Sunday 27 April 2014

टाइम ने प्रसिद्ध केली १०० प्रभावशाली लोकांची यादी

अमेरिकेच्या टाइम पत्रकाने २४ एप्रिल २०१४ ला जगातील १००  प्रभावशाली लोकांची यादी प्रसिद्ध केली. टाइम ने ही यादी कोणतीही क्रमवारी जाहिर न करता प्रसिद्ध केली आहे. ह्या यादीमध्ये चार भारतीयांचाही समावेश आहे.
ह्या वार्षिक यादीमध्ये अमेरिकेची राष्ट्रपती बराक ओबामा, चीनचे राष्ट्रपती ज़ी जिंगपिंग, ग्रेमी पुरस्कार विजेती कलाकार बियोन्स, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी, हिलेरी क्लिंटन, पोप फ्रांसिस, राशियाचे राष्ट्रपती वल्दीमीर पुतिन, जपानचे प्रधानमंत्री शिंजो एबे आणि पाकिस्तानची शैक्षणिक कार्यकर्त्ता मलाला यूसुफजई हे समाविष्ट आहेत

यादीमध्ये समाविष्ट असणारे चार भारतीय
  • भाजपचे पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार नरेंद्र मोदी
  • आम आदमी पार्टीचे नेता अरविंद केजरीवाल 
  • लेखिका अरुंधती राय
  • कोयंबटूरच्या स्वास्थ कार्यकर्ता अरुणाचल मुरुगणनाथम
टाइम ने मोदींना जगातील सर्वात मोठया प्रजाकसत्ताक देशाचे नेत्तृत्व करणारा राजनेता म्हटले आहे तर अरविंद केजरीवाल यांना भारतीय राजकारणातील एक प्रभावी व्यक्ती म्हटले आहे जो आधुनिक भारतीय राजकारणाच्या विरुद्ध आहे
अरुणाचल मुरुगणनाथम यांना स्वास्थ संशोधान सांगितले आहे ज्याने आपल्या पत्नीला मदत करण्यासाठी कमी खर्च करून सेनिटरी पैड बनवणारी मशीन शोधून काढली
अरुंधती राय ह्या उपन्यासकार असून त्यांना भारतीय साहित्याच्या आत्म्याच्या रुपात सांगितले आहे

Sunday 20 April 2014

नासाच्या शास्त्राज्ञांनी केपलर १८६ एफ नामक ग्रह शोधला

कोणी: नासाच्या शास्त्राज्ञांनी
काय: केपलर १८६ एफ नामक ग्रह

अमेरिकेची अंतरिक्ष एजेंसी नासा (National Aeronautics and Space Administration) च्या शास्त्राज्ञांनी अवकाशामध्ये केपलर १८६ एफ नामक ग्रह शोधला आहे. शास्त्राज्ञांनी ह्या ग्रहाचा शोध 'केपलर स्पेस टेलिस्कोप' च्या माध्यमातून केली आहे. हा ग्रह पृथ्वीच्या आकाराचा असून पृथ्वीपासून ५०० प्रकाश वर्ष दूर स्थित आहे. शास्त्राज्ञांच्या मते ह्या ग्रहावर पाणी असण्याची शक्यता आहे
नासाच्या मते हा गृह पृथ्वीप्रमाणेच आपल्या सूर्यमालेतील सूर्याला गोलाकार परिक्रमा करतो

नासा (National Aeronautics and Space Administration):
ही संयुक्त राष्ट्र अमेरिकेची अंतरिक्ष एजेंसी आहे जी देशांतर्गत सार्वजनिक अंतरिक्ष कार्यक्रम आणि एरोनॉटिक्स आणि एरोस्पेस संशोधनासाठी जिम्मेदार आहे
नासाची स्थापना १९ जुलाई १९५८ मध्ये करण्यात आली. १ ऑक्टोम्बर १९५८ पासून नासाने कार्य करण्यास  केली.  नासाचे मुख्यालय वाशिंगटन डीसी मध्ये आहे. 

Thursday 17 April 2014

प्रश्नमलिका

१) श्रीलंकेमधील 'लंका ऑइल' या कंपनीने २०११ मध्ये तेथील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी होण्याचा मान मिळवला, ही कंपनी कोणाची आहे?
उत्तर - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन
२) बॉम्बे नैचरल सोसायटीच्या सध्या अध्यक्षपदी कोण आहेत?
उत्तर - होमी खुस्रोखां
३) दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टा किती लांबीचा आहे आणि तो किती राज्यातून जातो?
उत्तर - १४८३ किमी असून ६ राज्यातून जातो
४) राही सरनोबत ही महाराष्ट्रीयन महिला खेळाडू कोणत्या क्रीड़ा प्रकाराशी संबंधित आहे?
उत्तर - नेमबाजी २५ किमी

५) रसायनशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर - जॉन्स जैकब बझरेलियन
६) जगामध्ये सर्वाधिक मैंगनीज उत्पादन करणारा देश कोणता?
उत्तर - चीन (५५%)
७) रायपुर, नागपुर, संभलपुर व मलकापुर ह्या महत्वाच्या शहरातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
उत्तर - राष्ट्रिय महामार्ग ६ (हाजिरा-कोलकाता)
८) भारताच्या एकूण राष्ट्रिय उत्पादनापैकी सर्वाधिक वाटा कोणत्या राज्याचा आहे?
उत्तर - महाराष्ट्र

९) अमेरिकेतील इंडियाना राज्यात मुख्यालय असलेल्या व जगातील सर्वात मोठ्या डिझेल इंजिन उत्पादन करणाऱ्या कंपनीचे नाव काय?
उत्तर - कुमिन्स
१०) 'श्रमिक एक्सप्रेस' कोणत्या डॉन रेल्वे स्थानकादरम्यान धावते?
उत्तर - वलसाड-सोनपुर
११) महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी हाच जिल्हादंडाधिकारी म्हणून कार्य पार पडेल अशी कोणत्या कायद्याअंतर्गत तरतूद आहे?
उत्तर - मुंबई पोलिस कायदा - १९५५
१२) बिनविरोध निवडून आलेले भारताचे पाहिले व शेवटचे राष्ट्रपती कोण?
उत्तर - नीलम संजीव रेड्डी 

Sunday 13 April 2014

चालू घडामोडी

गीतकार जुलजार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर:
१२ एप्रिल २०१४ रोजी गीतकार गुलजार यांना भारतीय सिनेमामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित करण्यात आला आहे
गुलजार हे दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकणारे ४५ वे व्यक्ति आहेत. याअगोदर गुलजार यांना कला क्षेत्रामध्ये दिलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी २००४ साली पद्मभूषण आणि २००२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. 'मौसम' 'माचिस' आणि 'अंगूर' या हिंदी चित्रपटांच्या निर्देशनसाठी त्यांना राष्ट्रिय पुरस्कार मिळाला आहे. २००९ मध्ये 'स्लमडॉग मिलियनएअर' चित्रपटामधील 'जय हो' ह्या गाण्यासाठी गुलजार यांना सर्वश्रेष्ठ मौलिक गीत लेखनाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे

भारतीय महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न CPSEs

CPSE - Central Public Sector Enterprises

महारत्न CPSEs
  • भारत हेव्ही इलेट्रीकल्स लिमिटेड 
  • कोल इंडिया लिमिटेड 
  • गैल इंडिया लिमिटेड 
  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 
  • नैशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड
  • ऑइल एंड नॅचुरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड
  • स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
नवरत्न CPSEs
  • भारत इलेट्रोनिक्स लिमिटेड 
  • भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड 
  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 
  • हिंदुस्तान पेट्रिलियम कॉर्पोरेशन लिमिटेड 
  • महानगर टेलेफोन निगम लिमिटेड 
  • नैशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड 
  • नैशनल मिनेरल डेवलपमेंट कॉर्पोरेशन 
  • नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड 
  • ऑइल इंडिया लिमिटेड 
  • पॉवर फायनांस कॉर्पोरेशन लिमिटेड 
  • पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 
  • राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड 
  • रूरल इलेक्ट्रीफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड 
  • शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
मिनीरत्न वर्ग १ - महत्वाच्या CPSEs
  •  एयरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ़ इंडिया 
  • बाल्मर लौरी एंड कंपनी लिमिटेड 
  • भारत संचार निगम लिमिटेड 
  • सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन 
  • कोचीन शिपयार्ड्स लिमिटेड 
  • एन्नोर पोर्ट लिमिटेड 
  • गोवा शिपयार्ड्स लिमिटेड 
  • हिंदुस्तान कॉपर लिमिटेड 
  • हिंदुस्तान पेपर कॉर्पोरेशन लिमिटेड 
  • इंडियन टूरिज़म कैटरिंग एंड टूरिजम कॉर्पोरेशन लिमिटेड 
  • माझगाव डॉक लिमिटेड 
  • नैशनल फर्टीलाइजर्स लिमिटेड 
  • नैशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड 
  • ONGC विदेश लिमिटेड 
  • पवन हंस हेलिकॉपटर लिमिटेड 
  • स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ़ इण्डिया लिमिटेड 
मिनिरत्न वर्ग २ - CPSEs
  • भारत पंप्स एंड कप्रेसर्स लिमिटेड 
  • HMT (अंतरराष्ट्रीय) लिमिटेड 
  • HSCC (इंडिया)लिमिटेड 

Sunday 6 April 2014

नचिकेत मोर समिती

कोणी स्थापन केली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने
कशासाठी - वित्तीय सर्वसमावेशकता आणण्यासाठी
केव्हा - २३ सप्टेंबर २०१३

नचिकेत मोर - ICICI बँकेचे माजी कार्यकारी संचालक
शिफारसी -
  1. 'क्लास बँकिंग'ला पर्याय देणारा 'मास बँकिंग'चा प्रयोग म्हणून अत्यल्प उत्पन्न असलेली कुटुंबे व लघुत्तम व्यावसायिकांसाठी विशेष बँकेच्या रचनेची शिफारस
  2. कमाल रु. ५०,०००/- रुपये खात्यात शिल्लक असेल अशा आर्थिक वर्गासाठी ठेव व कर्ज सोयी देणाऱ्या विशेष बँका असाव्यात
  3. 'होलसेल बँका' अशीही एक बँकांची वर्गवारी केली जावी, जेणेकरून निन्म आर्थिक स्तरासाठी वाहिलेल्या विशेष बँकासाठीचा निधीचा स्त्रोत खुला होईल
  4. लक्षणीय म्हणजे प्राधान्यक्रमाने कर्ज वितरण म्हणजे शेतकरी, लघुउद्योजक, निर्यातदार, ग्रामीण व वंचित घटकांना बँकांनी त्यांच्या एकूण वितरीत कर्जाच्या ५०% पूर्वीचे इतके कर्ज वितरीत केले जावे
  5. १ जानेवारी २०१६ पर्यंत १८ वर्षाच्या पुढे वय असलेल्या प्रत्येकाकडे स्वतंत्र, पूर्ण सेवा असलेले सुरक्षित इलेक्ट्रोनिक बँक खाते असले पाहिजे
  6. देशातील कोणत्याही भागात प्रत्येकाला १५ मिनिटे चालण्याचा अंतरावर पैसे काढण्याची, भरण्याची व बिले भरण्याची सोय असली पाहिजे
  7. अल्प उत्पन्न कुटुंबांसाठी 'पेमेंट बँक' हवी, अशी बँक सुरु करण्यासाठी किमान ५० कोटी भांडवल आवश्यक
  8. कृषी कर्जावरील व्याजमाफीची पद्धत बंद करून ते शेतकऱ्यांपर्यंत फायदे पोहचवले पाहिजेत
  9. आधारकार्ड असल्यावर बँकेत खाते लगेच उघडले गेले पाहिजे
  10. ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीत वित्तीय निवारण संस्था असावी

Friday 4 April 2014

भारतातील १५ लोकसभा निवडणुका आणि राज्यकर्ते

भारत स्वतंत्र झाल्यापासून भारतामध्ये १५ वेळा लोकसभा निवडणुका झाल्या त्यापैकी १० वेळा कॉंग्रेस ही राज्यकर्ता पक्ष होता.

१) पहिल्या लोकसभा निवडणुका, १९५१ - देशातील पहिल्या लोकसभा निवडणुका १९५१ मध्ये झाल्या. त्यामध्ये कॉंग्रेसने ४८९ पैकी ३६४ जागांवर विजय मिळविला. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. कॉंग्रेसला निवडणुकांमध्ये ४४.९% मते मिळाली
२) दुसऱ्या लोकसभा निवडणुका, १९५७ - देशातील दुसऱ्या लोकसभा निवडणुका १९५७ मध्ये झाल्या, त्यामध्ये नेहरूंनी दुसर्यांदा विजय मिळविला. कॉंग्रेसला ४९४ पैकी ३७१ जागांवर विजय मिळाला. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला ४७.७८% मते मिळाली. 
३) तिसऱ्या लोकसभा निवडणुका, १९६२ - देशातील तिसऱ्या लोकसभा निवडणुका १९६२ मध्ये झाल्या. त्यामध्ये कॉंग्रेसला ४९४ पैकी ३६१ जागांवर विजय मिळविला. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला ४४.७२% मते मिळाली
४) चौथ्या लोकसभा निवडणुका, १९६७ - पंडित नेहरूचे निधन झाल्यावर देशामध्ये इंदिरा गांधी रूल सुरु झाला. देशातील चौथ्या लोकसभा निवडणुका १९६७ मध्ये झाल्या. ज्यामध्ये कॉंग्रेसने पुन्हा एकदा निवडणुका जिंकल्या आणि इंदिरा गांधी देशातील पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. १९६७ मध्ये काँग्रसने ५२० जागांपैकी २३८ जागांवर विजय मिळविला. त्या निवडणुकांमध्ये ४०.७८% मते मिळाली. 
५) पाचव्या लोकसभा निवडणुका, १९७१ - भारतीय राजकारणातील पाचव्या लोकसभा निवडणुका १९७१ मध्ये झाल्या. या निवडणुकांमध्ये सलग पाचव्यांदा कॉंग्रेसने आपला विजय मिळविला. इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने ५१८ जागांपैकी ३५२ जागांवर विजय मिळविला. 

६) सहाव्या लोकसभा निवडणुका, १९७७ - देशातील सहाव्या लोकसभा निवडणुका १९७७ मध्ये झाल्या. सहाव्या लोकसभा निवडणुका भारतीय राजकारणामध्ये एक मोठा फेरबदल घेऊन आल्या. देशामध्ये पहिल्यांदा युती सरकार तयार झाले. त्यावेळी जनता पक्ष आणि जनता दल (सेक्युलर) ह्या दोन पक्षांनी मिळून हे युती सरकार तयार केले होते. मोरारजी देसाई हे ह्या युती सरकारचे पंतप्रधान निवडले गेले. देशातील पहिल्या युती सरकारने ५४२ जागांपैकी ३४५ जागांवर विजय नोंदविला आणि त्यांना ५१.८९% मते मिळाली. 
७) सातव्या लोकसभा निवडणुका - सातव्या लोकसभा निवडणुकामध्ये पुन्हा एक वेळ इंदिरा गांधींची लहर आली आणि त्यांनी जबरदस्त वापसी करत ५४२ जागांपैकी ३७४ जागांवर विजय मिळविला ज्यामध्ये कॉंग्रेसला ४२.६९% मत मिळाली.
८) आठव्या लोकसभा निवडणुका, १९८० - लोकसभेच्या आठव्या निवडणुका १९८० मध्ये झाल्या. ज्यामध्ये कॉंग्रेसने ५१५ जागांपैकी ४१६ जागांवर विजय मिळविला आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले. यादरम्यान कॉंग्रेसला ४९% मते मिळाली. 
९) नवव्या लोकसभा निवडणुका, १९८९ - नवव्या लोकसभेच्या निवडणुका १९८९ मध्ये पार पडल्या. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला हरवून नैशनल फ्रंट आणि जनता दल ह्यांनी मिळून युती सरकार स्थापन केले. आणि देशाला वीपी सिंह यांच्या हवाली केले. या निवडणुकांमध्ये युती सरकारला ५१.८९% मते मिळाली. 
१०) दहाव्या लोकसभा निवडुका, १९९१ - दहाव्या लोकसभा निवडणुका १९९१ मध्ये पार पडल्या. ह्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने पलटवार केला आणि पीव्ही नारासिम्हराव भारताचे नवीन पंतप्रधान झाले. यावेळी देशाने इंदिरा गांधींप्रमाणे राजीव गांधीना ही हरविले होते. कॉंग्रेसने या निवडणुकांमध्ये ५४५ पैकी २४४ जागांवर विजय मिळविला. कॉंग्रेसला या निवडणुकांमध्ये ३५% मत मिळाली.

११) अकराव्या लोकसभा निवडणुका, १९९६ - अकराव्या लोकसभेच्या निवडणुका १९९६ साली झाल्या.
१२) बाराव्या लोकसभा निवडणुका, १९९८ - लोकसभेच्या बाराव्या निवडणुका १९९८ मध्ये झाल्या आणि यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचं सरकार निवडून आलं. या निवडणुकांमध्ये भाजपला ५४५ जागांपैकी २५४ जागांवर विजय मिळाला. या निवडणुकांमध्ये एनडीएला ३७.२१% मते मिळाली.
१३) तेराव्या लोकसभा निवडणुका, १९९९ - लोकसभेच्या तेराव्या निवडणुका १९९९ मध्ये पार पडल्या, त्या निवडणुकांमध्ये भाजप आणि एनडीएचं सरकार निवडूक आलं. ह्यावेळी त्यांना ५४५ पैकी २७० जागांवर विजय मिळाला आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. सलग दुसऱ्या विजयामध्ये त्यांना ३७.०६% मते मिळाली.
१४) लोकसभेच्या चौदाव्या निवडणुका, २००४ - २००४ मध्ये लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, ज्यामध्ये कॉंग्रेस आणि युपीएने सरकार बनविले. ह्या सरकारला ३५.४०% मते मिळाली. कॉंग्रेस आणि युपिए सरकारने मिळून ५४३ पैकी २१८ जागांवर विजय मिळविला. यादरम्यान मनमोहन सिंह हे देशाचे पहिले शीख पंतप्रधान झाले.
१५) पंधराव्या लोकसभा निवडणुका, २००९ - लोकसभेच्या १५व्या निवडणुका २००९ साली झाल्या, पुन्हा एकवेळ कॉंग्रेस आणि मित्र पक्षांना ३७.२२% मते मिळाली आणि ५४३ जागांपैकी २६२ जागांवर विजय मिळाला. पुन्हा एकवेळ मनमोहन सिंह हे पंतप्रधान झाले.