Sunday 15 May 2016

चालू घडामोडी : १० मे

१. कोणत्या भारतीय विद्युत निर्मिती करणार्या कंपनीला बांग्लादेशमध्ये द्रवरूप नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी प्रकल्पाला मान्यता प्राप्त झाली आहे?
उत्तर - रिलायंस पावर, रिलायंस पावर ह्या भारतीय कंपनीला बांग्लादेश सरकारकडून एलएनजी वर आधारित विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी परवानगी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ७५० मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारला जाईल. हा प्रकल्प मेघनघाट येथे प्रस्थापित असून ढाकापासून अवघ्या ४० किमी अंतरावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी लगणार्य गॅसची साठवणूक व आयत महेशखली ह्या बंदरामध्ये होणार आहे.

२. साक्षी मलिक कोणत्या खेळाशी निगडित आहे?
उत्तर - कुस्ती, नुकतेच भारतीय महिला कुस्तीपटु साक्षी मलिक हिने रिओ ओलम्पिक्स २०१६ च्या फ्रीस्टाइल ५८ वजनी गटामध्ये आपली जागा बुक केली आहे. तिने इस्तानबुल येथे पार पडलेल्या ओलम्पिक वर्ल्ड क्वालीफाइंग टूर्नामेंटमध्ये लें झांग चा पराभव केला आणि रिओ ओलंपिक्स मध्ये आपले स्थान निश्चित केले. त्याचप्रमाणे ४८ किलो वजनी गटामध्ये विनेश फोगट ही देखील रिओ ओलम्पिक्ससाठी क्वालिफाइड झाली आहे.

३. 'हरमुख खादी ग्राम उद्योग संस्थान' जम्मू आणि काश्मीर मधील कोणत्या शहरामध्ये सुरु करण्यात आले आहे?
उत्तर - श्री नगर, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्रा यांनी जम्मू आणि काश्मीर मधील श्री नगर येथे हरमुख खादी ग्राम उद्योग संस्थानचे उद्धघाटन केले. सदर संस्थान हातमाग आणि विणकाम करण्याचे केंद्र असेल त्याचप्रमाणे खादी वस्तू विकन्याचे केंद्र म्हणून ही काम करेल.

४. आशिया खंडातील पहिली तांदूळ टेक्नोलॉजी पार्क उभारण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे?
उत्तर - कर्नाटक, कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील गंगवटी येथे आशिया खंडातील पहिले तांदूळ टेक्नोलॉजी पार्क उभारण्याचा निर्णय कर्नाटक सरकाने घेतला आहे. त्याचप्रमाणे मका टेक्नोलॉजी पार्क हवेरी जिल्ह्यातील रानीबेन्नुर येथे उभारण्यात येणार आहे. ह्या संस्था पब्लिक-प्राइवेट पार्टनरशिप तत्त्वावर उभारण्यात येणार आहेत.

५. २०१६ ची मुटुआ मेड्रिड ओपन पुरुष एकेरी मलिका कोणी जिंकली आहे?
उत्तर - नोवाक जोकोविक, सर्बियन टेनिस प्लेयर नोवाक जोकोविक याने २०१६ ची मुटुआ मेड्रिड ओपन पुरुष एकेरी मालिका जिंकली असून त्याने मेड्रिड मधील पार्क मंजनरेस (क्ले कोर्ट) येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये अंडी मर्रेचा ६-२, ३-६, ६-३ असा पराभव केला.
६. २०१६ ची मुटुआ मेड्रिड ओपन महिला एकेरी मालिका कोणी जिंकली?

उत्तर - सिमोना हालेप, रोमानियन टेनिसपटू सिमोना हालेप हिने २०१६ ची मुटुआ मेड्रिड ओपन महिला एकेरी मालिका जिंकली असून अंतिम सामन्यामध्ये  तिने डोमिनिका सिबुल्कोवाचा ६-२, ६-४ असा सरळ सेट्स मध्ये पराभव केला.

No comments:

Post a Comment