Saturday 30 July 2016

चालू घडामोडी : २६ जुलै

१. भारतीय रेल्वेने प्रवाश्यांना किती विमा देऊ केला आहे?
उत्तर - १० लाख रुपये, भारतीय रेल्वे कैटरिंग टूरिज्म कॉर्पोरेशन सप्टेंबर २०१६ पासून प्रवाश्यांना १ रुपये प्रीमियमवर १० लक्ष रुपये विमा देऊ करणार आहे. ह्यासाठी प्रवाश्यांना आईआरसीटीसीच्या वेबसाइटवरुन बुक करावी लागेल. जर ट्रेन अपघात झाला तर विम्याची ही रक्कम वैध टिकिटधारकाला दिली जाईल. टिकिट बुकिंग करताना हा विमा उतरविणे पर्यायी असेल.
२. कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त कुपोषित मुले आहेत, वॉटर ग्रिडचे सर्वेक्षण 'कॉट शॉर्ट - हाऊ लॅक ऑफ टॉयलेट्स एंड क्लीन वॉटर कंट्रीब्यूट टू मालनुट्रिशन?
उत्तर - भारत, वॉटर ग्रिडच्या सर्वेक्षणनुसार भारतामध्ये सर्वात जास्त कुपोषित मुलांची संख्या आहे. हा अहवाल वाटरएड ह्या अंतरराष्ट्रीय संस्थेने प्रकाशित केला आहे. ह्या अहवालानुसार भारतामध्ये तब्बल ४८ दशलक्ष लहान मुले कुपोषण किंवा अविकसित आहेत. भारताखालोखाल नाइजेरिया, पाकिस्तान, इंडोनेशिया, चीन, इथोपिया, बांग्लादेश, कांगो, फिलीपींस हे देश आहेत.
३. २०१६ च्या टिळक सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - शरद पवार, माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भारतीय हरितक्रांतीमध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना यंदाच्या टिळक सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार १ ऑगस्टला पुण्यात प्रदान केला जाईल. सन्मानचिन्ह आणि १ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप असेल.
४. कैरो येथे पार पडलेल्या अंतरराष्ट्रीय अरेबिक सुंदरहस्ताक्षर स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीयाला दूसरे बक्षीस मिळाले आहे?
उत्तर - मुख्तार अहमद, भारतीय सुलेखक मुख्तार अहमद यांना कैरो येथे पार पडलेल्या अंतरराष्ट्रीय अरेबिक हस्ताक्षर स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमकाचे क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. ह्या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये पूर्ण जगातून ११५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रथम पारितोषिक इजिप्तच्या खालिद मोहम्मद याला मिळाले. ह्या स्पर्धेचे उद्दिष्ट नव्याने कलाकार घडविणे आणि नवीन जेनेरेशनला सार्वजानिक शोज आणि कार्यशाळेमधून कलेची जिज्ञासा करून देणे.
५. राष्ट्रीय म्यूजियमच्या महासंचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - डॉ. बुधा रश्मी मणि, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या माजी अधिकारी डॉ. बुधा रश्मी मणि यांची राष्ट्रिय म्यूजियमच्या महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्या पुढील तीन वर्षे म्हणजेच वयाची ७० वर्षे पूर्ण होईपर्यंत ह्या पदाचा कार्यभार संभाळणार आहेत. राष्ट्रीय म्यूजियम भारतातील सर्वात मोठे म्यूजियम असून राष्ट्रीय म्यूजियममध्ये जवळपास दोन लाख भारतीय आणि विदेशी वस्तुंचा समावेश आहे. म्यूजियममध्ये ५००० वर्ष जुन्या वस्तू देखील आहेत.
६. 'हाऊ टू बी अ बॉस: अ गाइड टू सर्वाइविंग कांकेरिंग लाइफ' पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - लिली सिंग, हाउ टू बी अ बॉस: अ गाइड टू सर्वाइविंग कांकेरिंग लाइफ पुस्तकाची लेखक भारतीय वंशाची कैनेडियन यू ट्यूब स्टार लिली सिंग आहे. तिने आपल्या पुस्तकात तिच्या जीवनातील सत्य आणि विनोदी घटना लिहल्या आहेत. खरया आयुष्यामध्ये बॉस बनायचे असेल तर मेहनत करावी लागते आणि यश मिळविण्यासाठी कोणतेही शॉर्ट कट्स नसतात हे ह्या पुस्तकामध्ये तिने आवर्जून नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment