ख़त उद्योग:
- नायट्रोजन, फॉस्फरस, पोटेशियम हे रासायनिक खतातील तीन प्रमुख घटक आहेत
- भारतात नेत्रयुक्त खते, मिश्र खते, युरिया व उप-उत्पादक म्हणून अमोनियम सल्फेट या खतांचे उत्पादन होते
- भारतात सार्वजनिक क्षेत्रातील पहिला खत कारखाना झारखण्डमधील सिंद्री येथे १९५१ मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेत उभारण्यात आला
- भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील खत प्रकल्पांसाठी ९ सार्वजनिक निगम कार्यरत आहेत
९ निगम पुढीलप्रमाणे:
- फर्टिलायझर कारपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड - १९६१ ला स्थापन, सिंद्री (झारखण्ड), गोरखपुर (उ. प्रदेश), तालचेर (ओडिसा), रामागुंडम (आंध्र प्रदेश) या ४ प्रकल्पावरती देखरेख
- हिंदुस्तान फर्टिलायझर कारपोरेशन लिमिटेड - १९७८ ला स्थापन, दुर्गापुर, हल्दिया (प. बंगाल), नामरूप (आसाम), बरौनी (बिहार) या ४ प्रकल्पावरती देखरेख
- पाइराइट्स एंड फॉस्फेट केमिकल्स लिमिटेड - १९६० ला स्थापन, अंजोर (बिहार), सालदीपुर (राजस्थान), देहरादून (उत्तरांचल) या ३ प्रकल्पावरती देखरेख
- राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स - १९७८ ला स्थापन, मुंबई व थल प्रकल्पावरती देखरेख
- नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड - १९७८ ला स्थापन, भटिंडा व पानीपत (पंजाब) प्रकल्पावरती देखरेख
- प्रोजेक्ट्स एंड डेवलपमेंट इंडिया लिमिटेड - १९७८ ला स्थापन, डिजाइनिंग, इंजेनेरिंग, तपासणी, देखरेख ही कामे ही संस्था करते
- फर्टिलायझर्स एंड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड - १९७८ ला स्थापन, कोचीनमध्ये २ प्रकल्पावरती देखरेख
- मद्रास फर्टिलायझर्स लिमिटेड - १९६६ ला स्थापन, चेन्नईमध्ये प्रकल्प असून तो इतर प्रकल्पांना अमोनिया पुरवितो
- अरावली जिप्सम एंड मिनरल्स इंडिया लिमिटेड, जोधपुर - इतर प्रकल्पांसाठी जिप्सम पुरविण्यासाठी
कागद उद्योग:
- भारतातील पहिली कागद गिरणी - सेहरापुर (प. बंगाल) १८३२
- विस्तार - मध्यप्रदेश, महाराष्ट्र, झारखण्ड, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश
- महाराष्ट्रातील चंद्रपुर व नागपूर कागद गिरण्यांसाठी प्रसिद्ध
No comments:
Post a Comment