Sunday 16 February 2014

समाजसेवक

स्वामी दयानंद सरस्वती
मूळनाव - मूलशंकर तिवारी
जन्म - २० सप्टेंबर १८२४ (टंकारा, गुजरात)
मृत्यु - ३० ऑक्टोंबर १८८३ (अजमेर, राजस्थान)

जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्ठी:
  • १८४५ - गृहत्याग करुन संन्यास स्वीकारला आणि देशभर भटकंती सुरु केली 
  • १८६०-६३ - मथुरेतील अंध साधू विरजानंद यांचे शिष्यत्व पत्कारुन तीन वर्षे हिंदू धर्माचा अभ्यास केला
  • केशवचंद्र सेन यांच्या सांगण्यावरून हिंदी भाषेतून धर्मप्रसार सुरु केला 
  • १० एप्रिल १८७५ - मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना 
  • १८७७ - लाहोर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन केली 
  • स्वामी दयानंदानी सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास साधनरया 'सत्यार्थप्रकाश' या ग्रंथांची रचना केली 
स्वामी दयानदांची सुधारणा कार्य:
  • देशात अनेक ठिकाणी 'संस्कृत पाठशाळांची' स्थापना 
  • लाहोर येथे पाश्चात्य शास्त्रे व संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी 'इंडियन अकॅडमी' ही संस्था स्थापन केली
  • गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणसंस्था स्थापन केल्या 
  • स्त्रिया व शुद्र यांना वेदाभ्यासाचा अधिकार दिला 
  • १८८३ - विषप्रयोगमुळे निधन 
  • स्वामी दयानदांच्या मृत्युसमयी आर्य समाजाच्या शंभराहून अधिक शाखा देशात स्थापन झाल्या होत्या
आर्य समाज:
  • वेद हेच हिंदूंचे खरे धर्मग्रंथ आहेत 
  • परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदांत असून वेदाध्ययन हे प्रत्येक हिन्दुमात्राचे कर्तव्य आहे 
  • वेद हा आर्यांचा पवित्र ग्रंथ असून सर्व आर्यांनी वेदप्रमाण्य मानले पाहिजे 
  • ईश्वर एकच असून तो निर्गुण, निराकार आहे 
  • चातुर्वर्ण्य हे जन्मसिद्ध नसून गुणकर्मावर आधिरित असावेत
  • 'वेदांकड़े चला' रूढ़ीबद्ध उपासनेच्या विळख्यातून हिंदू धर्माला वाचविण्यासाठी स्वामी दयानंदानी आपल्या धर्मबांधवांना वेदांकडे चला हा आदेश केला 
  • 'लढाऊ हिंदू धर्म' भगिनी निवेदिता यांनी 'लढाऊ हिंदू धर्म' या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा केली आहे 
आर्य समाजाच्या इतर सुधारणा:
  • आर्य समाजाचे कार्यकर्ते लाला हंसराज यांनी लाहोर येथे 'दयानंद एंग्लोवैदिक कॉलेज' स्थापन केले 
  • स्वामी श्रद्धानंद यांनी कांग्री येथे 'गुरुकुल' ही संस्था स्थापन केली 
  • परधर्मात गेलेल्या हिंदूना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची 'धर्मशुद्धीची' क्रांतिकारी चळवळ आर्य समजाने राबविली

No comments:

Post a Comment