्या ठिकाणी पार पडले?
उत्तर - लद्दाख, भारत-चीन दरम्यान पहिले संयुक्त लष्कर अभ्यास शिबिर लद्दाख मध्ये पार पडले. भारत व चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उभे सैन्याच्या दरम्यान जास्तीत जास्त संवाद आणि समन्वय. हे अभ्यास शिबिर ६ फेब्रुवारी २०१६ मध्ये पार पडले.

४. एप्रिल २०१६ मध्ये होणारी जगभरातील पहिली जागतिक सागरी परिषद कोणत्या देशात भरविण्यात येणार आहे?
उत्तर - भारत, भारताला पहिली जागतिक सागरी परिषद भरविण्याचे यजमान मिळाले असून ही परिषद एप्रिल २०१६ मध्ये पार पडेल.

५. नॅशनल इंस्टीटूट ऑफ सायन्स एज्युकेशन एंड रिसर्च ही कोणत्या राज्यामध्ये आहे?
उत्तर - ओडिशा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नॅशनल इंस्टीटूट ऑफ सायन्स एज्युकेशन एंड रिसर्च संस्थेचे उद्धघाटन केले ही संस्था ओडिशा राज्यातील जतनी (भुवनेश्वर) येथे स्थित आहे.

६. ट्रांस-पैसिफिक भागीदारी करारामध्ये किती देश सदस्य आहेत?
उत्तर - १२, ट्रांस-पैसिफिक करार हा बहुराष्ट्रीय व्यापार करार असून सध्या १२ देश ह्या करारामध्ये सदस्य देश आहेत. ४ फेब्रुवारी रोजी ह्या करारावर न्यूझीलंडमधील ऑकलैंडमध्ये झालेल्या बैठकीमध्ये १२ देशांनी स्वाक्षरी केली असून त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्रूनेई, दारुसलाम, कॅनडा, चिली, जपान, मलेशिया, मेक्सिको, न्यूझीलंड, पेरू, सिंगापुर, विएतनाम, अमेरिका हे सदस्य देश आहेत.

Saturday 13 February 2016

चालू घडामोडी : ५ फेब्रुवारी

१. मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०१६ मध्ये कोणत्या महितीपटास (डॉक्यूमेंट्री) गोल्ड़न कोंच (सुवर्ण शंख पुरस्कार) पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - फूम शांग, मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०१६ चा गोल्डन कोंच पुरस्कार मणिपुरी महितीपट फूम शांगला मिळाला आहे. हा १४वा मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे. फूम शांग हा ५२ मिनिटांचा महितीपट असून बाम पबणकुमार ह्यांनी दिग्दर्शित केला असून मणिपूर राज्यातील लोकटक तलवावरून सुरु असलेल्या तणावग्रस्त वतावरणाचे चित्रीकरण केले आहे.
२. २०१६ ची (पुरुष) राष्ट्रीय स्नूकर स्पर्धा कोणी जिंकली आहे?
उत्तर - आदित्य मेहता, इंदौर येथे भरविण्यात आलेली ८३ वी राष्ट्रीय स्नूकर स्पर्धा आदित्य मेहता याने जिंकली आहे. अंतिम सामन्यामध्ये त्याने मनन चंद्राचा ६-३ असा पराभव केला.
३. युरेपियन आण्विक जीवशास्त्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - हम्बुर्ग, नुकतेच भारताला युरेपियन आण्विक जीवशास्त्र संघटनेचे म्हणजेच युरेपियन मॉलीक्यूलर बॉयलॉजी आर्गेनाईजेशनचे सहकारी सदस्यपद मिळाले आहे. नावाप्रमाणे ह्या संघटनेमध्ये सर्व युरेपियन देश असून सिंगापूर आणि भारत हा दूसरा यूरोप खंडाबाहेरील सदस्य देश आहेत. युरेपियन आण्विक जीवशास्त्र संघटनेचे मुख्यालय जर्मनीच्या हम्बुर्ग शहरामध्ये असून ही संघटना १९६४ मध्ये अस्तिवात आली आहे.
४. सनडान्स चित्रपट महोस्तव २०१६ मधील जागतिक चित्रपट निर्मिती पुरस्कार (ग्लोबल फ्लिम मेकिंग अवार्ड) कोणाला मिळाला आहे?
उत्तर - गीतू मोहनदास, मल्याळाम अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शिका गीतू मोहनदास यांना २०१६ सनडान्स चित्रपट महोस्तवातील जागतिक चित्रपट निर्मिती पुरस्कार मिळाला असून त्यांचा येणारा चित्रपट 'इन्शाँ अल्लाह'  या चित्रपटाच्या कथेला मिळाला आहे. ह्या चित्रपटाच्या कथेमध्ये लक्ष्यद्वीपमधील एक मुलगा आपल्या हरविलेल्या भावाला शोधण्यासाठी काय काय कष्ट घेते हे दर्शविले आहे.
५. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कोणत्या भारतीय कंपनीला जगातील सर्वात जास्त प्रभावी कंपनी म्हणून गणले गेले आहे?
उत्तर - टाटा कंसलटेंसी सर्विसेस, भारतील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टाटा कंसलटेंसी सर्विसेसला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील सर्वात प्रभावी कंपनी असे प्रमाणित केले आहे. हे प्रमाण ब्रॅड मूल्यांकणामध्ये जगातील अग्रेसर असलेल्या ब्रॅड फायनान्सने केले आहे. त्यांच्या २०१६ च्या सर्वेक्षणानुसार टीसीएस ला अअ+ रेटिंग मिळाली असून त्यांना १०० पैकी ७८.३ गुण मिळाले आहेत. त्याचप्रमाणे ह्या सर्वेक्षणानुसार डिस्ने हे २०१६ चे जगातील सर्वात प्रभावी ब्रॅड असून ऍपल हे जगातील सर्वात वैल्युएबल ब्रॅड आहे.
६. २०१६ चा मिल्ट्री कोब्रा गोल्ड सराव कोणत्या देशामध्ये भरविण्यात येणार आहे?
उत्तर - थाइलॅंड, दरवर्षी प्रामुख्याने अमेरिका आणि थाइलॅंड दरम्यान होणारा अंतरराष्ट्रीय मिल्ट्री कोब्रा गोल्ड सराव हा थाइलॅंड मध्ये पार पडेल. ह्यावर्षी भारत देखील ह्या सरावामध्ये सहभागी होणार आहे. 

