Thursday 27 February 2014

प्रश्नमालिका - २

१ - वन्यजीव सप्ताह कधी साजरा केला जातो?
उत्तर - १ ते ७ सप्टेंबर
२ - सर अल्फ्रेड नोबेल यांनी कशाच्या शोधातून मोठी संपत्ती कमावली होती?
उत्तर - डायनामाईट
३ - भारतामध्ये कोणत्या खेळाडूचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो?
उत्तर - मेजर ध्यानचंद
४ - आतापर्यंत सर्वात कमी काळ पंतप्रधानपद कोणी भूषविले आहे?
उत्तर - अटल बिहारी वाजपेयी (१३ दिवस)
५ - जर एकाच महिन्यात दोन पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला काय म्हणतात?
उत्तर - ब्लू मून

६ - युरिया तसेच जैवखते यांचे उत्पादन करण्यासाठी असलेले 'KRIBHCO' याचे विस्तारित रूप काय आहे?
उत्तर - कृषक भारती कोओपरेटिव्ह लिमिटेड
७ - 'एप्पल' या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
उत्तर - टीम कुक
८ - लोकसभा त्याचप्रमाणे राज्यसभा यामध्ये विरोधी पक्षनेते कोण आहेत?
उत्तर - सुषमा स्वराज व अरुण जेटली
९ - सर्वात जास्त देशांची संख्या असलेला खंड कोणता?
उत्तर - अफ्रिका (५३ देश)
१० - समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव काय?
उत्तर - केशव सीताराम ठाकरे

११ - जागतिक बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कोण आहेत?
उत्तर - कौशिक बसू
१२ -  राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार कॅटची स्थापना झाली आहे?
उत्तर - कलम ३२३ (अ)
१३ - दिल्लीचा राज्यपक्षी काय आहे?
उत्तर - चिमणी
१४ - केंद्रीय निवडणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?
उत्तर - सुकुमार सेन
१५ - मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने सन्मानित केलेली पहिली भारतीय व्यक्ती कोण?
उत्तर - सोली सोराबजी 

Wednesday 26 February 2014

इतिहास - ब्राम्हो समाज

ब्राम्हो समाज
राजा राममोहन रॉय यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली

उद्देश: हिंदू धर्मग्रंथांचा चिकिस्तक अभ्यास करुन खरया धर्मतत्वांची जाणीव लोकांना करुन देणे त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी जो प्रचार चालविला होता त्याचे उत्तर देणे

वैशिष्ट्ये: एकेश्वर वादावर भर, मूर्तीपूजेला विरोध, वेदप्रणीत हिंदू धर्मावर निष्ठा 
राजा राममोहन रॉय यांच्यानंतर ब्राम्हो समाजाची धुरा देवेंद्रनाथ टागोर यांनी संभाळली. त्यांनी १८४३ साली ब्राम्हो समाजात प्रवेश केला व केशवचंद्र सेन यांनी १८५७ मध्ये सदस्यत्व पत्करले. परंतु या दोघांच्यात वैचारिक मतभेद होता. देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखालील आदि ब्राम्हो समाजचे कार्य मुख्यत्वे करुन धार्मिक सेवांपुरतेच मर्यादित होते, तर केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखालील नूतन किंवा ब्राम्हो समाजाने समाजसुधारनेसारख्या व्यापक क्षेत्रातही आपले कार्य चालू ठेवले

केशवचंद्र सेन यांनी 'सुलभ समाचार' या सप्ताहिकद्वारे आपल्या विचारांचा प्रसार केला. नूतन ब्राम्हो समाजाने, स्त्रियांनाही ब्राम्हो समाजात स्थान दिले. त्याचबरोबर स्त्रियांच्या शिक्षणासाठी 'विक्टोरिया इंस्टीट्यूट' व 'नॉर्मल स्कुल' या संस्थांचीही स्थापना केली. तंत्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन त्यांनी तंत्रनिकेतनही सुरु केले

मुलींच्या विवाहाची किमान वयोमर्यादा १४ वर्षे ठरविणारा 'दी नेटिव्ह सिव्हिल मॅरेज एक्ट' १८७२ साली पास झाला. त्यामागे केशवचंद्र सेन यांचा मोलाचा वाटा होता. परन्तु १४ वर्षे पूर्ण न झालेल्या आपल्या मुलीचा विवाह त्यांनी कुचबिहाराच्या राजाशी १८७८ साली घडवून आणला. त्यामुळे नव ब्राम्हो समाजातील काही मंडळींनी त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास उडाला आणि त्यातूनच पुढे 'साधारण ब्राम्हो समाज' या वेगळ्या संस्थेची स्थापना झाली. या दुहीमुळे ब्राम्हो समाजाचा प्रभाव कमी होऊन त्यांचे कार्य मंदावले 

Sunday 23 February 2014

सामान्य ज्ञान

१ - वन्यजीव संरक्षण कायदा कधी पारित करण्यात आला?
उत्तर - १९७२ 
२ - वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ़ इंडियाचे अध्यक्षपदी कोण आहेत?
उत्तर - रणजीतसिंह 
३ - पेंच व्याघ्र प्रकल्पातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
उत्तर - राष्ट्रीय महामार्ग - ७ (वाराणसी-कन्याकुमारी)
४ - 'फुलानी' ही आदिवासी जमात कोणत्या  देशातील आहे?
उत्तर - नायजेरिया 
५ - बँक ऑफ़ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सध्या कोण कार्यरत आहे?
उत्तर - विजयलक्ष्मी अय्यर (२०१२-सध्या)

६ - भारतातील एकूण पेट्रोलियम उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन इंडियन ऑइलकड़े आहे?
उत्तर - ४९%
७ - २०१३ ची वर्ल्ड एथेलेटिक्स चैम्पियनशिप कुठे पार पडली?
उत्तर - मॉस्को 
८ - फ्नोम पेन्ह ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर - कंबोडिया 
९ - टर्निंग पॉइंट - अ जर्नी टू चैलेंजेस ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - ए. पी. जे. अब्दुल कलाम 
१० - रायपुर, नागपूर, संभलपुर व मलकापुर ह्या महत्त्वाच्या शहरातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
उत्तर - राष्ट्रीय महामार्ग - ६ (हजीरा-कोलकाता)

११ - दाचीगाम, सलीम अली आणि किश्तवार ही राष्ट्रिय उद्याने कोणत्या भारतीय घटक राज्यात आहेत?
उत्तर - जम्मू आणि काश्मीर 
१२ - भारतातील विमा (इन्शुरन्स) व्यवसायवार कोण निर्बंध (देखरेख) ठेवते?
उत्तर - इनुरंस रेग्यूरेटरी एंड डेवलपमेंट अथॉरिटी 
१३ - भारतात शेती क्षेत्रातील गोल्ड रेवोलुशन म्हणजे काय?
उत्तर - बागायती उत्पादने 
१४ - भारतात गॅस व पेट्रोलियम पदार्थ वाहन नेण्यासाठी आशिया खंडातील सर्वात लांब १०,८८९ किमी अंतरची पाईपलाईन कोणत्या कंपनीने उभारली आहे?
उत्तर - इंडियन ऑइल 
१५ - सलवा किर हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत?
उत्तर - दक्षिण सूदान

Wednesday 19 February 2014

भारतीय शिक्षणाचा इतिहास

शिक्षण:
  • १८१३ च्या चार्टर अक्टनुसार कंपनीने भारतात शिक्षाणासाठी १ लाख प्रति वर्षी कर्च करावेत अशी तरतूद होती
  • १८१७ राजा राममोहन रॉय यांनी कलकत्ता येथे हिन्दू कॉलेजची स्थापना केली
  • १८३४ एल्फिस्तन कॉलेजची स्थापना मुंबई येथे
  • मेकोलेचा शिक्षणाचा झिरपता सिधान्त
  • १८३५ भारतीयांना इंग्रजी शिक्षण देन्यासंबधी कायदा मंजूर केला
  • १८४४ हर्डिग्सने शिक्षण मंडलाची स्थापना केली
  • १८४५ ग्रांट मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबई येथे
  • १८४३ ते १८५३ या काळात वायव्य प्रांतात ले. गवर्नल जेम्स थॉमस याने स्थानीक भाषेत शिक्षण देण्यास पुढाकार घेतला
  • १८५४ च्या वुड्स खालिद्यानुसार १८५७ ला मुंबई, चेन्नई व कलकत्ता येथे विद्यापीठ स्थापना
  • जॉन एलियट या ब्रिटिशाने भारतात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाचा जोरदार पुरस्कार  केला
  • १८८२ हंटर कमीशन रिपनच्या कलकिर्दित हे शिक्षण विषयक कमीशन नेमले गेले
  • १९०४ कर्झनने भारतीय विद्यापिठाच्या सुधार्नेचा कायदा संमत केला
  • ना गोखालेंनी केलेली सक्तीची प्राथमिक शिक्षणाची मागणी इंग्रजानी मान्य केली
  • भारतातील महाविद्यालयीन व विद्यापिठीय शिक्षण पद्धतीत सुधारणा सुचविण्यासाठी साँडलर समिती , हर्टाग समिती, सजार्ट समिती अश्या अनेक समित्या नेमल्या

Monday 17 February 2014

१३ फेब्रुवारी - राष्ट्रीय महिला दिन

भारतामध्ये १३ फेब्रुवारी २०१४ हा दिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणुन साजरा केला गेला. भारताच्या पहिल्या महिला गव्हर्नर (संयुक्त आग्रा आणि अवध प्रांत) त्यांची जन्म तिथी १३ फेब्रुवारी ही राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरी केली गेली. सरोजिनी नायडू यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ मध्ये हैद्राबाद येथे झाला. ही त्यांची १३५ वी जयंती होती
भारतामध्ये महिलांच्या विकासासाठी सरोजिनी नायडू यांनी केलेल्या कार्याला मान्यता देण्यासाठी त्यांच्या जयंती दिवशी राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला गेला 

सरोजिनी नायडू:
  • सरोजिनी नायडू ह्या भारताच्या गान (स्वर) कोकिळा म्हणून ओळखल्या जातात
  • त्यांचे उच्च शिक्षण लंडन आणि कैंब्रिज मध्ये झाले 
  • १९ वर्षाच्या असताना त्यांचे लग्न डॉ. गोविंदराजलू नायडू यांच्या सोबत झाले 
  • सरोजिनी नायडू ह्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या
  • त्या भारतातील पहिल्या महिला गव्हर्नर (संयुक्त आग्रा आणि अवध प्रांत) होत्या 
  • १९१९ मध्ये झालेल्या जलियानवाला बाग हत्याकांडावर दू:खी होऊन त्यांनी कविता लिहने बंद केले 
  • १९०५ मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणीनंतर त्या राजकरणामध्ये सक्रीय झाल्या
  • १९२५ मध्ये कानपुर येथे झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष
  • १९२८ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना कैसर-ए-हिंद ही पदवी देऊन सन्मानित केले 
  • सरोजिनी नायडू यांचे निधन २ मार्च १९४९ ला झाले 
साहित्यामध्ये सरोजिनी नायडू यांचे योगदान:
  • १९०५ - गोल्डन थ्रेशोल्ड (कविता संग्रह)
  • १९१२ - दी बर्ड ऑफ़ टाइम (कविता संग्रह)
  • १९१७ - ब्रोकन विंग (कविता संग्रह)
  • १९१७ - मुहम्मद जीना: ऎन एम्बेसेडर ऑफ़ यूनिटी 
  • दी मैजिक ट्री 
  • फीस्ट ऑफ़ यूथ 
  • दी विझार्ड मास्क 

Sunday 16 February 2014

समाजसेवक

स्वामी दयानंद सरस्वती
मूळनाव - मूलशंकर तिवारी
जन्म - २० सप्टेंबर १८२४ (टंकारा, गुजरात)
मृत्यु - ३० ऑक्टोंबर १८८३ (अजमेर, राजस्थान)

जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्ठी:
  • १८४५ - गृहत्याग करुन संन्यास स्वीकारला आणि देशभर भटकंती सुरु केली 
  • १८६०-६३ - मथुरेतील अंध साधू विरजानंद यांचे शिष्यत्व पत्कारुन तीन वर्षे हिंदू धर्माचा अभ्यास केला
  • केशवचंद्र सेन यांच्या सांगण्यावरून हिंदी भाषेतून धर्मप्रसार सुरु केला 
  • १० एप्रिल १८७५ - मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना 
  • १८७७ - लाहोर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन केली 
  • स्वामी दयानंदानी सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास साधनरया 'सत्यार्थप्रकाश' या ग्रंथांची रचना केली 
स्वामी दयानदांची सुधारणा कार्य:
  • देशात अनेक ठिकाणी 'संस्कृत पाठशाळांची' स्थापना 
  • लाहोर येथे पाश्चात्य शास्त्रे व संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी 'इंडियन अकॅडमी' ही संस्था स्थापन केली
  • गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणसंस्था स्थापन केल्या 
  • स्त्रिया व शुद्र यांना वेदाभ्यासाचा अधिकार दिला 
  • १८८३ - विषप्रयोगमुळे निधन 
  • स्वामी दयानदांच्या मृत्युसमयी आर्य समाजाच्या शंभराहून अधिक शाखा देशात स्थापन झाल्या होत्या
आर्य समाज:
  • वेद हेच हिंदूंचे खरे धर्मग्रंथ आहेत 
  • परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदांत असून वेदाध्ययन हे प्रत्येक हिन्दुमात्राचे कर्तव्य आहे 
  • वेद हा आर्यांचा पवित्र ग्रंथ असून सर्व आर्यांनी वेदप्रमाण्य मानले पाहिजे 
  • ईश्वर एकच असून तो निर्गुण, निराकार आहे 
  • चातुर्वर्ण्य हे जन्मसिद्ध नसून गुणकर्मावर आधिरित असावेत
  • 'वेदांकड़े चला' रूढ़ीबद्ध उपासनेच्या विळख्यातून हिंदू धर्माला वाचविण्यासाठी स्वामी दयानंदानी आपल्या धर्मबांधवांना वेदांकडे चला हा आदेश केला 
  • 'लढाऊ हिंदू धर्म' भगिनी निवेदिता यांनी 'लढाऊ हिंदू धर्म' या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा केली आहे 
आर्य समाजाच्या इतर सुधारणा:
  • आर्य समाजाचे कार्यकर्ते लाला हंसराज यांनी लाहोर येथे 'दयानंद एंग्लोवैदिक कॉलेज' स्थापन केले 
  • स्वामी श्रद्धानंद यांनी कांग्री येथे 'गुरुकुल' ही संस्था स्थापन केली 
  • परधर्मात गेलेल्या हिंदूना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची 'धर्मशुद्धीची' क्रांतिकारी चळवळ आर्य समजाने राबविली

चालू घडामोडी - क्रीडा

३० जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१४:
  • भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिका - जानेवारी २०१४ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान मालिका खेळली गेली. ही मालिका न्यूझीलंडने ४-० ने जिंकली. या मालिकेमध्ये भारताला १ ही सामना जिंकता आला नाही. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जलद ८००० धावा करणारा जगातील चौथा खेळाडू ठरला आहे
  • कैथी क्रॉस यांची अंपायर पैनल मध्ये नियुक्ती - न्यूझीलंडच्या कैथी क्रॉस यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पहिली महिला अंपायर म्हणून पैनलवर निवड केली आहे. क्रॉस ह्या ५६ वर्षाच्या असून त्या ११ सदस्यीय अंपायरिंग पैनलच्या सदस्य झाल्या आहेत जे पैनल विश्व चषकसाठी घोषित केले आहे
  • हिना संधुच्या स्कोरला विश्व रेकॉर्ड म्हणून मान्यता - हिना संधुने नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या म्युनिच विश्व कपमध्ये १० मीटर एयर पिस्तोल स्पर्धेमध्ये २०३.८ गुण मिळविले होते त्याला विश्व रेकॉर्ड म्हणून मान्यता मिळाली आहे. हिना सिंधुने सर्बियाच्या जोरना अरनोविक हिचा 5.२ गुनाने पराभव करुण सुवर्ण पदक मिळविले आहे
  • ओलंपिक मशाल राशियाच्या सर्वोच्च शिखरावर - ओलम्पिकची मशाल १ फेब्रुवारी रोजी रोजी राशियाच्या सर्वोच्च एलब्रस शिखरावर पेटवली गेली. मशाल ही समुद्र सपाटीपासून ५६४२ मीटर उंचीवर पेटवली गेली
  • खेल मंत्रालयाने खेलरत्न, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांसाठी प्रमाण निश्चित केले
  • अभिनव बिंद्राला सुवर्ण पदक - भारतीय निशानेबाज अभिनव बिंद्रा ने नेदरलैंडच्या हेग मध्ये आयोजित इंटर शूट टाई सीरीज शूटिंग टूर्नामेंट मध्ये ९ फेब्रुवारी रोजी आपले तिसरे सुवर्ण पदक जिंकले. अभिनव बिंद्रा ने ह्या टूर्नामेंट मध्ये प्रीक्वालिफिकेशन स्कोर ६१३.७ नंतर पाहिले सुवर्ण पदक मिळविले. 

Friday 14 February 2014

भारतातील सर्वात उंच, सर्वात मोठे - भाग २

  • सर्वात मोठा बोगदा - जवाहर टन्नल (जम्मू आणि कश्मीर)
  • सर्वात मोठा महामार्ग - राष्ट्रीय महामार्ग ७ (वाराणसी-कन्याकुमारी)
  • लोकसंख्येने सर्वात लहान राज्य - सिक्कीम 
  • क्षेत्रफळ सर्वात मोठे राज्य - राजस्थान 
  • क्षेत्रफळ सर्वात लहान राज्य - गोवा 
  • सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य - उत्तर प्रदेश 
  • सर्वात जास्त लोकसंख्येची घनाता असलेले राज्य - पश्चिम बंगाल 
  • सर्वात मोठी गुहा - अमरनाथ 
  • सर्वात मोठे गुहा मंदिर - कैलाश मंदिर, एल्लोरा (महाराष्ट्र)
  • सर्वात मोठी प्राण्यांची यात्रा - सोनपुर (बिहार)
  • सर्वात मोठे ऑडिटोरियम - षण्मुखानंद हॉल (मुंबई)
  • सर्वात मोठे गुरुद्वारा - सुवर्ण मंदिर (अमृतसर)
  • सर्वात मोठे हॉटेल - ओबेरॉय-शेरटन (मुंबई)
  • सर्वात खोल नदी खोरे - भागीरथी आणि अलकनंदा 
  • सर्वात मोठी चर्च - सैंट कैथेड्रल (गोवा)
  • सर्वात जुने चर्च - सैंट थॉमस चर्च, त्रिचूर (केरळ)
  • सर्वात लांब नदी - गंगा (२६४० किमी)
  • सर्वात लांब बीच - मरीना बीच, चेन्नई 
  • सर्वोच्च लढाई फिल्ड - साइचिन ग्लेसियर 
  • सर्वात मोठे स्टेडियम - युवा भारती स्टेडियम (कोलकाता)
  • सर्वात मोठे नदीवरील बेट - माजुली, ब्रम्हपुत्रा नदी (असाम)
  • सर्वात मोठे तारांगण - बिर्ला तारांगण (कोलकाता)
  • सर्वात मोठे खारया पाण्याचे सरोवर - सांभर 

Thursday 13 February 2014

अंतरिम रेल्वे बजेट २०१४-१५

रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी १२ फेब्रुवारी २०१४ रोजी लोकसभेमध्ये २०१४-१५ चे रेल्वे बजेट सादर केले. मल्लिकार्जुन खरगे यांचे हे प्रथम बजेट असून यूपीए सरकारचे शेवटचे रेल्वे बजेट आहे. या बजेटमध्ये त्यांनी प्रवासी भाड्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. त्याचबरोबर ७२ नवीन रेल्वे गाड्या सुरु करण्याचे त्याचप्रमाणे ईशान्य भारतीय राज्यांमध्ये रेल्वे जाळे वाढविण्याचे आश्वासन दिले आहे.
अंतरिम रेल्वे बजेट २०१४-१५ चे प्रमुख मुद्दे:
  • प्रवासी भाड्यामध्ये कोणतीही वाढ नाही 
  • ७२ नवीन ट्रैन सुरु करण्याची घोषणा, ज्यामध्ये १७ एसी प्रीमियम, ३८ एक्सप्रेस, १० पॅसेंजर, ४ मेमू तर ३ डेमू ट्रैन आहेत 
  • जलद गतीवाल्या आणि अधिक जास्त ट्रैन सुरु करण्याचा निर्णय
  • शिलॉन्ग, ईटानगर ह्या ईशान्येकडील राज्यांना रेल्वे जोडणार
  • दिल्ली-मुंबई दरम्यान चलणार्या प्रीमियम एसी स्पेशन ट्रैनमध्ये आरक्षण करण्याची अवधी कमी केली जाणार 
  • प्रवासी भाडे त्याचप्रमाणे माल भाडे ठरविण्यासाठी एक स्वतंत्र रेल्वे टैरिफ अथॉरिटी बनविण्याचा निर्णय ज्यामध्ये सर्व पक्षांची भागीदारी असेल 
  • वार्षिक रेल्वे बजेट ६४३०५ करोड़ रुपये
  • रेल्वे भाड्यामधून १६०७७५ कोड रुपये कमाई होण्याची शक्यता त्याचप्रमाणे एकूण अनुमानित खर्च हा ११०६४९ करोड़ रुपये
  • माल वाहतुकीमधुन ९४ हजार करोड रुपये कमाईचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे 
  • पब्लिक-प्रायवेट पार्टनरशिपवाले प्रकल्प सुरु करणे 
  • रेल्वेने सहावा वेतन आयोग सुरु केला 
  • पेट्री कारमध्ये इंडक्शन कुकराचा वापर करणार 
  • आसाममध्ये रंगिया-मुरकोंगासेलेक ही ५१० किमीची लाईन १ वर्षामध्ये पूर्ण करणे 
  • ट्रैनची चालू स्थिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन ट्रैकिंग सुरु करणार 
महाराष्ट्रातून सुरु होनरया ट्रेन्स:
  • हावड़ा-पुणे एक्सप्रेस (एसी प्रीमियम ट्रैन)
  • मुंबई-हावड़ा एक्सप्रेस (एसी प्रीमियम ट्रैन)
  • मुंबई-पटना एक्सप्रेस (एसी प्रीमियम ट्रैन)
  • बांद्रा-अमृतसर एक्सप्रेस (एसी प्रीमियम ट्रैन)
  • बांद्रा-कटरा एक्सप्रेस (एसी प्रीमियम ट्रैन)
  • मुंबई-गोरखपुर एक्सप्रेस (एसी प्रीमियम ट्रैन)
  • भावनगर-बांद्रा एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)
  • हुबली-मुंबई एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)
  • मुंबई-चेन्नई एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)
  • मुंबई-करमाली एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)
  • नांदेड़-औरंगाबाद एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)
  • पुणे-लखनऊ एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)
  • कानपूर-बांद्रा एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)

Tuesday 11 February 2014

भारतीय रिझर्व्ह बॅंकेविषयी अधिक माहिती

भारतीय रिझर्व्ह बॅंकेविषयी अधिक माहिती:
  • रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय - मुंबई 
  • रिझर्व्ह बँकेची प्रशिक्षण महाविद्यालये - ३ (मुंबई, पुणे, चेन्नई)
  • रिझर्व्ह बँकेची देशात चौदा शाखा कार्यालये आहेत, त्यापैकी दोन  महाराष्ट्रात नागपुर आणि मुंबई (भायखला) आहेत 
  • रिझर्व्ह बँकेचे पाहिले गव्हर्नर - ओसबोर्न अर्कल स्मिथ 
  • रिझर्व्ह बँकेचे पाहिले भारतीय गव्हर्नर - चिंतामण द्वारकानाथ (सी. डी. देशमुख)
  • देशातील फ़क्त रिझर्व्ह बॅंकेमध्ये आपण खाते उघडू शकत नाही 
  • रिझर्व्ह बँक बँकांना जास्तीत जास्त ३ महीने मुदतीची कर्जे देते
  • १ जुलै १९६० रोजी रिझर्व्ह बँकेने 'प्रत्यक्ष गॅरंटी योजना' सुरु केली 
  • रिझर्व्ह बँकेने खासगी बँकांना परवाना देण्यासाठी त्यांचे बेस कॅपिटल २०० कोटी रु. असायला पाहिजे असे जाहिर केले 
  • रिझर्व्ह बँक दर सहा महिन्यांनी पतधोरण जाहिर करते 
  • २, ५, १०, ५०, १००, ५००, १००० इ. रुपयांच्या नोटा वचनपत्रे तर रुपयाची नोट 'प्रिंसिपल नोट' म्हणून ओळखली जाते
  • परकीय चलनासोबत रुपयाचा कायदेशीर विनिमय दर जाहिर करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची असते 
  • ठेवी जमा योजनेचा कारभार रिझर्व्ह बॅंकेशी संलग्न डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन कडे आहे 
  • एखादी बँक बुडाली तर खातेदाराची १ लाख रु. पर्यंतची ठेवीची रक्कम खातेदारास डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन परत करते 
  • १९९३ मध्ये रिझर्व्ह बँकेने नवीन खाजगी बँक स्थापन्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहिर केली 
  • रिझर्व्ह बँकेने निर्यात व्यापारातील पतपुरवठा योजना २३ मार्च १९७३ ला सुरु केली 
  • रिझर्व्ह बँकेने सर्वप्रथम हुंडी बाजार योजना १९५२ ला तर नवीन हुंडी बाजार योजना १ नोव्हेंबर १९७० ला सुरु केली 
  • रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर - के. जे. उद्देशी 
  • कुमकुवत व प्राधान्य क्षेत्रातील व्यक्तींना व्याजाची सवलतीचा दर रिझर्व्ह बँक ठरविते 
  • रिझर्व्ह बँकेने शेती क्षेत्रास पतपुरवठा करण्यासाठी १९५६ ला 'नॅशनल अग्रिकल्चरल क्रेडिट फंड' स्थापन केले तर १९६३ ला 'शतकी पुनर्वित्त महामंडळ' स्थापन केले

Monday 10 February 2014

भारतातील सर्वात उंच, सर्वात मोठे - भाग १

  • सर्वोच्च पुरस्कार - भारतरत्न 
  • सर्वोच्च शौर्य पुरस्कार - परमवीर चक्र 
  • सर्वात लांब नदी - गंगा (२५२५ किमी)
  • सर्वात मोठी उपनदी - यमुना (१३७६ किमी)
  • सर्वात मोठा तलाव - वुलर तलाव (कश्मीर)
  • खारट पाण्याचा सर्वात मोठा तलाव - चिल्का (ओरिसा)
  • सर्वात मोठा मानवनिर्मित तलाव - गोविंद वल्लभपंत सागर (रिहंद धरण)
  • सर्वात उंच शिखर - काराकोरम (८६११ मी)
  • सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर - मुंबई 
  • आकाराने सर्वात मोठे राज्य - राजस्थान 
  • सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य - उत्तरप्रदेश 
  • सर्वात उंच धबधबा - कुंचिकल धबधबा (४५५ मी, शिगोमा कर्नाटक)
  • सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (पश्चिम बंगाल)
  • त्रिभुज प्रदेश नसणारी सर्वात मोठी नदी - नर्मदा आणि तापी 
  • नदीवरील सर्वात मोठा पूल - महात्मा गांधी सेतू, पटना (५५७५ मी)
  • सर्वात मोठे गुहा मंदिर - एल्लोरा 
  • सर्वात लांब रोड - ग्रांड ट्रंक रोड 
  • सर्वात उंचीवरील रोड - खारदुंगला मधील रोड (लेह-मनाली भागामध्ये)
  • सर्वात मोठी मस्जिद - जामा मस्जिद (दिल्ली)
  • सर्वात उंच दरवाजा - बुलंद दरवाजा, ५३. मी (फत्तेहपुर सिक्री)
  • सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक - भारतीय स्टेट बँक 
  • सर्वात लांब कनाल - इंदिरा गांधी कनाल (राजस्थान)
  • सर्वात मोठा घुमट - गोल घुमट (बीजापुर)
  • सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय - झूलॉजिकल गार्डन (अलीपुर, कोलकाता)
  • सर्वात मोठे म्यूजियम - इंडिया म्यूजियम (कोलकाता)
  • सर्वात उंच धरण - तेहरी धरण, २६० मी 
  • सर्वात मोठे वाळवंट - थार वाळवंट (राजस्थान)
  • सर्वात मोठा जिल्हा - कुच्छ (गुजरात)
  • सर्वात जलद ट्रैन - शताब्दी एक्सप्रेस (दिल्ली-भोपाळ)
  • सर्वात जास्त समुद्र किनारा असणारे राज्य - गुजरात, १६६० किमी 
  • सर्वात जास्त समुद्र किनारा असणारे दक्षिण भारतातील राज्य - आंध्र प्रदेश, ९७२ किमी 
  • सर्वात लांब रेल्वे मार्ग - आसाम ते कन्याकुमारी, ४२७२ किमी
  • सर्वात मोठा प्लॅटफॉर्म - खरगपुर, ८३३ मी (पश्चिम बंगाल)
  • सर्वात उंचीवरील रेल्वे स्थानक - घूम (पश्चिम बंगाल)

Sunday 9 February 2014

महत्त्वाचे वर्धापन दिन आणि दिवस भाग - १

खाली नमूद केलेले भारतीय त्याचप्रमाणे अंतरराष्ट्रीय महत्त्वाचे वर्धापनदिन आणि दिवस
भाग -१, जानेवारी ते जून

जानेवारी:
  • १ जानेवारी - लष्कर अस्थापना दिवस 
  • ७ जानेवारी - बालकांचे संरक्षण दिवस 
  • ९ जानेवारी - प्रवासी दिवस 
  • १२ जानेवारी - राष्ट्रीय युवा दिवस 
  • १५ जानेवारी - लश्कार दिन 
  • २५ जानेवारी - भारतीय पर्यटन दिवस 
  • २६ जानेवारी - प्रजकसत्ताक दिन आणि लॉ दिवस 
  • ३० जानेवारी - जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन 
  • ३० जानेवारी - सर्वोदय दिन 
फेब्रुवारी: 
  • १२ फेब्रुवारी - रोज डे 
  • १३ फेब्रुवारी - सरोजिनी नायडू यांची जयंती 
  • १३ फेब्रुवारी - जागतिक विवाह दिन 
  • १४ फेब्रुवारी - वेलेंटाइन डे 
  • २१ फेब्रुवारी - जागतिक मातृभाषा दिन 
  • २४ फेब्रुवारी - केंद्रीय अबकारी दिन 
  • २८ फेब्रुवारी - राष्ट्रिय विज्ञान दिन 
मार्च:
  • ४ मार्च - राष्ट्रीय सुरक्षा दिन 
  • ८ मार्च - अंतरराष्ट्रीय महिला दिन 
  • ८ मार्च - अंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 
  • ९ मार्च - जागतिक किडनी दिन 
  • १४ मार्च - जागतिक ग्राहक दिन 
  • १५ मार्च - जागतिक अपांग दिन 
  • १५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिन 
  • २१ मार्च - जागतिक वनीकरण दिन 
  • २३ मार्च - जागतिक हवामान दिन 
  • २३ मार्च - भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना फाशी देण्यात आली 
  • २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन 
एप्रिल:
  • ५ एप्रिल - राष्ट्रिय मेरीटाइम दिन (समुद्री)
  • ७ एप्रिल - राष्ट्रिय आरोग्य दिन 
  • १० एप्रिल - जलसंपदा दिन/राष्ट्रीय सर्वे दिन 
  • १० एप्रिल - जागतिक होमिओपेथिक दिवस 
  • १४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 
  • १७ एप्रिल - जागतिक अनुवांशिक रोग दिन 
  • १८ एप्रिल - जागतिक वारसा दिन 
  • २१ एप्रिल - भारतीय सिविल सर्विसेस दिन 
  • २२ एप्रिल - वसुंधरा दिन 
  • २४ एप्रिल - पंचायत दिवस 
मे:
  • १ मे - महाराष्ट्र दिन 
  • १ मे - जागतिक कामगार दिन 
  • मे महिन्यातील पहिला मंगळवार जागतिक दमा दिन 
  • ३ मे - वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे 
  • ८ मे - जागतिक रेड क्रॉस दिन 
  • ८ मे - जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 
  • मे महिन्यातील पहिला रविवार जागतिक हास्य दिन 
  • मे महिन्यातील दूसरा रविवार जागतिक मातृदिन 
  • ११ मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 
  • १२ मे - जागतिक परिचारिका दिन (नर्स)
  • १३ मे - राष्ट्रीय एकता दिन 
  • १५ मे - जागतिक कुटुम्ब दिन 
  • १७ मे - जागतिक दूरसंचार दिन 
  • २१ मे - दहशदवाद विरोधी दिन 
  • २७ मे - जवाहरलाल नेहरु स्मृतीदिन 
  • २९ मे - एवेरेस्ट दिन 
  • ३१ मे - एंटी टोबैको दिन 
जून:
  • ५ जून - जागतिक पर्यावरण दिन 
  • १४ जून - जागतिक रक्तदान दिन 
  • जून महिन्यातील तीसरा रविवार फादर्स डे 
  • २० जून - जागतिक निर्वासित दिन 
  • २८ जून - गरीबी दिन 

Saturday 8 February 2014

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

भारतातही मध्यवर्ती बँक स्थापन्यासाठी १९२६ मध्ये 'हिल्टन यंग कमिशन' स्थापन केले होते. त्याच्या शिफारशीनुसार १९२७ मध्ये रिझर्व्ह बँक स्थापनेसाठी एक विधेयक मांडण्यात आले. १९३५ ची संघराज्यात्मक राज्यघटना अमलात येण्यापुर्वी रिझर्व्ह बँक ऑफ़ स्थापन केली जाणे आवश्यक होते. त्या दृष्टीने १९३४ मध्ये रिझर्व्ह बँक इंडिया ऎक्ट केला गेला आणि १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व्ह बँकेची स्थापना होऊन कारभार सुरु झाला

रचना: रिझर्व्ह बँक स्थापनेच्या वेळी ती खासगी शेअर धारकांची होती. त्यावेळी एकूण भांडवल ५ कोटी रु. होते. त्यापैकी २.८ कोटी रु. हे भागधारकांचे होते तर २.२ कोटी रु. केंद्र सरकारचे होते
मध्यवर्ती संचालक मंडळ:
  • गव्हर्नर - १ 
  • डेप्युटी गव्हर्नर - ४ 
  • स्थानिक संचालक मंडळाचे प्रतिनिधी - ४ 
  • सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ व्यक्ती - १० 
  • सरकारच्या अर्थ खात्यातील अधिकारी - १ 
रिझर्व्ह बँकेच्या स्थानिक कार्यालयात स्थानिक संचालक मंडळ असते, त्यात ३ ते ५ संचालक असून त्यापैकी एकाची निवड मध्यवर्ती संचालक मंडळावर होते. सरकार शेती, उद्योग, व्यापार, व्यवसाय इ. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अशा ९ व्यक्तींची नियुक्ती मंडळावर करते. त्यांची मुदत ४ वर्षे असते. रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई येथे असून नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई येथे स्थानिक कार्यालये आहेत. पूर्वी ब्रेमहादेशात रंगून येथेही कार्यालय होते. परंतु ब्रम्हदेशाला स्वंतंत्र मिळाल्यानंतर ते बंद करण्यात आले. रिझर्व्ह बँकेने १५ ऑगस्ट १९४७ ते ३० जून १९४८ या कालावधीत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य केले आहे. देशातील १४ शहरांमध्ये रिझर्व्ह बँकेची शाखा कार्यालये असून महाराष्ट्रात भायखला, मुंबई आणि नागपुर येथे शाखा आहेत. मुंबईमध्ये मध्यवर्ती कार्यालयमध्ये २३ विभाग आहेत
बँकेच्या मुख्य कार्यालयात संचालक मंडळ असून बँकेचे गव्हर्नर या मंडळाचे अध्यक्ष असतात. सध्या रघुराम राजन हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत. 

राष्ट्रीयीकरण: १ जानेवारी १९४९ रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्याच वेळी खासगी भागधारकांना १०० रु. च्या शेअर्सवर ११८ रु. १० आणे इतके पैसे दिले आणि ते शेअर्स सरकारने ताब्यात घेतले

Friday 7 February 2014

सत्या नाडेला जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी माइक्रोसॉफ्टचे सीईओ

वॉशिंग्टन येथे ४ फेब्रुवारी २०१४ रोजी सत्या नाडेला यांची जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी माइक्रोसॉफ्टच्या मुख्या कार्यकारी अधिकारी यापदी नियुक्ति केली आहे.सत्या नाडेला यांना यापूर्वीचे सीईओ स्टीव बामर यांचे पद घ्यायचे आहे. कंपनीच्या मते सत्या नाडेला हे माइक्रोसॉफ्टचे तिसरे सीईओ आहेत. माइक्रोसॉफ्टच्या ३८ वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय व्यक्तीची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले आहे

सत्या नाडेला यांच्याबाबत थोड़े:
  • सत्या नाडेला यांचा जन्म हैद्राबाद, आंध्रप्रदेशमध्ये झाला 
  • ते वर्ष १९९२ पासून माइक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत आहेत 
  • सत्या नाडेला यांनी मनिपाल इंस्टीटूट ऑफ़ टक्नोलॉजी मधून इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग पूर्ण केली 
  • सत्या नाडेला यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठातून मास्टर ऑफ़ सायन्स ही पदवी प्राप्त केली 
  • सत्या नाडेला यांनी शिकागो विद्यापीठातून एमबीए ची पदवी प्राप्त केली 
  • ते १९९२ पासून माइक्रोसॉफ्टसोबत आहेत, त्यांनी २०१२ पासून क्लाउडचे कार्यकारी उपाध्यक्ष त्याचप्रमाणे इंटरप्राइज़ समूहाची सेवा केली 
  • सत्या नाडेला यांचे वडील बीएन युगांधर नियोजन आयोगाचे सदस्य होते त्याचप्रमाणे ते पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहाराव यांचे विशेष सचिव म्हणून काम केले आहे 
माइक्रोसॉफ्ट:
  • माइक्रोसॉफ्टची स्थापना बिल गेट्स आणि पॉल एलन यांनी रेडमोंड, अमेरिका येथे एप्रिल १९७५ मध्ये केली. माइक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी आहे 
  • माइक्रोसॉफ्टने सप्टेंबर २०१३ मध्ये नोकिया ही मोबाईल फोन बनविणारी जगातील अग्रगण्य कंपनी ७.२ बिलियन अमेरिकी डॉलरला विकत घेतली 
  • आणि महत्त्वाचे सत्या नाडेला हे जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी माइक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत

Thursday 6 February 2014

ध्रुव ३ आणि अग्नी ४

ध्रुव ३ स्वदेशी  उच्च प्रदर्शन कम्प्यूटिंग सिस्टम डिफेन्स रिसर्च एंड डेव्हलपमेंट ऑर्गनाइजेशन द्वारे लॉन्च

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशनचे महानिदेशक (डायरेक्टर जनरल) त्याचप्रमाणे अनुरागचे (अडवांस नुमेरिकल रिसर्च एंड एनालिसिस ग्रुप) संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार अविनाश चंदर यांनी हैद्राबाद येथे २५ जानेवारी २०१४ रोजी ध्रुव ३ चे उद्घाटन केले. ध्रुव ३ ही स्वदेशी बनवटीची उच्च परफोर्मन्स क्षमता असलेली कंप्यूटिंग सिस्टम आहे. ध्रुव ३ ही कठीण संरक्षण प्रायोगिक समस्या सोडविण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
ध्रुव ३ ही अति उच्चतम कंप्यूटिंग सिस्टम असून तिचा उपयोग प्रामुख्याने मध्यम आकाराची लढाऊ विमान त्याचप्रमाणे ही भारतातील अतिमहत्त्वाची कंप्यूटिंग सिस्टम असून सायबर सुरक्षा त्याचप्रमाणे माहिती देवान -घेवाण मध्ये महत्वाची भूमिका पार पाडेल

अग्नी ४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू अग्नी ४ ह्या क्षेपणास्त्राची २० जानेवारी २०१४ रोजी ओरिसा येथील व्हीलर बेटावर यशस्वी चाचणी करण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे २ टप्प्यांचे क्षेपणास्त्र आहे.
१ - पल्ला ४ हजार किलोमीटर
२ - लांबी २० मीटर
३ - वजन १७ टन
४ - उंच उडन्याची क्षमता ८५० किलोमीटर
अग्नी ४ या क्षेपणास्त्राचे हे तीसरे यशस्वी परिक्षण असून ते आता भारतीय सशस्त्र सेनेच्या हवाली करण्यात आले आहे. अग्नी ४ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे दोन टप्प्यांचे क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला ४ हजार किलोमीटर इतका आहे. अग्नी १, अग्नी २, अग्नी ३, पृथ्वी या क्षेपणास्त्राप्रमाणेच हे सध्या भारतीय सशस्त्र सेनेला सोपविण्यात आले आहे 

Wednesday 5 February 2014

केंद्राची मातृ आणि शिशु ट्रैकिंग सुविधा

केंद्रीय आरोग्य आणि समाज कल्याण मंत्रालयाने ३१ जानेवारी २०१४ रोजी नवी दिल्ली येथे आपल्या राष्ट्रीय आरोग्य आणि समाज कल्याण संस्थानामध्ये मातृ आणि शिशु ट्रैकिंग सुविधेचे उद्घाटन केले. मातृ आणि शिशु ट्रैकिंग सुविधा डिसेंबर २००९ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत सुरु करण्यात आली आहे
मातृ आणि शिशु ट्रैकिंगच्या विशेष सुविधा:
  • मातृ आणि शिशु ट्रैकिंग योजना ही वेबवर आधारित सुविधा आहे जी गर्भवती महिला आणि ० ते ५ वयोगटातील मुले यांची माहिती जमा करेल आणि त्याना पुरविल्या जाणार्या सोयी-सुविधांनां  ट्रैक करेल 
  • ह्या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे गर्भवती महिलेला प्रसूतिपूर्व त्याचप्रमाणे प्रसूतिनंतर उच्च गुणवत्तेसह  व पूर्ण देखभाल दिली जावी आणि प्रत्येक लहान मुलाला लसिकरणाची प्रत्येक लस मिळेल याची खात्री करने 
  • आई आणि बालक ह्याचा देखरेखीशिवाय ह्या योजनेअंतर्गत आशा कर्मचारी, एएनएम् कर्मचारी त्याचप्रमाणे स्वत:च्या माता-पित्यासोबत गर्भवती महिला फोनवरती बोलू शकतात 
  • ह्या सेवेअंतर्गत लाभार्थ्याना मिळणारया सोयी-सुविधा त्याचप्रमाणे योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्व राज्यातून माहिती गोळा केली जाईल 
  • लाभार्थ्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे सरकारकडून मिळणारया अनेक योजनांबाबत माहिती दिली जाईल 
  • सुविधा केन्द्रावरती ८० हेल्प डेस्क एजेंट असतील जे सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० पर्यन्त काम करातील 
  • लाभार्थ्यांना त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचार्यांना आरोग्य विषयक समस्यांवरती उपाय-योजना सांगण्याकरिता मोफत कॉल सुविधा सुरु केली आहे  
इतर सुविधा:
  • गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योेजनेचा लाभ मिळेल 
  • गर्भाव्यस्था किंवा बाळाच्या वयानुसार लाभार्थ्यांना फोन कॉल किंवा टेक्स्ट संदेशाच्या माध्यमातून योग्य ती माहिती दिली जाईल 
  • आशा कर्मचार्यांचा पगार हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल आणि नियमितरित्या भेटेल याची खात्री केली जाईल 
  • गरजेनुसार आशा कर्मचार्यांना इंटरअक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्सच्या माध्यमातून ट्रेंनिंग दिली जाईल 

चालू घडामोडी

५६ वे ग्रैमी पुरस्कार २०१४ ची घोषणा:

अमेरिकेच्या रिकॉर्डिंग अकादमीने २६ जानेवारी २०१४ रोजी ५६ व्या ग्रैमी पुरस्कार २०१४ ची घोषणा केली. ग्रैमी पुरस्कार हे दरवर्षी फ़क्त संगीत क्षेत्रामध्ये काम करणार्या कलाकारांना प्रदान केला जातो, या वर्षीचे ग्रैमी पुरस्कार खलीलप्रमाणे:
  • अल्बम ऑफ़ दी ईयर - ड्राफ्ट पंक याचा - रैंडम असेस मेमरीस 
  • रेकॉर्ड ऑफ़ दी ईयर - ड्राफ्ट पंक, निल रॉजर्स यांचे - गेट लकी 
  • नविन कलाकार - रेयन लेविस 
  • सॉँग ऑफ़ दी ईयर - लॉर्ड याचे - रॉयल्स 
  • लहान मुलांचा अल्बम - जेनिफर गोसाई हिचा - थ्रो पेनी इन दी विशिंग वेल 
  • पॉप सोलो परफॉर्मन्स - लॉर्ड याचे - रॉयल्स
ग्रैमी पुरस्काराबाबत थोड़े: 
  • ग्रैमी पुरस्कारांना ग्रैमोफोन पुरस्कार असेदेखील म्हटले जाते 
  • ग्रैमी पुरस्कार हे संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार आहेत, हे पुरस्कार अमेरिकेच्या रेकॉर्डिंग अकादमीतर्फे दरवर्षी दिले जातात 
  • रिकॉर्डिंग अकादमी ही 'नॅशनल एकाडमी ऑफ़ रिकॉर्डिंग आर्ट्स एंड सायन्सेस' या नावाने ओळखली जाते 
  • ही अकादमी १९५७ ला अमेरिकेमध्ये स्थापन केली गेली 
  • पहिला ग्रामी पुरस्कार सोहळा ४ मे १९५९ ला लॉस एंजल्स मध्ये झाला 
  • २०१३ पर्यंत केवळ ४ भारतीयांना ग्रामी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे 
  • १९६७ साली सितार वादक पंडित रवी शंकर हे ग्रामी पुरस्कार प्राप्त करणारे पाहिले भारतीय संगीतकार होते, त्यांना १९७२ त्याचप्रमाणे २००१ या वर्षी देखील ग्रामी पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे 
  • १९९४ मध्ये वीणावादक विश्वमोहन भट्ट आणि गिटार गुरु री कोदर यांना संयुक्तपणे ग्रामी पुरस्काराने सन्मानित केले गेले 
  • वर्ष २०१० मध्ये भारतीय संगीतकार ए आर रेहमान याला ग्रामी पुरस्काराने सन्मानित केले गेले 

