Saturday 27 February 2016

रेल्वे बजेट २०१६-१७ मुख्य मुद्दे

गुरुवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सादर केलेला रेल्वे बजेट २०१६-१७ हा त्यांचा दूसरा तर मोदी सरकारचा दूसरा रेल्वे बजेट होता. त्यांनी नवीन चार ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली असून कोणत्याही प्रकारची भाडेवाढ केली नाही. प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी डब्ब्यांमध्ये सीसीसटीवी कॅमरा लावण्याचे संकेत दिले आहेत. अंत्योदय, तेजस, उदय, हमसफर ह्या नवीन ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे. हमसफर ही ४जी ची विशेष सेवा असणारी ट्रेन असून ही सेवा फक्त ३ एसी डब्ब्यांमध्येच असेल. तेजस ही १३० तासी वेगाने चालणारी ट्रेन असेल तर उदय ही रात्री धावणारी ट्रेन असेल. २०१६-१७ रेल्वे बजेट मधील प्रमुख मुद्दे:
  • रेल्वे मंत्र्यांनी काही नवीन ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे, हमसफर, तेजस, उदय आणि अंत्योदय.
  • आधुनिक सोयी सुविधानानी सज्ज अशी महामना एक्सप्रेस सुरु करण्याची घोषणा.
  • २०१६-१७ ह्या आर्थिक वर्षासाठी १.२१ लाख कोटींचे बजेट ठेवण्यात आले असून, त्यातील ४० हजार कोटी सरकारने मदत करावी असे त्यांचे मत आहे.
  • प्रवाशी डब्ब्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ५०% अधिक आरक्षण देण्याची कल्पना.
  • गूगल सोबत करार करून ह्यावर्षी १०० स्टेशनवरती येत्या २ वर्षांमध्ये ४०० स्टेशनवरती वाय-फाय सेवा सुरु करण्याचा प्रस्ताव.
  • ह्या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत १७००० शौचालये उपलब्ध करून देण्याची घोषणा.
  • पॅसेंजर ट्रेनची गती ८० किमी तासी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
  • दर १ मिनिटाला तब्बल ७२०० ई-टिकिट देण्याचे लक्ष्य समोर ठेवून सर्व्हरची क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव
  • प्रवाश्यांच्या अधिक सुरक्षेसाठी सर्व मोठया स्टेशनवरती होणाऱ्या सर्व घडामोडींवर सीसीटीवीने लक्ष ठेवले जाईल.
  • प्रवाश्यांच्या अधिक सेवेसाठी १३९ वरती फोन करून टिकिट कॅन्सल करण्याची सुविधा

No comments:

Post a Comment