Monday 3 February 2014

भारतीय राज्यघटना

मंत्रीमंडळातील मंत्र्यांचे प्रकार: मंत्र्यांचे एकूण ५ प्रकार आहेत
१ - कॅबिनेट मंत्री:
  • हे प्रथम दर्जाचे मंत्री असून त्यांची संख्या २९ आहे 
  • अर्थ, परराष्ट्र संबंध, संरक्षण, गृह, दळणवळण, रेल्वे इत्यादी महत्त्वाची खाती कॅबिनेट मंत्र्यांकडे असतात 
  • मंत्रीमंडळाची बैठक म्हणजेच कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होय
२ - राज्यमंत्री:
  • हे दुसर्या दर्जाचे मंत्री आहेत 
  • कॅबिनेट मंत्र्यांइतकेच वेतन व भत्ते यांना मिळतात 
  • पंतप्रधानांच्या आमंत्रणाशिवाय यांना मंत्रीमंडळाच्या बैठकीस उपस्थित राहता एट नाही 
  • बहुधा कॅबिनेट मंत्र्याला मदतनीस म्हणून ते कम करतात, उदा. गृहराज्यमंत्री, कृषि राज्यमंत्री 
  • त्यांची संख्या १६ ते २० इतकी अपेक्षित असते 
३ - उपमंत्री:
  • हे तिसर्या दर्जाचे मंत्री असतात 
  • यांच्याकडे प्रशासनाचा कोणताही विभाग वा खाते पूर्णपणे आणि स्वतंत्र्यरित्या सोपविलेले नसते 
  • ज्या खात्यात काम जास्त असते, त्या खात्याच्या मंत्र्यास मदतनीस म्हणून उपमंत्री कार्य करतात 
  • कॅबिनेटच्या बैठकीस यांना निमंत्रण नसते 
  • त्यांची संख्या १६ ते २० इतकी अपेक्षित असते 
४ - सांसदीय मंत्री: 
  • यांची संख्या पंतप्रधान ठरवितात 
  • हे मंत्री मंत्रीमंडळाचे सदस्य नसतात 
  • मंत्र्यांना त्यांच्या कार्यात मदतनीस म्हणून ते कार्य करतात 
  • कालांतराने त्यांचे उपमंत्री वा राज्यमंत्री म्हणून नामनिर्देशन होऊ शकते 
५ - बिनखात्याचे मंत्री:
  • यांच्याकडे प्रशासनाचे कोणतेच खाते नसते 
  • विशेष परिस्थितीच पंतप्रधान त्यांची नियुक्ती करतात 
  • एखाद्या मंत्र्यांचे रिक्त झालेले पद हे मंत्री संभाळतात  

No comments:

Post a Comment