Sunday 31 January 2016

इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू

पाच वर्षांतून एकदा देशाचे सर्वोच्च सेनाधिपती म्हणून राष्ट्रपतींकडून भारताच्या नौदल ताफ्याच्या संचालनाचे अवलोकन केले जाते. त्यास प्रेसिडेंशियल फ्लीट रिव्ह्यू म्हणतात. आपले नौदल सामर्थ्य जगाला दाखवून देण्यासाठी भारताने २००१ मध्ये त्यास अंतरराष्ट्रीय रूप दिले, जानेवारी २००१ मध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये २९ देशांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर आता ०४ - ०८ फेब्रुवारी  दरम्यान विशापट्टनम येथे भारताचा दूसरा इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू होत आहे. ह्या आधीचा फ्लीट रिव्ह्यू हा  जानेवारी २०११ मध्ये मुंबई येथे पार पडला होता.
जगभरातील ५२ देशांच्या नौदलांच्या वरिष्ठ दर्यावर्दिंनी भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे कूच केली आहे. यामध्ये भारताच्या युद्धनौकांसह अमेरिका, चीन, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया आदी बलाढ्य नौदलांच्या एकूण ९० युद्धनौका आणि २० हजार नौसैनिक बंगालच्या उपसागरातील आरमार नियोजनाच्या कसोटीत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

डिजीटल स्वरुप: यंदा इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूसाठी जगभरातील सर्व नोंदणी वेबसाइटच्या माध्यमातून करण्यात आल्या असून, या वेबसाइटवर व्हिडिओ, फोटो देण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment