Sunday 27 October 2013

भारतातील अवजड उद्योग भाग १

लोह - पोलाद उद्योग:
  • अवजड उद्योगामूले याचे स्थानिकीकरण कोळसा क्षेत्राजवळच होते 
  • १८७० - भारतातील पहिला आधुनिक लोह - पोलाद कारखाना पश्चिम बंगालमधील कुल्टी येथे सुरु झाला 
  • १९०७ - खासगी क्षेत्रातील सर्वात मोठा लोह - पोलाद उद्योग जमशेदपुर येथे सुरु करण्यात आला 
  • १९१९ - बर्नपुर (पश्चिम बंगाल) येथे इंडियन आयर्न एंड स्टील कंपनीचा प्रकल्प 
  • १९२३ - भद्रावती (कर्नाटक) येथे विश्वेश्वेरैय्या आयर्न एंड स्टील कंपनी हा सार्वजानिक क्षेत्रातील पहिला लोह - पोलाद प्रकल्प
  • विस्तार - पश्चिम बंगाल, झारखण्ड, कर्नाटक, ओड़िसा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू
  • दुसर्या पंचवार्षिक योजनाकाळात (१९५६-६१) महालनोबिस प्रतिमानानुसार पायाभूत उद्योगांच्या निर्मितीस प्राधान्य देण्यास आले, त्यानुसार
  • रुरकेला (ओड़िसा), भिलाई (छत्तीसगड), दुर्गापुर (पश्चिम बंगाल) हे प्रकल्प हाती घेण्यात आले
  • तर बोकारो (झारखण्ड) हा प्रकल्प तिसर्या योजनाकाळात हाती घेण्यात आला 
  • याशिवाय, आंध्र प्रदेशात विशाखापट्टनम, चेन्नई व सालेम (तामिळनाडू), मुम्बई, ठाणे, चंद्रपुर (महाराष्ट्र) या लोह-पोलाद प्रकल्पांचे कार्य आठव्या योजनेदरम्यान हाती घेण्यात आले
सिमेंट उद्योग:
  • बांधकाम उद्योगात प्रामुख्याने वापरल्या जाणार्या सिमेंटमध्ये चूनखड़ी, चिकनमाती, जिप्सम व कोळसा या कच्च्या मालाची आवश्यकता असते 
  • या कच्च्या मालाच्या क्षेत्रातच सिमेंट उद्योग एकटवलेले आहेत 
  • १९०४ - या वर्षी भारतात चेन्नई येथे पहिला सिमेंट कारखाना सुरु झाला 
  • विस्तार - तामिळनाडू, झारखण्ड, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश राज्यात 
  • सिमेंट उत्पादनात भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे 
  • देशात चार ठिकाणी सिमेंट उद्योगातील कर्मचार्यासाठी प्रक्षिक्षण केंद्र कार्यरत आहेत 
  • देशात सिमेंट उत्पादनात अग्रेसर राज्य - झारखण्ड

Thursday 24 October 2013

भारत संकीर्ण घडामोडी

या भागात आपण भारताविषयी संकीर्ण घडामोडी पाहणार आहोत
  • भारत स्वतंत्र झाला - १५ ऑगस्ट १९४७ 
  • भारत प्रजक्सत्तक बनला - २६ जानेवारी १९५० 
  • भारतीय घटना समितीचे पाहिले अधिवेशन - ९ डिसेंबर १९४६ (दिल्ली)
  • भारतीय घटना समितीचे हंगामी अध्यक्ष - अच्चिदानंद सिन्हा (९ ते ११ डिसेंबर १९४६)
  • भारतीय घटना समितीचे अध्यक्ष - डॉ. राजेंद्र प्रसाद 
  • घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • घटना समितीचे सल्लागार - बी. एन. राव 
  • घटना समितीचे एकुण कामकाज - २ वर्षे ११ महीने १६ दिवस (प्रत्यक्ष कामकाज - १६५ दिवस)
  • घटना समितीने घटना समान्त केली - २६ नोव्हेंबर १९४९ 
  • भारतीय राज्यघटना अमलत आली - २६ जनेवती १९५० 
  • घटनेनुसार भारताचे वर्णन - सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य
  • भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या भाषा - २२ 
  • राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष - फजल अली (१९५३)
  • राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य - पन्निकर, कुंझारू
  • भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले देशातील पाहिले राज्य - आंध्रप्रदेश (१ ओक्टोम्बर १९५३)
  • राज्यघटनेतील परिशिष्टांची संख्या - १२ 
  • राज्यघटनेतील प्रकाराने - २४ 
  • घटनेतील मुलभुत अधिकारांची संख्या - ६ (भाग ३)
  • घटनेतील मुलभुत कर्तव्यांची संख्या - ११ (भाग ४ अ)

