Tuesday 2 February 2016

चालू घडामोडी - २७ जानेवारी

१. कोणत्या राज्यामध्ये २३ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान लाल पांडा हिवाळी महोत्सव साजरा झाला?
उत्तर - सिक्किम, सिक्किम मध्ये २३ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान लाल पांडा हिवाळी महोत्सव साजरा झाला. ह्या नऊ दिवसाच्या महोत्सवामध्ये अन्न, संस्कृती, संगीत, नृत्य, योगा, सुसंवाद असे वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात.

२. इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरामध्ये उभारण्यात येणार आहे?
उत्तर - गुड़गांव, इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे मुख्यालय राष्ट्रिय सौर ऊर्जा संस्थेच्या आवारात ५ एकर जागेमध्ये उभारण्यात आहे. एखाद्या अंतरराष्ट्रिय किंवा अंतर-सरकारी संस्थेचे मुख्यालय भारतामध्ये उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचप्रमाणे भारत ही इमारत आणि इतर सोयी सुविधा उभारण्यासाठी तब्बल १७५ करोड रुपये खर्च करणार आहे.

३. नुकत्याच प्रकाशित झालेल्या जागतिक भष्ट्राचार निर्देशकामध्ये भारताला कितवे स्थान देण्यात आले आहे. उत्तर - ७६ वे, भष्ट्रचारावर लक्ष ठेवून असणारी बर्लिन स्थित ट्रांसपेरेंसी इंटरनॅशनल ह्या संस्थेने १६८ देशांच्या यादीमध्ये भारताला ७६ वे स्थान दिले आहे. सर्वात कमी भष्ट्राचार असलेला देश डेन्मार्क असून त्यापाठोपाठ फिनलैंड, स्वीडन, न्यूझीलंड, नेदरलॅंड आहेत. ही आकडेवारी सरकारी क्षेत्रामध्ये होणाऱ्या भष्ट्रचारावर आधारित असते.

४. ऑस्ट्रेलियामधील दंतचिकित्सा कार्यासाठी कोणाचा ऑर्डर ऑफ़ ऑस्ट्रेलिया पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे?
उत्तर - संजीव कोशी, तीन भारतीय वंशाच्या असलेल्या संजीव कोशी, चेंनुपथी जगदीश, जय चंद्रा यांना ऑस्ट्रेलियातील सर्वात उच्च पुरस्कार म्हणजेच ऑर्डर ऑफ़ ऑस्ट्रेलिया पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांना भौतिक, तंत्रज्ञान, औषधी क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल देण्यात आला आहे. संजय कोशी मेलबर्न स्थित दंतचिकित्सक असून त्यांना औषधी क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. चेंनुपथी जगदीश हे कॅनबेरातील ऑस्ट्रेलिया नॅशनल यूनिवर्सिटी मध्ये ख्यातनाम प्राध्यापक आहेत तर जय चंद्रा हे डोळ्याचे डॉक्टर आहेत.

५. भारतातील कोणत्या पहिल्या ट्रेनमध्ये अंधांसाठी ब्रेल लिपीमधील फलक लावण्यात आले आहेत?
उत्तर - मैसूर-वाराणसी एक्सप्रेस, मैसूर-वाराणसी एक्सप्रेस ही देशातील पहिली ट्रेन असेल जिच्यामध्ये अंधांसाठी ब्रेल लिपीतील फलक लावण्यात आले आहेत. ह्या फलकांवरती बर्थ (आसान) नंबर, अलार्म चैनचे ठिकाण, स्वछतागृह त्याचप्रमाणे आपात्कालीन खिड़की यांबद्दल माहिती असेल. त्याचप्रमाणे ह्या आपात्कालीन खिडकीचा वापर कसा करावा ह्याची माहिती देखील दिली आहे. दिल्ली-पूरी पुरुषोत्तम एक्सप्रेस मध्ये सर्वप्रथम ब्रेल लिपीतील फलकांचे डब्बे होते.

६. ऑल इंडिया रेडिओ तर्फे नुकताच सुरु करण्यात आलेला २४ तास शास्त्रीय संगीत ऑडियो चॅनलचे नाव काय आहे?
उत्तर - रागम, ऑल इंडिया रेडिओ रसिकांच्या सेवेकरता तर्फे रागम हा २४ तास शास्त्रीय संगीताचा ऑडियो चॅनल सुरु करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ह्या चॅनलला डिजिटल रूप ही देण्यात आले आहे. ह्याची वेबसाइट असून त्याचे एंड्राइड ऑप देखील प्रकाशित करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment