Tuesday 11 February 2014

भारतीय रिझर्व्ह बॅंकेविषयी अधिक माहिती

भारतीय रिझर्व्ह बॅंकेविषयी अधिक माहिती:
  • रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय - मुंबई 
  • रिझर्व्ह बँकेची प्रशिक्षण महाविद्यालये - ३ (मुंबई, पुणे, चेन्नई)
  • रिझर्व्ह बँकेची देशात चौदा शाखा कार्यालये आहेत, त्यापैकी दोन  महाराष्ट्रात नागपुर आणि मुंबई (भायखला) आहेत 
  • रिझर्व्ह बँकेचे पाहिले गव्हर्नर - ओसबोर्न अर्कल स्मिथ 
  • रिझर्व्ह बँकेचे पाहिले भारतीय गव्हर्नर - चिंतामण द्वारकानाथ (सी. डी. देशमुख)
  • देशातील फ़क्त रिझर्व्ह बॅंकेमध्ये आपण खाते उघडू शकत नाही 
  • रिझर्व्ह बँक बँकांना जास्तीत जास्त ३ महीने मुदतीची कर्जे देते
  • १ जुलै १९६० रोजी रिझर्व्ह बँकेने 'प्रत्यक्ष गॅरंटी योजना' सुरु केली 
  • रिझर्व्ह बँकेने खासगी बँकांना परवाना देण्यासाठी त्यांचे बेस कॅपिटल २०० कोटी रु. असायला पाहिजे असे जाहिर केले 
  • रिझर्व्ह बँक दर सहा महिन्यांनी पतधोरण जाहिर करते 
  • २, ५, १०, ५०, १००, ५००, १००० इ. रुपयांच्या नोटा वचनपत्रे तर रुपयाची नोट 'प्रिंसिपल नोट' म्हणून ओळखली जाते
  • परकीय चलनासोबत रुपयाचा कायदेशीर विनिमय दर जाहिर करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची असते 
  • ठेवी जमा योजनेचा कारभार रिझर्व्ह बॅंकेशी संलग्न डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन कडे आहे 
  • एखादी बँक बुडाली तर खातेदाराची १ लाख रु. पर्यंतची ठेवीची रक्कम खातेदारास डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन परत करते 
  • १९९३ मध्ये रिझर्व्ह बँकेने नवीन खाजगी बँक स्थापन्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहिर केली 
  • रिझर्व्ह बँकेने निर्यात व्यापारातील पतपुरवठा योजना २३ मार्च १९७३ ला सुरु केली 
  • रिझर्व्ह बँकेने सर्वप्रथम हुंडी बाजार योजना १९५२ ला तर नवीन हुंडी बाजार योजना १ नोव्हेंबर १९७० ला सुरु केली 
  • रिझर्व्ह बँकेच्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर - के. जे. उद्देशी 
  • कुमकुवत व प्राधान्य क्षेत्रातील व्यक्तींना व्याजाची सवलतीचा दर रिझर्व्ह बँक ठरविते 
  • रिझर्व्ह बँकेने शेती क्षेत्रास पतपुरवठा करण्यासाठी १९५६ ला 'नॅशनल अग्रिकल्चरल क्रेडिट फंड' स्थापन केले तर १९६३ ला 'शतकी पुनर्वित्त महामंडळ' स्थापन केले

No comments:

Post a Comment