Sunday 15 May 2016

लोकसभा

लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य 'भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे' हे असते, अर्थात राज्य कारभारच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत.

'लोकसभा' हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २०१६ पर्यंत भारतामध्ये १६ लोकसभा कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेचे थेट प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ़ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्य घटनेनुसार लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य जास्तीत जस्त असू शकतात, त्यात ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत तर २ सदस्य एँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.
प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणिबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यांमध्ये ५ वर्षांहुन अधिक काळही वाढवता येतो.
राज्यागणिक मतदारसंघ:
 विभाग 
प्रकार
मतदारसंघ
अंदमान आणि निकोबार बेटे
केंद्रशासित प्रदेश
आंध्र प्रदेश
राज्य
२५
अरुणाचल प्रदेश
राज्य
आसाम
राज्य
१४
बिहार
राज्य
४०
चंडीगढ़
केंद्रशासित प्रदेश
छत्तीसगढ़
राज्य
११
दादरा आणि नगर हवेली
केंद्र शासित प्रदेश
दमन आणि दिव
केंद्रशासित प्रदेश
दिल्ली
केंद्रशासित प्रदेश
गोवा
राज्य
गुजरात
राज्य
२६
हरियाणा
राज्य
१०
हिमाचल प्रदेश
राज्य
जम्मू आणि कश्मीर
राज्य
झारखण्ड
राज्य
१४
कर्नाटक
राज्य
२८
केरळ
राज्य
२०
लक्ष्यद्वीप
केंद्रशासित प्रदेश
मध्य प्रदेश
राज्य
२९
महाराष्ट्र
राज्य
४८
मणिपुर
राज्य
मेघालय
राज्य
मिझोरम
राज्य
नगालैंड
राज्य
ओडिशा
राज्य
२१
पुदुच्चेरी
केंद्रशासित प्रदेश
पंजाब
राज्य
१३
राजस्थान
राज्य
२५
सिक्किम
राज्य
तामिळनाडू
राज्य
३९
तेलंगाना
राज्य
१७
त्रिपुरा
राज्य
उत्तराखंड
राज्य
उत्तर प्रदेश
राज्य
८०
पश्चिम बंगाल
राज्य
४२



देश आणि खंड स्वारस्यपूर्ण गोष्ठी

* पूर्ण जगतील तलावांची संख्या एकत्र केली तरी कनाडामध्ये त्याहून अधिक तलाव आहेत.
* कझागिस्तान हा चहूबाजूने जमीनी सीमा असणारा सर्वात मोठा देश आहे.
* फ्रांसमध्ये तब्बल १२ अंतरराष्ट्रिय टाइम ज़ोन आहेत.
* जगातील सर्वाधिक वजनदार लोकांची संख्या नॉरू देशामध्ये आहे.
* जगातील सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेला देश म्हणजेच मंगोलिया, ह्या देशाची घनता ४ लोक प्रति चौरस मैल आहे.
* सौदी अरेबिया देशामध्ये एकही नदी नाही.
* जगातील सर्वात जास्त जंगल असणारा देश म्हणजेच सूरीनाम, देशाच्या पूर्ण जमिनीपैकी ९१% जमीन ही जंगल आहे.
* पापुआ न्यू गिनी देशामध्ये सर्वात जास्त भाषा म्हणजेच ८२० भाषा बोलल्या जातात.
* रशियाला सर्वात जास्त शेजारी देश असून त्यांची संख्या १६ आहे.
* न्यूज़ीलॅंड हा महिलांना मतदानाचा अधिकार देणारा जगातील सर्वात पहिला देश आहे.
* कॅनडा देशाला जगातील सर्वधिक लांबीचा समुद्र किनारपट्टी लाभली असून तिची लांबी तब्बल २०२.०८० किमी आहे.
* सिंगापूरमध्ये एकही शेत नाही आणि हा बिगर शेतीचा जगातील सर्वात मोठा देश आहे.
* भारतामध्ये सर्वात जास्त पोस्ट ऑफिस आहेत

