Thursday 12 May 2016

चालू घडामोडी : ४ मे

१. कोणत्या भारतीय प्राध्यापकांची लंडनच्या रॉयल सोसायटीची फेलोशिप मिळाली आहे?
उत्तर - श्रीराम रामास्वामी, हैदराबादच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या इंटरडिसिप्लिनरी सायन्स विभागाचे संचालक श्रीराम रामास्वामी यांना लंडनच्या रॉयल सोसायटीने फेलोशिप दिली आहे. संपूर्ण जगातून निवडण्यात आलेल्या ५० संशोधकांपैकी ते १ असून ही फेलोशिप इतर २ भारतीयांना मिळाली असून ते अनिवासी भारतीय आहेत.

२. भारतीय मेडिकल कौन्सिलच्या कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून कोणती समिती नेमण्यात आली आहे?
उत्तर - आर. एम. लोढ़ा समिती, भारतीय मेडिकल कौन्सिलच्या कार्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आर. एम. लोढ़ा समितीची नेमणूक करण्यात आली असून ही समिती कमीत कमी एक वर्ष कौन्सिलच्या कामावर लक्ष ठेवून असेल. सदर समिती ३ सदस्यीय समिती असून कौन्सिलच्या प्रत्येक कामामध्ये हेरगिरी करू शकते.

३. २०१६ च्या जागतिक आस्थमा दीनानिमित्त ह्यावर्षीची थीम कोणती आहे?
उत्तर - यु कैन कंट्रोल यूअर आस्थमा, दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी साजरा केला जाणारा जागतिक आस्थमा दिन हयवर्षी ३ मे रोजी साजरा करण्यात आला. जागतिक पातळीवर आस्थमाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी हा उद्देश आहे. २०१६ ची थीम 'तुम्ही तुमचा आस्थमा कंट्रोल करू शकता' हा होता.

४. मानस वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे?
उत्तर - आसाम, मानस वन्यजीव अभयारण्य आसाम राज्यामध्ये असून यूनेस्कोने जाहीर केलेल्या नैसर्गिक जागतिक वारसा ठिकाणापैकी एक आहे. हे अभयारण्य अनेक प्रकारच्या वन्य प्राण्यासाठी आश्रय स्थान आहे, प्रामुख्याने वाघ, हत्ती, गेंडा, डुक्कर इ.

५. २०१६ ची इंग्लिश प्रीमियर लीग कोणत्या फुटबॉल कलबने जिंकली आहे?
उत्तर - लीसेस्टर सिटी, २०१६ ची इंग्लिश प्रीमियर लीग लीसेस्टर सिटी क्लबने जिंकली आहे. १३२ वर्षाच्या इतिहासामध्ये लीसेस्टर सिटी क्लब ही स्पर्धा प्रथमच जिंकला आहे. त्याचप्रमाणे फुटबॉल रायटर्स असोशिएशन तर्फे दिला जाणारा फुटबॉलर ऑफ़ दी ईयर २०१६ चा पुरस्कार लीसेस्टर सिटीच्या जमी वर्दीला मिळाला आहे.

६. २०१६ ची फॉर्मूला १ रशियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली आहे?
उत्तर - निको रोसबर्ग, मर्सेडीज़ फॉर्मूला वन टीमचा जर्मन फॉर्मूला वन ड्राइवर रिको रोसबर्ग याने २०१६ ची रशियन ग्रँड प्रिक्स जिंकली आहे. ही स्पर्धा रशियाच्या सोची शहरामध्ये पार पडली.

No comments:

Post a Comment