Wednesday 5 February 2014

चालू घडामोडी

५६ वे ग्रैमी पुरस्कार २०१४ ची घोषणा:

अमेरिकेच्या रिकॉर्डिंग अकादमीने २६ जानेवारी २०१४ रोजी ५६ व्या ग्रैमी पुरस्कार २०१४ ची घोषणा केली. ग्रैमी पुरस्कार हे दरवर्षी फ़क्त संगीत क्षेत्रामध्ये काम करणार्या कलाकारांना प्रदान केला जातो, या वर्षीचे ग्रैमी पुरस्कार खलीलप्रमाणे:
  • अल्बम ऑफ़ दी ईयर - ड्राफ्ट पंक याचा - रैंडम असेस मेमरीस 
  • रेकॉर्ड ऑफ़ दी ईयर - ड्राफ्ट पंक, निल रॉजर्स यांचे - गेट लकी 
  • नविन कलाकार - रेयन लेविस 
  • सॉँग ऑफ़ दी ईयर - लॉर्ड याचे - रॉयल्स 
  • लहान मुलांचा अल्बम - जेनिफर गोसाई हिचा - थ्रो पेनी इन दी विशिंग वेल 
  • पॉप सोलो परफॉर्मन्स - लॉर्ड याचे - रॉयल्स
ग्रैमी पुरस्काराबाबत थोड़े: 
  • ग्रैमी पुरस्कारांना ग्रैमोफोन पुरस्कार असेदेखील म्हटले जाते 
  • ग्रैमी पुरस्कार हे संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार आहेत, हे पुरस्कार अमेरिकेच्या रेकॉर्डिंग अकादमीतर्फे दरवर्षी दिले जातात 
  • रिकॉर्डिंग अकादमी ही 'नॅशनल एकाडमी ऑफ़ रिकॉर्डिंग आर्ट्स एंड सायन्सेस' या नावाने ओळखली जाते 
  • ही अकादमी १९५७ ला अमेरिकेमध्ये स्थापन केली गेली 
  • पहिला ग्रामी पुरस्कार सोहळा ४ मे १९५९ ला लॉस एंजल्स मध्ये झाला 
  • २०१३ पर्यंत केवळ ४ भारतीयांना ग्रामी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे 
  • १९६७ साली सितार वादक पंडित रवी शंकर हे ग्रामी पुरस्कार प्राप्त करणारे पाहिले भारतीय संगीतकार होते, त्यांना १९७२ त्याचप्रमाणे २००१ या वर्षी देखील ग्रामी पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे 
  • १९९४ मध्ये वीणावादक विश्वमोहन भट्ट आणि गिटार गुरु री कोदर यांना संयुक्तपणे ग्रामी पुरस्काराने सन्मानित केले गेले 
  • वर्ष २०१० मध्ये भारतीय संगीतकार ए आर रेहमान याला ग्रामी पुरस्काराने सन्मानित केले गेले 

No comments:

Post a Comment