Monday 8 February 2016

भारतातील राष्ट्रीय उद्याने

१. आंशी राष्ट्रीय उद्यान - कर्नाटक, स्थापना - १९८७, २५० चौ. किमी
२. बलफक्रम राष्ट्रीय उद्यान - मेघालय, स्थापना - १९८६, २२० चौ. किमी
३. बांधवगढ राष्ट्रीय उद्यान - मध्य प्रदेश, स्थापना - १९८२, ४४८.८५ चौ. किमी
४. बांदीपुर राष्ट्रीय उद्यान - कर्नाटक, स्थापना - १९७४, ८७४.२० चौ. किमी
५. बन्नेरगट्टा राष्ट्रीय उद्यान - कर्नाटक, स्थापना - १९७४, १०४.२७ चौ. किमी
६. बासंदा राष्ट्रीय उद्यान - गुजरात, स्थापना - १९७९, २४ चौ. किमी
७. बेतला राष्ट्रीय उद्यान - झारखण्ड, स्थापना - १९८६, २३१.६७ चौ. किमी
८. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान - ओरिसा, स्थापना - १९८८, १४५ चौ. किमी
९. ब्लॅकबक राष्ट्रिय उद्यान - गुजरात, स्थापना - १९७६, ३४.०८ चौ. किमी
१०. बुक्सा व्याघ्र प्रकल्प - पश्चिम बंगाल, स्थापना - १९९२, ११७.१ चौ. किमी
११. कॉपबेल बे राष्ट्रीय उद्यान - अंदमान आणि निकोबार, स्थापना - १९९२, ४२६.२३ चौ. किमी
१२. चांदोली राष्ट्रीय उद्यान - महाराष्ट्र, स्थापना - २००४, ३०९ चौ. किमी
१३. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड, स्थापना - १९३६, ५२०.८२ चौ. किमी
१४. दाचीगाम राष्ट्रीय उद्यान - जम्मू आणि काश्मीर, स्थापना - १९८१, १४१ चौ. किमी
१५. मुरु (वाळवंट) राष्ट्रीय उद्यान - राजस्थान, स्थापना - १९८०, ३१६२ चौ. किमी
१६. दिब्रु-सौखोवा राष्ट्रीय उद्यान - आसाम, स्थापना - १९९९, ३४० चौ. किमी
१७. दुधवा राष्ट्रीय उद्यान - उत्तर प्रदेश, स्थापना - १९७७, ४९०.२९ चौ. किमी
१८. एराविकुलम राष्ट्रीय उद्यान - केरल, स्थापना - १९७८, ९७ चौ. किमी
१९. फॉसिल राष्ट्रीय उद्यान - मध्य प्रदेश, स्थापना - १९८३, 0.२७ चौ. किमी
२०. गलाथिया राष्ट्रीय उद्यान - अंदमान आणि निकोबार, स्थापना - १९९२, ११० चौ. किमी
२१. गंगोत्री राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड, स्थापना - १९८९, १५५२.७३ चौ. किमी
२२. गीर राष्ट्रीय उद्यान - गुजरात, स्थापना - १९७५, २५८.७१ चौ. किमी
२३. गोरुमारा राष्ट्रीय उद्यान - पश्चिम बंगाल, स्थापना - १९९४, ७९.४५ चौ. किमी
२४. गोविंद पशु विहार - उत्तराखंड, स्थापना - १९९०, ४७२.०८ चौ. किमी
२५. हिमालयीन राष्ट्रीय उद्यान - हिमाचल प्रदेश, स्थापना - १९८४, ७५४.४० चौ. किमी
२६. गुगामल राष्ट्रीय उद्यान - महाराष्ट्र, स्थापना - १९८७, ३६१.२८ चौ. किमी
२७. गिंडी राष्ट्रीय उद्यान - तामिळनाडू, स्थापना - १९७६, २.८२ चौ. किमी
२८. हेमिस राष्ट्रीय उद्यान - जम्मू आणि काश्मीर, स्थापना - १९८१, ४१०० चौ. किमी
२९. इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान - तामिळनाडू, स्थापना - १९८९, ११७.१० चौ. किमी
३०. इंद्रावती राष्ट्रीय उद्यान - छत्तीसगढ, स्थापना - १९८१, १२५८.३७ चौ. किमी
३१. कालेसर राष्ट्रीय उद्यान - हरियाणा, स्थापना - २००३, १००.८८ चौ. किमी
३२. कान्हा राष्ट्रीय उद्यान - मध्य प्रदेश, स्थापना - १९५५, ९४० चौ. किमी
३३. कांगेर राष्ट्रीय उद्यान - छत्तीसगढ, स्थापना - १९८२, २०० चौ. किमी
३४. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान - आसाम, स्थापना - १९७४, ४७१.७१ चौ. किमी
३५. कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान - मणीपुर, स्थापना - १९७७, ४० चौ. किमी
३६. केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान - राजस्थान, स्थापना - १९८१, २८.७३ चौ. किमी
३७. किश्तवाड राष्ट्रीय उद्यान - जम्मू आणि काश्मीर, स्थापना - १९८१, ४०० चौ. किमी
३८. कुंद्रेमुख राष्ट्रीय उद्यान - कर्नाटक, स्थापना - १९८७, ६००.३२ चौ. किमी
३९. माधव राष्ट्रीय उद्यान - मध्य प्रदेश, स्थापना - १९५९, ३७५.२२ चौ. किमी
४०. मानस राष्ट्रीय उद्यान - आसाम, स्थापना - १९९०, ५०० चौ. किमी
४१. माउंट अबू अभयारण्य - राजस्थान, स्थापना - १९६०, २८८ चौ. किमी
४२. माउंट हरिएट राष्ट्रीय उद्यान - अंदमान आणि निकोबार, स्थापना - १९८७, ४६.६२ चौ. किमी
४३. मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान - तामिळनाडू, स्थापना - १९९०, १०३.२४ चौ. किमी
४४. नागरहोळ राष्ट्रीय उद्यान - कर्नाटक, स्थापना - १९८८, ६४३.३९ चौ. किमी
४५. नावेगाव राष्ट्रीय उद्यान - महाराष्ट्र, स्थापना - १९७५, १३३.८८ चौ. किमी
४६. पन्ना राष्ट्रीय उद्यान - मध्य प्रदेश, स्थापना - १९७३, ५४२.६७ चौ. किमी
४७. पेंच राष्ट्रीय उद्यान - महाराष्ट्र, स्थापना - १९७५, २५७.८५ चौ. किमी
४८. पेरियार राष्ट्रीय उद्यान - केरळ, स्थापना - १९८२, ३५० चौ. किमी
४९. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान - राजस्थान, स्थापना - २००३, २०० चौ. किमी
५०. रनथम्बौर राष्ट्रीय उद्यान - राजस्थान, स्थापना - १९८०, ३९२ चौ. किमी
५१. संजय राष्ट्रीय उद्यान - मध्य प्रदेश, स्थापना - १९८१, १९३८.०१ चौ. किमी
५२. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - महाराष्ट्र, स्थापना - १९८३, ८६.९६ चौ. किमी
५३. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान - केरळ, स्थापना - १९८४, ८९.५२ चौ. किमी
५४. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान - पश्चिम बंगाल, स्थापना - १९८४, १३३०.१० चौ. किमी
५५. ताडोबा राष्ट्रीय उद्यान - महाराष्ट्र, स्थापना - १९५५, ११६.५५ चौ. किमी
५६. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड, स्थापना - १९८२, ८७.५० च. किमी

Sunday 7 February 2016

महाराष्ट्राचे भारतातील स्थान

आकर: साधारण त्रिकोणाकृती, पाया कोकणात व निमुळते टोक भंडारयाकडे
अक्षांश विस्तार: १५ डिग्री ४४' उत्तर अक्षवृत्त ते २२ डिग्री ६' अक्षवृत्त
रेखांश विस्तार: ७२ डिग्री ३६' पूर्व रेखावृत्त ते ८० डिग्री ५४' रेखावृत्त
लांबी व रुंदी: ३०७,७१३ चौ. किमी, भारतात आकाराच्या दृष्टया मध्य प्रदेश व राजस्थानच्या खालोखाल तीसरा क्रमांक
नौसर्गिक सीमा: वायव्येस सातमाळा डोंगररांगा, गाळणा आणि अक्राणी टेकडया तर उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा, गविलखंड टेकडया आणि ईशान्येस दरकेसा टेकडया तर पूर्वेस चिरोली टेकडया, भमरागड़ डोंगर दक्षिणेस हिरण्यकेशी नदी, तेरेखोल नदी तर पश्चिमेस अफाट असा अरबी समुद्र

राजकीय सीमा: वायव्येस गुजरात आणि दादरा व नगर-हवेली संघराज्य उत्तरेस मध्यप्रदेश पूर्व आग्नेय आंधप्रदेश तर दक्षिणेस कर्नाटक व गोवा.
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग व जिल्ह्यांची संख्या:
  1. कोकण विभाग: ६ जिल्हे - मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  2. पुणे विभाग: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापूर
  3. नाशिक विभाग: नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव
  4. औरंगाबाद विभाग: औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड 
  5. अमरावती विभाग: अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ
  6. नागपूर विभाग: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या: ३६
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग: कोकण, देश, खानदेश, मराठवाडा, विदर्भ
महाराष्ट्र एकूण तालुक्यांची संख्या ३६३ आहे.

चालू घडामोडी : १ फेब्रुवारी

१. भारतातील पहिले डिफेन्स इंडस्ट्रियल पार्क (संरक्षण आद्योगिक उद्यान) कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे?
उत्तर - केरळ, केरळमधील पलक्कड़ जिल्ह्यातील ओट्टप्पलममध्ये भारतातील पहिले डिफेन्स इंडस्ट्रियल पार्क उभारण्याचे भारत सरकारने ठरविले आहे. ह्या पार्कसाठी २३१ करोड रुपये खर्च येणार असून केंद्र आणि केरळ राज्य सरकारच्या सहकार्याने हे उद्यान उभारण्यात येणार आहे. ५० कोटी रुपये केंद्र सरकार गुंतविणार असून उर्वरित रक्कम केरळ राज्य सरकार पुरविणार आहे.

२. ३० व्या सूरजकुंड अंतरराष्ट्रीय कलाकुसार (क्राफ्ट्स) मेळा २०१६ साठी कोणते राज्य विषय (थीम) ठरविण्यात आला आहे?
उत्तर - तेलंगाना, ३० वा सूरजकुंड अंतरराष्ट्रिय कलाकुसार मेळा २०१६ हरियाणातील फरीदाबाद येथे सुरु आहे. हा मेळा १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जाईल. ह्या मेळ्यासाठी तेलंगाना हे राज्य विषय ठेवण्यात आला आहे. हा कार्यक्रम सूरजकुंड मेळा अथॉरिटी, हरियाणा पर्यटन महामंडळ आणि भारत सरकारच्या (पर्यटन व परराष्ट्र मंत्रालय) सहकार्याने साजरा होत आहे.

३. २०१६ ची ऑस्ट्रिलयन पुरुष ओपन मालिका कोणी जिंकली आहे?
उत्तर - नोवाक जोकोविच, सर्बियाच्या नोवाक  जोकोविचने २०१६ ची ऑस्ट्रेलियन ओपन मलिका जिंकली आहे. मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये जोकोविचने एंडी मरेचा पराजित करून ही स्पर्धा जिंकली.

४. कोणती भारतीय कंपनी जगातील सर्वात उंच उभा क्लॉक टॉवर बांधणार आहे?
उत्तर - इंफोसिस, सॉफ्टवेर विश्वातील नामांकित भारतीय एमइनसी इंफोसिस आपल्या मैसूर येथील शिक्षण संस्थेमध्ये जगातील सर्वात उंच क्लॉक टॉवर उभारणार आहे. प्रस्तावित टॉवर हा १३५ मीटरचा असून तो लंडनमधील बिग मेन टॉवर (९६ मीटर) हून उंच असेल.

५. सशस्त्र सीमा बलाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - अर्चना रामसुंदरम, ज्येष्ठ आईपीस ऑफिसर अर्चना रामसुंदरम यांची सशस्त्र सीमा बलाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड करण्यात आली असून त्या नेपाळ आणि भूटान सीमेवरील कार्यभार सांभाळतील. ह्यासोबतच  निमलष्करी दलाच्या त्या महिला संचालक आहेत. सध्या त्या राष्ट्रिय गुन्हे नोंदणी विभागाच्या विशेष संचालक आहेत.

६. २०२१ चा फिना वर्ल्ड अक्वैटिक्स चैम्पियनशिप भरविण्याचे यजमानपद कोणत्या देशाला मिळाले आहे?
उत्तर - जपान, २०२१ चा फिना वर्ल्ड अक्वैटिक्स चैम्पियनशिप भरविण्याचे यजमान पद जपान मिळाले असून जपानमधील फुकुओका शहरामध्ये ह्या स्पर्धा पार पडणार आहेत.

Friday 5 February 2016

चालू घडामोडी : ३०, ३१ जानेवारी

१. २०१६ चा ऑस्ट्रेलियन ओपन एकेरी महिला चषक कोणी जिंकला आहे?
उत्त्तर - अँजेलिक कर्बर, जर्मन टेनिस खेळाडू अँजेलिक कर्बर हिने २०१६ ची ऑस्ट्रेिलयन ओपन (महिला) जिंकली आहे, मेलबर्न पार्क येथे झालेल्या  अंतिम सामन्यामध्ये तिने अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिचा पराभव केला. याआधी जर्मनीच्या स्टफ्फी ग्राफने १९९४ मध्ये ही मलिका जिंकली होती.

