Monday 17 February 2014

१३ फेब्रुवारी - राष्ट्रीय महिला दिन

भारतामध्ये १३ फेब्रुवारी २०१४ हा दिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणुन साजरा केला गेला. भारताच्या पहिल्या महिला गव्हर्नर (संयुक्त आग्रा आणि अवध प्रांत) त्यांची जन्म तिथी १३ फेब्रुवारी ही राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरी केली गेली. सरोजिनी नायडू यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ मध्ये हैद्राबाद येथे झाला. ही त्यांची १३५ वी जयंती होती
भारतामध्ये महिलांच्या विकासासाठी सरोजिनी नायडू यांनी केलेल्या कार्याला मान्यता देण्यासाठी त्यांच्या जयंती दिवशी राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला गेला 

सरोजिनी नायडू:
  • सरोजिनी नायडू ह्या भारताच्या गान (स्वर) कोकिळा म्हणून ओळखल्या जातात
  • त्यांचे उच्च शिक्षण लंडन आणि कैंब्रिज मध्ये झाले 
  • १९ वर्षाच्या असताना त्यांचे लग्न डॉ. गोविंदराजलू नायडू यांच्या सोबत झाले 
  • सरोजिनी नायडू ह्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या
  • त्या भारतातील पहिल्या महिला गव्हर्नर (संयुक्त आग्रा आणि अवध प्रांत) होत्या 
  • १९१९ मध्ये झालेल्या जलियानवाला बाग हत्याकांडावर दू:खी होऊन त्यांनी कविता लिहने बंद केले 
  • १९०५ मध्ये झालेल्या बंगालच्या फाळणीनंतर त्या राजकरणामध्ये सक्रीय झाल्या
  • १९२५ मध्ये कानपुर येथे झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष
  • १९२८ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना कैसर-ए-हिंद ही पदवी देऊन सन्मानित केले 
  • सरोजिनी नायडू यांचे निधन २ मार्च १९४९ ला झाले 
साहित्यामध्ये सरोजिनी नायडू यांचे योगदान:
  • १९०५ - गोल्डन थ्रेशोल्ड (कविता संग्रह)
  • १९१२ - दी बर्ड ऑफ़ टाइम (कविता संग्रह)
  • १९१७ - ब्रोकन विंग (कविता संग्रह)
  • १९१७ - मुहम्मद जीना: ऎन एम्बेसेडर ऑफ़ यूनिटी 
  • दी मैजिक ट्री 
  • फीस्ट ऑफ़ यूथ 
  • दी विझार्ड मास्क 

No comments:

Post a Comment