Sunday 21 February 2016

चालू घडामोडी : १२ फेब्रुवारी

१. भारतामध्ये जनुकीय सुधार करून नव्याने तयार करण्यात आलेल्या मोहरीचे नव काय आहे?
उत्तर - डीएमएच-११, दिल्ली विद्यापीठाचे शास्त्रज्ञ दीपक पेंटल यांनी जनुकीय सुधर करून नव्याने मोहरी तयार केली आहे. अजून विक्रीसाठी ह्या सुधारित मोहरीला मान्यता मिळाली नसून जेनेटिक इंजीनियरिंग अप्रेसल कमिटीने निर्मात्यांकडून अधिक महितीची मागणी केली आहे.

२. जागतिक रेडिओ दिन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर - १३ फेब्रुवारी, जागतिक रेडिओ दिन हा दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी वेग-वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. ह्या वर्षीची थीम होती आपात्कालीन समयी रेडिओचा कसा योग्य प्रकारे वापर करावा.

३. नुकत्याच प्रकाशित झालेल्या माहितीच्या आधारे भारतामध्ये असंघटीत कामगारांची टक्केवारी किती आहे?
उत्तर - ८९%, सरकारने नुकात्याच प्रकाशित केलेल्या आकडेवारी नुसार भारतामध्ये असंघटित कामगारांची संख्या ४० कोटी असून टक्केवारी तब्बल ८९% आहे.

४. प्राईड ऑफ केरळ ह्या पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - विद्या बालन, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेती विद्या बलन जी मुळची केरळचीच आहे, तिला प्राईड ऑफ केरळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार जागतिक मल्याळी  परिषद व कैराली टीवी ह्यांच्या सहयोगाने दिला जातो.

५. कोणत्या देशाने १९ वर्ष वयोगटाखालील क्रिकेट विश्व चषक २०१६ जिंकला आहे?
उत्तर - वेस्ट इंडीज, तीन वेळा १९ वर्ष वयोगटाखालील विश्व चषक विजेते भारतीय संघाला वेस्ट इंडिजने २०१६ चा १९ वर्ष वयोगटाखालील विश्व चषक मालिकेमध्ये सहज चित केले आणि आपला पहिला विश्व चषक जिंकला. हा अंतिम सामना बांग्लादेशमधील मीरपुर येथे पार पडला. बांग्लादेशाचा कर्णधार मेहंदी हसनची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली तर इंग्लंडच्या जैक बुरनहमने स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा तर नामबियाच्या फ्रिट्ज कोएट्ज़ीने स्पर्धेमध्ये सर्वात जास्त बळी घेतले.

६. २०१६ ची सेंट पिट्सबर्ग महिला ट्रॉफी कोणत्या जोडीने जिंकली आहे?
उत्तर - मार्टिना हिंगिस-सानिया मिर्जा, भारतीय-स्वीस महिला जोडी मार्टिना हिंगिस-सानिया मिर्जा यांनी २०१६ ची सेंट पिट्सबर्ग महिला ट्रॉफी जिंकली. त्यांनी अंतिम सामन्यामध्ये रशियन-चेक जोडी वेरा दुशेविना-बरबोरा यांचा सरळ सेट्स मध्ये पराभव केला. २०१६ मधील त्यांचे हे चौथे विजेतेपद आहे. 

No comments:

Post a Comment