२. के. वीरमणी सामाजिक न्याय पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्त्तर - नितीश कुमार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार म्हणजेच के वीरमणी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी देण्यात येणार आहे. हा पुरस्कार शिकागो स्थित पेरियार इंटरनॅशनल ह्या संस्थेकडून प्रदान केला जातो, १ लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

३. २०१५-१६ ची एमआरएफ चॅलेंज फॉर्मूला २००० ही कार रेसिंग स्पर्धा कोणी जिंकली आहे?
उत्तर - मद्रास रेसिंग ट्रॅक, तामिळनाडू येथे पार पडलेली २०१५-१६ ची एमआरएफ चॅलेंज फार्मूला २००० ही स्पर्धा ब्राज़ीलियन रेसिंग ड्रायव्हर पित्रो पिट्टीपालदी ह्याने जिंकली आहे.

४. भारतामध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट (एकूण देशांतर्गत उत्पादन) मोजण्यासाठी कोणते आर्थिक वर्ष बेस ईयर (आधार वर्ष) म्हणून मानले जाईल?
उत्तर - २०११-१२

५. एनपीटीसी लिमिटेडच्या संचालक व अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - गुरदीप सिंग, शासनाने नुकतेच एनपीटीसी लिमिटेडच्या संचालक व अध्यक्षपदी गुरदीप सिंग यांची नेमणूक केली आहे, सध्या ते गुजरात राज्य विद्युत महामंडळाचे मुख्य आहेत. गुरदीप सिंग हे पाहिले व्यक्ती आहेत ज्यांची शासनाच्या शोध कमिटीतर्फे महारत्न कंपनीच्या मुख्यपदी निवड झाली आहे.

६. ३४ वी नॅशनल रोविंग चैम्पियनशिप कोणत्या शहरामध्ये पार पडली?
उत्तर - हैद्राबाद, ३४ वी नॅशनल रोविंग चैम्पियनशिप २०१६ हैद्राबादच्या हुसैन सागर तलावामध्ये २५ ते ३१ जानेवारी दरम्यान भरविण्यात आली होती. पुरुष गटामध्ये भारतीय पोलिस दलाच्या संदीप कुमार ह्याने ही मलिका जिंकली.

Thursday 4 February 2016

चालू घडामोडी: २८ जानेवारी

१. २६ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान भारत पर्व हा महोत्सव कोणत्या शहरमध्ये भरविण्यात आला होता?
उत्त्तर- दिल्ली, ६७ वा प्रजासत्ताक दिन विशेष रूपाने साजरा करता यावा म्हणून केंद्र सरकारने २६ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान भारत पर्व महोस्तव दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये भरविला होता. आयोजित महोस्तव हा भारतातील विविध राज्यांतील भोजन आणि संस्कृती दाखविण्यासाठी आयोजित केला गेला होता. ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सामान्य जनतेने जास्तीत जास्त लोक सहभाग करने आणि देशाची विवेधतेतील एकता जपने हा होता.

२. मुख्यमंत्री जल स्वावलंभन अभियान योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
उत्त्तर - राजस्थान, राजस्थान सरकारने पाण्याची साठवण, जलसंधारण करण्यासाठी मुख्यमंत्री जल स्वावलंभन अभियान सुरु केले आहे. ही योजना मुख्यतः ग्रामीण भागामध्ये राबविण्यात येणार असून जलसंधारणासाठी नवीन उपक्रम, शुद्धतेबद्दल जनजागरण अशा गोष्टींचा समावेश आहे.

३. सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ़ बुद्धिस्ट स्टडीज कोणत्या शहरामध्ये आहे?
उत्तर - लेह, जम्मू कश्मीर, नुकतेच केंद्र सरकारने सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ़ बुद्धिस्ट स्टडीज, लेह ला डे-नोवो केटेगरी अंतर्गत डीम्ड विद्यापीठाचा दर्जा दिल्याचे घोषित केले आहे. डे-नोवो यूनिवर्सिटी म्हणजेच नावीन्यपूर्ण विद्यापीठ.

४. आईसीसी चा १९ वर्ष वयोगटाखालील विश्व चषक कोणत्या दशामध्ये खेळला जात आहे?
उत्तर - बांग्लादेश, बांग्लादेशने आईसीसीचा १९ वर्ष वयोगटाखालील विश्वचषकाचा यजमान देश आहे. ही मलिका २२ जानेवारी पासून १४ फेब्रुवारी दरम्यान होणार असून हा ११ वा १९ वर्ष वयोगटाखालील विश्वचषक आहे. बांग्लादेशने याआधी २००४ मध्ये १९ वर्ष वयोगटाखालील विश्वचषकाचे यजमानपद भूषविले होते.

५. थाई तांदूळ निर्यातदार असोशिएशननुसार २०१५ मध्ये कोणत्या देशाने सर्वात तांदूळ निर्यात केला आहे?
उत्तर - भारत, बैंकाक स्थित थाई तांदूळ निर्यातदार असोशिएशननुसार भारताने थाईलंडला पाठीमागे टाकत २०१५ मधील जगातील सर्वात जास्त तांदूळ निर्यात करणारा देश झाला आहे. भारताने २०१५ मध्ये तब्बल १०.२३ करोड़ टन तांदूळ निर्यात केला आहे. भारत, थाइलॅंड पाठोपाठ वियतनाम हा तीसरा सर्वात मोठा निर्यातदार असून गतवर्षीप्रमाणे यावर्षी ही चीन सर्वात मोठा तांदूळ आयतदार आहे.

६. २०१६ चा ऐलान बॉर्डर पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर - डेविड वॉर्नर, २०१६ चा ऐलान बॉर्डर पुरस्कार सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरने जिंकला आहे, हा पुरस्कार जिंकणारा तो ११ वा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे.

Wednesday 3 February 2016

क्योटो प्रोटोकॉल

जपानमधील क्योटो शहरात जगातील प्रमुख देशांची जागतिक तपमानवाढ व प्रदुषण नियंत्रण यासाठी बैठक झाली या बैठकीला क्योटो प्रोटोकॉल असे संबोधले जाते. सध्याचे तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून त्यामुळे जर पृथ्वीवर असमतोल निर्माण झाल्यास त्याला केवळ मानवजात जवाबदार आहे. ही तमानवाढ मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे.
जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अमुलाग्र प्रयत्न होण्याची गरज आहे. क्योटो प्रोटोकॉल हा त्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या प्रोटोकॉलमध्ये अनेक देशांनी मान्य केले आहे की ते २०१५ पर्यंत आपापल्या देशातील हरितवायूंचे उत्सर्जन १९९० च्या पातळीपेक्षा कमी आणतील. कराराप्रमाणे अनेक देशांनी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु जर्मनी वगळता बहुतेक देशांना या कराराचे पालन करणे अवघड जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हरितवायूंचे उत्सर्जन एवढ्या लवकर कमी करणे म्हणजे आर्थिक प्रगतिला खिळ घालणे. तसेच अमेरिकेसारख्या सर्वात जास्त उत्सर्जन करणाऱ्या देशाने अजूनही या करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे एकंदरित जागतिक तापमानवाढ सध्यातरी अटळ दिसत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, यूरोप, चीन, जपान हे देश आहेत. याचे मुख्य कारण त्यांचे मोठ्या प्रमाणावरील उर्जेचा वापर व मोठ्या प्रमाणावरील हरितवायूंचे उत्सर्जन परंतु जागतिक तापमानवाढीस सर्वात जास्त फटका एकंदरित उष्ण कटिबंधीय देशांना जास्त बसणार आहे.

Tuesday 2 February 2016

चालू घडामोडी - २७ जानेवारी

१. कोणत्या राज्यामध्ये २३ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान लाल पांडा हिवाळी महोत्सव साजरा झाला?
उत्तर - सिक्किम, सिक्किम मध्ये २३ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान लाल पांडा हिवाळी महोत्सव साजरा झाला. ह्या नऊ दिवसाच्या महोत्सवामध्ये अन्न, संस्कृती, संगीत, नृत्य, योगा, सुसंवाद असे वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात.

२. इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरामध्ये उभारण्यात येणार आहे?
उत्तर - गुड़गांव, इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे मुख्यालय राष्ट्रिय सौर ऊर्जा संस्थेच्या आवारात ५ एकर जागेमध्ये उभारण्यात आहे. एखाद्या अंतरराष्ट्रिय किंवा अंतर-सरकारी संस्थेचे मुख्यालय भारतामध्ये उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचप्रमाणे भारत ही इमारत आणि इतर सोयी सुविधा उभारण्यासाठी तब्बल १७५ करोड रुपये खर्च करणार आहे.

३. नुकत्याच प्रकाशित झालेल्या जागतिक भष्ट्राचार निर्देशकामध्ये भारताला कितवे स्थान देण्यात आले आहे. उत्तर - ७६ वे, भष्ट्रचारावर लक्ष ठेवून असणारी बर्लिन स्थित ट्रांसपेरेंसी इंटरनॅशनल ह्या संस्थेने १६८ देशांच्या यादीमध्ये भारताला ७६ वे स्थान दिले आहे. सर्वात कमी भष्ट्राचार असलेला देश डेन्मार्क असून त्यापाठोपाठ फिनलैंड, स्वीडन, न्यूझीलंड, नेदरलॅंड आहेत. ही आकडेवारी सरकारी क्षेत्रामध्ये होणाऱ्या भष्ट्रचारावर आधारित असते.

४. ऑस्ट्रेलियामधील दंतचिकित्सा कार्यासाठी कोणाचा ऑर्डर ऑफ़ ऑस्ट्रेलिया पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे?
उत्तर - संजीव कोशी, तीन भारतीय वंशाच्या असलेल्या संजीव कोशी, चेंनुपथी जगदीश, जय चंद्रा यांना ऑस्ट्रेलियातील सर्वात उच्च पुरस्कार म्हणजेच ऑर्डर ऑफ़ ऑस्ट्रेलिया पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांना भौतिक, तंत्रज्ञान, औषधी क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल देण्यात आला आहे. संजय कोशी मेलबर्न स्थित दंतचिकित्सक असून त्यांना औषधी क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. चेंनुपथी जगदीश हे कॅनबेरातील ऑस्ट्रेलिया नॅशनल यूनिवर्सिटी मध्ये ख्यातनाम प्राध्यापक आहेत तर जय चंद्रा हे डोळ्याचे डॉक्टर आहेत.

५. भारतातील कोणत्या पहिल्या ट्रेनमध्ये अंधांसाठी ब्रेल लिपीमधील फलक लावण्यात आले आहेत?
उत्तर - मैसूर-वाराणसी एक्सप्रेस, मैसूर-वाराणसी एक्सप्रेस ही देशातील पहिली ट्रेन असेल जिच्यामध्ये अंधांसाठी ब्रेल लिपीतील फलक लावण्यात आले आहेत. ह्या फलकांवरती बर्थ (आसान) नंबर, अलार्म चैनचे ठिकाण, स्वछतागृह त्याचप्रमाणे आपात्कालीन खिड़की यांबद्दल माहिती असेल. त्याचप्रमाणे ह्या आपात्कालीन खिडकीचा वापर कसा करावा ह्याची माहिती देखील दिली आहे. दिल्ली-पूरी पुरुषोत्तम एक्सप्रेस मध्ये सर्वप्रथम ब्रेल लिपीतील फलकांचे डब्बे होते.

६. ऑल इंडिया रेडिओ तर्फे नुकताच सुरु करण्यात आलेला २४ तास शास्त्रीय संगीत ऑडियो चॅनलचे नाव काय आहे?
उत्तर - रागम, ऑल इंडिया रेडिओ रसिकांच्या सेवेकरता तर्फे रागम हा २४ तास शास्त्रीय संगीताचा ऑडियो चॅनल सुरु करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ह्या चॅनलला डिजिटल रूप ही देण्यात आले आहे. ह्याची वेबसाइट असून त्याचे एंड्राइड ऑप देखील प्रकाशित करण्यात आले आहे.