चालू घडामोडी : १० मे

१. कोणत्या भारतीय विद्युत निर्मिती करणार्या कंपनीला बांग्लादेशमध्ये द्रवरूप नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी प्रकल्पाला मान्यता प्राप्त झाली आहे?
उत्तर - रिलायंस पावर, रिलायंस पावर ह्या भारतीय कंपनीला बांग्लादेश सरकारकडून एलएनजी वर आधारित विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ७५० मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारला जाईल. हा प्रकल्प मेघनघाट येथे प्रस्थापित असून ढाकापासून अवघ्या ४० किमी अंतरावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी लगणार्य गॅसची साठवणूक व आयत महेशखली ह्या बंदरामध्ये होणार आहे.

२. साक्षी मलिक कोणत्या खेळाशी निगडित आहे?
उत्तर - कुस्ती, नुकतेच भारतीय महिला कुस्तीपटु साक्षी मलिक हिने रिओ ओलम्पिक्स २०१६ च्या फ्रीस्टाइल ५८ वजनी गटामध्ये आपली जागा बुक केली आहे. तिने इस्तानबुल येथे पार पडलेल्या ओलम्पिक वर्ल्ड क्वालीफाइंग टूर्नामेंटमध्ये लें झांग चा पराभव केला आणि रिओ ओलंपिक्स मध्ये आपले स्थान निश्चित केले. त्याचप्रमाणे ४८ किलो वजनी गटामध्ये विनेश फोगट ही देखील रिओ ओलम्पिक्ससाठी क्वालिफाइड झाली आहे.

३. 'हरमुख खादी ग्राम उद्योग संस्थान' जम्मू आणि काश्मीर मधील कोणत्या शहरामध्ये सुरु करण्यात आले आहे?
उत्तर - श्री नगर, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्रा यांनी जम्मू आणि काश्मीर मधील श्री नगर येथे हरमुख खादी ग्राम उद्योग संस्थानचे उद्धघाटन केले. सदर संस्थान हातमाग आणि विणकाम करण्याचे केंद्र असेल त्याचप्रमाणे खादी वस्तू विकन्याचे केंद्र म्हणून ही काम करेल.

४. आशिया खंडातील पहिली तांदूळ टेक्नोलॉजी पार्क उभारण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे?
उत्तर - कर्नाटक, कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील गंगवटी येथे आशिया खंडातील पहिले तांदूळ टेक्नोलॉजी पार्क उभारण्याचा निर्णय कर्नाटक सरकाने घेतला आहे. त्याचप्रमाणे मका टेक्नोलॉजी पार्क हवेरी जिल्ह्यातील रानीबेन्नुर येथे उभारण्यात येणार आहे. ह्या संस्था पब्लिक-प्राइवेट पार्टनरशिप तत्त्वावर उभारण्यात येणार आहेत.

५. २०१६ ची मुटुआ मेड्रिड ओपन पुरुष एकेरी मलिका कोणी जिंकली आहे?
उत्तर - नोवाक जोकोविक, सर्बियन टेनिस प्लेयर नोवाक जोकोविक याने २०१६ ची मुटुआ मेड्रिड ओपन पुरुष एकेरी मालिका जिंकली असून त्याने मेड्रिड मधील पार्क मंजनरेस (क्ले कोर्ट) येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये अंडी मर्रेचा ६-२, ३-६, ६-३ असा पराभव केला.
६. २०१६ ची मुटुआ मेड्रिड ओपन महिला एकेरी मालिका कोणी जिंकली?

उत्तर - सिमोना हालेप, रोमानियन टेनिसपटू सिमोना हालेप हिने २०१६ ची मुटुआ मेड्रिड ओपन महिला एकेरी मालिका जिंकली असून अंतिम सामन्यामध्ये  तिने डोमिनिका सिबुल्कोवाचा ६-२, ६-४ असा सरळ सेट्स मध्ये पराभव केला.