Sunday 20 October 2013

भारत गौरवचिन्हे

भारत १५ ऑगस्ट १९४७ ल स्वतंत्र्य झाला पण भारताला परक्रमांची खुप मोठी परंपरा आहे, त्यापैकीच एक म्हणजे भारतीय गौरवचिन्हे ती पुढीलप्रमाणे

भारतीय राष्ट्रगीत:
  • राष्ट्रगीत - जन गन मन (मुळ गीत ५ कडव्यांचे पण प्रथम कडव्यास राष्ट्रगीत म्हणुन मान्यता)
  • रचना - रविंद्रनाथ टागोर 
  • प्रथम गायन - २७ डिसेंबर १९११ (कोलकाता अधिवेशन)
  • राष्ट्रगीतास घटना समितीची मान्यता - २४ जानेवारी १९५०
  • गायनाचा कालावधी - ५२ सेकंद
भारतीय गीत:
  • वन्दे मातरम 
  • निवड - बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतून 
  • प्रथम गायन - १८९६ चे कोलकाता अधिवेशन
राष्ट्रचिन्ह व त्याचे स्वरुप:
  • राष्ट्रचिन्हाची निवड - सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरुन 
  • मान्यता - २६ जानेवारी १९५० 
  • स्वरुप - सिंह, बैल व घोडा या प्राण्यांची प्रतीकात्मक चिन्हे 
  • चार सिंहापैकी तीन दर्शनी बाजुस व एक पाठीमागे 
  • राष्ट्रचिन्हाच्या तळभागाकडे उजव्या बाजुस घोडा तर डाव्या बाजुस बैल असे धर्मचक्र आहे 
  • राष्ट्रचिन्हाच्याखाली सत्यमेव जयते हा संदेश आहे 
भारतीय राष्ट्रध्वज:
  • घटना समितीने राष्ट्रध्वजास मान्यता दिली २२ जुलै १९४७ 
  • स्वरुप - तिरंगा 
  • सर्वात वर केशरी, मध्ये पांढरा तर सर्वात खाली हिरव्या रंगाचा पट्टा 
  • मध्यभागी सफ़ेद पट्ट्यावर निळसर रंगाचे अशोक चक्र 
  • हे चक्र सारनाथ येथील स्तंभावरून निवडले असून त्यास २४ आरे आहेत 
  • राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे गुणोत्तर - २:३ 
राष्ट्रीय दिनदर्शिका:
  • मान्यता - २२ मार्च १९५७ 
  • वैशिष्ट्य - शके कालगनेनुसार नव वर्षाची सुरुवात - चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढी पाढ़वा)
  • या दिनदर्शिकेनुसार वर्षाचे ३६५ दिवस असतात 
  • राष्ट्रीय प्राणी - वाघ तर राष्ट्रीय पक्षी - मोर
  • राष्ट्रीय फळ - आंबा तर राष्ट्रीय फुल - कमळ
  • राष्ट्रीय नदी - गंगा तर राष्ट्रीय जलचर - डॉल्फिन 
  • राष्ट्रीय लिपी - देवनागरी तर राष्ट्रीय भाषा - हिंदी

Thursday 17 October 2013

वनस्पती शास्त्र

वनस्पतीच्या प्रत्येक भागाचा अभ्यास करणे म्हणजेच वनस्पती शास्त्र होय

वनस्पती शास्त्राचे अभ्यासानुसार भाग पडतात ते पुढीलप्रमाणे:
  • रुपिकी (मोर्फोलोजी) - सजीवांच्या बाह्य रचनेच्या अभ्यासाचे शास्त्र
  • शरीर (एनातोमी) - सजीवांच्या अंतररचनेच्या अभ्यासाचे शास्त्र
  • शरीरक्रिया शास्त्र (फ़िजिओलोजी) - सजीवांच्या विविध जीवनक्रियांचा अभ्यास
  • टाक्सानोमी - सजीवांचे वर्गीकरण 
  • परीस्थीतीकी (एकॉलोजी) - पर्यावरण व सजीव यांचा परस्पर संबंधाचा अभ्यास
सजीवांची लक्षणे:
  • स्वयंप्रेरणेने हालचाल हे सजीवांचे मुख्य लक्षण आहे 
  • वनस्पती अवयवांची हालचाल करू शकतात उदा. लाजालूचे झाड
  • पर्यावरणातील  कोणत्याही बदलास प्रतिसाद देण्याची सजीवांची क्षमता म्हणजे चेतना क्षमता
  • पेशी हा सर्व सजीवांचा मुलभुत घटक आहे
एकपेशीय सजीव - जिवाणू, शैवालांचे काही प्रकार, अमीबा, परमेशियम
बहूपेशीय सजीव - धोतरा, सूर्यफूल, साप, घोडा
चयापचय क्रिया - सजिवांच्या शरीरातील विविध प्रक्रिया
चय - जिवद्रव्यात वाढ होण्याची क्रिया उदा. पेशींची वाढ 
पचय - या क्रियेत जिवद्रव्यातील घटक वापरले जातात, म्हणून ती विघटनाची क्रिया आहे 

