Friday 15 July 2016

चालू घडामोडी : ९, १० जुलै

१. कृषी केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कोणते वेब पोर्टल सुरु केले आहे?
उत्तर - कृषी विज्ञान केंद्र, भारताचे कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये कृषी केंद्रांवर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र ही वेब पोर्टल सुरु केली. ही पोर्टल ६४५ कृषी केंद्रांवर लक्ष ठेवून असेल. कृषी विज्ञान केंद्र शेतकर्यांना शेतीबाबत नवीन योजना, हवामान बदल, बाजार विकास, शेतकर्यांना विविध विषयांवर सल्ला पुरवेल.
२. अब्दुल सत्तार ईधी यांचे नुकतेच निधन झाले ते नावाजलेले समाजसेवक असून ते कोणत्या देशाचे होते?
उत्तर - पाकिस्तान, अब्दुल सत्तार ईधी पाकिस्तानातील प्रसिध्द मानवतावादी आणि समाजसेवक होते त्यांचे नुकतेच कराची मध्ये निधन झाले ते ९२ वर्षांचे होते. ते पाकिस्तानातील ईधी फाउंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख होते. ईधी फाउंडेशन पाकिस्तानामध्ये मोफत समाजसेवेचे काम करते उदा. एम्बुलैंस, अनाथालये, वृद्ध आणि अपंगाना मोफत सेवा सुविधा देते.
३. अमली पदार्थांची तस्करी, खेळ आणि कडधान्य ट्रेडिंगसाठी भारताने कोणत्या अफ्रीकन देशासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - मोजांबिक, भारताने मोजांबिकसोबत तीन सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे त्यामध्ये अमली पदार्थांची तस्करी, खेळ आणि कडधान्य ट्रेडिंग असे तीन करार आहेत. ह्या करारानुसार मोजांबिक तूर डाळ उत्पादनावर भर देणार असून हा संपूर्ण तूर भारतामध्ये आयात केला जाईल. त्याचप्रमाणे अमली पदार्थांच्या तस्करीवर बंधण घालणे आणि खेळांना प्राधान्य देणे.
४. वर्ल्ड बँक एनर्जी इफिशिएंसी इनिशिएटिवसाठी कोणत्या भारतीय बँकेने सिडबीसोबत करार केला
आहे?
उत्तर - येस बँक, स्मॉल इंडस्ट्रीज डेवलपमेंट ऑफ इंडिया अर्थातच सिडबीने येस बँकेसोबत लहान उद्योगांना अर्थ सहाय्य करण्यासाठी  करार केला आहे.
५. "ऐस अगेंस्ट ऑड्स' हे कोणत्या भारतीय टेनिस खेळाडूचे आत्मचरित्र आहे?
उत्तर - सानिया मिर्झा, ऐस अगेंस्ट ऑड्स हे सानिया मिर्झाचे आत्मचरित्र असून तिने तिचे वडील इम्रान मिर्झा यांच्यासोबत शब्दांकित केले आहे. तिने आपल्या आत्मचरित्रमध्ये आयुष्यामध्ये आलेले सर्व उतार चढाव त्याचप्रमाणे आनंदी आणि दुःखी क्षण यांचे वर्णन केले आहे. खेळाच्या मैदानामध्ये आणि मैदानाबाहेर खेळाडुंसोबत असलेले संबंध त्याचप्रमाणे एक साधारण खेळाडू ते उत्कृष्ट खेळाडू बनण्याचा प्रवास हयात नमूद केला आहे.
६. राष्ट्रीय ई-विधान अकॅडमी कोणत्या भारतीय राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे?
उत्तर - हिमाचल प्रदेश, राष्ट्रिय ई-विधान अकॅडमी भारतातील हिमाचल प्रदेश मधील तपोवनमध्ये उभारण्यात येणार असून ह्याच ठिकाणी म्हणजेच धर्मशाळामध्ये हिमाचल प्रदेशची विधानसभा आहे. ही अकॅडमी भारतातील विविध राज्यांतून येणार्या आमदार आणि खासदारांना प्रशिक्षित करेल.

No comments:

Post a Comment