Thursday 12 May 2016

चालू घडामोडी : ४ मे

१. कोणत्या भारतीय प्राध्यापकांची लंडनच्या रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळाली आहे?
उत्तर - श्रीराम रामास्वामी, हैदराबादच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या इंटरडिसिप्लिनरी सायन्स विभागाचे संचालक श्रीराम रामास्वामी यांना लंडनच्या रॉयल सोसायटीने फेलोशिप दिली आहे. संपूर्ण जगातून निवडण्यात आलेल्या ५० संशोधकांपैकी ते १ असून ही फेलोशिप इतर २ भारतीयांना मिळाली असून ते अनिवासी भारतीय आहेत.

२. भारतीय मेडिकल कौन्सिलच्या कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून कोणती समिती नेमण्यात आली आहे?
उत्तर - आर. एम. लोढ़ा समिती, भारतीय मेडिकल कौन्सिलच्या कार्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आर. एम. लोढ़ा समितीची नेमणूक करण्यात आली असून ही समिती कमीत कमी एक वर्ष कौन्सिलच्या कामावर लक्ष ठेवून असेल. सदर समिती ३ सदस्यीय समिती असून कौन्सिलच्या प्रत्येक कामामध्ये हेरगिरी करू शकते.

३. २०१६ च्या जागतिक आस्थमा दीनानिमित्त ह्यावर्षीची थीम कोणती आहे?
उत्तर - यु कैन कंट्रोल यूअर आस्थमा, दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी साजरा केला जाणारा जागतिक आस्थमा दिन हयवर्षी ३ मे रोजी साजरा करण्यात आला. जागतिक पातळीवर आस्थमाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी हा उद्देश आहे. २०१६ ची थीम 'तुम्ही तुमचा आस्थमा कंट्रोल करू शकता' हा होता.

४. मानस वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे?
उत्तर - आसाम, मानस वन्यजीव अभयारण्य आसाम राज्यामध्ये असून यूनेस्कोने जाहीर केलेल्या नैसर्गिक जागतिक वारसा ठिकाणापैकी एक आहे. हे अभयारण्य अनेक प्रकारच्या वन्य प्राण्यासाठी आश्रय स्थान आहे, प्रामुख्याने वाघ, हत्ती, गेंडा, डुक्कर इ.

५. २०१६ ची इंग्लिश प्रीमियर लीग कोणत्या फुटबॉल कलबने जिंकली आहे?
उत्तर - लीसेस्टर सिटी, २०१६ ची इंग्लिश प्रीमियर लीग लीसेस्टर सिटी क्लबने जिंकली आहे. १३२ वर्षाच्या इतिहासामध्ये लीसेस्टर सिटी क्लब ही स्पर्धा प्रथमच जिंकला आहे. त्याचप्रमाणे फुटबॉल रायटर्स असोशिएशन तर्फे दिला जाणारा फुटबॉलर ऑफ़ दी ईयर २०१६ चा पुरस्कार लीसेस्टर सिटीच्या जमी वर्दीला मिळाला आहे.

६. २०१६ ची फॉर्मूला १ रशियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली आहे?
उत्तर - निको रोसबर्ग, मर्सेडीज़ फॉर्मूला वन टीमचा जर्मन फॉर्मूला वन ड्राइवर रिको रोसबर्ग याने २०१६ ची रशियन ग्रँड प्रिक्स जिंकली आहे. ही स्पर्धा रशियाच्या सोची शहरामध्ये पार पडली.

Thursday 5 May 2016

भारतीय संघराज्य

भारतीय संघराज्यांविषयी थोडी अधिक माहिती,
१. १९५६ मध्ये आंध्र प्रदेशची राजधानी हैद्राबाद करण्यात आली त्या आधीची राजधानी कोणती होती?
उत्तर - कुर्नूल
२. अरुणाचल प्रदेश राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली?
उत्तर - १९८७
३. प्राचीन काळी आसाम कोणत्या नावाने ओळखले जात होते?
उत्तर - प्रगिज्योतिषपुर
४. बिहारचे राज्य फूल म्हणून कोणते आहे?
उत्तर - झेंडू
५. छत्तीसगढ़ राज्यामध्ये कोणत्या जमतीची लोकांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
उत्तर - गोंड
६. गोवा राज्यातील सर्वात लांब समुद्र किनारा (बीच) कोणता आहे?
उत्तर - कोलवा बीच
७. पंजाब राज्यातून वेगळ्या हरियाणाची निर्मिती केव्हा करण्यात आली?
उत्तर - १९६६
८. ब्रिटिश भारताची उन्हाळी राजधानी म्हणून कोणत्या वर्षी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाची निवड करण्यात आली होती?
उत्तर - १८६४
९. जम्मू आणि काश्मीर राज्याचा शेवटचा राज्यकर्ता महाराज कोण होते?
उत्तर - हरी सिंह
१०. भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे?
उत्तर - जम्मू आणि काश्मीर, लदाख
११. भारत रत्न पुरस्कार मिळविणारे पहिले मराठी व्यक्तिमत्व कोणते?
उत्तर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१२. मद्रास प्रांततून केरळ हे राज्य कोणत्या वर्षी वेगळे करण्यात आले?
उत्तर - १९५६
१३. मध्य प्रदेश राज्यातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) कोणते?
उत्तर - कान्हा नॅशनल पार्क
१४. वेगळ्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
उत्तर - यशवंतराव चव्हाण
१५. मेघालयची राजधानी शिलॉंग ईशान्येकडील ..... म्हणून ओळखले जाते?
उत्तर - स्कॉटलैंड
१६. ओडिशामधील जग्गनाथ पूरी मंदीर कोणत्या वर्षी बांधण्यात आले?
उत्तर - ११६१
१७. पंजाब राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे?
उत्तर - बाज़ (गरुड़)
१८. भारताचे २२ वे राज्य म्हणून सिक्कीम कोणत्या वर्षी सामिल झाले?
उत्तर - १९७५
१९. उत्तराखंड राज्यातील ऊंच पर्वत शिखर कोणते आहे?
उत्तर - नंदादेवी
२०. कोणत्या वर्षी यूनाइटेड प्रोविन्सेसचे नामकरण उत्तर प्रदेश असे करण्यात आले?
उत्तर - १९५०

Wednesday 4 May 2016

चालू घडामोडी : ३० अप्रिल

१. पत्रकारीतेमध्ये दिलेल्या आपल्या भरीव कामगिरीसाठी २०१६ चा रेडइंक जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान केला गेला आहे?
उत्तर - टी. एन. निनान, ६ वा रेडइंक पुरस्कार पत्रकारीतेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या पत्रकारांना मुंबई प्रेस कल्बतर्फे हे पुरस्कार देण्यात येतात. यंदाचा रेडइंक जीवनगौरव पुरस्कार बिज़नेस स्टॅंडर्डचे अध्यक्ष टी. एन. निनान ह्यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे रेडइंक जॉर्नलिस्ट ऑफ़ दी ईयरचा पुरस्कार एनडीटीवीचे मुख्य संपादक रवीश कुमार ह्यांना मिळाला.

२. कोणत्या देशाच्या कागदी चलनाला २०१५ आयबीएनएस बँकनोट ऑफ़ दी ईयर पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - न्यूजीलैंड चे डॉलर ५ ची पॉलीमर नोट, २०१५ चा आयबीएनएस बँकनोट ऑफ़ दी ईयरचा पुरस्कार न्यूज़ीलैंडच्या ५ डॉलर च्या पॉलीमर नोटला मिळाला आहे. हा पुरस्कार इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी तर्फे दरवर्षी दिला जातो.