चयापचय क्रियेट पुढील क्रियांचा समावेश होतो:
  • पोषण - या क्रियेत अन्नाचे जिवद्रव्याच्या घटकांत रूपांतर होते 
  • वृद्धि - सजीवांच्या आकार व आकारमानातील वाढ
  • श्वसन - या क्रियेत उर्जा निर्माण होते 
  • उस्तर्जन - शरीरातील टाकाऊ द्रव्ये बाहेर टाकण्याची क्रिया
  • अनुकूलन - पर्यावरणातील बदलांशी जुळवुण घेण्याचे सजिवांचे लक्षण 
  • प्रजनन व मुर्त्यु

Sunday 13 October 2013

महाराष्ट्रातील प्रमुख शहरे भाग - २

मागील भागात आपण महाराष्ट्राची राजधानी, उपराजधानी त्याचप्रमाणे ऐतिहासिक शहरे पहिली, या भागात राज्यातील इतर प्रमुख शहरे

राज्यातील इतर प्रमुख शहरे:
१ - नांदेड
  • प्रमुख नदी - गोदावरी 
  • शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांची समाधी
  • प्रसिद्ध गुरुद्वारा २००९ मध्ये गुरु-त-गद्दी हा शीख बाधवांचा त्रिशताब्दी सोहळा संपन्न
२ - कोल्हापूर
  • प्रमुख नदी - पंचगंगा 
  • महालक्ष्मी प्राचीन मंदिर, गुळाची मोठी बाजारपेठ
  • ऐतिहासिक राजधानी, चित्रनगरी, रंकाळा तलाव, पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण
  • खासबाग हा कुस्ती आखाडा, शिवाजी उद्याम्गर हे प्रमुख औद्योगिक केंद्र
  • शिवाजी विद्यापीठ
३ - पंढरपूर
  • प्रमुख नदी - भीमा (चंद्रभागा)
  • पमुख तीर्थक्षेत्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रखुमाई यांचे मंदिर
  • आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री यात्रेस देशभरातून लाखो वारकरी येथे दर्शनासाठी येतात
४ - तुळजापूर
  • प्रमुख नदी - नाही 
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत - भवानी मातेचे मंदिर 
६ - पैठण 
  • प्रमुख नदी - गोदावरी 
  • संत एकनाथांची समाधी, पैठण्या व शालू प्रसिद्ध, सातावाहानंची राजधानी
  • नाथसागर जलाशयातील पाणी वापरून संत ड्यानेश्वर उद्यानाची निर्मिती
७ - अहमदनगर 
  • प्रमुख नदी - नाही 
  • चंद बीबीचा महाल, दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक, ऐतिहासिक किल्ला 
  • ज्येष्ठ समाजसेवक अन्न हजारे यांचे आदर्श गाव 
८ - चंद्रपूर 
  • औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, बल्लारपूर कागद कारखाना
  • ताडोबा राष्ट्रीय उद्यान, माडिया गौंड हि आदिवासी जमात 

Sunday 6 October 2013

महाराष्ट्रातील प्रमुख शहरे भाग - १

महाराष्ट्र हे देशातील आकाराने तिसरे मोठे राज्य असून देशातील सर्वात औद्यीगिक व प्रगत राज्य आहे

