५ ऑगस्ट २०१६ ला रिओ दी जनेरियोमध्ये ऑलम्पिक गेम्सचे उद्घाटन झाले त्याचप्रमाणे पहिल्यांदाच दक्षिण अमेरिकी देशांमध्ये ऑलिम्पिक गेम्स भरविण्यात आले आहेत. ह्या गेम्सबद्दल काही फैक्ट्स एंड नंबर्स
१०: रिओ ऑलिम्पिक गेम्सच्या ओपनिंग सेरेमनीचा बजट हा लंडन २०१२ ओपनिंग सेरेमनीच्या १० पट कमी होता.
१२,०००: ऑलिम्पिक मशालबाजांची संख्या, ऑलिम्पिक मशाल २६ ब्राझिलिअन राज्यांतून गेली असून ब्राझीलच्या ९०% लोकसंख्येतून पास झाली आहे.
१०,५००: खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
२८: खेळांचा रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये समावेश आहे.
२०६: देशांचे खेळाडू गेम्समध्ये सहभागी आहेत.
२,४८८: ऑलिम्पिक मेडल्स/पदक विविध खेळातील खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहेत. त्यामध्ये ८२१ सुवर्ण, ८१२ रौप्य आणि ८६४ कांस्य पदकांचा समावेश आहे.
१०: पहिल्यांदाच १० निर्वासित खेळाडू ऑलिम्पिक गेम्समध्ये सहभागी होत आहेत. १० पैकी ६ पुरुष आणि ४ महिला खेळाडू आहेत आणि सर्व ऑलिम्पिक फ्लैग अंतर्गत खेळणार आहेत.
१८,६६८: गुम हा देश रिओपासून १८,६६८ किमी दूर असून रिओ गेम्समध्ये सर्वात दूरहून खेळाडू पाठविणारा देश आहे.
५५५: रिओ गेम्समध्ये सर्वाधिक खेळाडू पाठविणारा देश 'अमेरिका ऑलिम्पिक टीम' २६३ पुरुष आणि २९२ महिला खेळाडू.
३९: सर्वात तरुण खेळाडू आणि सर्वात वयस्कर खेळाडू यांच्या वयातील फर्क. रिओ गेम्समध्ये सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडूचे वय १३ (गौरिका सिंह, नेपाळ) सर्वात वयस्कर खेळाडूचे वय ५२ (एक्वेस्ट्रियन फिलिप डटन, अमेरिका).
२. नवीन खेळांचा समावेश. ११२ वर्षांच्या खंडानंतर गोल्फचा पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे तर रग्बी सेवन हा पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेला खेळ आहे.
३,६०४: रिओ अथेलेटेस विलेजमध्ये असलेले अपार्टमेंट्स जे ११,००० खेळाडू आणि ६,००० प्रशिक्षकांसाठी घर असेल.
No comments:
Post a Comment