३. कोणत्या भारतीय नौदल जहाजांचा कार्यकाळ मुंबई नौदल डॉकयार्ड येथे संपुष्टात आला?
उत्तर - आयएनएस निपात आणि आयएनएस वीर, भारतीय नौदलाने २८ अप्रिल २०१६ रोजी आयएनएस निपात आणि आयएनएस वीर ह्या जहजांना मुंबई डॉकयार्ड येथे निरोप दिला. दोन्ही जहाजे १२४१ आरई क्लासची असून त्यांनी पश्चिम किनारपट्टीवर गस्त लावण्यात खूप मोठी कामगिरी केली आहे.

४. २०१४ वाडा (वर्ल्ड एंटी डोपिंग एजेंसी) च्या ग्लोबल डोपिंग अहवालानुसार जागतिक क्रम वारीमध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
उत्तर - तिसर्या, वाडाच्या २०१४ च्या वार्षिक अहवालानुसार भारत तिसर्या स्थानावर आहे.

५. अलमट्टी जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
उत्तर - कृष्णा, अलमट्टी धरण हे कर्नाटकामध्ये कृष्णा नदीवर असून २०१५ मध्ये जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण झाले होते. धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे सध्या हे धरण चर्चेत होते.

Sunday 1 May 2016

चालू घडामोडी : २८, २९ अप्रिल

१. जैतापूर अणुभट्टी येथे रिएक्टर बसविण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत समांज्यस करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - फ़्रांस, जैतापूर येथील अणु विद्युत प्रकल्पामध्ये सहा इवोलुशनरी प्रेशराइस्ड वॉटर रिएक्टर्स बसविण्यासाठी भारत-फ़्रांस मध्ये समांज्यस करारावर सह्या करण्यात आल्या. ह्या करारामध्ये अणुविद्युत निर्मितीसाठी लागणारे इंधन, त्याचप्रमाणे देखभाल, आणि इतर बाबींचा समावेश आहे.

२. कोणत्या भारतीय कलाकाराने २०१६ च्या मॉस्को शिल्प (स्कल्पचर) स्पर्धा "दी मैजिकल वर्ल्ड ऑफ़ सँड" मध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे?
उत्तर - सुदर्शन पटनायक, मॉस्को येथे पार पडलेल्या ९ व्या मास्को शिल्प स्पर्धेमध्ये भारताच्या सुदर्शन पटनायकने सुवर्ण पदक पटकावले आहे. हे पदक त्याने साकारलेल्या १५ फूट ऊंच शिल्पासाठी मिळाले आहे, ते शिल्प महात्मा गांधींचे होते व त्यातून वर्ल्ड पीस हा संदेश देण्यात आला होता.

३. कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य दिन जागतिक पातळीवर कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - २८ अप्रिल, कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य म्हणजेच सेफ्टी एंड हेल्थ ऐट वर्क दिन जागतिक पातळीवर २८ अप्रिल रोजी साजरा केला जातो. कार्यस्थळी सुरक्षित रित्या काम व्हावे त्याचप्रमाणे कोणतेही काम ० अपघात मध्ये पूर्ण व्हावे ह्यासाठी मजरांमध्ये जागरूकता निर्माण होणे ह्या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो.

४. "दी ग्रेट इंडियन वर्ल्ड ट्रिप" पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - तुषार अग्रवाल, "दी ग्रेट इंडियन वर्ल्ड ट्रिप" पुस्तकाचे लेखक तुषार अग्रवाल असून लेखकाने पुस्तकामध्ये त्याला आणि त्याच्या मित्राला जग भ्रमंतीमध्ये आलेल्या अडचणींचे वर्णन केले आहे. लेखकाने आणि त्याच्या मित्राने तब्बल ९०००० किमीचा प्रवास कारने केला असून त्याने ह्यासाठी ५० देश आणि ६ खंडामध्ये भटकावे लागले.

५. दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी सलंग्न आहे?
उत्तर - तीरंदाजी, भारताच्या दीपिका कुमारीने तीरंदाजी विश्वचषकमध्ये महिलांच्या रिकर्व इवेंटमध्ये ७२० पैकी ६८६ गुण कमावले. या गुणांसह तिने दक्षिण कोरियाच्या को बो बे हिच्या २०१५ मधील गुणांची बरोबरी केली आहे. २०११, २०१२ आणि २०१३ मधील विश्वचषकांमध्ये दीपिकाने रौप्यपदकांची कमाई केली आहे. त्याचप्रमाणे नुकतेच तिला पद्मश्रीनेही गौरविण्यात आले आहे.

६. २०१६ चा रेडइंक वीर पत्रकार पुरस्कार कोणाला त्यांच्या मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - जगेंद्र सिंह, मुंबई प्रेस कल्ब तर्फे दिला जाणारा रेडइंक वीर पत्रकार पुरस्कार जगेंद्र सिंह यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

चालू घडामोडी : २७ अप्रिल

१. नोमेडिक एलीफैंट २०१६ ही सैन्य सराव अभ्यास मालिका भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडणार आहे?
उत्तर - मंगोलिया, ११ वी इंडो-मंगोलियन संयुक्त सैन्य अभ्यास सैन्य शिबिर नोमेडिक एलीफैंट २०१६ मंगलोिया मध्ये पार पडणार असून दोन्ही देशांमधील सैन्यामधील सामंजस्य वाढविणे हे ह्यामागचे उद्देश आहे. ही अभ्यास मलिका ८ मे २०१६ पासून सुरु होणार आहे. दहशतविरुद्ध लढा हे ह्या शिबिराचे मूळ उद्देश आहे.

२. जागतिक मलेरिया दिन कोणत्या तारखेला पाळला जातो?
उत्तर - २५ अप्रिल, जागतिक मलेरिया दिन दरवर्षी २५ अप्रिल रोजी जगातील अनेक देशांमध्ये पाळला जातो. २०१६ ची ध्येय वाक्य होते 'इंड मलेरिया फॉर गुड' ह्य ध्येया अनुसार २०३० पर्यंत संपूर्ण जगातून मलेरियाचा नायनाट करणे आणि जगाला मलेरिया मुक्त करणे.

३. कोणत्या भारतीय वीज वितरण कंपनीने देशातील पहिली इ-ऑफिस वीज वितरण कंपनी होण्याचा मान पटकावला आहे?
उत्तर - आंध्र प्रदेश (पूर्व) वीज वितरण कंपनी लिमिटेड, विशाखापट्टनम स्थित आंध्र प्रदेश पूर्व वीज वितरण कंपनी लिमिटेड देशातील पहिली इ-ऑफिस वीज वितरण कंपनी असून कोणत्या अडथळ्याविना फाइल्स प्रोसेस करणे त्याचप्रमाणे कामातील पारदर्शकता आणि गुणवत्तेस चालना देने हे ह्यामागचे उद्देश आहे.

४. २०१६ चा मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कारने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - जितेन्द्र, ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांचा मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार - २०१६ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी केलेल्या योगदानबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांचे काही नावाजलेले चित्रपट - हिम्मतवाला, तोहफा, धरम वीर इ.

५. कोणत्या भारतीय फुटबॉलपटूने फुटबॉल प्लेयर्स एसोसिएशन ऑफ़ इंडियातर्फे दिला जाणारा इंडियन प्लेयर ऑफ़ दी ईयर हा पुरस्कार जिंकला आहे?
उत्तर - जेजे लालपेखलुआ, भारतीय स्ट्राइकर जेजे लालपेखलुआ ह्याने भारतीय फुटबॉल प्लेयर्स एसोसिएशन तर्फे दिला जाणारा इंडियन प्लेयर ऑफ़ दी ईयर पुरस्कार जिंकला असून रांटी मार्टिन्स ह्याला परदेशी प्लेयर ऑफ़ दी ईयर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

६. शरण बसवेश्वर मंदिर कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे?
उत्तर - कर्नाटक, शरण बसवेश्वर मंदिर कर्नाटकमधील कलबुर्गी शहरामध्ये वसले असून हे शहर कर्नाटक राज्याच्या ईशान्येला वसले आहे.