Thursday 6 February 2014

ध्रुव ३ आणि अग्नी ४

ध्रुव ३ स्वदेशी  उच्च प्रदर्शन कम्प्यूटिंग सिस्टम डिफेन्स रिसर्च एंड डेव्हलपमेंट ऑर्गनाइजेशन द्वारे लॉन्च

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशनचे महानिदेशक (डायरेक्टर जनरल) त्याचप्रमाणे अनुरागचे (अडवांस नुमेरिकल रिसर्च एंड एनालिसिस ग्रुप) संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार अविनाश चंदर यांनी हैद्राबाद येथे २५ जानेवारी २०१४ रोजी ध्रुव ३ चे उद्घाटन केले. ध्रुव ३ ही स्वदेशी बनवटीची उच्च परफोर्मन्स क्षमता असलेली कंप्यूटिंग सिस्टम आहे. ध्रुव ३ ही कठीण संरक्षण प्रायोगिक समस्या सोडविण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
ध्रुव ३ ही अति उच्चतम कंप्यूटिंग सिस्टम असून तिचा उपयोग प्रामुख्याने मध्यम आकाराची लढाऊ विमान त्याचप्रमाणे ही भारतातील अतिमहत्त्वाची कंप्यूटिंग सिस्टम असून सायबर सुरक्षा त्याचप्रमाणे माहिती देवान -घेवाण मध्ये महत्वाची भूमिका पार पाडेल

अग्नी ४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू अग्नी ४ ह्या क्षेपणास्त्राची २० जानेवारी २०१४ रोजी ओरिसा येथील व्हीलर बेटावर यशस्वी चाचणी करण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे २ टप्प्यांचे क्षेपणास्त्र आहे.
१ - पल्ला ४ हजार किलोमीटर
२ - लांबी २० मीटर
३ - वजन १७ टन
४ - उंच उडन्याची क्षमता ८५० किलोमीटर
अग्नी ४ या क्षेपणास्त्राचे हे तीसरे यशस्वी परिक्षण असून ते आता भारतीय सशस्त्र सेनेच्या हवाली करण्यात आले आहे. अग्नी ४ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे दोन टप्प्यांचे क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला ४ हजार किलोमीटर इतका आहे. अग्नी १, अग्नी २, अग्नी ३, पृथ्वी या क्षेपणास्त्राप्रमाणेच हे सध्या भारतीय सशस्त्र सेनेला सोपविण्यात आले आहे 

No comments:

Post a Comment