Monday 3 February 2014

अर्थशास्त्र

रिझर्व्ह बँकेची पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने:
१ - बँकदरात बदल करणे: ज्या दराने रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा करते त्या दराला बँकदर असे म्हणतात. तर व्यापारी बँका ग्राहकांना ज्या दराने कर्जपुरवठा करतात त्या दराला बाजारदर असे म्हणतात. ज्या वेळी पतचलन निर्मिती कमी व्हावी तेव्हा रिझर्व्ह बँक बँकदरात वाढ करते. त्यामुळे व्यापारी बँकाना कर्ज महाग होऊन कर्जाची मागणी पूर्वीपेक्षा कमी होते. या धोरणाला महाग पैशाचे धोरण असे म्हणतात. ज्यावेळी पतचलन वाढवायचे असेल तेव्हा रिझर्व्ह बँक बँकदर कमी करते. या धोरणाला स्वस्त पैशाचे धोरण असे म्हटले जाते

२ - खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी-विक्री करणे: रिझर्व्ह बँक सार्वजनिक कर्जरोख्यांची खरेदी वा विक्रीच्या आधारे पतनियंत्रण करीत असते. पतचलन कमी होते तेव्हा रिझर्व्ह बँक रोख्यांची विक्री करते. त्यामुळे व्यापारी बँका, गुंतवणूक संस्था यांच्याकडून रोखे खरेदी केल्याने त्यांच्याकडील पतनिर्मितीही कमी होते. पतचलन वाढवायचे असे धोरण असेल तेव्हा रिझर्व्ह बँक व्यापारी बँकाकडून रोखे विकत घेते. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेकडील पैसा त्या बँकाकड़े जातो. रोख पैशांमध्ये वाढ होऊन पतनिर्मितीत वाढ होत असते

३ - रोख राखीव निधीचे प्रमाण बदलणे: व्यापारी बँकांना ठेवींपैकी विशिष्ठ टक्के रक्कम ही रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवावी लागते. त्याला रोख राखीव निधी असे म्हणतात. या प्रमाणात बदल झाला असता त्याचा परिणाम पतचलनावर होत असतो. पतचलन कमी व्हावे असे धोरण असते तेव्हा हे प्रमाण वाढवले जाते, त्यामुळे बँकाकडील रोख पैसा कमी होतो. तसेच पतचलन वाढवायचे असेल तेव्हा हे प्रमाण कमी केले जाते. म्हणजे बँकाकडील रोख पैशात वाढ होत असते

४ - वैधानिक रोखतेचे प्रमाण: व्यापारी बँकांनी स्वत:जवळ ठेवलेली रोख रक्कम, इतर व्यापारी बँकांमध्ये ठेवलेली रोख रक्कम, सोने, मान्यताप्राप्त कर्जरोखे यातील गुंतवणूक यांना वैधानिक रोखतेचे प्रमाण असे म्हणतात. हे प्रमाण रिझर्व्ह बँक ठरवत असते. रोख राखीव निधींच्या व्यतिरिक्त प्रत्येक बँकेला वैधानिक रोखता ठेवावी लागते. १९९१ नंतर वैधानिक रोखतेचे प्रमाणही कमी होत आहे

भारतीय राज्यघटना

मंत्रीमंडळातील मंत्र्यांचे प्रकार: मंत्र्यांचे एकूण ५ प्रकार आहेत
१ - कॅबिनेट मंत्री:
  • हे प्रथम दर्जाचे मंत्री असून त्यांची संख्या २९ आहे 
  • अर्थ, परराष्ट्र संबंध, संरक्षण, गृह, दळणवळण, रेल्वे इत्यादी महत्त्वाची खाती कॅबिनेट मंत्र्यांकडे असतात 
  • मंत्रीमंडळाची बैठक म्हणजेच कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होय
२ - राज्यमंत्री:
  • हे दुसर्या दर्जाचे मंत्री आहेत 
  • कॅबिनेट मंत्र्यांइतकेच वेतन व भत्ते यांना मिळतात 
  • पंतप्रधानांच्या आमंत्रणाशिवाय यांना मंत्रीमंडळाच्या बैठकीस उपस्थित राहता एट नाही 
  • बहुधा कॅबिनेट मंत्र्याला मदतनीस म्हणून ते कम करतात, उदा. गृहराज्यमंत्री, कृषि राज्यमंत्री 
  • त्यांची संख्या १६ ते २० इतकी अपेक्षित असते 
३ - उपमंत्री:
  • हे तिसर्या दर्जाचे मंत्री असतात 
  • यांच्याकडे प्रशासनाचा कोणताही विभाग वा खाते पूर्णपणे आणि स्वतंत्र्यरित्या सोपविलेले नसते 
  • ज्या खात्यात काम जास्त असते, त्या खात्याच्या मंत्र्यास मदतनीस म्हणून उपमंत्री कार्य करतात 
  • कॅबिनेटच्या बैठकीस यांना निमंत्रण नसते 
  • त्यांची संख्या १६ ते २० इतकी अपेक्षित असते 
४ - सांसदीय मंत्री: 
  • यांची संख्या पंतप्रधान ठरवितात 
  • हे मंत्री मंत्रीमंडळाचे सदस्य नसतात 
  • मंत्र्यांना त्यांच्या कार्यात मदतनीस म्हणून ते कार्य करतात 
  • कालांतराने त्यांचे उपमंत्री वा राज्यमंत्री म्हणून नामनिर्देशन होऊ शकते 
५ - बिनखात्याचे मंत्री:
  • यांच्याकडे प्रशासनाचे कोणतेच खाते नसते 
  • विशेष परिस्थितीच पंतप्रधान त्यांची नियुक्ती करतात 
  • एखाद्या मंत्र्यांचे रिक्त झालेले पद हे मंत्री संभाळतात