Sunday 1 May 2016

चालू घडामोडी : २७ अप्रिल

१. नोमेडिक एलीफैंट २०१६ ही सैन्य सराव अभ्यास मालिका भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडणार आहे?
उत्तर - मंगोलिया, ११ वी इंडो-मंगोलियन संयुक्त सैन्य अभ्यास सैन्य शिबिर नोमेडिक एलीफैंट २०१६ मंगलोिया मध्ये पार पडणार असून दोन्ही देशांमधील सैन्यामधील सामंजस्य वाढविणे हे ह्यामागचे उद्देश आहे. ही अभ्यास मलिका ८ मे २०१६ पासून सुरु होणार आहे. दहशतविरुद्ध लढा हे ह्या शिबिराचे मूळ उद्देश आहे.

२. जागतिक मलेरिया दिन कोणत्या तारखेला पाळला जातो?
उत्तर - २५ अप्रिल, जागतिक मलेरिया दिन दरवर्षी २५ अप्रिल रोजी जगातील अनेक देशांमध्ये पाळला जातो. २०१६ ची ध्येय वाक्य होते 'इंड मलेरिया फॉर गुड' ह्य ध्येया अनुसार २०३० पर्यंत संपूर्ण जगातून मलेरियाचा नायनाट करणे आणि जगाला मलेरिया मुक्त करणे.

३. कोणत्या भारतीय वीज वितरण कंपनीने देशातील पहिली इ-ऑफिस वीज वितरण कंपनी होण्याचा मान पटकावला आहे?
उत्तर - आंध्र प्रदेश (पूर्व) वीज वितरण कंपनी लिमिटेड, विशाखापट्टनम स्थित आंध्र प्रदेश पूर्व वीज वितरण कंपनी लिमिटेड देशातील पहिली इ-ऑफिस वीज वितरण कंपनी असून कोणत्या अडथळ्याविना फाइल्स प्रोसेस करणे त्याचप्रमाणे कामातील पारदर्शकता आणि गुणवत्तेस चालना देने हे ह्यामागचे उद्देश आहे.

४. २०१६ चा मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कारने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - जितेन्द्र, ज्येष्ठ अभिनेते जितेन्द्र यांचा मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार - २०१६ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी केलेल्या योगदानबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांचे काही नावाजलेले चित्रपट - हिम्मतवाला, तोहफा, धरम वीर इ.

५. कोणत्या भारतीय फुटबॉलपटूने फुटबॉल प्लेयर्स एसोसिएशन ऑफ़ इंडियातर्फे दिला जाणारा इंडियन प्लेयर ऑफ़ दी ईयर हा पुरस्कार जिंकला आहे?
उत्तर - जेजे लालपेखलुआ, भारतीय स्ट्राइकर जेजे लालपेखलुआ ह्याने भारतीय फुटबॉल प्लेयर्स एसोसिएशन तर्फे दिला जाणारा इंडियन प्लेयर ऑफ़ दी ईयर पुरस्कार जिंकला असून रांटी मार्टिन्स ह्याला परदेशी प्लेयर ऑफ़ दी ईयर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

६. शरण बसवेश्वर मंदिर कोणत्या भारतीय राज्यामध्ये आहे?
उत्तर - कर्नाटक, शरण बसवेश्वर मंदिर कर्नाटकमधील कलबुर्गी शहरामध्ये वसले असून हे शहर कर्नाटक राज्याच्या ईशान्येला वसले आहे.

No comments:

Post a Comment