Wednesday 4 May 2016

चालू घडामोडी : ३० अप्रिल

१. पत्रकारीतेमध्ये दिलेल्या आपल्या भरीव कामगिरीसाठी २०१६ चा रेडइंक जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान केला गेला आहे?
उत्तर - टी. एन. निनान, ६ वा रेडइंक पुरस्कार पत्रकारीतेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या पत्रकारांना मुंबई प्रेस कल्बतर्फे हे पुरस्कार देण्यात येतात. यंदाचा रेडइंक जीवनगौरव पुरस्कार बिज़नेस स्टॅंडर्डचे अध्यक्ष टी. एन. निनान ह्यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे रेडइंक जॉर्नलिस्ट ऑफ़ दी ईयरचा पुरस्कार एनडीटीवीचे मुख्य संपादक रवीश कुमार ह्यांना मिळाला.

२. कोणत्या देशाच्या कागदी चलनाला २०१५ आयबीएनएस बँकनोट ऑफ़ दी ईयर पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - न्यूजीलैंड चे डॉलर ५ ची पॉलीमर नोट, २०१५ चा आयबीएनएस बँकनोट ऑफ़ दी ईयरचा पुरस्कार न्यूज़ीलैंडच्या ५ डॉलर च्या पॉलीमर नोटला मिळाला आहे. हा पुरस्कार इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी तर्फे दरवर्षी दिला जातो.

३. कोणत्या भारतीय नौदल जहाजांचा कार्यकाळ मुंबई नौदल डॉकयार्ड येथे संपुष्टात आला?
उत्तर - आयएनएस निपात आणि आयएनएस वीर, भारतीय नौदलाने २८ अप्रिल २०१६ रोजी आयएनएस निपात आणि आयएनएस वीर ह्या जहजांना मुंबई डॉकयार्ड येथे निरोप दिला. दोन्ही जहाजे १२४१ आरई क्लासची असून त्यांनी पश्चिम किनारपट्टीवर गस्त लावण्यात खूप मोठी कामगिरी केली आहे.

४. २०१४ वाडा (वर्ल्ड एंटी डोपिंग एजेंसी) च्या ग्लोबल डोपिंग अहवालानुसार जागतिक क्रम वारीमध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
उत्तर - तिसर्या, वाडाच्या २०१४ च्या वार्षिक अहवालानुसार भारत तिसर्या स्थानावर आहे.

५. अलमट्टी जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
उत्तर - कृष्णा, अलमट्टी धरण हे कर्नाटकामध्ये कृष्णा नदीवर असून २०१५ मध्ये जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे काम पूर्ण झाले होते. धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे सध्या हे धरण चर्चेत होते.

No comments:

Post a Comment