Wednesday 5 February 2014

केंद्राची मातृ आणि शिशु ट्रैकिंग सुविधा

केंद्रीय आरोग्य आणि समाज कल्याण मंत्रालयाने ३१ जानेवारी २०१४ रोजी नवी दिल्ली येथे आपल्या राष्ट्रीय आरोग्य आणि समाज कल्याण संस्थानामध्ये मातृ आणि शिशु ट्रैकिंग सुविधेचे उद्घाटन केले. मातृ आणि शिशु ट्रैकिंग सुविधा डिसेंबर २००९ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत सुरु करण्यात आली आहे
मातृ आणि शिशु ट्रैकिंगच्या विशेष सुविधा:
  • मातृ आणि शिशु ट्रैकिंग योजना ही वेबवर आधारित सुविधा आहे जी गर्भवती महिला आणि ० ते ५ वयोगटातील मुले यांची माहिती जमा करेल आणि त्याना पुरविल्या जाणार्या सोयी-सुविधांनां  ट्रैक करेल 
  • ह्या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे गर्भवती महिलेला प्रसूतिपूर्व त्याचप्रमाणे प्रसूतिनंतर उच्च गुणवत्तेसह  व पूर्ण देखभाल दिली जावी आणि प्रत्येक लहान मुलाला लसिकरणाची प्रत्येक लस मिळेल याची खात्री करने 
  • आई आणि बालक ह्याचा देखरेखीशिवाय ह्या योजनेअंतर्गत आशा कर्मचारी, एएनएम् कर्मचारी त्याचप्रमाणे स्वत:च्या माता-पित्यासोबत गर्भवती महिला फोनवरती बोलू शकतात 
  • ह्या सेवेअंतर्गत लाभार्थ्याना मिळणारया सोयी-सुविधा त्याचप्रमाणे योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्व राज्यातून माहिती गोळा केली जाईल 
  • लाभार्थ्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे सरकारकडून मिळणारया अनेक योजनांबाबत माहिती दिली जाईल 
  • सुविधा केन्द्रावरती ८० हेल्प डेस्क एजेंट असतील जे सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० पर्यन्त काम करातील 
  • लाभार्थ्यांना त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचार्यांना आरोग्य विषयक समस्यांवरती उपाय-योजना सांगण्याकरिता मोफत कॉल सुविधा सुरु केली आहे  
इतर सुविधा:
  • गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योेजनेचा लाभ मिळेल 
  • गर्भाव्यस्था किंवा बाळाच्या वयानुसार लाभार्थ्यांना फोन कॉल किंवा टेक्स्ट संदेशाच्या माध्यमातून योग्य ती माहिती दिली जाईल 
  • आशा कर्मचार्यांचा पगार हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल आणि नियमितरित्या भेटेल याची खात्री केली जाईल 
  • गरजेनुसार आशा कर्मचार्यांना इंटरअक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्सच्या माध्यमातून ट्रेंनिंग दिली जाईल 

No comments:

Post a Comment