Sunday 1 May 2016

चालू घडामोडी : २८, २९ अप्रिल

१. जैतापूर अणुभट्टी येथे रिएक्टर बसविण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत समांज्यस करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - फ़्रांस, जैतापूर येथील अणु विद्युत प्रकल्पामध्ये सहा इवोलुशनरी प्रेशराइस्ड वॉटर रिएक्टर्स बसविण्यासाठी भारत-फ़्रांस मध्ये समांज्यस करारावर सह्या करण्यात आल्या. ह्या करारामध्ये अणुविद्युत निर्मितीसाठी लागणारे इंधन, त्याचप्रमाणे देखभाल, आणि इतर बाबींचा समावेश आहे.

२. कोणत्या भारतीय कलाकाराने २०१६ च्या मॉस्को शिल्प (स्कल्पचर) स्पर्धा "दी मैजिकल वर्ल्ड ऑफ़ सँड" मध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे?
उत्तर - सुदर्शन पटनायक, मॉस्को येथे पार पडलेल्या ९ व्या मास्को शिल्प स्पर्धेमध्ये भारताच्या सुदर्शन पटनायकने सुवर्ण पदक पटकावले आहे. हे पदक त्याने साकारलेल्या १५ फूट ऊंच शिल्पासाठी मिळाले आहे, ते शिल्प महात्मा गांधींचे होते व त्यातून वर्ल्ड पीस हा संदेश देण्यात आला होता.

३. कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य दिन जागतिक पातळीवर कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - २८ अप्रिल, कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य म्हणजेच सेफ्टी एंड हेल्थ ऐट वर्क दिन जागतिक पातळीवर २८ अप्रिल रोजी साजरा केला जातो. कार्यस्थळी सुरक्षित रित्या काम व्हावे त्याचप्रमाणे कोणतेही काम ० अपघात मध्ये पूर्ण व्हावे ह्यासाठी मजरांमध्ये जागरूकता निर्माण होणे ह्या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो.

४. "दी ग्रेट इंडियन वर्ल्ड ट्रिप" पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - तुषार अग्रवाल, "दी ग्रेट इंडियन वर्ल्ड ट्रिप" पुस्तकाचे लेखक तुषार अग्रवाल असून लेखकाने पुस्तकामध्ये त्याला आणि त्याच्या मित्राला जग भ्रमंतीमध्ये आलेल्या अडचणींचे वर्णन केले आहे. लेखकाने आणि त्याच्या मित्राने तब्बल ९०००० किमीचा प्रवास कारने केला असून त्याने ह्यासाठी ५० देश आणि ६ खंडामध्ये भटकावे लागले.

५. दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी सलंग्न आहे?
उत्तर - तीरंदाजी, भारताच्या दीपिका कुमारीने तीरंदाजी विश्वचषकमध्ये महिलांच्या रिकर्व इवेंटमध्ये ७२० पैकी ६८६ गुण कमावले. या गुणांसह तिने दक्षिण कोरियाच्या को बो बे हिच्या २०१५ मधील गुणांची बरोबरी केली आहे. २०११, २०१२ आणि २०१३ मधील विश्वचषकांमध्ये दीपिकाने रौप्यपदकांची कमाई केली आहे. त्याचप्रमाणे नुकतेच तिला पद्मश्रीनेही गौरविण्यात आले आहे.

६. २०१६ चा रेडइंक वीर पत्रकार पुरस्कार कोणाला त्यांच्या मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - जगेंद्र सिंह, मुंबई प्रेस कल्ब तर्फे दिला जाणारा रेडइंक वीर पत्रकार पुरस्कार जगेंद्र सिंह यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

No comments:

Post a Comment