Sunday 15 May 2016

लोकसभा

लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य 'भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे' हे असते, अर्थात राज्य कारभारच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत.

'लोकसभा' हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २०१६ पर्यंत भारतामध्ये १६ लोकसभा कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेचे थेट प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ़ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्य घटनेनुसार लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य जास्तीत जस्त असू शकतात, त्यात ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत तर २ सदस्य एँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.
प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणिबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यांमध्ये ५ वर्षांहुन अधिक काळही वाढवता येतो.
राज्यागणिक मतदारसंघ:
 विभाग 
प्रकार
मतदारसंघ
अंदमान आणि निकोबार बेटे
केंद्रशासित प्रदेश
आंध्र प्रदेश
राज्य
२५
अरुणाचल प्रदेश
राज्य
आसाम
राज्य
१४
बिहार
राज्य
४०
चंडीगढ़
केंद्रशासित प्रदेश
छत्तीसगढ़
राज्य
११
दादरा आणि नगर हवेली
केंद्र शासित प्रदेश
दमन आणि दिव
केंद्रशासित प्रदेश
दिल्ली
केंद्रशासित प्रदेश
गोवा
राज्य
गुजरात
राज्य
२६
हरियाणा
राज्य
१०
हिमाचल प्रदेश
राज्य
जम्मू आणि कश्मीर
राज्य
झारखण्ड
राज्य
१४
कर्नाटक
राज्य
२८
केरळ
राज्य
२०
लक्ष्यद्वीप
केंद्रशासित प्रदेश
मध्य प्रदेश
राज्य
२९
महाराष्ट्र
राज्य
४८
मणिपुर
राज्य
मेघालय
राज्य
मिझोरम
राज्य
नगालैंड
राज्य
ओडिशा
राज्य
२१
पुदुच्चेरी
केंद्रशासित प्रदेश
पंजाब
राज्य
१३
राजस्थान
राज्य
२५
सिक्किम
राज्य
तामिळनाडू
राज्य
३९
तेलंगाना
राज्य
१७
त्रिपुरा
राज्य
उत्तराखंड
राज्य
उत्तर प्रदेश
राज्य
८०
पश्चिम बंगाल
राज्य
४२



No comments:

Post a Comment