Friday 7 February 2014

सत्या नाडेला जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी माइक्रोसॉफ्टचे सीईओ

वॉशिंग्टन येथे ४ फेब्रुवारी २०१४ रोजी सत्या नाडेला यांची जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी माइक्रोसॉफ्टच्या मुख्या कार्यकारी अधिकारी यापदी नियुक्ति केली आहे.सत्या नाडेला यांना यापूर्वीचे सीईओ स्टीव बामर यांचे पद घ्यायचे आहे. कंपनीच्या मते सत्या नाडेला हे माइक्रोसॉफ्टचे तिसरे सीईओ आहेत. माइक्रोसॉफ्टच्या ३८ वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय व्यक्तीची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले आहे

सत्या नाडेला यांच्याबाबत थोड़े:
  • सत्या नाडेला यांचा जन्म हैद्राबाद, आंध्रप्रदेशमध्ये झाला 
  • ते वर्ष १९९२ पासून माइक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत आहेत 
  • सत्या नाडेला यांनी मनिपाल इंस्टीटूट ऑफ़ टक्नोलॉजी मधून इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग पूर्ण केली 
  • सत्या नाडेला यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठातून मास्टर ऑफ़ सायन्स ही पदवी प्राप्त केली 
  • सत्या नाडेला यांनी शिकागो विद्यापीठातून एमबीए ची पदवी प्राप्त केली 
  • ते १९९२ पासून माइक्रोसॉफ्टसोबत आहेत, त्यांनी २०१२ पासून क्लाउडचे कार्यकारी उपाध्यक्ष त्याचप्रमाणे इंटरप्राइज़ समूहाची सेवा केली 
  • सत्या नाडेला यांचे वडील बीएन युगांधर नियोजन आयोगाचे सदस्य होते त्याचप्रमाणे ते पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहाराव यांचे विशेष सचिव म्हणून काम केले आहे 
माइक्रोसॉफ्ट:
  • माइक्रोसॉफ्टची स्थापना बिल गेट्स आणि पॉल एलन यांनी रेडमोंड, अमेरिका येथे एप्रिल १९७५ मध्ये केली. माइक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी आहे 
  • माइक्रोसॉफ्टने सप्टेंबर २०१३ मध्ये नोकिया ही मोबाईल फोन बनविणारी जगातील अग्रगण्य कंपनी ७.२ बिलियन अमेरिकी डॉलरला विकत घेतली 
  • आणि महत्त्वाचे सत्या नाडेला हे जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी माइक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत

No comments:

Post a Comment