Thursday 13 February 2014

अंतरिम रेल्वे बजेट २०१४-१५

रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी १२ फेब्रुवारी २०१४ रोजी लोकसभेमध्ये २०१४-१५ चे रेल्वे बजेट सादर केले. मल्लिकार्जुन खरगे यांचे हे प्रथम बजेट असून यूपीए सरकारचे शेवटचे रेल्वे बजेट आहे. या बजेटमध्ये त्यांनी प्रवासी भाड्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. त्याचबरोबर ७२ नवीन रेल्वे गाड्या सुरु करण्याचे त्याचप्रमाणे ईशान्य भारतीय राज्यांमध्ये रेल्वे जाळे वाढविण्याचे आश्वासन दिले आहे.
अंतरिम रेल्वे बजेट २०१४-१५ चे प्रमुख मुद्दे:
  • प्रवासी भाड्यामध्ये कोणतीही वाढ नाही 
  • ७२ नवीन ट्रैन सुरु करण्याची घोषणा, ज्यामध्ये १७ एसी प्रीमियम, ३८ एक्सप्रेस, १० पॅसेंजर, ४ मेमू तर ३ डेमू ट्रैन आहेत 
  • जलद गतीवाल्या आणि अधिक जास्त ट्रैन सुरु करण्याचा निर्णय
  • शिलॉन्ग, ईटानगर ह्या ईशान्येकडील राज्यांना रेल्वे जोडणार
  • दिल्ली-मुंबई दरम्यान चलणार्या प्रीमियम एसी स्पेशन ट्रैनमध्ये आरक्षण करण्याची अवधी कमी केली जाणार 
  • प्रवासी भाडे त्याचप्रमाणे माल भाडे ठरविण्यासाठी एक स्वतंत्र रेल्वे टैरिफ अथॉरिटी बनविण्याचा निर्णय ज्यामध्ये सर्व पक्षांची भागीदारी असेल 
  • वार्षिक रेल्वे बजेट ६४३०५ करोड़ रुपये
  • रेल्वे भाड्यामधून १६०७७५ कोड रुपये कमाई होण्याची शक्यता त्याचप्रमाणे एकूण अनुमानित खर्च हा ११०६४९ करोड़ रुपये
  • माल वाहतुकीमधुन ९४ हजार करोड रुपये कमाईचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे 
  • पब्लिक-प्रायवेट पार्टनरशिपवाले प्रकल्प सुरु करणे 
  • रेल्वेने सहावा वेतन आयोग सुरु केला 
  • पेट्री कारमध्ये इंडक्शन कुकराचा वापर करणार 
  • आसाममध्ये रंगिया-मुरकोंगासेलेक ही ५१० किमीची लाईन १ वर्षामध्ये पूर्ण करणे 
  • ट्रैनची चालू स्थिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन ट्रैकिंग सुरु करणार 
महाराष्ट्रातून सुरु होनरया ट्रेन्स:
  • हावड़ा-पुणे एक्सप्रेस (एसी प्रीमियम ट्रैन)
  • मुंबई-हावड़ा एक्सप्रेस (एसी प्रीमियम ट्रैन)
  • मुंबई-पटना एक्सप्रेस (एसी प्रीमियम ट्रैन)
  • बांद्रा-अमृतसर एक्सप्रेस (एसी प्रीमियम ट्रैन)
  • बांद्रा-कटरा एक्सप्रेस (एसी प्रीमियम ट्रैन)
  • मुंबई-गोरखपुर एक्सप्रेस (एसी प्रीमियम ट्रैन)
  • भावनगर-बांद्रा एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)
  • हुबली-मुंबई एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)
  • मुंबई-चेन्नई एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)
  • मुंबई-करमाली एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)
  • नांदेड़-औरंगाबाद एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)
  • पुणे-लखनऊ एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)
  • कानपूर-बांद्रा एक्सप्रेस (एक्सप्रेस ट्रैन)

No comments:

Post a Comment