राज्यातील काही प्रमुख शहरे पुढीलप्रमाणे :
१ - मुंबई:
  • प्रमुख नदी - नाही
  • मुंबई ही राज्यची राजधानी आहे तर देशाची आर्थिक राजधानी असून पश्चिम किअन्रवरिल महत्त्वाचे अंतरराष्ट्रीय बंदर आहे
  • मुंबई हे कापड गिरण्याचे केंद्र आहे त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठ, मुंबई उच्च न्यायालय, तुर्भे तेल शुद्धीकरण केंद्र
  • सात बेटांचे शहर म्हणून प्रसिद्ध, ऑगस्ट क्रांती मैदान, सनजत गांधी राष्ट्रीय उद्यान, हंगिग गार्डन, राणीचा बाग, तारापोरवाला मत्स्यालय इत्यादी प्रेक्षकीय  ठिकाणे
  • गेट वे ऑफ इंडिया भारताचे प्रवेशद्वार त्याचप्रमाणे देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर
२ - पुणे:
  • प्रमुख नद्या - मुळा व मुठा 
  • विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक केंद्र, पेशव्यांची राजधानी
  • बालभारती, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, वेधशाळा, भोसरी, आकुर्डी, खडकी, पिंपरी-चिंचवड येथे औद्योगिक वसाहती
  • शनिवार वाडा, राजा केळकर संग्रहालय, सारसबाग, पर्वती, खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी
  • फिल्म व टेलीविजन संस्था, कात्रज सर्पोद्यान, बालेवाडी क्रीडा संकुल,
  • जवळच आळंदी येथे संत ड्यानेश्वर तर देहू येथे सनात तुकारामांची समाधी 
३ - नागपूर
  • प्रमुख नदी - नाग
  • महाराष्ट्राची उप-राजधानी, राज्य विधीमंडळाची हिवाळी अधिवेशनाचे स्थळ, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ
  • देशातील सर्वात मोठी संत्र्याची बाजारपेठ, सीताबर्डी किल्ला, कापड गिरण्या, हातमागाचे केंद्र, रामटेक येथे श्री रामांचे मंदिर
  • देशाच्या मध्यस्थानी असल्यामुळे लोहमार्गाचे प्रमुख ठिकाण, रामटेक येथे कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ
  • खापरखेडा व कोरडी औष्णिक वीज केंद्रे, आंबेडकर यांनी बौद्ध धर्म येथेच स्वीकारला
४ - वर्धा
  • प्रमुख नदी - धाम 
  • सेवाग्राम येथे गांधीजींचा आश्रम तर पवनार येथे आचार्य विनोबा भावेंचा परमधाम आश्रम 
  • राष्ट्रभाषा प्रचार समितीचे केंद्र, हिंदी विश्वविद्यालय
५ - नाशिक 
  • प्रमुख नदी - गोदावरी 
  • सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण, चाळणी नोटा व तिकिटे छापणारी सिक्युरिटी प्रेस
  • ओझर येथे मिग विमानाचा कारखाना, गंगापूर येथे पहिले मातीचे धरण, द्राक्षे उत्पादन, एकलहरे येथे औष्णिक वीज केंद्र
६ - औरंगाबाद
  • प्रमुख नदी - नाही 
  • ५२ दरवाजांचे शहर, बिबीका मकबरा, पाणचक्की हि प्रेक्षणीय स्थळे, अजिंठा-वेरूळ लेणी, दौलताबाद किल्ला हिमरू शालू त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ
  • २०१० मध्ये नहार-ए-अंबरी या ऐतिहासिक पाणीयोजनेस राष्ट्रीय वारसा म्हणून मंजुरी
  • महाराष्ट्राची पर्यटन राजधानी
७ - अमरावती 
  • प्रमुख नदी - नाही 
  • गाडगे बाबांची समाधी, प्रसिद्ध हनुमान आखाडा, कुष्ठ रोग्यांसाठी शिवाजीराव पटवर्धन यांचे तपोवन
  • कापसाची मोठी बाजारपेठ, मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी

Friday 4 October 2013

महारष्ट्र सागरी व विमान वाहतूक

महाराष्ट्राला ७२० किमी चा सागरी किनारा लाभला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद हि ४ अंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत

महाराष्ट सागरी वाहतूक:
  • राज्याला ७२० किमीचा लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे
  • राज्याच्या सागरी किनारच्या उत्तरेला डहाणूपासून दक्षिणीकडे तेरेखोलच्या खाडीपर्यंत पाशीं किनार्यावर ४८ छोटी बंदरे आहेत
  • मुंबई व न्हावाशेवा ही राज्यातील मोठी बंदरे आहेत
  • मुंबई राज्यातील त्याचप्रमाणे देशातील प्रमुख अंतरराष्ट्रीय बंदर आहे
  • मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी मुंबईपासून ५० किमी अंतरावर न्हावाशेवा येथे कृत्रिम बंदर तयार करण्यात आले आहे
  • न्हावाशेवा तयार कण्यात आलेले बंदर म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे भारतातील सर्वात मोठे कंन्तेणार वाहतूक कारणाते बंदर आहे
  • याखेरीज राज्यात डहाणू, धरमतर, रत्नागिरी, मालवण, सातपाटी, रेडी, देवगड, दाभोळ, जयगड, आचरे, अंजनवेल, आलेवाडी, वर्सोवा इत्यादी अन्य बंदरे आहेत
महाराष्ट्र विमान वाहतूक:
  • राज्यातील प्रमुख अंतरराष्ट्रीय विमानतळ - छत्रपती शिवाजी अंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार विमानतळ - मुंबई
  • सांताक्रूझ हे देशांअंतर्गत वाहतुकीसाठी विमानतळ आहे
  • याशिवाय लोहगाव पुणे, सोनगाव - नागपूर ही अंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत
  • नोवेंबर २०१० मध्ये नवी मुंबईसाठी स्वतंत्र अंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा करण्यात आली असून २२ नोवेंबर २०१० रोजी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे